Mumbai Breaking News Today : भाजपा, शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात पालकमंत्रिपदावरून सुरू असलेल्या तणावानंतर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. मात्र, यानंतरही रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावर तोडगा निघालेला नाही. यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका होत आहे. राज्यात रुग्णांच्या मृत्यूचं सत्र सुरू असताना सत्ताधारी लाभाच्या पदांच्या वाटपात गुंतले असल्याची टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणासह दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर…

Live Updates

Today’s Live News in Marathi : महाराष्ट्राच्या राजकारणासह दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर...

18:51 (IST) 5 Oct 2023
अबब; ॲनाकोंडा सदृश महाकाय अजगर! तीन शेळ्या गिळल्या, गावकऱ्यांना धोका

गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तहसील मुख्यालयापासून सुमारे ७ कि.मी. अंतरावर असलेल्या सिवनी आणि जवरी गावात ॲनाकोंडा सदृश महाकाय अजगर गेल्या २-३ महिन्यांपासून गावातील सायफन नाल्याजवळ तळ ठोकून आहेत.

सविस्तर वाचा...

18:50 (IST) 5 Oct 2023
अबब; ॲनाकोंडा सदृश महाकाय अजगर! तीन शेळ्या गिळल्या, गावकऱ्यांना धोका

गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तहसील मुख्यालयापासून सुमारे ७ कि.मी. अंतरावर असलेल्या सिवनी आणि जवरी गावात ॲनाकोंडा सदृश महाकाय अजगर गेल्या २-३ महिन्यांपासून गावातील सायफन नाल्याजवळ तळ ठोकून आहेत.

सविस्तर वाचा...

18:03 (IST) 5 Oct 2023
"...तर आम्ही सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना 'पर्मनंट' करू", प्रकाश आंबेडकरांची घोषणा

https://twitter.com/VBAforIndia/status/1709834272084041915

मी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की, आम्हाला सत्ता द्या, आम्ही तुम्हाला पर्मनंट करू.

- प्रकाश आंबेडकर (राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी)

17:44 (IST) 5 Oct 2023
नवी मुंबई : वायुप्रदूषणावर महापालिकेचा धूळ शमन यंत्राचा उतारा; आठवडाभर वाशी, कोपरखैरणे परिसरात रात्रीच्या वेळी राहणार तैनात

शहरात विशेषतः कोपरखैरणे आणि वाशीच्या वेशीवर गेल्या महिन्याभरापासून हवा गुणवत्ता निर्देशांक घसरत चालला असून २०० ते ३०० दरम्यान एक्यूआय आढळला आहे.

सविस्तर वाचा...

17:42 (IST) 5 Oct 2023
नवी मुंबई हवा प्रदूषणात आता दिल्लीच्या पंगतीत? शहरात प्रातःकाळी हवेत धुक्याची चादर

आजवर देशात हवा प्रदूषणात दिल्ली आघाडीवर आहे. मात्र आता दिल्लीच्या पंगतीत नवी मुंबई येते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सविस्तर वाचा...

17:40 (IST) 5 Oct 2023
सहकारी संस्था अवसायनात काढण्यास स्थगिती; सहकार मंत्री वळसे पाटील यांची स्पष्टोक्ती, शेतकरी आत्महत्या…

बुलढाणा: केंद्र शासनाने सहकारला बळकटी देण्यासाठी नवीन कायदा आणला आहे. डीबीटी योजनेतून १५० प्रकारच्या सेवा देण्याचे काम करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा...

17:04 (IST) 5 Oct 2023
नंदुरबारचे तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांचा प्रताप; दहा कोटीपेक्षा अधिक महसुलाचे नुकसान; गुन्हा दाखल

नंदुरबार: नंदुरबारचे तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी अनेक प्रकरणांमध्ये अनियमितता करुन १० कोटी ८२ लाख रुपयांच्या महसुलाचे नुकसान केल्याचे उघड झाले आहे.

सविस्तर वाचा...

16:52 (IST) 5 Oct 2023
कल्याण - डोंबिवलीतील नागरिक धूळ, खडीने हैराण

कल्याण: मागील तीन महिन्यांच्या कालावधीत कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी वापरलेली माती मिश्रित खडी, सिमेंट मिश्रीत बारीक खडी आता रस्त्यांवर पसरली आहे.

सविस्तर वाचा...

16:45 (IST) 5 Oct 2023
बुलढाणा : पालकमंत्री वळसे पाटील ‘श्री’ चरणी नतमस्तक!

बुलढाणा : नूतन पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज, गुरुवारी शेगाव येथील श्री गजानन महाराज समाधी स्थळाचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी बुलढाण्यात दाखल होत अनौपचारिकरित्या पदाची सुत्रे स्वीकारली.

सविस्तर वाचा...

16:40 (IST) 5 Oct 2023
बहुप्रतिक्षीत नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन ऑक्टोबरमध्ये तेही पंतप्रधानांच्या हस्ते ? ‘या’ तारखांची चाचपणी सुरु…

बहुप्रतिक्षीत असलेल्या नवी मुंबई मेट्रोचा लोकार्पण सोहळा नवरात्रोत्सवात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केला जात आहे.

सविस्तर वाचा...

16:18 (IST) 5 Oct 2023
सूत्रे अजित पवारांकडे, पण बोलविता धनी भाजप?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून १९९९ ते २०२३ या २४ वर्षांत साडेबारा वर्षे पुण्याचे पालकमंत्री पद भूषविलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकमेव आहेत. आता पुन्हा एकदा त्यांच्या गळ्यात या पदाची माळ पडल्यानंतर राष्ट्र्वादीच्या पवार गटामध्ये आनंदाला उधाण आले आहे.

सविस्तर वाचा

16:16 (IST) 5 Oct 2023
ठाणे खाडी किनारी मार्गावर दोन ठिकाणी जंक्शन; बाळकुम आणि खारेगाव परिसर मार्गाला जोडणार

राज्यातील महायुती सरकारमध्ये एकत्र असणाऱ्या भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नवी मुंबईतील दरी आणखी रुंदावत असल्याचे चित्र आता दिसू लागले आहे.

सविस्तर वाचा

15:47 (IST) 5 Oct 2023
‘मिनी विरप्पन’ची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना सलामी!; जिल्हा कचेरीतील चंदनाचे झाड नेले कापून

नूतन जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांना चंदन तस्करांनी आज अनाधिकृत सलामी दिली! या बहाद्दरांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील चंदनाचे जुने झाड लंपास करून खळबळ उडवून दिली. जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी नुकतेच तर पालकमंत्री दिलिप वळसे पाटील यांनी आज गुरुवारी सूत्रे स्वीकारली.

सविस्तर वाचा

15:41 (IST) 5 Oct 2023
गोंदियात हनीट्रॅप, इन्स्टाग्रामवर मैत्री अन् अश्लील चित्रफीत बनवून ब्लॅकमेलिंग; व्यावसायिकाकडून उकळले २ लाख रुपये

गोंदिया : सुंदर महिलांचे आयडी बनवून त्यांचे मोबाईल नंबर इन्स्टाग्रामवर टाकून, तरुणांशी मैत्री करणे, अश्लील चॅटिंग करून त्यांची अश्लील चित्रफीत बनवणे, नंतर धमकावणे आणि ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळणे अशी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

सविस्तर वाचा...

15:37 (IST) 5 Oct 2023
अपहार प्रकरणी धुळे जिल्ह्यात सरपंच, ग्रामविकास अधिकारी निलंबित

धुळे: स्वच्छ भारत मिशनअंतर्गत प्रोत्साहन अनुदानाच्या रकमेत ग्रामसेवक आणि सरपंच यांनी संगनमताने २१ लाख ३६ हजारांचा अपहार केल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास आल्याने तालुक्यातील सोनगीर येथील तत्कालीन सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांच्याविरुध्द निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

15:24 (IST) 5 Oct 2023
पनवेल मुंबई लोकलची गती मंदावली, हार्बर-ट्रान्सहार्बर रेल्वे प्रवाशांचे हाल

ठाणे मार्गावर धावणारी ट्रान्सहार्बर अचानक पनवेल ते बेलापूर या दरम्यान कोणतेही कारण न देता बंद करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला.

सविस्तर वाचा...

15:24 (IST) 5 Oct 2023
नोंदणी मुद्रांक विभागाद्वारे आता दर्जेदार सेवा; पालकमंत्री दादा भुसे यांना विश्वास

मालेगाव: अद्ययावत व प्रशस्त इमारतीत स्थलांतरीत झालेल्या येथील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कार्यालयामुळे मालेगावच्या विकासात व महसुलात भर पडणार असून या माध्यमातून नागरिकांना अत्याधुनिक व दर्जेदार सेवा-सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.

सविस्तर वाचा...

15:23 (IST) 5 Oct 2023
पिंपरी महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी प्रदीप जांभळे यांची पुन्हा नियुक्ती

महाराष्ट्र प्रशासकीय लवाद (मॅट)च्या आदेशानुसार प्रतिनियुक्तीच्या पदाकरितेची पात्रता तपासून प्रदीप जांभळे-पाटील यांची पुन्हा महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

15:22 (IST) 5 Oct 2023
माझ्या नावाचा प्रस्ताव देताना स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये आज निवडणूक बेकायदेशीर होती म्हणणारेही - शरद पवार

ज्या ७० लोकांनी माझ्या नावाचा प्रस्ताव दिला त्यात असे काही लोक आहेत जे आज ते म्हणतात की, ही तालकटोराची बैठक कायद्यानुसार झाली नाही. तसेच तेथील निवडणूक बेकायदेशीर होती. मजेची गोष्ट म्हणजे या निवडणुकीत उमेदवारी अर्जात माझ्या नावाचा प्रस्ताव देताना स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये आज निवडणूक बेकायदेशीर होती म्हणणारेही होते.

- शरद पवार

15:21 (IST) 5 Oct 2023
हेमा उपाध्याय हत्या प्रकरण : चित्रकार चिंतन उपाध्याय दोषी, विशेष न्यायालयाचा निर्णय

विभक्त पत्नी हेमा उपाध्याय आणि तिचे वकील हरेश भंबानी यांच्या हत्येप्रकरणी चित्रकार चिंतन उपाध्याय याला दिंडोशी येथील विशेष न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवले.

सविस्तर वाचा...

15:18 (IST) 5 Oct 2023
तालकटोराच्या बैठकीत ७० जणांनी उमेदवार म्हणून माझं नाव दिलं - शरद पवार

मजेची गोष्ट म्हणजे तालकटोरा येथे जी पक्षाची बैठक झाली तेथे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तेथे निवडणूक घेण्याची जबाबदारी 'रिटर्निंग ऑफिसर'कडे होती. त्यांनी निवडणुकीची प्रक्रिया कशी असेल ते सर्वांसमोर सांगितलं. तसेच दोन दिवसांचा वेळ दिला. त्यानंतर ७० जणांनी उमेदवारी अर्ज भरला आणि त्यात एकच नाव दिलं, ते म्हणजे माझं नाव.

- शरद पवार

15:09 (IST) 5 Oct 2023
चंद्रकांत पाटील यांनी नव्या लोकांना जुन्या कार्यकर्त्यांच्या डोक्यावर बसवले; कोल्हापुरातील भाजपाच्या निष्ठावंतांचा आरोप

कोल्हापूर : मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपाच्या नव्या कार्यकारिणीत हस्तक्षेप केला आहे. त्यांनीच नव्या लोकांना आमच्या डोक्यावर बसवले आहे, असा आरोप कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबा देसाई यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. आमच्या कार्यकर्त्यांचा मागण्यांचा पक्षाने विचार केला नाही तर वेगळी भूमिका घेण्याचा इशारा त्यांनी दिला.

सविस्तर वाचा...

15:08 (IST) 5 Oct 2023
भुसावळ – मनमाड – पुणे हुतात्मा एक्सप्रेस नऊ महिन्यांपासून बंद; प्रवाशांची गैरसोय

मनमाड: भुसावळ – पुणे – नाशिक हुतात्मा एक्सप्रेस नऊ महिन्यांपासून बंद आहे. भुसावळ विभागात तिसर्या मार्गाची तसेच इतर तांत्रिक कामे सुरू असल्याने ३१ ऑक्टोंबरपर्यंत ही गाडी रद्द राहणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

15:06 (IST) 5 Oct 2023
"ते म्हणतात की, तेच राष्ट्रवादी काँग्रेसचे खरे अध्यक्ष आहेत आणि..."; शरद पवारांचा अजित पवार गटावर हल्लाबोल

आपल्याच जुन्या सहकाऱ्यांनी आपल्याविरोधारात निवडणूक आयोगात तक्रार केली आहे. त्याचं उत्तर आज दिल्लीतील कार्यकारणीच्या बैठकीत झालेल्या ठरावाने दिलं आहे. ते लोक म्हणतात की, तेच राष्ट्रवादी काँग्रेस आहेत. तालकटोरा येथे झालेल्या बैठकीतील राष्ट्रीय अध्यक्षाची निवडच चुकीची आहे. ते म्हणतात की, निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना काहीच अधिकार नाहीत. यापुढे जाऊन ते म्हणतात की, तेच राष्ट्रवादी काँग्रेसचे खरे अध्यक्ष आहेत, पदाधिकारी आहेत आणि पक्षाचं नाव, पक्षचिन्ह याचा वापर करण्याचा अधिकार केवळ त्यांनाच आहे. आपल्याला नाही.

- शरद पवार

14:56 (IST) 5 Oct 2023
भंडारा : वाघाची दुचाकीला धडक, मायलेक जखमी; नशीब बलवत्तर म्हणून…

भंडारा : भंडाऱ्याहून पवनीकडे दुचाकीने जात असताना दवडीपार बीटअंतर्गत येणाऱ्या भंडारा-पवनी मार्गावरील कोसेवाडी परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या वाघाने दुचाकीला धडक दिली. यात दिपक फुंडे व त्यांची आई पुष्पा फुंडे हे दोघेही जखमी झाले.

सविस्तर वाचा...

14:48 (IST) 5 Oct 2023
"हा आहे माझ्या लंडन दौऱ्याचा खर्च, आता...", उदय सामंत यांच्याकडून हिशोब मांडत विरोधकांना उत्तर

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या परदेशवारीवरून जनतेच्या पैशावर सहलीला जात असल्याचा आरोप केला. तसेच सातत्याने मंत्री आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या सुरू असलेल्या परदेशवाऱ्यांवर टीका केली. "आम्ही प्रश्न उपस्थित केल्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या परदेशवाऱ्या रद्द झाल्या," असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. यानंतर आता उदय सामंत यांनी लंडन दौऱ्यातील खर्चाचा हिशोब मांडत या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

सविस्तर वाचा...

14:48 (IST) 5 Oct 2023
"मराठा आणि कुणबी एकच आहेत, याचे पुरावे...", मनोज जरांगेंचं मोठं विधान, म्हणाले, "आता..."

मराठा आरक्षण आंदोलनातील नेते मनोज जरांगे पाटील यांनी धाराशीवमध्ये मोठं विधान केलं. "मराठा आणि कुणबी एकच आहेत आणि त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत," असा दावा मनोज जरांगेंनी केला. तसेच सरकारला ५ हजार कागदपत्रे सापडली आहेत. आता ट्रकभर पुरावे द्यायचे का, असा सवालही केला. ते गुरुवारी (५ ऑक्टोबर) धाराशीवमध्ये बोलत होते. जरांगे धाराशीवबरोबरच सोलापूरचाही दौरा करणार आहेत.

सविस्तर वाचा...

14:40 (IST) 5 Oct 2023
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नव्या व्यवस्थापन परिषद सदस्यांना वाटले टॅब्लेट, पण कागदाचा वापर कमी होण्याबाबत प्रश्नच

एका टॅब्लेटची किंमत सुमारे साठ ते सत्तर हजार रुपये असल्याचे सांगण्यात येते.

सविस्तर वाचा...

13:59 (IST) 5 Oct 2023
नवी मुंबईतील विकासकामांवरून शिंदे गटाची नाईकांवर आगपाखड; झोपडपट्टी पूनर्विकासावरून तणाव वाढला

राज्यातील महायुती सरकारमध्ये एकत्र असणाऱ्या भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नवी मुंबईतील दरी आणखी रुंदावत असल्याचे चित्र आता दिसू लागले आहे. सविस्तर वाचा…

13:23 (IST) 5 Oct 2023
थंडीची चाहूल! अनेक राज्यांतून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; भारतीय हवामान खाते म्हणते…

नागपूर : दिल्ली, राजस्थान, हिमाचल, हरियाणा, उत्तराखंड या राज्यांमधून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. तर, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेशच्या विविध भागांमधून हळूहळू मान्सून परतण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची चाहूल लागणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

सविस्तर वाचा...

Maharashtra Political News Live Updates

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह गांधी जयंती 2023 (फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Story img Loader