Maharashtra Live Updates Today, 03 October 2024: राज्यातील विधानसभा निवडणुका २६ नोव्हेंबरपूर्वी घेण्याचा निर्धार निवडणूक आयोगानं व्यक्त केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटप, इच्छुकांची समजूत, पात्रतेनुसार उमेदवारांची चाचपणी या गोष्टींना सुरुवात झाली आहे. यासंदर्भात पहिला टप्पा अर्थात जागावाटपाचा मुद्दा दोन्ही बाजूंनी अंतिम टप्प्यात आल्याचे दावे केले आहेत.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today, 03 October 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी...

11:56 (IST) 3 Oct 2024
Koyna Dam: कोयना धरणात चार महिन्यांत १७२.५९ अब्ज घनफूट जलआवक

सध्या धरणात प्रतिसेकंद ९,४६३ घनफूट पाण्याची आवक होताना सांडव्यावरून विसर्ग सुरू आहे.

सविस्तर वाचा...

11:41 (IST) 3 Oct 2024
मध्य वैतरणा धरणाच्या क्षेत्रात २६.५ मेगावॉट संकरित वीजनिर्मिती

मुंबई : येत्या अडीच वर्षांत मध्य वैतरणा धरणक्षेत्रात तरंगता सौरऊर्जा आणि जलविद्याुत निर्मिती असलेला संकरित ऊर्जा प्रकल्प राबवण्यात येणार आहे

सविस्तर वाचा...

11:30 (IST) 3 Oct 2024
Ajit Pawar on Mahayuti SeatSharing: हे पाहिलं की आमची करमणूक होते - अजित पवार

आम्ही सगळे बसून पत्रकार परिषद घेऊन २८८ जागा कुणाकुणाला दिल्या आहेत ते सांगू. माध्यमांमधले जागांचे अंदाज पाहून आमची करमणूक होते. मी अनेकदा सांगितलंय, जागा ठरल्यानंतर त्या मनात ठेऊन आम्हाला काही उपयोग आहे का? आमचं ठरलं की आम्ही सांगू. एकदा जागावाटप झाल्यानंतर आम्हालाही उमेदवार ठरवायचे आहेत - अजित पवार</p>

11:07 (IST) 3 Oct 2024

देशाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या नकाशावर आता अंबरनाथही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश सुरू

राज्यातील दहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून एमबीबीएस प्रवेश घेता येणार आहे.

सविस्तर वाचा...

10:59 (IST) 3 Oct 2024

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी हॉटेल, इमारतींची पोलिसांकडून तपासणी; सुमारे दोन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या कार्यक्रमासाठी ठाण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा...

10:17 (IST) 3 Oct 2024

पुणे: विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चालकाकडून शाळकरी मुलीवर अत्याचार, वानवडी पोलिसांकडून गाडीचालक अटकेत

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅन चालकाकडून सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

सविस्तर वाचा...

10:09 (IST) 3 Oct 2024

सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता अपघातात जखमी

सांगली : महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता अपघातात जखमी झाले असून, खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बुधवारी सायंकाळी हा अपघात घडला. त्यांच्यासोबत कुटुंबीय व नातेवाईक होते. त्यांनाही किरकोळ दुखापत झाली असून, त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आयुक्त गुप्ता महापालिकेच्या मोटारीने निघाले असता गव्हर्न्मेंट कॉलनीमध्ये रस्त्याच्या दुभाजकावर असलेल्या विजेच्या खांबाला मोटार धडकली. या अपघातात गुप्ता यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. अपघातानंतर त्यांच्यासह पत्नीलाही तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

10:07 (IST) 3 Oct 2024

अजित पवार बारामतीबाबत नक्की काय भूमिका घेणार? राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आज मेळावा

उपमुख्यमंत्री अजित पवार मेळाव्यात मार्गदर्शन करणार असून, ते काय बोलणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

सविस्तर वाचा...

10:07 (IST) 3 Oct 2024

Navratri 2024: पुण्यात नवरात्रोत्सवानिमित्त प्रमुख मंदिरांच्या परिसरात वाहतूक बदल

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील विविध मंदिरांच्या परिसरात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक बदल करण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा...

10:02 (IST) 3 Oct 2024

Abdul Sattar on BJP in Sillod: अब्दुल सत्तारांचा भाजपाला इशारा!

त्यांनी विरोध केला तर आमचे शिवसेनावालेही त्याचा पूर्ण हिशेब घेतील. ज्याप्रकारे भाजपाचे कार्यकर्ते सिल्लोडमध्ये काम करतील, त्याच पद्धतीने आम्हीही पूर्ण मराठवाडा व महाराष्ट्रभर काम करू - अब्दुल सत्तार</p>

Maharashtra News Live Today

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह| मुंबई रेन लाइव्ह अपडेट्स

Maharashtra Breaking News Live Today, 03 October 2024: राज्यभरातील बित्तंबातमी एका क्लिकवर!