Mumbai Maharashtra News : बीड सरपंच हत्या प्रकरणात सध्या वाल्मिक कराडचं नाव प्रामुख्याने घेतलं जात असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, त्याचवेळी विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली जात आहे. सुरेश धस यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला नसल्याचं म्हटलं आहे. त्याचवेळी सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
Marathi News Live Updates: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा आढावा
सोयाबीन खरेदीचा खेळखंडोबा, जाणून घ्या, खरेदीचे उद्दिष्ट का फसले, शेतकऱ्यांचे किती कोटी थकले ?
‘पीओपी’वरून पुन्हा घोळ आयत्या वेळच्या घोषणेमुळे माघी गणेशोत्सवात मूर्तिकार, मंडळांसमोर फेरनियोजनाचे आव्हान
मुंबई : गेली कित्येक वर्षे रखडलेल्या ‘प्लास्टर ऑफ पॅरीस’च्या मूर्तींवर बंदी घालण्यास अखेर माघी गणेशोत्सवाचा मुहूर्त मिळाला. माघी गणेशोत्सवात पीओपी मूर्तींना पूर्णत: बंदी घालण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक मंडळांना पर्यावरणपूरक मूर्तीचीच प्रतिष्ठापना करण्याचे हमीपत्र द्यावे लागेल.
ठाणे जिल्ह्यात वर्षभरात २ हजार लाडक्या लेकींना मिळाला लाभ, लेक लाडकी योजनेचे काम प्रगतीपथावर
ठाणे : सुरुवातीला तांत्रिक अडचणी तसेच जनजागृती अभावी लेक लाडकी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू शकली नव्हती. याची दखल घेत तांत्रिकदृष्ट्या सक्षम होण्यासह गावागावांमध्ये विशेष जनजागृती मोहीम राबवून ही योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यास जिल्हा परिषदेला आता यश आल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात या योजनेसाठी पात्र ठरलेल्या २ हजार ८९८ लाभार्थ्यांपैकी २ हजार ८१० लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे.
म्हैसाळ सिंचन योजनेचे पंप उद्यापासून सुरू
सांगली : पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन म्हैसाळ सिंचन योजनेचे पंप शुक्रवारपासून सुरू करण्यात येणार असल्याचे माजी मंत्री आ. सुरेश खाडे यांनी सांगितले. आ. खाडे यांच्या अध्यक्षतेखाली पाटबंधारे कार्यालयात जलसंपदा विभागाची आढावा बैठक पार पडली. यंदा पाऊस चांगला झाल्याने पूर्व भागात हंगामी बागायती पिकांची लागवड वाढली आहे. यामुळे पाण्याची गरजही वाढली असल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. अशा परिस्थितीत पिकांना पाणी देण्याची आवश्यकता असल्याने म्हैसाळ सिंचन योजना सुरू करण्यात येत आहे. म्हैसाळ सिंचन योजनेचे पंप शुक्रवार दि. १० जानेवारीपासून सुरू करण्याची सूचना आ. खाडे यांनी बैठकीत केली. या सिंचन योजनेचे पाणी मिरज पूर्व भागासह कवठेमहांकाळ, जत, सांगोला, मंगळवेढा तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतीला उपलब्ध होणार आहे.
बैठकीस अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता श्री. कोरे, ज्योती देवकारे, श्री. रासनकर, श्री. माळी व श्री. कर्नाळे यांच्यासह मारुती जमादार, दिनकर भोसले, राजू माने, रावसाहेब बेडगे, रविकांत साळुंखे, संतोष माळकर, दीपक पाटील, जितेंद्र ढोले, दयानंद खोत, राहुल पाटील, संतोष पवार, प्रसाद चौगुले इत्यादी शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते.
तरुणाच्या खून प्रकरणी पाच जणांना जन्मठेप
सांगली : यात्रेत तमाशावेळी दंगा करणाऱ्यांची नावे पंचांना सांगितल्यावरून तरुणाचा खून केल्याप्रकरणी पाच जणांना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी बुधवारी ही माहिती दिली. अग्रण धुळगाव येथील यल्लमा यात्रेवेळी अशोक भोसले या तरुणाचा सहा जणांनी काठ्या, कुकरी गुप्ती या हत्याराने मारून खून केला होता. याबाबत माहिती अशी, अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे २ डिसेंबर २०१७ रोजी रात्री एक वाजता तमाशात दंगा करणाऱ्यांची नावे पंचांना का सांगितली, या कारणावरून अशोक भोसले व प्रकाश भोसले या दोघांवर हत्याराने हल्ला केला होता. या हल्ल्यात अशोक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी संदीप चौगुले (वय २६), विशाल चौगुले (वय २३), नानासो उर्फ सागर चौगुले (वय २५), कुंडलिक कनप (वय २५), विजय चौगुले (वय २३) आणि बिरू कोळेकर या सात जणांविरुद्ध पोलिसांनी तपास करून जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
Sanjay Raut on Ajit Pawar Faction: संजय राऊतांचा अजित पवार गटावर हल्लाबोल!
अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंपर्यंत या सगळ्यांना आज जे काही मिळालं आहे ते शरद पवारांमुळे मिळालं आहे. त्यांची बाजारातली किंमत शरद पवारांनी निर्माण केली. आमच्याकडे एकनाथ शिंदे व त्यांच्याबरोबर गेलेल्या ४० चोरांची किंमत बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यामुळे आहे. पण बाप-लेकीला सोडा आणि आमच्याकडे या ही भाषा अमानुष आहे. क्रूर आहे – संजय राऊतांचं अजित पवार गटावर टीकास्र
वायू पुरवठ्याविना वीज प्रकल्प ‘गॅसवर’ उरण वीज प्रकल्पातील उत्पादन निम्म्यावर
उरण : राज्यात वीज उत्पादन अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्यात आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागडी वीज खरेदी करावी लागत आहे. मात्र वायू पासून स्वस्त वीज निर्माण करण्यात येणाऱ्या वीज प्रकल्पाला शासनाकडून पुरेसा वायू पुरवठा होत नसल्याने ६७२ मेगावॉट क्षमता असलेल्या उरणच्या वायू विद्युत प्रकल्पातून अवघे ३०० मेगावॉट वीज उत्पादन होत आहे.
Sanjay Raut on Delhi Election: आम आदमी पार्टी वि. काँग्रेस भांडणात ठाकरे गट कुठल्या बाजला?
दिल्लीत जर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने एकत्र निवडणुका लढवल्या असत्या, तर आम्हाला आनंद झाला असता. पण दिल्लीत आम आदमी पक्ष निवडणूक जिंकत असल्याचं दिसतंय. काँग्रेसही आमचा मित्रपक्ष आहे. त्यामुळे नेमकं काय धोरण ठेवावं, यावर आमच्या पक्षात चर्चा चालू आहे. उद्धव ठाकरे यावर निर्णय घेतील – संजय राऊत</p>
महाराष्ट्र न्यूज लाइव्ह