Maharashtra Live Updates Today, 03 October 2024: राज्यातील विधानसभा निवडणुका २६ नोव्हेंबरपूर्वी घेण्याचा निर्धार निवडणूक आयोगानं व्यक्त केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटप, इच्छुकांची समजूत, पात्रतेनुसार उमेदवारांची चाचपणी या गोष्टींना सुरुवात झाली आहे. यासंदर्भात पहिला टप्पा अर्थात जागावाटपाचा मुद्दा दोन्ही बाजूंनी अंतिम टप्प्यात आल्याचे दावे केले आहेत.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today, 03 October 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी…

14:06 (IST) 3 Oct 2024
सातारा शहरात कॉम्प्रेसर फुटून भीषण स्फोट; एक ठार, दोन जखमी

हा स्फोट इतका भीषण होता की चिकन व्यावसायिक पालकर सुमारे दहा फूट हवेत फेकले जाऊन रस्त्यावर आदळले.

सविस्तर वाचा…

14:04 (IST) 3 Oct 2024
काँग्रेसला घराणेशाहीचे ग्रहण, चंद्रपूर जिल्ह्यात नेत्यांच्या कुटुंबातील सदस्य उमेदवारीसाठी…

चंद्रपूर : जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला घराणेशाहीचे ग्रहण लागले आहे. नेत्याच्या कुटुंबातील सदस्य खासदार, आमदार, माजी नगराध्यक्ष किंवा पक्षसंघटनेत पदाधिकारी आहेतच, आता विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी, यासाठीही ते सरसावले आहेत.

सविस्तर वाचा…

14:01 (IST) 3 Oct 2024
नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू

नंदुरबार : जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील राणीपूर गावाजवळ बुधवारी दुपारी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात बकऱ्या चारणाऱ्या १० वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. वनविभागाला घटनेविषयी माहिती मिळूनही ते घटनास्थळी उशिरा दाखल झाल्याने ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.

वाचा सविस्तर…

13:57 (IST) 3 Oct 2024
उजनीतून दोन महिन्यांत सोडले १०६ टीएमसी पाणी, नीचांकी पातळीवरील उजनीत १२२.३६ टीएमसी पाणीसाठा

उजनी धरणात पाण्याचा भरपूर साठा असल्यामुळे धरणावर कार्यरत असलेल्या विद्युत निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून एक कोटी ७४ लाख युनिट वीज निर्मिती करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

13:53 (IST) 3 Oct 2024
मुंबई : मलबार हिल जलाशयाच्या दुरुस्तीसाठी अन्य पर्याय

मुंबई : मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव रद्द झाल्यानंतर आता जलाशयाच्या दुरुस्तीसाठी नव्या पर्यायाची चाचपणी करण्यात येईल. तलावाच्या पाच कप्प्यांपैकी एकेका कप्प्याच्या दुरुस्तीचा ना पर्याय पुढे आला आहे.

वाचा सविस्तर…

13:48 (IST) 3 Oct 2024
सातारा: खटाव तालुक्यात ज्येष्ठाचा चिमुरडीवर अत्याचार, घटनेने संताप; आरोपीला कोठडी

मुलीला दुसऱ्या दिवशी त्रास होऊ लागल्याने तिला दवाखान्यात उपचारांसाठी नेले असता तिने सगळी हकिकत सांगितली.

सविस्तर वाचा…

13:39 (IST) 3 Oct 2024
प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराजांना अटक, नेमकं काय कारण? वाचा सविस्तर…

प्रसिद्ध कीर्तनकार आणि सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणाऱ्या चैतन्य सयाजी वाडेकर (महाराज) यांना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.

सविस्तर वाचा…

13:38 (IST) 3 Oct 2024
वसई : ८ लाखांचे कर्ज फेडण्यासाठी तरुणाची योजना, प्रेयसीच्या मदतीने मामाच्या घरात चोरी

‘लोन ॲप’ वर झालेलं ८ लाखांचे कर्ज फेडण्यासाठी मिरा रोड मध्ये एका तरुणाने आपल्या प्रेयसीच्या मदतीने मामाच्याच घरात चोरी केली.

सविस्तर वाचा…

13:35 (IST) 3 Oct 2024
द्रोणागिरी परिसर खड्ड्यांत; पाऊस थांबल्याने मार्गावरील धुळीच्या उधळणीने प्रवासी आणि नागरिक त्रस्त

उरण : येथील द्रोणागिरी नोडमधील पावसाळ्यात झालेल्या खड्ड्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. याचा फटका नागरिक आणि वाहनचालकांना बसत आहे.

सविस्तर वाचा…

13:10 (IST) 3 Oct 2024
गारगाई धरण प्रकल्प रखडणार

मुंबई : मुंबई महापालिकेने पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन गारगाई धरण प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा…

13:09 (IST) 3 Oct 2024
कल्याणमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्याला पालिका आयुक्तांची नोटीस

घनकचरा विभागाचे स्वच्छता अधिकारी अविनाश मांजरेकर यांना आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

सविस्तर वाचा…

13:00 (IST) 3 Oct 2024
ग्रॅन्ट रोड येथे इमारतीचे छत कोसळले, मातीच्या ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची शक्यता

मुंबई : ग्रॅन्ट रोड येथील मौलाना शौकत अली रोडवरील शालिमार हॉटेलनजिक गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास युनायटेड चेंबर्स या इमारतीच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील छत कोसळले.

वाचा सविस्तर…

12:58 (IST) 3 Oct 2024
डोंबिवली आयरेतील बेकायदा साई रेसिडेन्सीवर हातोडा, उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कारवाई

‘लोकसत्ता’ने या बेकायदा इमारतीचा विषय लावून धरला होता. जेसीबी, पोकलेन, स्लॅब तोडणाऱ्या क्रॅकर सयंत्र तोडकाम यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

12:49 (IST) 3 Oct 2024

Ajit Pawar on Govinda: अजित पवारांची गोविंदा गोळीबार प्रकरणावर मिश्किल टोलेबाजी!

पिस्तुल, चाकू अशा हत्यारांसोबत काही लोक फोटो पोस्ट टाकतात. त्यावर पथकाची नजर असणार आहे. असं काही आढळून आल्यावर कारवाई केली जाईल. उगीच वडिलांचं पिस्तुल पडलं होतं, मी सहज बघायला घेतलं, फोटो काढला वगैरे चालणार नाही. परवा गोविंदा तर म्हणाला मी सकाळी कोलकात्याला जात होतो. माझं पिस्तुल बघत होतो पण चुकून गोळी गुडघ्यात शिरली. आता बघत असताना गोळी गुडघ्यात कशी शिरेल? पण आता तो अभिनेता आहे. बाबा तू म्हणतो ते खरं. त्याच्यावर काही बोलताही येत नाही. कारण खासदार होते. खासदारावर विश्वास ठेवला पाहिजे. कारण मीही खासदार होतो. नाहीतर पुन्हा म्हणाल दादांनी चिमटा काढला. कशाचा चिमटा आणि कशाचं काय – अजित पवारांची टोलेबाजी!

12:28 (IST) 3 Oct 2024
पुणे: मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचे बोपदेव घाटातून अपहरण, विनयभंग केल्याप्रकरणी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा

मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीचे मोटारीतून अपहरण करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकाला अटक करण्यात आली.

सविस्तर वाचा…

12:13 (IST) 3 Oct 2024
साताऱ्याच्या विकासात जिल्हा बँकेचे मोठे योगदान – अजित पवार

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा जिल्ह्याच्या आर्थिक, समाजिक, कृषी व शैक्षणिक विकासात मोलाचे योगदान आहे. या बँकेचा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी विविध योजना राबवाव्यात. या योजना राबविण्यासाठी शासनाचे सहकार्य राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

केंद्र शासनाच्या एमपीएस दराबाबत निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळणार आहे. शेतकऱ्यांना साडेसात हॉर्स पाॅवरपर्यंत मोफत वीज देण्याच्या निर्णयाबरोबर दूध उत्पादक शेतकऱ्यांना ७ रुपये ज्यादा अनुदान देण्याचाही निर्णय घेतला आहे. राज्यात सौरऊर्जेवर साडेनऊ हजार मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राज्यातील उपसासिंचन योजना टप्प्याटप्प्याने सौरऊर्जेवर करण्यात येणार आहे. याचा लाभ सातारा जिल्ह्यालाही होणार आहे. राज्याच्या विकासात सहकाराचा मोलाचा वाटा आहे. पुढील काळातही सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपल्या प्रगतीचा आलेख चढता ठेवेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला. बँकेचे अध्यक्ष आणि खासदार श्री. पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी बँकेडून अनेक योजना राबविण्यात येत आहे. बँकेच्या एकूण ३१९ शाखा आहेत. जिल्ह्यामध्ये सहकारी साखर कारखाने उभारण्यासाठी बँकेने सहकार्य केले आहे. अनेक योजनांच्या माध्यमातून सामाजिक कामेही केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

12:12 (IST) 3 Oct 2024
सोलापूर: नोकरी घालवण्याची धमकी देत शिक्षकांकडे मागितली खंडणी

सोलापूर : शिक्षकपदावरील तुमची नेमणूक बेकायदेशीर आहे, त्याबाबत उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. पुणे शिक्षण उपसंचालकांकडे माहितीच्या अधिकार कायद्याखाली मागवून घेतलेल्या माहितीचा वापर करून तुमची नोकरी घालवू शकतो, अशी धमकी देऊन संबंधित तिघा शिक्षकांना प्रत्येकी १५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी बापू संभाजी लवटे याच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बापू लवटे (रा. लोटेवाडी, ता. सांगोला) याच्याविरुद्ध पीडित शिक्षक सुनील प्रकाश लवटे (वय ३८, रा. मिरज रोड, सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या (लोटेवाडी) सांगोला, पंढरपूर आणि मंगळवेढा या तीन तालुक्यांत आठ उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि वसतिगृहे कार्यरत आहेत. फिर्यादी सुनील लवटे हे पंढरपूर तालुक्यातील नूतन विद्यालय शाळेत माध्यमिक शिक्षक म्हणून सेवेत आहेत. बापू लवटे यांनी २०१५ साली माहिती अधिकार कायद्याखाली सुनील लवटे यांच्यासह संस्थेतील इतर शिक्षकांची व संस्थेची माहिती मागितली होती. त्यावेळी नोकरी घालविण्याची धमकी देत बापू लवटे याने सुनील लवटे यांच्यासह अन्य शिक्षकांकडून प्रत्येकी ५० हजार रुपयांची खंडणी उकळली होती.

