Mumbai Maharashtra News Updates, 12 September 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकारण तापलं आहे. सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मतदारसंघाच्या मोर्चेबांधणीसाठी सध्या अनेक नेते राज्यात विविध ठिकाणी दौऱ्यावर आहेत. एकीकडे महायुतीचे नेते सभा घेत आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्याही सभा सुरु आहेत. या सभांच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच नागपूरमधील हिट अँन्ड रन प्रकरणावरून राजकारण तापलं आहे. तसेच सध्या राज्यभरात गणेशोत्सव उत्सहात सुरु आहेत. यासह सर्व राजकीय घडामोडींवर आपलं या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून लक्ष असेल. राज्यातील आणि देशभरातील राजकीय व सामाजिक घडामोडी येथे जाणून घ्या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra News Today, 12 September 2024

20:18 (IST) 12 Sep 2024
गडचिरोली : “राष्ट्रवादीतील फुटीनंतर भाग्यश्री आत्राम शरद पवारांच्या संपर्कात,”जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट

गडचिरोली : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यांच्यासोबत मंत्री धर्मरावबाबा आत्राम देखील महायुतीत सामील झाले. त्यांचा हा निर्णय न पटल्याने भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार यांची भेट घेत मनातील खदखद बोलून दाखवली होती.

सविस्तर वाचा…

19:42 (IST) 12 Sep 2024
नाशिक :काँग्रेस सेवादलातर्फे स्मार्ट सिटीच्या कामांविरोधात आंदोलन

नाशिक : शहराचा रखडलेला विकास, स्मार्ट सिटी योजनेच्या कामांचा केवळ गवगवा, याकडे लक्ष वेधण्यासाठी शहर काँग्रेस सेवादलाच्या वतीने शहरात चार फूट दुर्बिणींने चला शोधूया स्मार्ट नाशिक हे अनोखे आंदोलन करण्यात आले.

सविस्तर वाचा…

18:12 (IST) 12 Sep 2024
बुलढाणा : मानव-वन्यजीव संघर्ष; तब्बल पाच बिबट जेरबंद…

बुलढाणा : बुलढाणा तालुक्यात अजिंठा पर्वतरांगा आहेत. या अजिंठा पर्वतावर गिरडा हे गाव वसले आहे. गावाला वेढा घातलेल्या दाट आणि विस्तीर्ण जंगलात बिबट, अस्वल, सारख्या वन्य प्राण्यांचे गावकऱ्यांना नेहमीच दर्शन होते. यामुळे रात्री उशिरा शेताकडे वा दूर जाण्याचे गावकरी कटाक्षाने टाळतात.

सविस्तर वाचा…

18:00 (IST) 12 Sep 2024
राज्यात साथीच्या आजारांनी वर्षभरात ६८ जणांचे मृत्यू , स्वाइन फ्लू, डेंग्यूचे सर्वाधिक बळी

मुंबई : राज्यात विविध आजारांनी या वर्षभरात ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये स्वाइन फ्लूने सर्वाधिक ३९ जणांचा मृत्यू झाला असून डेंग्यूने १७ जणांचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर वाचा…

17:58 (IST) 12 Sep 2024
वसई विरार पालिकेचा कृत्रिम तलावांचा प्रयोग यशस्वी, ५ व्या दिवशी ६६% मूर्तींचे विसर्जन

वसई- वसई विरार महापालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. बुधवारी शहरात ५ दिवसांच्या एकूण ७ हजार ५०८ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. त्यापैकी ४ हजार ९८१ गणेश मूर्तींचे म्हणजेच ६६.३४ टक्के विसर्जन कृत्रिम तलावात झाले.

17:57 (IST) 12 Sep 2024
वर्धा : सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींची अन् संतप्त मात्र कराळे गुरुजी! काय आहे कारण?

वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा २० सप्टेंबरला वर्ध्यात होत आहे. केंद्र शासनाच्या विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांसाठी चेक व साहित्याचे वाटप त्यांच्या हस्ते होणार आहे.

सविस्तर वाचा….

