Mumbai Maharashtra News : बीड सरपंच हत्या प्रकरणात सध्या वाल्मिक कराडचं नाव प्रामुख्याने घेतलं जात असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, त्याचवेळी विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली जात आहे. सुरेश धस यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला नसल्याचं म्हटलं आहे. त्याचवेळी सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Marathi News Live Updates: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा आढावा
किरिट सोमय्यांच्या आरोपानंतर खळबळ… अमरावतीत आता बांगलादेशींच्या…
अमरावती : मालेगावपाठोपाठ अंजनगाव सुर्जी येथे देखील बांगलादेशी अवैध स्थलांतरितांना बनावट जन्म प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा आरोप भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी केल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी आता जिल्हा प्रशासनाने दर्यापूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे.
बुलढाणा : अनामिक आजाराचा कहर! केसगळती, टक्कलग्रस्त रुग्णांची संख्या शंभरपेक्षा जास्त…
बुलढाणा : शेगाव तालुक्यातील गावातील केस गळती आणि टक्कलग्रस्त रुग्णांची संख्या कालच्या तुलनेत आज दुप्पट झाल्याचे धक्कादायक चित्र आहे. या विचित्र आणि अनामिक आजाराची रुग्ण संख्या शंभरवर पोहोचली आहे.
नागपूर : दोन वर्षीय चिमुकलीने आईच्या कुशीत सोडला जीव…
नागपूर : कामाच्या शोधात आलेले दाम्पत्य विटाभट्टीवर मोलमजुरी करीत होते. कामाच्या ठिकाणी त्यांची दोन वर्षीय चिमुकली खेळत होती. दरम्यान, कामावर उपस्थित चालकाने कार मागे घेतली असता त्या चिमुकलीच्या अंगावरुन कारचे चाक गेले.
नागपूर : फटाके फोडणाऱ्या बुलेटमुळे त्रस्त! पोलिसांनी शेकडो सायलेन्सर…
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून नागपूरकर बुलेटस्वारांच्या फटाक्यांनी त्रस्त झाले होते. अनेक जेष्ठांनी आणि महिलांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. तसेच काही रुग्णालयांनीही पोलिसांकडे बुलेटच्या फट्ट आवाजाबाबत आक्षेप घेतला होता.
देवीच्या मूर्तीवरील १५ लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास
सांगली : आरग (ता. मिरज) येथील पद्मावती मंदिरामध्ये गुरूवारी पहाटे अज्ञातांने चोरी करून मुर्तीच्या अंगावरील १८ तोळे सुवर्णालंकार आणि एक किलो चांदीचे दागिने असा १५ लाखाचा ऐवज लंपास केला आहे.
दोन महिन्यांमध्ये मुंबईतील पीएम २.५ धूलीकणांमध्ये वाढ
पीएम २.५ या अतिसूक्ष्म धूलीकणाचा कणाचा व्यास २.५ मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी असतो.
टीसच्या कर्मचाऱ्यांना मार्च २०२६ पर्यंत दिलासा, टाटा एज्युकेशन ट्रस्टकडून ११५ कर्मचाऱ्यांसाठी भरीव तरतूद
तरतूद ३१ डिसेंबर रोजी संपल्याने या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. मात्र टाटा एज्युकेशन ट्रस्टने निधी दिल्याने हे निलंबन मागे घेण्यात आले होते.
नाशिकरोड कारागृहातील जमिनीत दोन भ्रमणध्वनी, गुन्हा दाखल
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या आवारात जमिनीत पुरलेले दोन भ्रमणध्वनी आढळले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोली येथील सुवर्णदुर्ग किल्ल्याला मिळणार ‘वर्ल्ड हेरीटेज’चा दर्जा; जिल्हा प्रशासनाकडून पाहणी
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सिंह, बांधकाम विभाग, पुरातत्त्व विभाग, प्रांताधिकारी, तहसीलदार आदींनी हर्णे किल्ला आणि परिसरामध्ये काय सुविधा देता येतील? याविषयी पाहणी केली.
चांदिवली – असल्फादरम्यानच्या मिसिंग लिंक प्रकल्पातील अडथळा दूर, महापालिकेने पाच बांधकामे हटवली
चांदिवली परिसरातील ६० पुटी विजय फायर मार्ग आणि जंगलेश्वर मंदिर मार्गादरम्यानच्या ‘मिसिंग लिंक’ जोडणी प्रकल्पाचे काम सुरू आहे.
ठाणे : थकीत कर वसुलीसाठी पालिकेने वाजविले ढोल ताशे, नौपाडा विभागात पालिका प्रशासनाकडून कारवाई
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मालमत्ता कराच्या वसुलीत वाढ झाली असली तरी मालमत्ता कर वसुलीचे उद्दीष्ट गाठण्यासाठी अडीच महिनेच शिल्लक राहिले आहेत.
ठाणे अंतर्गत मेट्रोच्या त्रिपक्षीय सामंजस्य करारास मान्यता; केंद्र, राज्य शासन आणि महामेट्रो यांच्यात होणार करार
ठाणे महापालिकेने आखलेल्या १२ हजार २०० कोटींच्या अंतर्गत मेट्रो प्रकल्पासाठी त्रिपक्षीय करार करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
नवीन वर्षात पुन्हा एकदा नागनदी प्रदुषण मुक्तीसाठी प्रयत्न, काय आहे योजना?
नागपूर : शहराच्या मध्यभागातून वाहणारी नागनदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी यात सोडण्यात येणारे सांडपाणी वाहून नेण्यासाठी नदीच्या पात्रालगत बंद जलवाहिनी (पाईपलाईन) टाकण्यात येणार आहे. अतिक्रमण काढण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शासकीय कर्मऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंब निवृत्तवेतन प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर
नागपूर : महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियमाप्रमाणे कुटुंब निवृनिवेतनाबाबत तरतूदी नमूद करण्यात आल्या आहेत. सध्याच्या पध्दतीनुसार शासकीय कर्मचारी व त्याच्या प्रथम वारस (पती / पत्नी) यांच्या मृत्यू नंतर अविवाहित मुलगी २४ वर्षाची होईपर्यंत कुटुंब निवृत्तीवेतन प्रदान करण्यात येते. तसेच अपंगत्व असलेल्या पाल्याला हयातभर कुटुंब निवृत्तीवेतन न मिळण्याची तरतूद आहे.
वनमंत्री गणेश नाईक म्हणाले “वाघ मुंबईपर्यत आले तर काय…”
चंद्रपूर : जंगलातून बाहेर पडलेले वाघ व बिबट मुंबईपर्यंत आले तर काय होईल याची कल्पना मी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना देणार आहे. वाघांना जंगलात सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ देण्यासोबतच इतरही उपाययोजना करण्यासाठी वरील नेत्यांशी चर्चा करणार, असे वनमंत्री गणेश नाईक म्हणाले.
अधिकाऱ्यांच्या उत्तराने वनमंत्री नाराज, वनाधिकाऱ्यांना दिली तंबी…
नागपूर : पैसे भरुन व्याघ्रप्रकल्पात कॅमेरे नेता येतात, मग भ्रमणध्वनीवरच बंदी का, असा थेट प्रश्न वनमंत्री गणेश नाईक यांनी वनाधिकाऱ्यांना विचारला. त्यावर अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तराने वनमंत्री समाधानी झाले नाहीत आणि त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या गर्दीने भरून धावत असताना देखील दादर -रत्नागिरी पॅसेंजर गाडी बंद करण्यात आली आहे. ही गाडी पुन्हा सुरु करण्यासाठी रत्नागिरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्ट मंडळाने मनसेचे रत्नागिरी तालुका अध्यक्ष रूपेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट यांना निवेदन दिले. यावेळी यामागणीवर लवकरात लवकर ठोस कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
दिवा ते दादर मार्गाची क्षमता नसल्याचे कारण देणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाने त्याच मार्गावर दादर-गोरखपूर (चार दिवस) आणि दादर-बालिया (तीन दिवस) विशेष रेल्वेगाड्या (दैनिक) सुरू केल्या. म्हणजेच रेल्वे प्रशासनाने कोकणासाठी दूजाभाव धोरण अवलंबले असून, याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना धिक्कार करत असून येथील प्रवाशांच्या व जनतेच्या सहकार्याने कोकण रेल्वेच्या या मनमानी व दुजाभाव कारभाराविरोधात व्यापक जनआंदोलन उभारू आणि यातून होणाऱ्या परिणामाला कोंकण रेल्वे प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा कोंकण रेल्वे प्रशासनाला दिला आहे.
सागरी किनाऱ्यावर लक्ष ठेवणाऱ्या ड्रोन प्रणाली नियंत्रण कक्षाचे नितेश राणे यांच्या हस्ते उदघाटन
सावंतवाडी : सागरी किनाऱ्यावर ड्रोन प्रणालीच्या माध्यमातून लक्ष ठेवणाऱ्या यंत्रणेचे उद्घाटन मस्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. राज्याच्या जलाधीक्षेत्रात नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन चा वापर केल्यास अनधिकृत मासेमारी करणाऱ्या लोकांची पुराव्यासह माहिती विभागास उपलब्ध होण्यास मदत होणार आहे, अशा लोकांवर सागरी कायद्याअंतर्गत कठोरपणे कारवाई करणे सोयीचे होणार आहे. अनधिकृत मासेमारी आळा घालून शाश्वत मासेमारी टिकून राहण्याचे दृष्टीने राष्ट्रीय सागरी सुरक्षा व सुरक्षित या दृष्टीने राज्याच्या जलधी क्षेत्रात ड्रोनद्वारे देखरेख ठेऊन मासेमारीचे नियमन करण्याकरता ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स यांच्या प्रणाली या ड्रोन प्रणालीचे नियंत्रण कक्षाचे उदघाटन नितेश राणे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने मुंबई मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयात करण्यात आले.
एचएमपीव्हीच्या प्रतिबंधासाठी कृती दलाची स्थापना, जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती
राज्यामध्ये एचएमपीव्हीचे रुग्ण सापडू लागल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाने तातडीने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.
देशातील माता मृत्यूदर २० टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य, स्त्रीरोग तज्ज्ञांची ‘फॉग्सी’ संघटना करणार जनजागृती
मुंबई : स्त्रीरोग तज्ज्ञांच्या ‘इंडियन ऑब्स्टेट्रिक्स ॲण्ड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी’ (‘फॉग्सी’) या संस्थेने देशातील माता मृत्यू दर २० टक्क्यांनी कमी करण्यासाठी विशेष अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महिलांचे प्रबोधन करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या नवनियुक्त अध्यक्षा डॉ. सुनीता तांदुळवाडकर यांनी मुंबईत आयोजित ६७ व्या ‘ऑल इंडिया काँग्रेस ऑफ ऑब्स्टेट्रिक्स ॲण्ड गायनॅकॉलॉजी’ परिषदेत केली.
