Maharashtra Breaking News Live Today, 12 October 2023: शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून १३ ऑक्टोबरऐवजी सुनावणी आज दुपारी २ वाजता होणार आहे. जी -20 देशांच्या सभागृह अध्यक्षांची बैठक दिल्लीत होणार असल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तिकडे जाणार आहेत. त्यामुळे वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती आहे. पण याच प्रकरणी १३ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याने बदललेल्या वेळापत्रकावर जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे. छगन भुजबळ यांनी हे वक्तव्य केलं आहे की पहाटेचा शपथविधी हे अजित पवारांचं बंड नव्हतं. शरद पवारांनी भाजपाला डीच केलं. त्यावर काही प्रतिक्रिया येतात का याकडे पाहणार आहोत.या बातम्यांवर आणि राज्यातल्या इतर घडामोडींवर आपली लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून नजर असणार आहे.

Live Updates

Mumbai Maharashtra Live News in Marathi| शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवर आज सुनावणी आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी

19:13 (IST) 12 Oct 2023
अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई; २०२२ मध्ये न्यायालयाने दिलेल्या आदेशाची बजावणी ११ महिन्यांनी

नवी मुंबई: नवी मुंबई अतिक्रमण विरोधी विभागाने आज तुर्भे आणि नेरुळ मध्ये मोठी कारवाई केली आहे.  नेरुळ मधील दोन इमारतींचे पाणी आणि गॅस पुरवठा बंद केला तर तुर्भे विभाग कार्यालय अंतर्गत असलेल्या सानपाडा गावातील तीन इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.

सविस्तर वाचा...

18:40 (IST) 12 Oct 2023
मोबाईलचे सुटे भाग विकणारा निघाला ड्रॅग डीलर; तब्बल १ कोटी १ लाख १० हजार रुपयांचे किलोभर एम डी जप्त

नवी मुंबई: स्वस्त बाळगण्यास सोपे असलेले एम डी अर्थात मेफेड्रॉन या अमली पदार्थाची लोकप्रियता वाढत असल्याने विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे.

सविस्तर वाचा...

18:38 (IST) 12 Oct 2023
सातारा: खाजगी ट्रॅव्हल्समधील २२ लाख रुपयांच्या बॅग चोरीचा गुन्हा उघड

वाई: खाजगी ट्रॅव्हल्समधील २२ लाख रुपयांची बॅग चोरीचा गुन्हा मध्यप्रदेश येथील आरोपीस अटक करुन भुईंज पोलिसांनी उघडकीस आणला.

सविस्तर वाचा...

18:12 (IST) 12 Oct 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाकाली महोत्सवाचे टिझर लाँच

चंद्रपूर: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चंद्रपूरात आयोजित श्री माता महकाली महोत्सवाच्या पहिल्या टिझरचे लाँचींग करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

18:11 (IST) 12 Oct 2023
नाशिक:विल्होळीत बिबट्या जेरबंद

नाशिक - शहरापासून जवळच असलेल्या विल्होळी परिसरात काही दिवसांपासून ग्रामस्थांना दिसणारा बिबट्या अखेर वन विभागाने लावलेल्या जाळ्यात सापडला. बिबट्याला पकडण्यासाठी बुधवारी परिसरात पिंजरा लावण्यात आल्यानंतर २४ तासाच्या आत बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातीन शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे .

सविस्तर वाचा

17:54 (IST) 12 Oct 2023
ऊसाचा दुसरा हप्ता प्रश्नी कोल्हापुरातील बैठक निष्फळ; साखर कारखानदारांचा नकार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील ऊसाला एफआरपी शिवाय जादा  दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रूपये देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी येथे झालेली बैठक निष्फळ ठरली. हि रकम देण्यास साखर कारखानदारांनी  नकार दिला.

सविस्तर वाचा

17:46 (IST) 12 Oct 2023
लवकरात लवकर कारवाई होईल अशी अपेक्षा आहे-अनिल देसाई

लवकरात लवकर अध्यक्ष अपात्रतेची कारवाई करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आता २० तारखेनंतर निकाल येणार असं सांगितलं जातं आहे. मात्र स्पष्ट हे दिसतं आहे की अपात्रतेची टांगती तलवार असताना वेळकाढूपणा केला जातो आहे. पहिल्या १६ जणांची अपात्रतेची कारवाई आहे त्यानंतर २२ जणांची आहे. मग नोटीस मिळाली, नोटीस मिळाली नाही हे सांगितलं जातं आहे. प्रत्येकाची सुनावणी वेगळी घ्यावी असंही सांगितलं जातं आहे. कायद्यासाठी वेळकाढूपणा केला जातो आहे. असं अनिल देसाईंनी म्हटलं आहे.

17:35 (IST) 12 Oct 2023
निर्भया निधीतून पहिला सीसी टीव्ही कॅमेरा भायखळा रेल्वे स्थानकात

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील सुरक्षा वाढवण्याच्या उद्देशाने रेल्वे स्थानकांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यावर भर देण्यात येत आहे.

सविस्तर वाचा...

16:49 (IST) 12 Oct 2023
अमरावती: कंत्राटीकरणाचा विरोध! स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा

अमरावती : गेल्या काही वर्षात अगोदरच अपेक्षित असलेली नोकर भरती होत नाही आहे. त्यात राज्य सरकार सरकारी नोकरीत खासगीकरण व कंत्राटीकरण करण्याचे पाऊल उचलू पाहत आहे. त्याविरोधात विदर्भ स्पर्धा परीक्षा शिक्षक व विद्यार्थी संघ कृती समितीच्या वतीने गुरूवारी येथील संत गाडगेबाबा मंदिरासमोरील प्रांगणातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्‍यात आला.

सविस्तर वाचा

16:44 (IST) 12 Oct 2023
बद्रीनाथ येथील अलकनंदा नदीत बुलढाण्यातील भाविक बुडाला

बुलढाणा : बद्रीनाथ केदारनाथच्या यात्रेसाठी बुलढाण्याहून गेलेल्या भाविकांपैकी एक भाविक आज बद्रीनाथ येथील अलकनंदा नदीत बुडाल्याचे दुर्देवी वृत्त आहे. उत्तराखंड एसडीआरएफतर्फे हेलिकॉप्टरच्या मदतीने युद्धपातळीवर शोध घेण्यात येत आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. त्यामुळे संबंधित कुटुंब व सोबतचे भाविक हवालदिल झाले आहे.

सविस्तर वाचा...

16:31 (IST) 12 Oct 2023
धरणांमध्ये पुरेसा जलसाठा असतानाही चेंबूरमधील डोंगराळ भागात पाण्याची चणचण

मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून चेंबूर परिसरातील डोंगरावर वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना पाण्याची तीव्र चणचण भासत असून मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयात अनेक वेळा तक्रारी केल्यानंतरही पाण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात आलेला नाही.

सविस्तर वाचा

16:04 (IST) 12 Oct 2023
उरण-पनवेल मार्गावरून एसटी सुरू करण्यासाठी बोकडवीरा, फुंडे, डोंगरी व पाणजे गावातील महिलांचे धरणे आंदोलन

उरण: उरण – पनवेल या पारंपरिक मुख्य रस्त्यावरील एसटी बस सेवा पुर्ववत सुरू करा या मागणीसाठी गुरुवारी जनवादी महिला संघटनेच्या नेतृत्वाखाली भर उन्हात बोकडवीरा, फुंडे, डोंगरी व पाणजे येथील महिल्यानी सिडको विरोधात एल्गार पुकारत आंदोलन केले.

सविस्तर वाचा...

16:01 (IST) 12 Oct 2023
चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात ‘मिथेन’चे साठे; पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सर्वेक्षणात…

विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनसोबत या ब्लॉक संदर्भात गेल, लॉयड आणि सोलार ग्रुपची बैठक आणि सादरीकरण झाले होते.

सविस्तर वाचा...

15:58 (IST) 12 Oct 2023
“सत्ताधाऱ्यांकडून शेतकरी, कष्टकऱ्यांना नव्हे तर कर्जबुडव्यांना कर्जमाफी”, शरद पवार यांचे सरकारवर टीकास्र

संपुआ सरकारच्या काळात शेतकऱ्यांना ६७ हजार कोटींचे कर्ज एकदम माफ केले होते. आता सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही, असे शरद पवार म्हणाले.

सविस्तर वाचा...

14:41 (IST) 12 Oct 2023
शिंदे गटाकडून सुनावणीसाठी कुठलाही बडा नेता उपस्थित नाही

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातविधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज पुन्हा एकदा सुनावणी नियोजित केली आहे. या सुनावणीला आज दुपारी सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्षांकडून याचिका एकत्र करण्यावर सुनावणी सुरु झाली. यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, आमदार अजय चौधरी आणि शिवसेना ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत विधानभवनात उपस्थित आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून केवळ त्यांचे वकील उपस्थित आहेत. कोणताही बडा नेता उपस्थित नाही.

14:36 (IST) 12 Oct 2023
मुंबई: मेंदूतील रक्तवाहिनीला आलेला फुगा फुटल्याने रुग्णाच्या जीवावर बेतले

मुंबई : वाढता ताणतणाव, बदलती जीवनशैली यामुळे माणसाच्या मेंदूवर अनेक विपरित परिणाम होत असतात. त्यातूनच मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांना इजा होण्याची दाट शक्यता असते. यामुळे रक्तवाहिन्यांना फुगा येतो आणि व्यक्तीचा मृत्यू होण्याचा धोका निर्माण होतो.

सविस्तर वाचा

14:34 (IST) 12 Oct 2023
नवीन पनवेल येथे जलवाहिनी फुटली; लाखो लीटर पाणी वाया

पनवेल: नवीन पनवेल उपनगरातील रेल्वेरुळाला खेटून असणा-या झोपडपट्टीलगतची जलवाहिनी मागील २४ तासांपासून फुटून त्यामधून लाखो लीटर पाणी वाया जात आहे.

सविस्तर वाचा...

14:22 (IST) 12 Oct 2023
१९ कोटींच्या खर्चानंतरही मोरा – मुंबई जलप्रवाशांना पार करावी लागणार अडथळ्यांची शर्यत

उरण: मोरा ते मुंबई जलप्रवासाठी असलेल्या नादुरुस्त जेट्टीच्या मजबुतीकरणासाठी शासनाने बुधवारी १९ कोटींचा निधी मंजूर केला आहे. मात्र हा निधी केवळ जेट्टीच्या मजबुतीकरणासाठी असल्याचे मेरिटाईम बोर्डाने स्पष्ट केले आहे.

सविस्तर वाचा...

14:19 (IST) 12 Oct 2023
कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

पुणे : कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराबाबत राज्य सरकारने नियुक्त केलेल्या चौकशी आयोगाला फेब्रुवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आयोगाचे मुंबईतील कामकाज आटोपले असून केवळ पुण्यातील कामकाज अद्याप बाकी आहे.

सविस्तर वाचा

14:18 (IST) 12 Oct 2023
जुन्या मालमत्तेच्या खरेदीनंतर वीज बिलातील नावात आपोआप होणार बदल; जाणून घ्या महावितरणची नवी सुविधा

पुणे : जुनी सदनिका किंवा दुकान खरेदी करतानाच वीजजोडणी किंवा देयक देखील स्वतःच्या नावावर करून घेण्याची सोय खरेदीदारांना महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाची संगणक प्रणाली महावितरणशी जोडण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

14:15 (IST) 12 Oct 2023
अमरावतीत यशोमती ठाकूर आणि डॉ. अनिल बोंडे आमने-सामने

अमरावती : भाजपचे राज्‍यसभा सदस्‍य डॉ. अनिल बोंडे आणि काँग्रेसच्‍या आमदार यशोमती ठाकूर यांच्‍यात आजवर राजकीय कटुता फारशी दिसली नाही, पण भाजपच्‍या ओबीसी यात्रेच्‍या निमित्‍ताने डॉ. बोंडे यांनी यशोमती ठाकूर यांच्‍या आडनावावरून केलेले वक्‍तव्‍य वादग्रस्‍त ठरले आणि राजकारण पेटले. आता उभय नेत्‍यांमध्‍ये शाब्दिक वाद टोकदार बनला आहे.

सविस्तर वाचा...

14:11 (IST) 12 Oct 2023
पुणे रेल्वे स्थानकात मोबाइल चोरट्याला पकडले; २० मोबाइल संच जप्त

पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरात मोबाइल चोरट्याला लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने पकडले. चोरट्याकडून २० मोबाइल संच जप्त करण्यात आले.

वाचा सविस्तर...

14:06 (IST) 12 Oct 2023
“शाळा विकू नका, मी शासनाला दोन्ही किडन्या देतो,” उद्विग्न प्रभारी सरपंचांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

ज्या शाळेने माझ्या भविष्याची पायाभरणी केली, अशी माझी प्रिय शाळा दत्तक योजनेतून मला कुठल्याही परिस्थितीत चालवायला द्या, अशी मागणी सरपंचाने जिल्हाधिकाऱ्यांना केली.

