Mumbai Maharashtra News : बीड सरपंच हत्या प्रकरणात सध्या वाल्मिक कराडचं नाव प्रामुख्याने घेतलं जात असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, त्याचवेळी विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली जात आहे. सुरेश धस यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला नसल्याचं म्हटलं आहे. त्याचवेळी सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi News Live Updates: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा आढावा

14:29 (IST) 9 Jan 2025

वनमंत्र्यांच्या पहिला विदर्भ दौरा, माजी वनमंत्र्यांच्या कामाचे कौतुक

नागपूर: महाराष्ट्रातील १७ टक्के जागा वनक्षेत्राने व्यापलेली आहे, विभाग समजून घ्यायचा आहे. माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठ्या प्रमाणात खात्याची प्रगती केली आहे करोडो झाडे लावण्याचे उद्दिष्ट साध्य केले,असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी नागपूर येथे केले.

वाचा सविस्तर…

14:29 (IST) 9 Jan 2025

मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू – खांडेकर

चंद्रपूर : राज्यातील २० जिल्ह्यांत मानव-वन्यजीव संघर्ष आहे. हा संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने वन विभागाचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. येत्या काळात ‘एआय’ तंत्र प्रणालीचा वापर संपूर्ण राज्यात केला जाणार आहे.

वाचा सविस्तर…

14:10 (IST) 9 Jan 2025

नागपूर विमानतळ विस्तार, प्रशासन मिशन मोडवर

नागपूर विमानतळ विस्तारीकरणाचा मुद्दा राज्य शासनाने प्राधान्यक्रमाने हाती घेतला आहे.

सविस्तर वाचा…

14:02 (IST) 9 Jan 2025

उपराजधानीत तोतया पोलिसांचा सुळसुळाट, अजनी पोलीस ठाण्यासमोरच…

शहरात तोतया पोलिसांची एवढी हिम्मत वाढली की थेट पोलीस ठाण्यासमोर उभे राहून नागरिकांना लुबाडत आहेत.

सविस्तर वाचा…

13:56 (IST) 9 Jan 2025

उल्हासनगरच्या शासकीय निरीक्षणगृहातील आठ अल्पवयीन मुली पळाल्या

कल्याण : उल्हासनगर येथील शासकीय निरीक्षण गृह व विशेष गृहातील आठ १५ ते १७ वयोगटातील मुली मंगळवारी सकाळी शयनगृहातील खिडकीच्या जाळ्या तोडून पळून गेल्या. ही माहिती निरीक्षण गृहातील कर्मचाऱ्यांनी तातडीने हिललाईन पोलीस ठाण्याला दिली.

वाचा सविस्तर…

13:40 (IST) 9 Jan 2025

कल्याण – डोंबिवलीत चोरीचा एक कोटी ४३ लाखांचा मुद्देमाल नागरिकांना परत

कल्याण, डोंबिवली शहरात मागील काही महिन्यांत विविध प्रकारच्या चोऱ्यांचा माध्यमातून नागरिकांचा किमती ऐवज चोरीस गेला होता.

सविस्तर वाचा…

13:33 (IST) 9 Jan 2025

नाशिक महानगरपालिकेच्या दोन रुग्णालयात आता डायलिसीस केंद्र

मनपा रुग्णालयात ही सेवा नसल्याने रुग्णांना शासनाच्या संदर्भ सेवा रुग्णालयात ताटकळत रहावे लागते. नव्या सुविधेमुळे रुग्णांना जलदपणे ही सेवा मिळू शकणार आहे.

सविस्तर वाचा…

13:28 (IST) 9 Jan 2025

‘एचएमपीव्ही’च्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका दक्ष; आठ रुग्णालयांमध्ये व्यवस्था

पिंपरी : ह्युमन मेटान्यूमो (एचएमपीव्ही) या विषाणूचा भारतात शिरकाव झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी महापालिकेच्या आठही रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

13:09 (IST) 9 Jan 2025

व्यपगत साडेदहा हजार प्रकल्पांपैकी पाच हजार ३२४ प्रकल्पांकडून प्रतिसाद! उर्वरित साडेतीन हजार गृह प्रकल्पांवर कारवाई होणार

मुंबई : महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाने (महारेरा) गेल्या महिन्यात व्यपगत प्रकल्पांना दिलेल्या नोटिसांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. नोटिस बजावण्यात आलेल्या दहा हजार ७७३ प्रकल्पांपैकी पाच हजार ३२४ प्रकल्पांतील विकासकांनी नोटिसांना उत्तरे देऊन त्यानुसार कार्यवाही केली आहे.