17:36 (IST) 12 Sep 2024
पुणे: एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने ५० हजारांचा गंडा

एटीएम केंद्रामधून रक्कम काढून देण्याच्या बहाण्याने चोरट्याने हातचलाखी करीत एकाला ५० हजार रुपयांचा गंडा घातला आहे.

सविस्तर वाचा…

17:33 (IST) 12 Sep 2024
मुंबईः लैंगिक अत्याचाराचे चित्रीकरण करून खंडणीची मागणी

मुंबईः महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करून त्याचे चित्रीकरण वायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

सविस्तर वाचा…

17:13 (IST) 12 Sep 2024
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करताच भाग्यश्री आत्राम यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. भाग्यश्री आत्राम यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील प्रवेशामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. या प्रवेशानंतर बोलताना भाग्यश्री आत्राम यांनी म्हटलं की, मी माझ्या भाषणात माझं मत मांडलं आहे. मी इकडे का पक्ष प्रवेश केला? तेही सांगितलं आहे. तसेच वडीलांच्या विरोधात निवडणूक लढणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असता भाग्यश्री आत्राम यांनी हो असं मोजक्या शब्दांत उत्तर दिलं.

17:11 (IST) 12 Sep 2024
साक्षात ‘विघ्नहर्ता’ मंडपात, तरीही चोरट्यांनी साधला डाव

नागपूर : गणपतीला ’विघ्नहर्ता’म्हणून पुजले जाते. अनेक जण त्यांच्यावरील संकट दूर व्हावे म्हणून श्रीगणेशाला साकडेही घालतात. श्रद्धेपोटी काही दानही करतात. त्यासाठी मंडपात दान पेट्या ठेवलेल्या आहेत. अशीच एक दानपेटी महाल भागातील एका गणेश मंडळाच्या मंडपात ठेवण्यात आली होती, तेथे चोरट्यांनी डाव साधला.

सविस्तर वाचा….

17:02 (IST) 12 Sep 2024
१,४३८ कोटींचे बँक फसवणूक प्रकरण: ईडीकडून ४३ कोटींच्या मालमत्तेवर टाच

मुंबई: बँक समुहाची १,४३८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) ४३ कोटी ५२ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली.

सविस्तर वाचा…

16:49 (IST) 12 Sep 2024
कल्याणमध्ये अ. भा. गौ रक्षा महासंघाच्या कार्यकर्त्याचे अपहरण करून तबेल्यात बेदम मारहाण, जिवंत गाडून टाकण्याची आरोपींची धमकी

गोमांस असलेला टेम्पो पोलिसांना पकडून दिला, या रागातून दोन भावांनी टेम्पो पकडून देणाऱ्या अखिल भारतीय गौ रक्षा महासंघाच्या एका कार्यकर्त्याचे मंगळवारी अपहरण केले.

सविस्तर वाचा…

16:34 (IST) 12 Sep 2024
बापरे, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या नावानेही फसवणूक

नागपूर : एकविसाव्या शतकाला तंत्रज्ञानाचे युग समजले जाते. या शतकाच्या सुरुवातीच्या दोन दशकातच मानवाने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली. मात्र तंत्रज्ञान जितक्या वेगाने प्रगती करत आहे, तितक्याच वेगाने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणारे गुन्हे वाढत आहेत.

सविस्तर वाचा….

16:20 (IST) 12 Sep 2024
नागपूर ‘हिट अ‍ॅण्ड रन’मुळे चर्चेत आलेल्या लाहोरी बारवर वरदहस्त कुणाचा?

नागपूर : नागपुरातील धरमपेठमसारख्या उच्चभ्रूंच्या वस्तीत असलेला लाहोरी बार हा नेहमीच गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये झालेल्या वादामुळे चर्चेत राहत आला आहे. सध्या राज्यभर गाजत असलेल्या हिट अ‍ॅण्ड रन अपघात प्रकरणातील आरोपी याच बारमधून बाहेर पडले होते, त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सविस्तर वाचा….

16:02 (IST) 12 Sep 2024
“आमचं सरकार आल्यास लाडक्या बहिणींना तीन हजार देणार”, संजय राऊतांचं मोठं विधान

“लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांनी घ्यावेत. हे पैसे कोणाच्या खिशातून जात नाहीत. हे पैसे सरकारचे आहेत, तुमच्या आमच्या करातील हे पैसे आहेत. मग ते पैसे आपल्याला मिळत असतील तर बहि‍णींनी ते पैसे घेतले पाहिजेत. आता दोन महिन्यांनी आमचं (महाविकास आघाडीचं) सरकार येणार आहे. त्यावेळी या १५०० रुपयांचे तीन हजार झाल्याशिवाय राहणार नाहीत”, असं मोठं विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

15:59 (IST) 12 Sep 2024
बुलढाणा : पोहोताना तिघे मित्र बुडाले! दोघे बचावले, एकाचा मृत्यू

बुलढाणा : मित्रांसह पोहायला गेल्यावर नदीत बुडालेल्या बालकाचा मृतदेह अखेर विसेक तासानंतर सापडला आहे. आज गुरुवारी, १२ सप्टेंबर रोजी सकाळपासून राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेनंतर त्याचा मृतदेह हाती लागला. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात मोताळा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

सविस्तर वाचा…..

15:46 (IST) 12 Sep 2024
मुंबई : डान्सबारमधील अश्लील नृत्यास प्रोत्साहन गुन्हा नाही, एकाविरोधातील गुन्हा रद्द करताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण

मुंबई : डान्सबारमधील महिलांना अश्लील पद्धतीने नृत्य करण्यासाठी केवळ प्रोत्साहन देणे हा गुन्हा ठरत नाही. किंबहुना, ही कृती भारतीय दंडसंहितेच्या कलम २९४ अंतर्गत अश्लील कृत्य ठरत नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

सविस्तर वाचा…

15:32 (IST) 12 Sep 2024
रायगड: रोह्यातील साधना कंपनीत स्फोट; २ कामगारांचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी

रोह्यातील साधना नायट्रोकेम कंपनीत सकाळी सव्वा अकराच्या सुमारास स्फोट झाला.

सविस्तर वाचा…

15:13 (IST) 12 Sep 2024
सावत्र भावाची हत्या करणाऱ्यास सश्रम कारावास, उल्हासनगरमध्ये जमिनीच्या वादातून झाली होती हत्या

विष्णु राजाराम रामगुडे असे कारावास झालेल्या आरोपीचे नाव आहे. तुकाराम रामगुडे असे मृताचे नाव आहे.

सविस्तर वाचा…

15:09 (IST) 12 Sep 2024
मुंबई : संस्कृती, परंपरा जपणारी केशवजी नाईकांची चाळ

मुंबई : संस्कृती, परंपरा आणि साधेपणाची जपणूक करीत श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्था आजही मुंबईमधील गिरगावातील केशवजी नाईकांच्या चाळीत घटनेनुसार गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.

सविस्तर वाचा…

14:56 (IST) 12 Sep 2024
अजित पवार गटाला धक्का! भाग्यश्री आत्राम यांचा शरद पवार गटात प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे. भाग्यश्री आत्राम यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील प्रवेशामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

14:51 (IST) 12 Sep 2024
रायगडच्या धाटाव एमआयडीतील एका केमिकल कंपनीत स्फोट

रायगड जिल्ह्यामधील धाटाव एमआयडीसीमधील एका केमिकल कंपनी स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटमध्ये तीन तीन कामगार ठार झाल्याची प्राथमिक आहे. या कंपनीत स्पोट झाल्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. या स्फोटानंतर अग्निशमन यंत्रणेसह मदतकार्य सुरु असल्याची माहिती सांगितली जात आहे.

14:28 (IST) 12 Sep 2024
बेस्टकडून ‘पे ॲण्ड पार्क’ व्यवस्था

मुंबई : गुरुवारपासून मुंबईत गणेशभक्तांची गर्दी वाढणार आहे. परिणामी खासगी दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्याही वाढणार असल्याने, ही वाहने उभी करण्यासाठी बेस्टने ‘पे ॲण्ड पार्क’व्यवस्था सुरू केली आहे.

सविस्तर वाचा…

14:26 (IST) 12 Sep 2024
नितीन गडकरींचे देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा पत्र; जाणून घ्या नेमका विषय काय?

अकोला : वाशीम जिल्ह्यामध्ये सिंचनाचा गंभीर प्रश्न आहे. सिंचन अनुशेषामुळे जिल्ह्यात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ९ सप्टेंबरला दुसऱ्यांदा पत्र दिले.

सविस्तर वाचा….

14:06 (IST) 12 Sep 2024
पिंपरी-चिंचवड: पत्नीने केली मोबाइलच्या हट्टापायी आत्महत्या; वाकड मधील घटना

पैशाच्या अडचणीमुळे ते मोबाईल घेऊ शकत नव्हते. तरीही ते मोबाईल घेण्याचा प्रयत्न करत होते.

सविस्तर वाचा…

14:00 (IST) 12 Sep 2024
Video :आमदारांच्या घरात जहाल विषारी साप; डॉगी भुंकला अन्…

वर्धा : आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या नव्या निवासस्थानी जहाल विषारी सापाचे झालेले आगमन सर्वांची त्रेधातिरपीट उडवून गेले.

सविस्तर वाचा…

13:57 (IST) 12 Sep 2024
गोंदिया : वाघीण भरकटली अन्… नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पात नेमकं काय घडलं?

गोंदिया : जिल्ह्यातील नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात २०२४ यावर्षी एप्रिल महिन्यात एक वाघीण सोडण्यात आली होती. ही वाघीण या व्याघ्र प्रकल्पात स्थिरावली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी ती या प्रकल्पात भरकटली असून, तिचा सध्या वावर गोंदिया शहराजवळील ढाकणी परिसरात असल्याची माहिती आहे.

सविस्तर वाचा….

13:42 (IST) 12 Sep 2024
पुणे: गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पकडले, ३८ किलो गांजा जप्त

पुणे : गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर परिसरात पकडले. त्यांच्याकडून ३८ किलो गांजा जप्त करण्यात आला.

सुमेर सादिक तांबोळी (वय २६), विकास बाळू बनसोडे (वय ३४, दोघे रा. सांगोला, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. तांबाेळी आणि बनसोडे पुणे -सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर परिसरात गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडून ३८ किलो गांजा जप्त करण्यात आला. अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, युवराज कांबळे, योगेश मांढरे, चेतन गायकवाड, संदीप जाधव यांनी ही कारवाई केली.

13:34 (IST) 12 Sep 2024
“३४ वर्ष झाले तरी मला उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळेना”, अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका

“दिलीपराव मोहिते पाटील यांना उत्कृष्ट वक्तृत्वाबद्दल सर्वोत्कृष्ट भाषण पुरस्कार मिळाला. मला ३४ वर्ष झाले तरीही मला सर्वोत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार मिळाला नाही. मला उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला नाही. आता काय केल्यावर काय होणार हे काय कळेना. जरा सुधारणा सांगा की भाषणात हा बदल करा, म्हणजे मला सर्वोत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार मिळेल. सभागृहात मी असं बोलावं म्हणजे मी उत्तम उत्कृष्ट संसदपटू होईल, असं कोणी सांगत नाही”, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळेंना खोचक टोला लगावला.

13:28 (IST) 12 Sep 2024
लोणी काळभोरमधील इंधन कंपन्यांच्या टँकरमधून इंधन चोरणारी टोळी गजाआड, चोरलेल्या डिझेलची काळ्या बाजारात विक्री

चोरटे टँकरचालकांशी संगममत करून पेट्रोल-डिझेल चोरी करत असल्याची माहिती मुंढवा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजू महानोर, पोलीस कर्मचारी शिवाजी जाधव, मल्हारी ढमढेरे यांना मिळाली.

सविस्तर वाचा…

राज्यातील धनगर समाजाला घटनेनुसार एसटी आरक्षण असून त्याची तत्काळ अंमलबजावणी करा. या मागणीसाठी आजपासून पंढरपूरमध्ये आमरण उपोषण धनगर बांधवांनी सुरु केलं आहे. सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा येणाऱ्या विधानसभेला सत्तेच्या खुर्चीवरून पाय उतार करणार, असा इशारा धनगर समाजाने दिला आहे.

धनगर समाज, (संग्रहित छायचित्र)