सविस्तर वाचा...

14:05 (IST) 12 Oct 2023
महिला तस्करीचे प्रमाण राज्यात सर्वाधिक, ५ लाख महिला बेपत्ता; महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणतात…

महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे. महिला बेपत्ता होण्याच्या १३ लाख तक्रारी आहेत.

सविस्तर वाचा...

14:04 (IST) 12 Oct 2023
ललित पाटील प्रकरणात ‘ससून’च्या अधिष्ठात्यांच्या अडचणीत वाढ

पुणे : अमली पदार्थ तस्करी प्रकरणाचा सूत्रधार ललित पाटील याने ससून रुग्णालयातून पलायन केल्याने रुग्णालयाचे व्यवस्थापन संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कैदी रुग्णांना ससूनमध्ये विशेष वागणूक दिल्याचा आरोप होत आहे. यातच आता काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी ललित पाटील प्रकरणात ससूनच्या अधिष्ठात्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

वाचा सविस्तर...

14:01 (IST) 12 Oct 2023
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसोबत भेदभाव; राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांनी केली 'ही' मागणी

आयोगाद्वारे पुण्यातील महात्मा गांधी प्रशिक्षण केंद्र, महिला व बाल विकास कार्यालय येथे आयोगाच्या सदस्यांसोबत पुणे विभागाच्या प्रलंबित प्रकरणांची दोन दिवस सुनावणी घेण्यात आली. या दोन दिवसांत ५० सुनावण्या घेण्यात आल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शहा म्हणाल्या, की शिक्षणाचे प्रमुख केंद्र असलेल्या पुणे, मुंबईतील अनेक शाळांची आरटीई संकेतस्थळावर नोंद नाही.

सविस्तर वाचा

13:52 (IST) 12 Oct 2023
सावधान ! इंडियन कोस्ट गार्डचा अधिकारी सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकला अन्...

इंडियन कोस्ट गार्डच्या अधिकाऱ्याने स्वेच्छानिवृत्तीनंतर ‘रिटायर्डमेन्ट प्लॅन’ची गूगलवरून माहिती घेतली. मात्र, ते माहिती घेताना चक्क सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकले. सायबर गुन्हेगाराने अधिकाऱ्याला अधिक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करायला लावली व ४३ लाखांचा गंडा घातला. 

सविस्तर वाचा

13:49 (IST) 12 Oct 2023
मालवाहतुकीतून रेल्वे मालामाल; पॅसेंजर, एक्सप्रेसचे रडगाणे सुरूच...

पॅसेंजर, एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना तासनतास विलंब व ऐनवेळी अचानक रद्द होण्याचे प्रकार गेल्या एका वर्षापासून सातत्याने सुरू आहेत. यामुळे प्रवाशी हैराण होत आहेत. तर एकीकडे मात्र याच काळात रेल्वेने मालवाहतुकीतून गेल्यावर्षीपेक्षा जास्त उत्पन्न मिळवल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.

सविस्तर वाचा

13:41 (IST) 12 Oct 2023
नागपूर : आमदार ठाकरे विरुद्ध नरेंद्र जिचकार वाद, विभागीय आढावा बैठकीत गोंधळ

नागपूर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष संघटन बांधणीसाठी काँग्रेसने आयोजित केलेल्या आढावा बैठकीत गोंधळ बघावयास मिळाला.

वाचा सविस्तर...

13:39 (IST) 12 Oct 2023
मुंबई : शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर महानगरपालिकेची ठाकरे गटाला लेखी परवानगी

मुंबई : दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्याबाबतचा वाद संपल्यानंतर गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला महानगरपालिकेने लेखी परवानगी दिली. ठाकरे गटाला मेळाव्यानिमित्त २३ व २४ ऑक्टोबर रोजी मैदान वापरण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

cm eknath shinde uddhav thackeray (1)

एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे (फोटो - एएनआय)

शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून १३ ऑक्टोबरऐवजी सुनावणी आज दुपारी २ वाजता होणार आहे. जी -20 देशांच्या सभागृह अध्यक्षांची बैठक दिल्लीत होणार असल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तिकडे जाणार आहेत. त्यामुळे वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती आहे.

Story img Loader