सविस्तर वाचा…

12:58 (IST) 9 Jan 2025

‘लाडक्या मित्रा’च्या भेटीसाठी कायपण! एकनाथ शिंदे-पोपट धोत्रे यांच्या कान्हूरमधील मैत्रीची चर्चा

शिवसेनेत असताना ठाण्यात एकत्र काम केलेल्या ‘लाडक्या मित्रा’साठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी शिरूर तालुक्यातील कान्हूर गावात येत मित्राच्या वाड्याला भेट देतानाच गावातील मेसाई देवीचे दर्शन घेतले. सविस्तर वाचा

12:52 (IST) 9 Jan 2025

Aaditya Thackeray on Devendra Fadnavis: ठाकरे गटाच्या फडणवीसांशी वाढलेल्या भेटीगाठींमागे नेमकं काय?

यात जास्त काही गुपित नाही. निवडणुकीसंदर्भात ईव्हीएमवर आमचा संशय आहेच. पण ती वेगळी बाब आहे. आत्ता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. विरोधी पक्ष म्हणून जर आम्ही त्यांच्यासमोर काही महत्त्वाचे मुद्दे मांडत असू, तर त्यात काहीच चुकीचं नाहीये. आमचं सरकार असतानाही आमच्या अनेक भेटीगाठी झाल्या आहेत. या भेटीगाठी जनहितासाठी असतील, आम्ही एकत्र मिळून आम्ही चांगलं काही करू शकत असू, तर वाईट काय? मी मध्यंतरी राजकीय होर्डिंग्जबाबत मुद्दा मांडला होता. जर मुख्यमंत्र्यांनी पहिलं पाऊल टाकलं, तर आम्हीही त्यांच्या पावलासोबत पाऊल टाकून साथ देऊ – आदित्य ठाकरे</p>

12:50 (IST) 9 Jan 2025

शिळफाटा रस्त्यावर नवी मुंबई परिवहन सेवेच्या बसला आग, वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नामुळे २२ प्रवासी सुरक्षित, बस खाक

कल्याण : कल्याण-शिळफाटा रस्त्यावर मानपाडा हद्दीतील रुणवाल चौक येथे नवी मुंबई पालिका परिवहन सेवेच्या बसला गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता अचानक आग लागली. आग लागताच चालकाने प्रवाशांना उतरण्याचा इशारा केला. याठिकाणी गस्तीवर असलेल्या कोळसेवाडी शाखेच्या वाहतूक पोलिसांनी तातडीने बसमधील २२ प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले.

सविस्तर वाचा…

12:45 (IST) 9 Jan 2025

सिकलसेल औषध खरेदीचा निधी वर्षभरापासून पडून, नंदुरबार जिल्हा आरोग्य विभागाची उदासीनता

राज्यात सिकलसेलचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात या रोगावरील औषध खरेदी वर्षभरापासून रखडली आहे.

वाचा सविस्तर…

12:28 (IST) 9 Jan 2025

हवा प्रदुषण रोखण्यासाठी पाहाणीबरोबरच दंडात्मक कारवाई, नोटीसीनंतर नियमांचे पालन होते की नाही, याची पाहाणी सुरू

ठाणे : हवा प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून कठोर पाऊले उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून हवा प्रदुषणास कारणीभूत असणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून दोन लाख ८० हजारांचा दंड वसुल केला आहे.

सविस्तर वाचा…

12:12 (IST) 9 Jan 2025

Bandra SRA Action on Illegal Constructions: कारवाईवर न्यायालयाची स्थगिती नाही, प्रशासनाचं वरुण सरदेसाईंना जमाव पांगवण्याचं आवाहन

वांद्र्यातील भरतनगर परिसरात एसआरएकडून अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईला स्थानिक नागरिकांनी मोठा विरोध केला असून ठाकरे गटाकडून आंदोलन केलं जात आहे. ठाकरे गटाचे नेते वरूण सरदेसाई हेही मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी प्रशासनाकडून वरुण सरदेसाईंना कारवाईवर न्यायालयानं स्थगिती दिलेली नाही, फक्त कोर्टात मॅटर लिस्टेड आहे, असं सांगण्यात आलं आहे. तसेच, स्वत:हून जे नागरिक घर खाली करत आहेत, त्यावर आमचा आक्षेप नाही, अशी भूमिका वरुण सरदेसाई यांनी घेतली आहे.

12:09 (IST) 9 Jan 2025

Paithan Morcha Update: पैठणमध्ये बीड सरपंच हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चा

बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याच्या विरोधात निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख व मुलगी वैभवी हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. आरोपींवर लवकरात लवकर कारवाई केली जावी, अशी मागणी यावेळी वैभवीनं केली आहे.

12:06 (IST) 9 Jan 2025

परवडणारे घर ७४ लाखांचे! सिडकोच्या अल्प उत्पन्न घरांचे दर पाहून अर्जदार अवाक

नवी मुंबई : सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात हक्काची घरे मिळवून देण्यासाठी महागृहनिर्मिती करणाऱ्या सिडकोने नवी मुंबई परिसरातील २६ हजार घरांचे दर मंगळवारी रात्री उशिरा जाहीर केले. त्यानुसार वाशी येथील अल्प उत्पन्न बचत गटातील सदनिकेची किंमत ७४ लाख रुपये ठरवण्यात आल्याने या घरांच्या खरेदीचे स्वप्न् पाहणाऱ्या सर्वसामान्यांचा हिरमोड झाला आहे

सविस्तर वाचा…

12:04 (IST) 9 Jan 2025
Bandra SRA Action on Illegal Constructions: वांद्र्यातील एसआरएच्या कारवाईला ठाकरे गटाचा विरोध, स्थानिक आक्रमक

मुंबईच्या वांद्रे भागातल्या भारतनगरमधील अनधिकृत बांधकामांवर एसआरएकडून कारवाई केली जात आहे. पाडकामाची कारवाई चालू असताना शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं. या कारवाईला विरोध करण्यासाठी या भागात ठाकरे गटाचे कार्यकर्ते दाखल झाले. स्थानिकांसह पदाधिकारी व कार्यकर्तेही कारवाईविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

11:56 (IST) 9 Jan 2025

ठाण्यातील २३ तलावाची होणार सफाई; पाण्यावरील तरंगता कचरा केला जाणार साफ

तलवांचे शहर अशी ओळख टिकविण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाकडून गेल्या काही दिवसांपासून विविध उपक्रम राबविले जात असतानाच, त्यापाठोपाठ आता शहरातील २३ तलावातील पाण्याच्या पृष्ठभागावरील तरंगता कचरा साफ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सविस्तर वाचा

11:55 (IST) 9 Jan 2025

शेतकऱ्यांपुढे नवेच संकट, ‘हे’च संपले म्हणून खरेदी ठप्प. जबाबदार कोण ?

वर्धा, सतत संकटाशी लढतो, तो शेतकरी अशी शेतकरी नेते शेतकऱ्यांची व्याख्या करतात. नैसर्गिक, सामाजिक, मानवनिर्मित अशा वेगवेगळ्या पातळीवर तो लढतो. अतिवृष्टी, धुके, गारपीट या संकटास तोंड देत आता काही उत्पादन हाती आले. सविस्तर वाचा

11:55 (IST) 9 Jan 2025

थंडीचा कहर, उपराजधानी गारठली; किमान तापमानात वेगाने घसरण

राज्यात गेल्या आठवड्यापासून थंडीचा जोर कायम आहे. विदर्भातील काही भागात थंडीचा जोर कमी झाला होता. पण, आता पुन्हा त्यात वाढ झालेली आहे. सविस्तर वाचा

11:54 (IST) 9 Jan 2025

प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्र्याना दिला हा प्रस्ताव, फडणवीस म्हणाले नक्कीच विचार करू

