Mumbai Pune Updates Today, 02 October 2024 : विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे राज्यात राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. एकीकडे महायुतीच्या सभा तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या मेळ्यांचा धडाका सध्या पाहायला मिळत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण पाहायला मिळत आहे. यातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दारू पिऊन मराठा आंदोलकांना शिवीगाळ केल्याच्या आरोपानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. याचबरोबर एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये आता ‘शिवनेरी सुंदरी’ नेमण्याचा निर्णय महाराष्ट्र परिवहन महामंडळाने घेतला आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तसेच लाडकी बहीण योजनेवर विरोधकांकडून टीकाही केली जाते आहे. याशिवाय राज्यातील इतर घडामोडींवरही आपलं लक्ष असणार आहे.

Live Updates

Maharashtra News Live Today, 02 October 2024

19:12 (IST) 2 Oct 2024
वेश्याव्यवसायातून थायलंडच्या १५ महिलांची सुटका, उल्हासनगरमधील घटना

याप्रकरणात पोलिसांनी लाॅजचा व्यवस्थापक पंकज सिंग (३७) याच्यासह पाच जणांना ताब्यात घेतले.

सविस्तर वाचा...

18:58 (IST) 2 Oct 2024
घटस्थापनेने उद्यापासून शारदीय नवरात्रोत्सव; रंगरंगोटी, विद्युत रोषणाईने तुळजाभवानी देवी मंदिराला झळाळी

पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करून नित्योपचार पूजा व घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे.

सविस्तर वाचा...

18:58 (IST) 2 Oct 2024
नाशिक : भावडबारीजवळ बस अपघात

नाशिक - जिल्ह्यातील विंचूर-देवळा-प्रकाशा या राष्ट्रीय महामार्गावरील भावडबारी घाटाजवळ बुधवारी राज्य परिवहनच्या बसला अपघात झाला. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. याठिकाणी रखडलेल्या रस्ता कामामुळे वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांनी लोकप्रतिनिधींसह प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला.

18:23 (IST) 2 Oct 2024
शरद पवारांची अजित पवारांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव

शरद पवारांनी अजित पवारांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी घड्याळ चिन्ह गोठवा अशी मागणी करण्यासाठी त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे काका विरुद्ध पुतण्या आणि घड्याळ चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहचला आहे.

18:22 (IST) 2 Oct 2024
नागपूर : ‘शिवनेरी सुंदरीचा मोह सोडा’, प्रवाशांना ‘हे’ देतात चांगली सेवा…

महामंडळाच्या संचालक मंडळाच्या ३०४ व्या सभेत महामंडळाचे नवीन अध्यक्ष भरत गोगावले यांनी शिवनेरी सुंदरीची नेमणूक करण्याची घोषणा केली.

सविस्तर वाचा...

18:10 (IST) 2 Oct 2024
बुलढाणा : महिला सरपंचाने स्वतःला जमिनीत घेतले गाडून! ‘लाडक्या बहिणी’साठी तहसीलदार…

आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यातील एका महिला सरपंचांनी असा काही 'आंदोनात्मक हिसका' दाखविला की 'साहेब' थेट आंदोलनाच्या दारी आले.

सविस्तर वाचा...

18:08 (IST) 2 Oct 2024
महाविकास आघाडीचं २०० जागाचं वाटप निश्चित झालंय-आव्हाड

महाविकास आघाडीचं दीडशे ते २०० जागांचं जागावाटप निश्चित झालं आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर जागावाटप पूर्ण होईल अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

17:53 (IST) 2 Oct 2024
यूपीआय, ऑनलाइन ॲप, एटीएम कार्ड नसूनही फसवणूक, खात्यातून ५० हजार लंपास

नागेश पांडुरंग दळवी व त्यांच्या आईच्या संयुक्त खात्यातून ५० हजार रुपये काढून फसवणूक करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

17:38 (IST) 2 Oct 2024
नागपूर : वंदे भारत एक्सप्रेस रद्द! रेल्वेचा निर्णय काय जाणून घ्या…

नागपूर ते सिकंदराबाद आणि सिकंदराबाद-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस प्रत्येकी दोन दिवस रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

सविस्तर वाचा...

17:16 (IST) 2 Oct 2024
सावंतवाडीत केसरकर यांच्या विरोधात बॅनरबाजी, ‘आता बदल हवो तर आमदार नवो!’

सावंतवाडी शहरातील मोक्याच्या ठिकाणी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात बॅनर झळकल्याचे बुधवारी सकाळी निदर्शनास आले.

सविस्तर वाचा...

16:54 (IST) 2 Oct 2024
मुलीची छेड काढणाऱ्याला रंगेहाथ पकडले, आईने घराबाहेर सीसीटीव्ही लावून रचला सापळा

अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून त्यांच्या घरात डोकावणार्‍या एका रोडरोमेयोला मनसे कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला.

सविस्तर वाचा...

16:29 (IST) 2 Oct 2024
“महात्मा फुलेंनी लिहिलेल्या ओळी या सरकारने बदलल्या”, वडेट्टीवारांकडून पुराव्यासह…

आपल्या सोयीनुसार काही ओळी जाणीवपूर्वक वगळल्या. काहींमध्ये सोयीचा बदल केला असा आरोप विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

सविस्तर वाचा...

16:11 (IST) 2 Oct 2024
ट्रक चालकाच्या चुकीमुळे ज्येष्ठ कामगाराचा मृत्यू

पनवेल ः ट्रक चालकाच्या चुकीमुळे ६३ वर्षीय कामगाराचा चाकाखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मुंब्रा पनवेल महामार्गावरील किरवली गावानजीक अन्नपूर्णा वेअरहाऊसमध्ये घडली. याबाबत तळोजा पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

16:06 (IST) 2 Oct 2024
“तीन नंबरची गाळ मुलगी शेतकऱ्यांच्या पोरांना…”; आमदार देवेंद्र भुयार महिलांविषयी जे बोलले त्यामुळे…

काही दिवसांपूर्वी एका सभेत त्‍यांनी महिलांसोबत वाद घालून बाहेर निघून जाण्‍याचे फर्मान सोडले होते, त्‍याचीही चर्चा रंगली होती.

सविस्तर वाचा...

16:05 (IST) 2 Oct 2024
पिंपरी- चिंचवडमध्ये पोलिसांसमोरच प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांना दमदाटी; देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

अपघातग्रस्त टेम्पोचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना दमदाटी आणि अश्लील शिवीगाळ केल्याची घटना देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

सविस्तर वाचा...

15:58 (IST) 2 Oct 2024
"आरक्षण वाचवायचे असेल तर...", प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपही सुरु आहेत. आता यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य करत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर त्यांनी हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले, "क्रिमीलेयरच्या माध्यमातून आरक्षण संपवण्यासाचा डाव सुरु आहे. वंचित बहुजन आघाडीने या निर्णयाला विरोध केला आहे. तुम्ही देखील विरोध करणार असताल तर तुम्ही वंचित बहुजन आघाडीला विधानसभेला मतदान द्या. हे आवाहन मी सर्वांना करतो", असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

15:49 (IST) 2 Oct 2024
कुत्र्याला बाहेर सोडू नका सांगणाऱ्याला जीवे मारण्याची धमकी; थेट पोलीस अधिक्षकांकडे तक्रार

"कुत्र्याला काही दिवस बाहेर सोडू नका", असे म्हटल्याचा राग आल्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

सविस्तर वाचा...

15:46 (IST) 2 Oct 2024
झोपु योजना रखडल्यास, विकासकांना ‘चटईक्षेत्रफळा’चा दंड!

मुंबई : रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास योजना पूर्ण व्हाव्यात, यासाठी राज्य शासनाने जोरदार प्रयत्न सुरु केले असून अशा योजना रखडविणाऱ्या विकासकांना ‘चटईक्षेत्रफळा’च्या रुपात दंड करण्याचे गृहनिर्माण विभागाने प्रस्तावीत केले आहे.

सविस्तर वाचा...

15:44 (IST) 2 Oct 2024
राज्यात आठ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता! एमबीबीएसच्या ८०० जागा वाढल्या…

मुंबई: केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्रातील आठ शसकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली आहे.

सविस्तर वाचा...

15:43 (IST) 2 Oct 2024
पर्यावरण नियम उल्लंघन प्रकरणी मर्सिडीज बेंझला दणका ! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली २५ लाखांची बँक हमी

पुणे : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मर्सिडीज बेंझ कंपनीला पाठविलेल्या नोटिशीला कंपनीने आठवडाभरातच उत्तर दिले आहे.

सविस्तर वाचा...

15:40 (IST) 2 Oct 2024
अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचा संकल्प मात्र आमदारांची मेळाव्याकडे पाठ !

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचा संकल्प मंगळवारी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात करण्यात आला.

सविस्तर वाचा...

15:39 (IST) 2 Oct 2024
विद्यार्थ्यांना मापाचे नसलेले, फाटलेले, उसवलेले गणवेश… राज्यात ‘गणवेश गोंधळ’का सुरू आहे?

पुणे : शालेय शिक्षण विभागाच्या एक राज्य एक गणवेश योजनेतील ‘गणवेश गोंधळ’अद्यापही सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

सविस्तर वाचा...

15:38 (IST) 2 Oct 2024
पुणे रेल्वे स्थानकातून सात महिन्यांच्या बालकाचे अपहरण, गुजरातमधून महिलेसह दोघांना अटक; बालक सुखरुप

पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातून सात महिन्यांच्या बालकाचे अपहरण करण्यात आले. लोहमार्ग पोलिसांनी तपास करून अहमदाबादमधून एका महिलेसह दोघांना अटक केली.

सविस्तर वाचा....

15:36 (IST) 2 Oct 2024
पिंपरीत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ; १७,५०० घरांमध्ये सापडल्या अळ्या

पिंपरी : शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असून, आतापर्यंत १७८ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे.

सविस्तर वाचा...

15:35 (IST) 2 Oct 2024
पिंपरी : चिंचवड शहरातील भाजपमधील गटबाजी उघड; इच्छुकांना डावलत विधानसभा उमेदवारीसाठी ‘या’ तिघांची नावे प्रदेशकडे

पिंपरी : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चिंचवड विधानसभा मतदार संघातून उमेदवार कोण असावा, याबाबत पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी भाजपने बोलविलेल्या बैठकीला इच्छुकांनाच डावलण्यात आले.

सविस्तर वाचा...

14:22 (IST) 2 Oct 2024
मुंबई: हिंदमाताला जलवेढा कायम

हिंदमाता परिसरात भूमिगत टाकी बांधण्यात आली असताना येथे पाणी साचल्यामुळे महापालिका प्रशासनालाही कोडे पडले आहे.

सविस्तर वाचा...

14:02 (IST) 2 Oct 2024
धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; नागपूरच्या मोवाड गावातील घटना

विजय पाचोरी हे सेवानिवृत्त शिक्षक असून पत्नी माला आणि दोन्ही मुले गणेश आणि दीपक यांच्यासोबत राहत होते.

सविस्तर वाचा...

13:33 (IST) 2 Oct 2024
पुण्यावर आता ‘एआय’ कॅमेऱ्यांंची नजर, २८६६ कॅमेरे बसविण्यासाठी ४३३ कोटी मंजूर

शहरातील वाढते गंभीर गु्न्हे, सराइतांच्या हालचाली टिपण्यासाठी पुणे पोलिसांकडून कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित (आर्टीफिशयल इंटेलिजन्स) सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

वाचा सविस्तर....

13:27 (IST) 2 Oct 2024
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याकडे दोन आमदारांनी फिरवली पाठ, आमदार म्हणाले,”अजितदादा पवार…”

पुण्यातील अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखाली काल मंगळवारी सेंट्रल पार्क येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता.

सविस्तर वाचा...

13:09 (IST) 2 Oct 2024
जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर भीषण अपघात, चालक गंभीर

जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर नियंत्रण सुटून ट्रेलरचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर ट्रेलरला भीषण आग लागली.

सविस्तर वाचा...

पुण्यातील बावधानमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी हिंजवडी पोलीस दाखल झाले असून घटनेचा तपास केला जात आहे.

Pune News

<br />पुण्यातील बावधानमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली