Mumbai Maharashtra News Updates, 12 September 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकारण तापलं आहे. सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मतदारसंघाच्या मोर्चेबांधणीसाठी सध्या अनेक नेते राज्यात विविध ठिकाणी दौऱ्यावर आहेत. एकीकडे महायुतीचे नेते सभा घेत आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्याही सभा सुरु आहेत. या सभांच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच नागपूरमधील हिट अँन्ड रन प्रकरणावरून राजकारण तापलं आहे. तसेच सध्या राज्यभरात गणेशोत्सव उत्सहात सुरु आहेत. यासह सर्व राजकीय घडामोडींवर आपलं या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून लक्ष असेल. राज्यातील आणि देशभरातील राजकीय व सामाजिक घडामोडी येथे जाणून घ्या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Live Updates

Maharashtra News Today, 12 September 2024

13:20 (IST) 12 Sep 2024
सरसंघचालकांच्या ‘त्या’ वक्तव्याचा चंद्रपुरात जाहीर निषेध, आंदोलन

चंद्रपूर: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड येथील समाधी लोकमान्य टिळक यांनी शोधली असा चुकीचा इतिहास सांगणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या निषेधार्थ त्यांच्या गृह जिल्ह्यात चंद्रपूर येथे आंदोलन करण्यात आले.

सविस्तर वाचा….

13:03 (IST) 12 Sep 2024
कल्याण: २७ गावांमधील पथदिवे कामांसाठी फेरनिविदा

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील २७ गावांमधील २६ कोटींची कामे घेण्यासाठी राजकीय पाठबळ असलेल्या ठेकेदारांमध्ये जोरदार चढाओढ सुरू होती.

सविस्तर वाचा…

12:54 (IST) 12 Sep 2024
महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता, शिंदे गटाच्या नेत्याचे भाकित

जालना – विधानसभा निवडणुकीत ‘महायुती’मधील घटक पक्षांत काही ठिकाणी एकमत झाले नाही तर मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे भाकीत शिवसेना (शिंदे) उपनेते अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केले आहे.

सविस्तर वाचा….

12:48 (IST) 12 Sep 2024
“शिंदे समिती काम का करत नाही?”, मनोज जरांगेंचा सरकारला सवाल

“सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर तुम्ही कितीही आदळआपट केली तरी विधानसभेला विषय संपणार आहे. कारण तुमच्या पक्षातील नेत्यांनाही वाटतं की आरक्षण मिळालं पाहिजे”, असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला. प्रसाद लाड यांच्या विधानावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, “तुमच्या सरकारने आश्वासन दिलं होतं. सगेसोयरे आरक्षण देणार, गुन्हे मागे घेणार, मग गुन्हे मागे का घेतले गेले नाही? शिंदे समितीला फक्त मुदतवाढ दिली, मग शिंदे समिती काम का करत नाही?”, असे सवाल मनोज जरांगे यांनी विचारले आहेत.

12:36 (IST) 12 Sep 2024
अकोल्यात उत्सवातून निवडणुकीची तयारी

अकोला : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सण व उत्सवांमधून निवडणुकीची तयारी करण्याची आयती संधीच नेत्यांसह इच्छुकांना मिळाली. उत्सवांतील गर्दीला आकर्षित करण्याचे प्रयत्न प्रमुख राजकीय नेत्यांनी सुरू केले.

सविस्तर वाचा….

12:33 (IST) 12 Sep 2024
“मणिपूरची जनता देशाची नाही का?, मग…”, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे राजकारणात अडकून पडले आहेत. मात्र, त्यांच्याकडे मणिपूरकडे लक्ष द्यायला वेळ नाही. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे विविध ठिकाणी आरती करत फिरत आहेत. पण मणिपूरची जनताही या देशाची नागरिक आहे. मात्र, या प्रश्नांवर पंतप्रधान मोदी बोलायला तयार नाहीत. ते बाकी सर्व विषयांवर बोलतील. आमच्यावर बोलतील, टीका करतील. मग मणिपूरवर का बोलत नाहीत? मणिपूरची जनता देशाची नाही का? लडाखमधील चीनच्या घुसखोरीबाबत का बोलत नाहीत?, असे सवाल उपस्थित करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा हल्लाबोल केला आहे. संजय राऊत नांदेडमध्ये बोलत होते.

12:33 (IST) 12 Sep 2024
यंदाचा गणेशोत्सव बचत गटांसाठी आर्थिक फलदायी, विविध वस्तू आणि खाद्यपदार्थ विक्रीतून १५ लाखांहून अधिकची आर्थिक उलाढाल

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, कल्याण, भिवंडी या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बचत गट कार्यरत आहेत.

सविस्तर वाचा…

12:20 (IST) 12 Sep 2024
फसवणुकीचा आरोपी प्राध्यापक वीस महिन्यांपासून घेतो पूर्ण वेतन, कारवाई शून्य…

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील सात प्राध्यापकांची आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपी जनसंवाद विभागाचे प्राध्यापक डॉ. धर्मेश धवनकर तब्बल वीस महिन्यांपासून सक्तीच्या रजेवर असून पूर्ण वेतन घेत आहे. मात्र, या प्रकरणात अद्याप कुठलीही कठोर कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सविस्तर वाचा….

12:18 (IST) 12 Sep 2024
ठाणे: विसर्जन सोहळ्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज, शहरात वाहतूक बदल

ठाणे शहरात ठिकठिकाणी विसर्जन होणार आहे. त्यामुळे वाहतुक पोलिसांनी वाहतूक बदल लागू केले आहेत.

सविस्तर वाचा…

12:18 (IST) 12 Sep 2024
गणेशोत्सवातील आनंदाचा शिधा लाटला; शिधा विकण्यासाठी नेत असताना जप्त, दोघांवर गुन्हा

राज्यातील गोरगरीब जनतेला सण उत्सवांच्या काळात मदत म्हणून अवघ्या शंभर रूपयात सहा जिन्नस असलेला एक अन्न धान्याचा संच दिला जातो.

सविस्तर वाचा…

12:17 (IST) 12 Sep 2024
महिला अत्याचार तपासातील त्रुटींवरून उच्च न्यायालयाची तीव्र नाराजी

पोलीस दलासह राज्य सरकारही याबाबत गंभीर नसल्याचे आतापर्यंत दिसून आल्याची उद्विग्नताही न्यायालयाने यावेळी व्यक्त केली.

सविस्तर वाचा…

12:17 (IST) 12 Sep 2024
मुलीच्या प्रेमापोटी १५ वर्षे एकमेकांपासून दूर राहिलेले दाम्पत्य एकत्र

संजय आणि नेहा (बदललेले नाव) हे दोघेही उच्चशिक्षित. संजय हा कृषी विभागात शासकीय नोकरीवर असून त्याचे २००९ मध्ये त्याचे नेहाशी लग्न झाले.

सविस्तर वाचा…

12:16 (IST) 12 Sep 2024
किरकोळीत ‘घाऊक’ लूट, घाऊक बाजारात दोन ते पाच रुपयांची दरवाढ; किरकोळीत भाज्यांचे दर दुप्पट

आवक काही प्रमाणात कमी होत असल्याने भाज्यांचे दर वधारल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

सविस्तर वाचा…

12:16 (IST) 12 Sep 2024
७० वर्षे जुनी गणेश कार्यशाळा रिकामी होताना…झावबा वाडीतील इमारतीच्या पुनर्विकासाला सुरुवात

Mumbai Zaoba Wadi Ganesh Workshop: मुंबईतील हॉटेलमध्ये नोकरी करता करता त्यांनी बोराबाजारातील एका इमारतीच्या जिन्याखाली गणेशमूर्ती साकारण्यास सुरुवात केली.

सविस्तर वाचा…

12:15 (IST) 12 Sep 2024
वनराज आंदेकर खून प्रकरणात आणखी दोघे अटकेत, आरोपींकडून आठ पिस्तुलांसह १३ काडतुसे जप्त

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणात पसार झालेल्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली.

सविस्तर वाचा…

12:14 (IST) 12 Sep 2024
मद्यविक्रीबंदीने गुन्हे कमी होणार का? मद्य विक्रेत्यांचा सवाल; पुढील वर्षी जिल्ह्यात बंदीची गणेश मंडळांची मागणी

गणेशोत्सवापूर्वी प्रमुख मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पाडली. या बैठकीस पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

सविस्तर वाचा…

12:14 (IST) 12 Sep 2024
सावधान! गणेशोत्सवात ढोल-ताशा, डीजे, स्पीकरच्या भिंतीजवळ जाताय… आधी धोके जाणून घ्या…

यंदाच्या गणेशोत्सवात आवाजाने कमाल मर्यादा गाठली असून, सर्वत्र ध्वनिप्रदूषणाची नोंद झाली आहे.

सविस्तर वाचा…

12:12 (IST) 12 Sep 2024
मंत्री गिरीश महाजनांवर उच्च न्यायालयाची नाराजी, काय आहे प्रकरण?

नागपूर : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी एका फेरविचार अर्जाची मागील दोन वर्षांपासून दखल न घेतल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली.

सविस्तर वाचा….

12:11 (IST) 12 Sep 2024
‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांची चिंता वाढणार, सर्वच परीक्षा लांबणार?

MPSC exams : महाराष्ट्र सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाची अंमलबजावणी २६ फेब्रुवारीपासून करण्यात आली आहे. शासनाने तसा जीआर काढला असून अंमलबजावणीबद्दलच्या तरतुदी सांगितल्या आहेत. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम २०२४ नुसार ‘सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग’ निर्माण करण्यात आला आहे. त्यानुसार या वर्गासाठी १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र, हे आरक्षण लागू झाल्यानंतर त्याचा परिणाम एमपीएससीच्या विविध जाहिरातींवर झाला असून त्याचा परीक्षांवर काय परिणाम होणार याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

सविस्तर वाचा….

11:32 (IST) 12 Sep 2024
खासदार नागेश पाटील आष्टीकरांची गाडी पोलिसांनी रोखल्यामुळे गोंधळ, नेमकं काय घडलं?

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संयज राऊत आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी संजय राऊत यांच्या स्वागतासाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर हे संयज राऊत यांच्या स्वागतासाठी नांदेड विमानतळावर दाखल झाले होते. मात्र, यावेळी पोलिसांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची गाडी रोखली. विमानतळात गाडी नेण्यास परवानगी नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यांची गाडी अडवल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. यावेळी त्यांची गाडी रोखल्यामुळे नागेश पाटील आष्टीकर यांनी संताप व्यक्त केला.

11:22 (IST) 12 Sep 2024
“हे संविधानाला अन् प्रोटोकॉलला धरून आहे का?”, मोदींनी सरन्यायाधीशांच्या घरी भेट दिल्यानंतर संजय राऊतांचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रात्री सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी चंद्रचूड यांच्या घरातील गणपतीचे दर्शन घेतले आणि आरतीमध्ये सहभाग घेतला. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत काही सवाल उपस्थित केले आहेत. संजय राऊत म्हणाले, “सरन्यायाधीश आणि पंतप्रधान हे संविधानाला आणि प्रोटोकॉलला धरून आहे का?, याबाबत आता लोकांमध्ये आणि घटना तज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे. पंतप्रधानांशी जवळीक असलेले न्यायाधीश मग ते कोणीही असो, महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारच्या बाबतीत आम्ही लढाई लढतोय. मात्र, आम्हाला न्याय का मिळत नाही. फक्त तारखा पडत आहेत. याबाबत मनात शंका आहे”, अशी टीका संजय राऊतांनी केली.

10:20 (IST) 12 Sep 2024
“बिल जप्त करायला इतका उशीर का लागला?”, नागपूर ‘हिट अॅण्ड रन’प्रकरणावरून संजय राऊतांचा सवाल

नागपूरमधील ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणावरून राजकारण तापलं आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांच्या कारने रविवारी मध्यरात्री तीन ते चार दुचाकी व चारचाकी वाहनांना धडक दिल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर संकेत बावनकुळेंच्या गाडीमध्ये दारूसह बीफ कटलेटची बिले आढळली”, असा आरोप संजय राऊतांनी केला होता. यानंतर पोलिसांनी हॉटेलचे बिल जप्त केल्याची माहिती समोर आली. हॉटेलचे बिल जप्त करायला इतका उशीर का लागला? बिल काढायला चार दिवस का लागले? गाडीची नंबर प्लेट का बदलण्यात आली? असे सवाल संजय राऊतांनी केले आहेत.

राज्यातील धनगर समाजाला घटनेनुसार एसटी आरक्षण असून त्याची तत्काळ अंमलबजावणी करा. या मागणीसाठी आजपासून पंढरपूरमध्ये आमरण उपोषण धनगर बांधवांनी सुरु केलं आहे. सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा येणाऱ्या विधानसभेला सत्तेच्या खुर्चीवरून पाय उतार करणार, असा इशारा धनगर समाजाने दिला आहे.

धनगर समाज, (संग्रहित छायचित्र)