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रताप राव जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्या समक्ष महत्वाचा प्रस्ताव ठेवला आहे. सविस्तर वाचा

11:52 (IST) 9 Jan 2025

नवी मुंबई पोलिसांचा नशामुक्तीचा नारा; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ

अमली पदार्थाच्या अवैध व्यवसायात अग्रभागी असलेल्या एक हजारांहून अधिक आफ्रिकन वंशाच्या नागरिकांना मायदेशी धाडण्याची कारवाई करणाऱ्या नवी मुंबई पोलिसांनी बुधवारी नशामुक्तीचा नारा देत ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाची सुरुवात केली. सविस्तर वाचा

11:50 (IST) 9 Jan 2025

कांदिवलीत महिलांसाठी फिरते स्नानगृह; भारतातील पहिलेच मोबाइल बाथरूम

कांदिवली पूर्व येथे हनुमान नगर परिसरात महिलांसाठी फिरते स्नानगृह तयार करण्यात आले आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आणि मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सदर स्नानगृहांची निर्मिती करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

11:49 (IST) 9 Jan 2025

सांगलीत ‘दत्त इंडिया’कडून जल, वायू प्रदूषण; आरोग्यास धोका निर्माण झाल्याची तक्रार

सांगलीतील दत्त इंडिया संचलित वसंतदादा कारखान्याकडून राख खुल्या वातावरणात पसरत असून प्रदूषित पाणी प्रक्रिया न करता कृष्णा नदीत सोडण्यात येत आहे. सविस्तर वाचा

11:48 (IST) 9 Jan 2025

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिक ‘लक्ष्य’; बतावणी करुन ३८ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनेत ज्येष्ठ नागरिकांकडे बतावणी करुन ३८ लाख रुपयांची फस‌वणूक केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पर्वती आणि हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. सविस्तर वाचा

11:47 (IST) 9 Jan 2025

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार डॉक्टर महिलेचा मृत्यू ; कात्रज- हांडेवाडी रस्त्यावर अपघात

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार डॉक्टर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज-हांडेवाडी रस्त्यावर घडली. याप्रकरणी ट्रकचालकाला काळेपडळ पोलिसांनी अटक केली.

सविस्तर वाचा

11:47 (IST) 9 Jan 2025

उल्हासनगरच्या आयुक्तांची उपमुख्यमंत्र्यांच्या उपसचिवपदी नियुक्ती विकास ढाकणेंची अल्पावधीत बदली, नव्या आयुक्तपदी डॉ. रसाळांचे नाव चर्चेत

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त विकास ढाकणे यांची अवघ्या पाच महिन्यात बदली झाली आहे. ढाकणे यांची नियुक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयात उप सचिवपदी करण्यात आली आहे. अवघ्या साडे चार महिन्याच्या कार्यकाळासाठी ढाकणे उल्हासनगरात होते.

सविस्तर वाचा…

11:42 (IST) 9 Jan 2025

कल्याणमध्ये ५०० रूपयांच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाचा खून

कल्याण : ५०० रूपयांच्या वादातून मोठ्या भावानाने मद्याच्या धुंदीत आपल्या लहान भावाचा खून केल्याची घटना कल्याण पश्चिमेतील रोहिदासवाडा भागातील सलीम रामपुरी चाळीत घडली आहे.

वाचा सविस्तर…

11:28 (IST) 9 Jan 2025

तीन पिढ्यांच्या वास्तव्यानंतर आदिवासी हक्काच्या घरापासून वंचित, पनवेलच्या विकास आराखड्यातील हरकतीवर सुनावणी

पनवेल : आदिवासी बांधवांच्या ७४ कुटुंबीयांच्या तीन पिढ्या रोडपाली येथील फुडलॅण्ड कंपनीच्या मागील जागेवर वास्तव्य करुनही अजूनही हक्काच्या घरापासून वंचित राहिल्या आहेत. सध्या आदिवासी बांधव राहत असलेल्या जागेवर ट्रक टर्मिनलचे आरक्षण पनवेल प्रारुप विकास आराखड्यात आखल्याने आदिवासी बांधवांनी याबाबत हरकत घेतली होती.

सविस्तर वाचा…

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह

Marathi News Live Updates: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा