Mumbai Pune Live Updates Today, 02 October 2024 : विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे राज्यात राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. एकीकडे महायुतीच्या सभा तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या मेळ्यांचा धडाका सध्या पाहायला मिळत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण पाहायला मिळत आहे. यातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दारू पिऊन मराठा आंदोलकांना शिवीगाळ केल्याच्या आरोपानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. याचबरोबर एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये आता ‘शिवनेरी सुंदरी’ नेमण्याचा निर्णय महाराष्ट्र परिवहन महामंडळाने घेतला आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तसेच लाडकी बहीण योजनेवर विरोधकांकडून टीकाही केली जाते आहे. याशिवाय राज्यातील इतर घडामोडींवरही आपलं लक्ष असणार आहे.

Live Updates

Maharashtra News Live Today, 02 October 2024

13:33 (IST) 2 Oct 2024
पुण्यावर आता ‘एआय’ कॅमेऱ्यांंची नजर, २८६६ कॅमेरे बसविण्यासाठी ४३३ कोटी मंजूर

शहरातील वाढते गंभीर गु्न्हे, सराइतांच्या हालचाली टिपण्यासाठी पुणे पोलिसांकडून कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित (आर्टीफिशयल इंटेलिजन्स) सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

वाचा सविस्तर….

13:27 (IST) 2 Oct 2024
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याकडे दोन आमदारांनी फिरवली पाठ, आमदार म्हणाले,”अजितदादा पवार…”

पुण्यातील अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखाली काल मंगळवारी सेंट्रल पार्क येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता.

सविस्तर वाचा…

13:09 (IST) 2 Oct 2024
जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर भीषण अपघात, चालक गंभीर

जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर नियंत्रण सुटून ट्रेलरचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर ट्रेलरला भीषण आग लागली.

सविस्तर वाचा…

12:51 (IST) 2 Oct 2024
बलात्कार प्रकरणातील आरोपीचा मुंबईला पळून जाण्याचा प्रयत्न, पोलिसांनी अकोल्यात ठोकल्या बेड्या

कोरपना येथील खासगी शाळेमध्ये इयत्ता सहावी मध्ये शिक्षण घेत असलेली अल्पवयीन पीडीत मुलगी आरोपीकडे दर रविवारी खासगी शिकवणीसाठी जात होती.

सविस्तर वाचा…

12:43 (IST) 2 Oct 2024
“महाराष्ट्रात असे काही घडेल की…”, अमित शाहांना रोहित पवारांचं प्रत्युत्तर

“महाराष्ट्रात असे काही घडेल की देशाला दिशा देऊन जाईल. त्यामुळे अमित शाह हे म्हणत आहेत ते खरं आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने दडपशाही आणि पैशाचा वापर करून लोकांनी महाविकास आघाडीला साथ दिली. तशीच ताकद या विधानसभेला मतदार या महाविकास आघाडीला देतील असा विश्वास आहे आणि हेच अमित शाह यांना देखील वाटत असावं, त्यामुळे कुठेतरी भाजपाला ही भिती आहे की राज्यात पुन्हा त्यांचं सरकार येणार आहे आणि ही भिती खरी आहे, म्हणून ते विरोधकांचे नेते आणि पदाधिकारी फोडा असं म्हणत आहेत”, असा हल्लाबोल रोहित पवार यांनी केला.

12:38 (IST) 2 Oct 2024
नागपूर: आर्थिक गुन्ह्यात तीनदा अडकलेले डॉ. धवनकर प्रत्येकदा कसे सुटतात? २१ महिन्याने पुन्हा रुजू

डॉ. धवनकर यांची चौकशी सुरू राहणार असून चौकशी समितीच्या निर्णयाच्या अधीन राहून त्यांची सक्तीची रजा तूर्तास रद्द करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

12:09 (IST) 2 Oct 2024
सावधान! चिकनगुनियाच्या रुग्णांवर स्टेराॅईडचा प्रयोग! अस्थिरोग तज्ज्ञ म्हणतात…

अनेक करोनाग्रस्तांनी भीतीपोटी स्टेराईड घेतल्याने त्याचे अनेक दुष्परिणाम बघायला मिळाले.

सविस्तर वाचा…

11:58 (IST) 2 Oct 2024
नागपूर: नियतीचा खेळ, अखेर प्र-कुलगुरूंना पद सोडण्याचे आदेश, शिक्षण मंचाला मोठा धक्का

कुलगुरूंच्या निधनानंतर विद्यापीठातील प्र- कुलगुरू पदाचा कार्यकाळ संपुष्टात येत असतो. कुलगुरू चौधरी यांचे दोनदा निलंबन झाले आहे.

सविस्तर वाचा…

11:37 (IST) 2 Oct 2024
नवीन महाबळेश्वर प्रकल्प रद्द करण्याची पर्यावरणतज्ज्ञांची मागणी

राज्य शासन कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कास पठार आणि सभोवतालच्या परिसरात नवीन महाबळेश्वर पर्यटन प्रकल्प सुरु करणार आहे.

सविस्तर वाचा…

11:31 (IST) 2 Oct 2024
पिंपरी : थकबाकीदार महापालिकेच्या रडारवर; सहा महिन्यांत ५०५ कोटींचा मालमत्ता कर जमा

पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा सहा लाख ३२ हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत.

सविस्तर वाचा…

11:30 (IST) 2 Oct 2024
चंद्रपूर: तालुका युवक काँग्रेसच्या नेत्यावर अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचाराचा केल्याचा आरोप, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

सहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्या प्रकरणी पोक्सो व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

सविस्तर वाचा…

11:30 (IST) 2 Oct 2024
राज्यात कारागृह पोलीस भरतीत ‘हायटेक कॉपी’

शहरात सुरु असलेल्या कारागृह पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत ‘हायटेक कॉपी’चा प्रकार समोर आल्यामुळे राज्यभरातील लेखी परीक्षेच्या पारदर्शकतेवर संशय निर्माण झाला झाला आहे.

सविस्तर वाचा…

10:48 (IST) 2 Oct 2024
“दिल्लीत २०२९ मध्ये भाजपाचे सरकार नसेल”, विजय वडेट्टीवारांचं विधान

“२०२९ मध्ये दिल्लीत देखील भारतीय जनता पक्षाचे सरकार नसेल. एवढ्या दूरचं स्वप्न पाहणं तर दूरच आहे. भाजपा केंद्रात कुबड्या घेऊन सत्तेत आहे. आता पुढे १० ते १५ वर्ष भाजपा राज्याच्या सत्तेतही राहणार नाही. एवढी राज्याची जनता त्यांना वैतागली आहे”, असा हल्लाबोल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

पुण्यातील बावधानमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी हिंजवडी पोलीस दाखल झाले असून घटनेचा तपास केला जात आहे.

<br />पुण्यातील बावधानमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली