Mumbai Maharashtra News Updates, 09 September 2024 : विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध मतदारसंघात नेत्यांचे दौरे वाढले आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून विविध मतदारसंघाचा आढावा आणि उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. तसेच महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षात जागावाटपासंदर्भात खलबतं सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये धुसफूस सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आज अमित शाह लालबागच्या राजाचं राजाचे दर्शन घेणार आहेत. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा महत्वाचा मानला जात आहे. यासह राज्यातील आणि देशभरातील राजकीय व सामाजिक घडामोडी येथे जाणून घ्या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

Maharashtra News Live Today, 09 September 2024

11:51 (IST) 9 Sep 2024
“बॉम्बेचं मुंबई करण्यात तुमचं योगदान असेल, तर…”; ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल!

दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी बोलताना, त्यांनी, बॉम्बे नको मुंबई हवी, अशी मागणी झाली, तेव्हा मीदेखील ही मागणी करणाऱ्यांमध्ये होतो, असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही भाष्य केलं आहे.

सविस्तर वाचा

11:23 (IST) 9 Sep 2024
पंतप्रधान मोदी २० ला वर्धेत! देशभरातून २० हजार ‘विश्वकर्मा’ हजेरी लावणार

वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वर्धा दौरा आता १९ नव्हे तर २० सप्टेंबरला होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर तयारी सुरू केली आहे.

सविस्तर वाचा….

11:23 (IST) 9 Sep 2024
सायबर गुन्हेगारांचा फसवणुकीचा नवा प्रकार.. काय आहे ‘कुरिअर स्कॅम’?

नागपूर : सणासुदीच्या दिवसांत राज्यात सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय झाल्या असून त्यांनी फसवणुकीचा नवा प्रकार शोधून काढला आहे.

सविस्तर वाचा….

11:18 (IST) 9 Sep 2024
शरद पवार लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी दाखल

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत. तसेच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी थोड्याच वेळात केंद्रीय ग्रृहमंत्री अमित शाह हे देखील दाखल होणार आहेत.

https://platform.twitter.com/widgets.js
11:12 (IST) 9 Sep 2024
पुणे: घोरपडे पेठेतील गुंड जंगल्या सातपुतेचा खुनाचा कट उधळला, एन्जॉय ग्रुपच्या सातजणांना अटक; सात पिस्तुलांसह २३ काडतुसे जप्त

शंकरशेठ रस्ता परिसरातील एका हाॅटेलमध्ये स्वारगेट भागातील गुंड कुणाल पोळ याचा पाच ‌वर्षांपूर्वी खून झाला होता.

सविस्तर वाचा…

10:56 (IST) 9 Sep 2024
पुणे: मद्यधुंद टेम्पो चालकाने सात ते आठ वाहनांना दिली धडक, दोघे जण जखमी

Pune Paud Road Accident: कोथरूड येथील करिश्मा सोसायटीच्या बाजूने टेम्पो चालक भरधाव वेगाने सावरकर पुलाच्या दिशेने निघाला होता.

सविस्तर वाचा…

10:56 (IST) 9 Sep 2024
अमित शाहांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी घेतलं बाप्पाचं दर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. सध्या गृहमंत्री अमित शाह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. यानंतर अमित शाह हे लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत.

10:37 (IST) 9 Sep 2024
“…तर हिशोब होणार”, मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा

“मराठा समाजाचं काम करणाऱ्या एका तरुणाचं अपहरण करुन नेण्यात आलं आणि त्याला मारहाण केली असल्याची माहिती मला समजली. आता हे खरं आहे की खोटं आहे, याबाबत सध्या मला अधिक माहिती नाही. असं झालं असेल तर त्या तरुणाच्या डोळ्यात पाणी आलं असेल. जर असं झालेलं असेल तर त्या तरुणाच्या डोळ्यात आलेल्या पाण्याचा हिशोब होणार, त्या तरुणाच्या डोळ्यातील अश्रूंचा बदला म्हणून तुमचं सरकार घालवल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा मनोज जरांगे यांनी सोलापूरमध्ये बोलताना दिला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आज अमित शाह लालबागच्या राजाचं राजाचे दर्शन घेणार आहेत. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, (फोटो-संग्रहित छायाचित्र)