12:08 (IST) 3 Oct 2024
शिक्षण विभागाने सुटका करूनही, शिक्षक बीएलओ कामात अडकलेलेच

पुणे : शिक्षकांना कराव्या लागणाऱ्या विविध कामांचे शैक्षणिक, अशैक्षणिक असे वर्गीकरण करून शिक्षकांनी निवडणूक कामकाजातील केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) या कामातून सुटका करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

11:56 (IST) 3 Oct 2024
Koyna Dam: कोयना धरणात चार महिन्यांत १७२.५९ अब्ज घनफूट जलआवक

सध्या धरणात प्रतिसेकंद ९,४६३ घनफूट पाण्याची आवक होताना सांडव्यावरून विसर्ग सुरू आहे.

सविस्तर वाचा…

11:41 (IST) 3 Oct 2024
मध्य वैतरणा धरणाच्या क्षेत्रात २६.५ मेगावॉट संकरित वीजनिर्मिती

मुंबई : येत्या अडीच वर्षांत मध्य वैतरणा धरणक्षेत्रात तरंगता सौरऊर्जा आणि जलविद्याुत निर्मिती असलेला संकरित ऊर्जा प्रकल्प राबवण्यात येणार आहे

सविस्तर वाचा…

11:30 (IST) 3 Oct 2024
Ajit Pawar on Mahayuti SeatSharing: हे पाहिलं की आमची करमणूक होते – अजित पवार

आम्ही सगळे बसून पत्रकार परिषद घेऊन २८८ जागा कुणाकुणाला दिल्या आहेत ते सांगू. माध्यमांमधले जागांचे अंदाज पाहून आमची करमणूक होते. मी अनेकदा सांगितलंय, जागा ठरल्यानंतर त्या मनात ठेऊन आम्हाला काही उपयोग आहे का? आमचं ठरलं की आम्ही सांगू. एकदा जागावाटप झाल्यानंतर आम्हालाही उमेदवार ठरवायचे आहेत – अजित पवार</p>

11:07 (IST) 3 Oct 2024

देशाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या नकाशावर आता अंबरनाथही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश सुरू

राज्यातील दहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून एमबीबीएस प्रवेश घेता येणार आहे.

सविस्तर वाचा…

10:59 (IST) 3 Oct 2024

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी हॉटेल, इमारतींची पोलिसांकडून तपासणी; सुमारे दोन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या कार्यक्रमासाठी ठाण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा…

10:17 (IST) 3 Oct 2024

पुणे: विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चालकाकडून शाळकरी मुलीवर अत्याचार, वानवडी पोलिसांकडून गाडीचालक अटकेत

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅन चालकाकडून सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

सविस्तर वाचा…

10:09 (IST) 3 Oct 2024

सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता अपघातात जखमी

सांगली : महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता अपघातात जखमी झाले असून, खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बुधवारी सायंकाळी हा अपघात घडला. त्यांच्यासोबत कुटुंबीय व नातेवाईक होते. त्यांनाही किरकोळ दुखापत झाली असून, त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आयुक्त गुप्ता महापालिकेच्या मोटारीने निघाले असता गव्हर्न्मेंट कॉलनीमध्ये रस्त्याच्या दुभाजकावर असलेल्या विजेच्या खांबाला मोटार धडकली. या अपघातात गुप्ता यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. अपघातानंतर त्यांच्यासह पत्नीलाही तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

10:07 (IST) 3 Oct 2024

अजित पवार बारामतीबाबत नक्की काय भूमिका घेणार? राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आज मेळावा

उपमुख्यमंत्री अजित पवार मेळाव्यात मार्गदर्शन करणार असून, ते काय बोलणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

सविस्तर वाचा…

10:07 (IST) 3 Oct 2024

Navratri 2024: पुण्यात नवरात्रोत्सवानिमित्त प्रमुख मंदिरांच्या परिसरात वाहतूक बदल

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील विविध मंदिरांच्या परिसरात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक बदल करण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा…

10:02 (IST) 3 Oct 2024

Abdul Sattar on BJP in Sillod: अब्दुल सत्तारांचा भाजपाला इशारा!

त्यांनी विरोध केला तर आमचे शिवसेनावालेही त्याचा पूर्ण हिशेब घेतील. ज्याप्रकारे भाजपाचे कार्यकर्ते सिल्लोडमध्ये काम करतील, त्याच पद्धतीने आम्हीही पूर्ण मराठवाडा व महाराष्ट्रभर काम करू – अब्दुल सत्तार</p>

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह| मुंबई रेन लाइव्ह अपडेट्स

Maharashtra Breaking News Live Today, 03 October 2024: राज्यभरातील बित्तंबातमी एका क्लिकवर!