Mumbai Maharashtra News Updates, 09 September 2024 : विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध मतदारसंघात नेत्यांचे दौरे वाढले आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून विविध मतदारसंघाचा आढावा आणि उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. तसेच महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षात जागावाटपासंदर्भात खलबतं सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये धुसफूस सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आज अमित शाह लालबागच्या राजाचं राजाचे दर्शन घेणार आहेत. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा महत्वाचा मानला जात आहे. यासह राज्यातील आणि देशभरातील राजकीय व सामाजिक घडामोडी येथे जाणून घ्या…

Live Updates

Maharashtra News Live Today, 09 September 2024

20:00 (IST) 9 Sep 2024
दोन मुलींवर पित्याकडून लैंगिक अत्याचार; वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबईः दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली वर्सोवा पोलिासांनी ५२ वर्षीय व्यक्तीविरोधात बलात्कार व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्या (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार मुलगी सध्या अनाथाश्रमात राहत असून तिने नुकतीच याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली.

सविस्तर वाचा

19:43 (IST) 9 Sep 2024
अर्ज करूनही ‘आरटीई’मध्ये अद्यापही प्रवेश मिळाला नसेल तर हे करा, शेवटची संधी

नागपूर : मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयंअर्थसहाय्यित शाळा, खाजगी विनाअनुदानित व खाजगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये (अल्पसंख्याक शाळा वगळून) २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत ७३ हजार ६१२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, अद्याप ३१ हजारांहून अधिक जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे.

सविस्तर वाचा

19:32 (IST) 9 Sep 2024
शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे मिळावे यासाठी पुणे येथील कृषी आयुक्तांच्या कार्यालयावर मोर्चा

कर्जत : राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे तात्काळ मिळावे या मागणीसाठी स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आज पुणे येथील कृषी आयुक्तांच्या कार्यालयावर मोर्चा काढला.

महात्मा गांधी पुतळ्या पासून मोर्चाला सुरुवात झाली व अलंकार टॉकीज, साधू वासवानी चौक मार्गे सेंट्रल बिल्डिंग येथील कृषी आयुक्त कार्यालयासमोर शेतकरी मोर्चाने गेले. मोर्चा अडवल्या नंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.

19:31 (IST) 9 Sep 2024
प्रवीण दरेकरांना लोणावळ्यात पाय ठेऊ देणार नाही; शरद पवार गटाचा इशारा

लोणावळा : शरद पवार यांच्यावर आमदार प्रवीण दरेकर यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी शरद पवार गटाने उत्तर दिलं आहे. लोणावळ्यात आमदार प्रवीण दरेकर यांना पाऊल ठेवू देणार नाही. असा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लोणावळा शहराध्यक्ष नासिर शेख यांनी हा इशारा दिला आहे.

शरद पवार यांनी आज मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्यावर भाजपकडून टीका करण्यात आली. शरद पवार हे ढोंगीपणा करत असल्याची टीका आमदार प्रवीण दरेकर यांनी केली. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

19:15 (IST) 9 Sep 2024
तोतया पोलीस अधिकाऱ्यांनी अटकेची भीती दाखवून लुटले; खारमध्ये गुन्हा दाखल

मुंबईः गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे भासवून व्यावसायिकाकडील ५ लाख रुपये घेऊन पलायन केलेल्या दोघांविरोधात खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस तपास करत आहेत.वांद्रे परिसरात राहणारे तौसिफ शेख (३७) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तक्रारीनुसार, शेख हे वकील असून त्यांच्या नातेवाईकांच्या मालकीची पर्यटन व्यवसाय संस्था आहे. तेथेविमान तिकीटे, रेल्वे तिकीटे, पैसे हस्तांतरीत करण्याचे कामकाज चालते.

सविस्तर वाचा

18:42 (IST) 9 Sep 2024
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ सप्टेंबरला नागपुरात! वंदे भारत एक्सप्रेला…

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर ते सिकंदराबाद दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ही गाडी मंगळवार वगळता दररोज धावणार आहे. सध्या नागपूरला पोहोचण्यासाठी प्रवासाला ८ तास लागतात; मात्र, नवीन वंदे भारत एक्स्प्रेसला ७ तास १५ मिनिटे लागतील.

सविस्तर वाचा....

18:34 (IST) 9 Sep 2024
गणराया ‘सार्वजनिक आरोग्य व्यवस्था’ होऊ दे ‘लाडकी’!

मुंबई: राज्यातील महायुती सरकारकडून ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा सध्या प्रचंड गाजावाजा सुरु असून यावर होणाऱ्या खर्चाच्या एक दशांश खर्च जरी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर करण्यात आला तर सार्वजनिक आरोग्य सेवा लाखो गोरगरीब रुग्णांसाठी ‘लाडकी’ बनू शकेल असे आरोग्य क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

सविस्तर वाचा

17:15 (IST) 9 Sep 2024
अपघात होऊन अर्धा तास झाला, पण कोणीही मदतीला आले नाही; घोडबंदर मार्गावर दुचाकीस्वाराचा अपघात, मित्राचा मृत्यू

ठाणे : घोडबंदर मार्गावरील वाहतुक कोंडीमुळे नागरिक अक्षरश: मेटाकुटीला आले असतानाच, या मार्गावर अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. या अपघातात प्रवेश राठोड (२७) यांचा मृत्यू झाला आहे. तर, त्यांचा मित्र सुरेंद्र गुप्ता (२६) हा गंभीर जखमी झाले. अवजड वाहनांच्या बेदरकार वाहतुकीमुळे होणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सविस्तर वाचा

16:57 (IST) 9 Sep 2024
कृत्रिम तलावांमध्ये गणपती विसर्जन करणाऱ्या गणेश भक्तांचा आयुक्तांच्या हस्ते सन्मान, जलप्रदूषण रोखण्यासाठी कडोंमपाचा उपक्रम

अधिकाधिक भाविकांनी पालिकेने निर्माण केलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणपती विसर्जन करावे, हा या उपक्रमा मागील मुख्य उद्देश आहे.

सविस्तर वाचा...

16:51 (IST) 9 Sep 2024
नागपूरच्या प्रसिद्ध सक्करदरा तलाव परिसर सर्वसामान्यांसाठी असुरक्षित, काय आहेत कारणे?

नागपूर : सक्करदरा तलावाच्या बाजूच्या परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा वावर वाढल्याने परिसरातील वस्तीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तलावातून काढलेला गाळ बाजूला टाकला असून त्याचे ढिगारे तयार झाले आहे. त्यावर बसून अनेक युवक दारू, गांजा व अंमली पदार्थांचे सेवन करताना आढळतात. मात्र, पोलिसांचे याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सविस्तर वाचा...

16:24 (IST) 9 Sep 2024
कल्याणमध्ये वर्दळीच्या रस्त्यांवर वाहने उभी करणाऱ्या वाहन मालकांवर कारवाई

वाहन कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची दमछाक होते. या वर्दळीच्या रस्त्यांवर अनेक वाहने अनेक महिने एकाच जागी उभी आहेत.

सविस्तर वाचा...

16:23 (IST) 9 Sep 2024
MPSC Update: ‘एमपीएससी’ राज्यसेवा परीक्षेच्या तारखेसंदर्भात मोठी अपडेट, बैठकीमध्ये निर्णय होताच...

नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २५ ऑगस्टला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा रद्द करण्याला पंधरा दिवस उलटल्यानंतरही परीक्षेची तारीख जाहीर न झाल्याने विद्यार्थी आता आक्रमक झाले आहेत. तारखे अभावी विद्यार्थ्यांचे संपूर्ण नियोजन कोलमडल्याने काहींनी आयोगाच्या अशा दिरंगाई विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला, तर सोमवारी ‘टि्वटर’ माेहीम राबवत आयोगाने तारीख जाहीर करावी अशी मागणी केली आहे.

सविस्तर वाचा

16:20 (IST) 9 Sep 2024
"आम्हाला १०० जागा द्यायला पाहिजेत", जागा वाटपाबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

राज्यात विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षात जागावाटपासंदर्भात खलबतं सुरु आहेत. महायुतीमधील सर्वच पक्षाने आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवरच शिवसेना शिंदे गटाचे नेते, मंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, "निवडणुकीच्या अनुषंगाने पाहिलं तर ही सर्वांनीच आपल्या वेगवेगळ्या मागण्या सुरु केलेल्या आहेत. मात्र, आम्हाला १०० जागा द्यायला पाहिजेत. त्यामधून आम्ही ८० जागा निवडूण आणू", अशी मागणी अब्दुल सत्तार यांनी केली आहे. ते टिव्ही ९ मराठीशी बोलत होते.

16:09 (IST) 9 Sep 2024
डोंबिवलीतील व्यावसायिकाची ५६ लाखांची फसवणूक

डोंबिवलीतील एका व्यावसायिकाची तीन भामट्यांनी ५६ लाख ६४ हजार रूपयांची फसवणूक केली आहे.

सविस्तर वाचा...

16:00 (IST) 9 Sep 2024
गणेशोत्सवाच्या तिसऱ्याच दिवशी सोन्याचे दर… चिंता वाढली !

नागपूर: श्री गणेशाच्या आगमणाच्या पहिल्याच दिवशी शनिवारी नागपूरसह राज्यभरात सोन्याच्या दरात घसरण झाली होती. परंतु आता हळू- हळू दर वाढताना दिसत आहे. गणेशोत्सवाच्या तिसऱ्याच दिवशी सोन्याच्या दरात किंचित वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. दरम्यान नागपुरातील सराफा व्यवसायिकांकडून मात्र लवकरच सोन्याच्या दरात आणखी वाढीचे संकेत दिले जात आहे.

सविस्तर वाचा....

15:43 (IST) 9 Sep 2024
Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विदर्भात धुसफूस, ‘हे’ आहे कारण

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह आपल्या गटाकडे राखण्यास यशस्वी झालेल्या अजित पवार यांना राज्यात पक्षाची शक्ती टिकवून ठेवण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहेत. त्यातच आता विदर्भातील राष्ट्रवादीच्या (अजित पवार) सर्व दहा जिल्हाध्यक्षांमध्येही धुसफूस दिसून येऊ लागली आहे.

सविस्तर वाचा....

15:26 (IST) 9 Sep 2024
महावितरणला थकबाकीचा ‘झटका’

अकोला : कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित (पी.डी.) ग्राहकांकडे थकबाकीचा आकडा अवाढव्य वाढला. ‘पी.डी.’ ग्राहकांनी महावितरणला थकबाकीचा झटका दिला असून मराठवाड्यातील या प्रकारच्या ग्राहकांकडे सर्वाधिक थकीत रक्कम आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील ‘पी.डी.’ ग्राहकांकडे देखील मोठी थकबाकी आहे. अभय योजनेतून वसुली करण्याचे आव्हान महावितरणपुढे आहे.

सविस्तर वाचा....

15:25 (IST) 9 Sep 2024
पुणे: भरधाव मोटारीच्या धडकेत महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

अपघातात दुचाकीस्वार तरुण जखमी झाला. याप्रकरणी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सविस्तर वाचा...

15:16 (IST) 9 Sep 2024
पुणे: पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे तरुणीची आत्महत्या

पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागातील भेकराईनगर परिसरात घडली.

सविस्तर वाचा...

14:22 (IST) 9 Sep 2024
"राज्याचे कृषीमंत्री सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न", संभाजीराजे छत्रपतींची धनंजय मुंडेंवर टीका

"राज्याचे कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर आलेले नाहीत. कृषीमंत्री धनंजय मुंडे हे शेतकऱ्यांच्या बांधावर यायचं सोडून बीडला सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न आहेत. हे राज्याचे कृषीमंत्र्यांना शोभतं का? त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली पाहिजे", अशी टीका माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

14:00 (IST) 9 Sep 2024
बदलापूर: ‘त्या’ माध्यम प्रतिनिधीला जामीन मंजूर, वकील संघटनांचा पुढाकार, अन्य आरोपींनाही जामीन

बदलापुरातील एका शाळेतील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर बदलापुरातील नागरिकांनी उत्स्फुर्त आंदोलन केले.

सविस्तर वाचा...

13:52 (IST) 9 Sep 2024
अबब! सात धरणं तुडुंब तर उर्वरित १०० टक्क्यांकडे…विक्रमी जलसाठा

वर्धा: सलग ४० दिवस जिल्ह्यात  संततधार  पडली. त्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र होते. तसेच शेतात पाणी साचल्याने हजारो हेक्टरवरील पिके वाया गेली आहे. थांब रे बाबा आता, अशी विनवणी शेतकरी करीत असल्याचे पाहायला मिळते. मात्र रविवारी रात्री काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली असून आज सकाळपासून ढगाळ वातावरण दाटून आले आहे.

सविस्तर वाचा

13:43 (IST) 9 Sep 2024
कल्याण मध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा अटकेत

पोलिसांनी सांगितले, गेल्या महिन्यात आरोपी रमेश यादव हा पीडित मुलीच्या घरी पाहुणा म्हणून राहण्यास आला होता.

सविस्तर वाचा...

13:24 (IST) 9 Sep 2024
केरळी वाद्य ‘चेंदा मेलम’च्या वादनाने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अभिवादन

केरळी वाद्य 'चेंदा मेलम' वादनाने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अभिवादन करण्यात आले.

सविस्तर वाचा...

13:23 (IST) 9 Sep 2024
वडेट्टीवार यांना पराभूत करा, कॉंग्रेस खासदाराचे अप्रत्यक्ष आवाहन

चंद्रपूर : ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ असो की गडचिरोली, या दोन्ही ठिकाणी अल्पसंख्यांक समाजाचे लोक प्रतिनिधित्व करीत आहेत. ही परंपरा आता खऱ्या अर्थाने बदलण्याची वेळ आली आहे, असे म्हणत काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर व भाजप आमदार परिणय फुके यांनी कॉंग्रेस नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नाव न घेता त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्याचे आवाहन कुणबी महाधिवेशनात केले.

सविस्तर वाचा....

13:05 (IST) 9 Sep 2024
माऊंट मेरी जत्रेनिमित्त बेस्टच्या १२१ जादा बस

यात्रेकरू मोठ्या प्रमाणावर वांद्रे स्थानक (प) येथे लोकलने येऊन तेथून बेस्टच्या बसने प्रवास करतात.

सविस्तर वाचा...

12:49 (IST) 9 Sep 2024
"ट्रिपल इंजिन सरकारमध्ये कामं होतं नाहीत, असं...", सुप्रिया सुळेंची महायुतीवर टीका

"महायुती सरकारमध्ये कोणतीही फाईल गोगलगाईप्रमाणे चालते. हा शब्द देवेंद्र फडणवीस यांचा आहे, माझा नाही. म्हणजे हात लागल्याशिवाय या सरकारमध्ये फाईल पुढे जात नाही. देवेंद्र फडणवीस यांनी ही कबुली दिली आहे. ट्रिपल इंजिन सरकारमध्ये कामं होतं नाहीत, फाईल पुढे जात नाहीत", असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

12:44 (IST) 9 Sep 2024
Video: वाशी रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेने वाचले प्रवाशाचे प्राण, घटना सीसीटीव्हीत कैद….

प्रवाशाला दुखापत झाली असेल म्हणून त्याची विचारणा केली, मात्र मला काही झाले नाही सांगत तो निघून गेला.

सविस्तर वाचा...

11:58 (IST) 9 Sep 2024
मैत्रिणीकडून गुंगीचे औषध, मित्रांकडून बलात्कार; बदलापुरातील खळबळजनक घटना, आरोपी अटकेत

तीन दिवसांपूर्वी भूमिकाने आपल्या मैत्रिणीला वाढदिवसासाठी घरी बोलावले होते. त्याचवेळी तिच्या दोन मैत्रांनाही वाढदिवसासाठी पाचारण केले होते.

सविस्तर वाचा...

11:57 (IST) 9 Sep 2024
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या या दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे. आज गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं. यानंतर आता अमित शाह यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आज अमित शाह लालबागच्या राजाचं राजाचे दर्शन घेणार आहेत. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

Maharashtra News Live Update in Marathi

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, (फोटो-संग्रहित छायाचित्र)