बनावट दागिन्यांच्या बदल्यात खरे दागिने घेऊन महिला पसार
मुंबई : कमी किमतीत सोन्याचे दागिने देण्याचे अमिष दाखवून एका महिलेने कुर्ल्यातील गृहिणीचे खरे दागिने घेऊन पोबारा केला. याप्रकरणी गृहिणीने घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
शरद पवारांनी संघाचे कौतुक करताच अजित पवारांच्या ‘या’ आमदाराने व्यक्त केली खंत, म्हणाले…
शरद पवारांनी नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत राज्यातील विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या प्रचाराचे कौतुक केलं. यावरून आता अजित पवारांचे कट्टर समर्थक आणि आमदार अण्णा बनसोडे यांनी शरद पवारांनी अजित पवारांचं कौतुक करायला हवं, असं म्हणत खंत व्यक्त केली आहे. सविस्तर वाचा
शिंदेशाहीतील चुकांची उजळणी करत नाईकांचे वर्चस्वाचे संकेत
नवी मुंबई पोलिसांच्या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कालखंडातील चुकांवर बोट ठेवत ‘नेताच जर चुकीचा असेल तर सगळीच यंत्रणा चुकते’ या वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्याचा रोख नेमका कोणाच्या दिशेने होता अशी चर्चा आता येथील राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. सविस्तर वाचा
महिलांना काम करण्यासाठी सर्वोत्कृष्ट असलेल्या पहिल्या पाच शहरांत पुण्याला स्थान
या सर्वेक्षणात आदर्श शहरे आणि सर्वोत्तम पद्धती निश्चित केल्या जातात. तसेच त्यात शहरांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी संस्था, धोरणकर्ते आणि व्यक्तींसाठी एक संधी उपलब्ध करून दिली जाते.
डोंबिवलीत सोसायटीच्या प्रवेशव्दारासमोर वाहने उभे करणाऱ्यांना गाढवाची उपमा, टाटा लाईनखाली दुचाकी वाहनांचे बेशिस्त वाहनतळ
टाटा लाईनखाली दररोज सहाशे ते सातशे दुचाकी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या केल्या जातात. या दुचाकी अनेक वेळा या भागातील सोसायट्यांच्या प्रवेशव्दारासमोर उभ्या केल्या जातात.
पाणी चोरी भोवली, २४५ घरांची नळ जोडणी तोडली
चंद्रपूर : जलमापक यंत्र ( मीटर ) काढून पाण्याचा वापर करणाऱ्या २४५ नळ धारकांवर नळ जोडणी बंद करण्याची कारवाई केली आहे. तर १०७ जलमापक यंत्र जप्त केले. तसेच मीटर काढून पाण्याचा वापर करणाऱ्या २ हजार ४०७ नळधारकांची नोंद घेण्यात आली असून मीटर जोडणी न केल्यास कारवाईचा इशारा महापालिकेने दिला आहे.
नागपूर विद्यापीठाच्या तिजोरीत ठणठणाट? तासिका प्राध्यापकांचे वेतन थकले
नागपूर : नुकतेच आपले शतकोत्तर वर्ष साजरे करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या चालू खात्यात ठणठणाट असल्याची माहिती आहे. बँकांमध्ये कोट्यवधींच्या मुदत ठेवी करण्यावर वित्त व लेखा अधिकारी हरीश पालिवाल यांचा भर आहे.
वाघाची शिकार? उकणी कोळसा खाणीत कुजलेला मृतदेह आढळला; १३ नखे व दोन दात…
यवतमाळ : वणी तालुक्यातील उकणी येथील खुल्या कोळसा खाणीच्या मुख्य मार्गावर वाघ मृतावस्थेत आढळला. वाघाचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या वाघाचे दोन मुख्य दात आणि १२ नखे गायब असल्याने वाघाचा मृत्यू नैसर्गिक आहे की त्याची शिकार करण्यात आली, याचा शोध वनविभागाने सुरू केला आहे.
जिओ टॉवर स्कॅम : देशभरातील हजारो नागरिकांना कोट्यवधीने गंडवणारी टोळी जेरबंद, कोलकातावरून सुरू होते…
जिओ टॉवर लावण्याच्या मोबदल्यात २५ लाख रुपये आणि नोकरीचे आमिष दाखवून देशातील हजारो नागरिकांना कोट्यवधीने गंडवणाऱ्या टोळीतील तब्बल ४२ जणांना नागपूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली.
प्रायव्हेट कोचिंग क्लासेसवर लगाम!; शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी नसल्यास…
बहुतांश विद्यार्थी शाळेत केवळ नावापुरता प्रवेश घेत प्रायव्हेट ट्युशन क्लास लावतात. त्यांची नोंद होत नाही. पण शाळा ओस पडत असल्याचे चित्र दिसून येते.
Marathi News Live Updates: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा