Maharashtra Political Crisis Updates: राज्यात सत्तांतर झाल्यानंतरच्या पहिल्याच पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना जशास तसं उत्तर देण्याचे आदेश दिल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपाने संसदीय मंडळ आणि निवडणूक समितीतून वगळलं असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याउलट निवडणूक समितीत देवेंद्र फडणवीसांना स्थान देत पक्षाने त्यांना महत्त्व दिल्याचं बोललं जात आहे. तसंच मोहित कंबोज यांनी सिंचना घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा नेता जेलमध्ये जाणार असल्याचा दावा केल्यामुळेही राजकारण तापलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

Maharashtra Breaking News Live Updates : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर!

13:07 (IST) 18 Aug 2022
डोंबिवली-कल्याण मधील २५० बेशिस्त रिक्षा चालकांवर ‘आरटीओ’ची कारवाई

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत जुलै मध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यांनी राबविलेल्या तपासणी मोहिमेत एकूण ३५० रिक्षांची तपासणी केली. या तपासणीच्या वेळी २५० रिक्षा चालक नियमबाह्य रिक्षा चालवित असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.

सविस्तर वाचा…

13:04 (IST) 18 Aug 2022
डोंबिवली : ढाबा, पेट्रोल पंप, वाहन दुरुस्ती दुकानांसमोरील तोडलेल्या दुभाजकांमुळे शिळफाटा वाहतूक कोंडीत?

कल्याण-शिळफाटा रस्त्यावर अनेक ठिकाणी ढाबा, हॉटेल, पेट्रोल पंप चालक, वाहन दुरुस्ती दुकान मालकांनी आपल्या सोयीसाठी रस्ता दुभाजक तोडून किंवा बाजुला करुन ठेवले आहेत. यामुळे वाहन चालक मनमानेल तेव्हा तोडलेल्या दुभाजकांमधून घुसून दोन्ही मार्गिकांच्या मध्ये आडवा घुसून वाहन कोंडीला सुरूवात करतो. एकल मार्गिका वाहन कोंडीने बंद झाली की दुसऱ्या मार्गिकेतील सर्व प्रकारचे वाहन चालक वाहतूक पोलिसांना न जुमानत मार्गिकेचे उल्लंघन करुन वाहने चालवितात. हे शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडीचे सर्वात महत्वाचे कारण आहे, अशी माहिती या रस्त्यावरुन नियमित येजा करणाऱ्या प्रवाशांनी दिली. वाचा सविस्तर बातमी….

12:50 (IST) 18 Aug 2022
भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांचे थर कोसळायला लागलेत – आशिष शेलार

“भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच आमचा गड.. आमचा गड म्हणून मिरवायचे…आता बघा कसे सगळे गडगडायला लागलेय..भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांचे थर कोसळायला लागलेत”!

वाचा सविस्तर

12:47 (IST) 18 Aug 2022
Viral Video: आदित्य ठाकरेंच्या भाषणादरम्यान BJP कार्यालयातून भाजपा कार्यकर्ते काढत होते फोटो; ही गोष्ट लक्षात येताच…

विधानसभेचं पावसाळी अधिवेशन बुधवारपासून सुरु झालं आहे. पहिल्याच दिवशी सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपा विरुद्ध महाविकास आघाडीमधील आमदारांमध्ये घोषणाबाजी झाल्याचं चित्र पहायला मिळालं. पहिल्या दिवसाचं कामकाज लवकर आटोपल्यानंतर युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे हे नियोजित शिवसंवाद यात्रेसाठी रायगडला रवाना झाले. पहिल्याच दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमदारांविरोधात आंदोलनामध्ये सहभागी झाल्यानंतर आदित्य दुपारनंतर कोकणातील अलिबागमध्ये पोहचले. यावेळेस मोठ्या उत्साहात शिवसेनेच्या समर्थकांनी त्यांचं स्वागत केलं. मात्र त्यांच्या भाषणादरम्यान घडलेल्या एका प्रकार सध्या चांगलाच चर्चेत आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. येथे क्लिक करुन पाहा व्हिडीओ

12:46 (IST) 18 Aug 2022
सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी फडणवीसांच्या भेटीचं कारण काय? कंबोज म्हणाले, “अरे भावा, आज…”

भारतीय जनता पार्टीचे नेते मोहीत कंबोज यांनी मंगळवारी रात्री केलेल्या तीन ट्वीटमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असतानाच त्यांनी बुधवारी रात्री अचानक राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता तुरुंगात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची भेट घेणार आहे, अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलं होतं. अन्य एक ट्वीट करत त्यांनी सिंचन घोटळ्याची पुन्हा चौकशी करावी, अशी मागणीही केली होती. त्यांनी कुणाचही नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे होता हे स्पष्टच आहे. या घोटाळ्यावरुन चर्चा सुरु झाली असतानाच काल रात्री ते फडणवीसांची भेट घेण्यासाठी गेल्याने नेमकी ही भेट कशासाठी अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र या भेटीमागील कारणाचा खुलासा कंबोज यांनीच केला आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

12:45 (IST) 18 Aug 2022
CM शिंदेंना पाहताच विरोधांकडून ‘५० खोके, एकदम ओके’ची घोषणाबाजी; शिंदेंसमोर चालणारा आमदार वैतागून म्हणाला, “तुम्हाला…”

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी शिंदे सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेली घोषणा म्हणजे ‘आले रे आले ५० खोके. ५० खोके, एकदम ओके’. मुख्यमंत्री शिंदे हे पायऱ्यांवरुन खाली उतरत असतानाच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ही घोषणाबाजी केली. ते ऐकून शिंदेंसोबतचे आमदार शंभूराज देसाईंनी पायऱ्यांवरुन उतरतानाच विरोधी आमदारांना ५० खोक्यांवरुन ऑफर दिली. येथे क्लिक करुन जाणून घ्या नेमकं घडलं काय.

12:45 (IST) 18 Aug 2022
गोंदिया : ‘…अन् ‘तो’ देवदुतासारखा धावून आल्याने वाचला तरूणीचा जीव!

धावत्या रेल्वेतून उतरू नये, धावत्या रेल्वेत चढणे धोकादायक आहे’, असे रेल्वे प्रशासनाकडून वारंवार प्रवाशांना सुचविले जाते. मात्र, प्रवासी नको ते धाडस करून स्वत:चाच जीव धोक्यात घालतात. अशीच एक घटना गोंदिया रेल्वे स्थानकावर घडली. चुकीच्या रेल्वेत चढल्याचे लक्षात आल्यावर एका तरुणीने धावत्या रेल्वेतून फलाटावर उडी घेतली. फलाटावर कोसळल्यानंतर ती रेल्वेखाली खेचल्या जात होती. अशातच, तेथे कर्तव्यावर असलेला रेल्वे सुरक्षा दलाचा जवान देवदुताप्रमाणे धावून आला. त्याने तरुणीला बाहेर खेचत तिचे प्राण वाचविले. वाचा सविस्तर बातमी…

12:42 (IST) 18 Aug 2022
‘५० खोके, एकदम ओके’ची घोषणाबाजी सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने-सामने आले अन्…

विरोधी पक्षनेते अजित पवार व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह नाना पटोले, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे आदींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात फलक झळकावत घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे या घोषणाबाजीच्या गोंधळामध्ये काही क्षण आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदेही आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. येथे वाचा सविस्तर वृत्त…

12:33 (IST) 18 Aug 2022
नागपूर : सरणावर पाणी, लाकडेही ओली, चिता जळेचना!, शहरातील स्मशानघाटांची दुरावस्था

तुटलेले ओटे… त्यावर साचलेले पाणी…बसण्याच्या जागेवर कचऱ्याचे साम्राज्य… परिसरात वाढलेली झुडपे… विद्युत दाहिनीच्या मार्गावर कचरा… पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेची वानवा… परिसरात अस्वच्छता… पावसाळ्यात गोवऱ्या आणि ओली लाकडे… तुटलेला विसावा ओटा आणि घाटावरील कर्मचाऱ्यांची मनमानी असे शहरातील स्मशानघाटावरचे चित्र आहे. वाचा सविस्तर बातमी…

12:22 (IST) 18 Aug 2022
ब्राह्मण समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य खासदार धानोरकरांना भोवणार, भाजपची पोलिसांकडे तक्रार

चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ब्राह्मण समाजासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाने धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. धानोरकर यांची तात्काळ चौकशी करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

सविस्तर वाचा…

12:21 (IST) 18 Aug 2022
पुणे : इलेक्ट्रिक डेपोंची संख्या वाढविण्याचे नियोजन

पीएमपीच्या ताफ्यातील विजेवर धावणाऱ्या (इलेक्ट्रिक बस- ई-बस) गाड्यांची संख्या वाढत असल्याने आता ई-डेपोंची संख्या वाढविण्याचे नियोजन सुरू झाले आहे. त्यानुसार चऱ्होली येथे डेपोचे काम सुरू झाले असून निगडी येथे सर्वात मोठा डेपो पीएमपीकडून विकसित केला जाणार आहे.

सविस्तर वाचा…

12:15 (IST) 18 Aug 2022
राज्यांची धोरणं काय असावीत हे ठरवणारे तुम्ही कोण? तामिळनाडूचा मोदी सरकारला रोखठोक सवाल

केंद्र सरकारने मोफत धोरणासंबंधी घेतलेल्या भूमिकेवरुन तामिळनाडूचे अर्थमंत्री पी थिगा राजन यांनी जोरदार टीका केली आहे. इतर राज्यांनी काय करावं हे केंद्र सरकारने का ठरवावं? अशी विचारणा त्यांनी केली आहे.

सविस्तर बातमी

12:12 (IST) 18 Aug 2022
संजय राऊत यांना दुपारी १२ वाजता हजर करा, शिवडी न्यायालयाचे आर्थर रॉड कारागृहाला आदेश

सध्या अटकेत असल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांना दुपारी १२ वाजता दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून हजर करण्याचे आदेश शिवडी न्यायालयाचे आर्थर रॉड कारागृहाला गुरुवारी दिले.

सविस्तर वाचा…

12:12 (IST) 18 Aug 2022
“हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाणांना शिवसेना विकली होती”, काँग्रेस सोडताच नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सामील झाले आहेत. तर दुसरीकडे माजी खासदार सुभाष वानखेडें यांनी घरवापसी करत शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर वानखेडेंनी हेमंत पाटील आणि आनंद जाधवांबाबत खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

सविस्तर बातमी

12:09 (IST) 18 Aug 2022
रश्मी शुक्लांनी फडणवीसांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण, बाळासाहेब थोरात म्हणाले “सागर बंगल्यात वॉशिंग मशीन…”

फोन टॅपिंग प्रकरणी आरोप असणाऱ्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बुधवारी रात्री सागर बंगल्यावर भेट घेतली. रश्मी शुक्ला आणि फडणवीसांच्या या भेटीनंतर अनेक तर्क वितर्कांना उधाण आले आहे. या भेटीवरुन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे.

सविस्तर बातमी

11:30 (IST) 18 Aug 2022
‘म्हाडा’च्या पुणे मंडळातील ५२११ घरांची सोडत पार

म्हाडाच्या पुणे मंडळातील ५२११ घरांसाठी आज (गुरुवार) सोडत काढण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुरदृश्यप्रणालीद्वारे सोडत काढण्यात आली. ५२११ घरांसाठी सुमारे ७१ हजार ७४२ सादर झाले होते. वाचा सविस्तर बातमी…

10:58 (IST) 18 Aug 2022
रुग्णालयासाठी ३५० कोटींचे कर्ज कर भरा, आरोग्य सेवा विकत घ्या; पुणे महापालिकेचा अजब कारभार

पुण्यातील वारजे येथे प्रस्तावित ७०० खाटांच्या अद्ययावत रुग्णालयासाठी महापालिका तब्बल ३५० कोटींचे कर्ज घेणार आहे. महापालिकेकडून रुग्णालयाची उभारणी होणार असून खासगी संस्थेला ते चालविण्यास देण्यात येणार आहे. सार्वजनिक खासगी लोकसहभागातून (पीपीपी) रुग्णालयाची उभारणी प्रस्तावित असून ‘कर भरा आणि आरोग्य सेवा विकत घ्या’, असा अजब कारभार महापालिकेकडून केला जाणार आहे. वाचा सविस्तर बातमी…

10:46 (IST) 18 Aug 2022
अंबरनाथ : आधीच पलावाची कोंडी, त्यात खड्ड्यांचा जाचकाटई ; बदलापूर राज्यमार्गावर पुन्हा खड्डे

गेल्या काही महिन्यांपासून बदलापूर ते ठाणे किंवा नवी मुंबई हा प्रवास मनस्ताप देणारा ठरू लागला आहे. डोंबिवलीजवळच्या काटई नाक्यापासून पलावा हे अवघे काही मीटरचे अंतर पार करण्यासाठी तासनतास खर्ची घालावे लागतात. त्यात काटई ते बदलापूर राज्यमार्गावर पुन्हा खड्डे उगवल्याने प्रवाशांना दुहेरी मनस्ताप सहन करावा लागतो आहे. काटई नाक्यापासून ते थेट बदलापुरपर्यंत विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून त्यामुळे प्रवास जीवघेणा झाला आहे. वाचा सविस्तर बातमी…

10:45 (IST) 18 Aug 2022
पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे ऑगस्टच्या मध्यातच पूर्ण क्षमतेने भरली

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही चारही धरणे यंदा ऑगस्टच्या मध्यालाच पूर्ण क्षमतेने भरली आहेत. गेल्या पाच वर्षांत सन २०१९ चा अपवाद वगळता एवढ्या लवकर चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. यंदा चारही धरणांत समाधानकारक पाणीसाठा झाल्याने शहराला पिण्यासाठी आणि ग्रामीण भागाच्या शेतीसाठी आवश्यक पाण्याची पुढील वर्षभराची चिंता मिटली आहे. वाचा सविस्तर बातमी…

10:43 (IST) 18 Aug 2022
ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस

ठाणे महापालिकेच्या कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त समीर जाधव हे बदलीच्या ठिकाणी म्हणजेच वर्तकनगर प्रभाग समितीत हजर झालेले नसून याप्रकरणी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी जाधव यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. वाचा सविस्तर बातमी…

10:41 (IST) 18 Aug 2022
द्रुतगती महामार्गावरील अपघात रोखण्याबाबत रस्ते महामंडळाला अखेर जाग

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील (एक्स्प्रेस वे) वाढते अपघात रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॅार्पोरेशन – एमएसआरडीसी) अतिरिक्त पोलीस कर्मचारी, सहा सुमो वाहने, गस्ती पथक, डेल्टा फोर्स तैनात करण्यात येणार आहे. वाचा सविस्तर बातमी…

10:39 (IST) 18 Aug 2022
बच्चू कडू शिंदे सरकारवर नाराज? अधिवशेनाच्या पहिल्या दिवशी अनुपस्थित राहिल्याने चर्चा

राज्यात सत्तांतर झाल्यानंतरचं पहिलंच पावसाळी अधिवेशन पार पडत असून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी पायऱ्यांवरुन गद्दार अशा घोषणा दिल्याने संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान यावेळी अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या अनुपस्थितीची चांगलीच चर्चा रंगली होती. मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न दिल्यानेच बच्चू कडू नाराज असल्याचं बोललं जात होतं. मात्र बच्चू कडू यांनी विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर भाष्य केलं आहे.

सविस्तर बातमी

10:38 (IST) 18 Aug 2022
भाजपाने गडकरींना वगळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया

भाजपा संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या पुनर्रचनेत पक्षाने माजी अध्यक्ष, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना वगळलं आहे. त्याचवेळी निवडणूक समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संधी देत भाजपाने त्यांना पदोन्नती दिली आहे. दरम्यान नितीन गडकरी यांना वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनेही यावर प्रतिक्रिया देताना भाजपावर टीका केली असून, गडकरींची राजकीय उंची वाढत असल्याचं हे चिन्ह आहे असं म्हटलं आहे.

सविस्तर बातमी

10:37 (IST) 18 Aug 2022
कर्नाटकात शिक्षण संस्थांमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यावरून वाद

कर्नाटकमधील शाळा-महाविद्यालयांमध्ये ३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी साजरी करण्यात यावी, असे वक्तव्य शालेय शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी केल्याने वाद निर्माण झाला आहे. कर्नाटकातील राज्य सरकार दांभिक असल्याची टीका मुस्लीम समुदायाने केली. मुस्लीम विद्यार्थिनींना शाळा-महाविद्यालयाच्या आवारात हिजाब परिधान करण्यास बंदी घातली जाते, मग गणेश चतुर्थी साजरी करण्यास परवानगी का दिली जाते, असा सवाल विचारला जात आहे.

सविस्तर बातमी

10:36 (IST) 18 Aug 2022
घरांच्या किमतीत पाच टक्के वाढ; बांधकाम साहित्य दरवाढीबरोबर वाढत्या मागणीचा परिणाम

बांधकाम साहित्यात झालेल्या दरवाढीबरोबरच घरांच्या मागणीतही वाढ झाल्याने मुंबई महानगर घरांच्या किमतीही पाच टक्क्यांनी वाढल्या आहेत. नजीकच्या काळातही घरांच्या किमतींची वाढ कायम राहील, असा दावा करण्यात येत आहे. कॉन्फर्डेशन ऑफ रिएल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) यांच्या पुढाकाराने ‘कोलिएर्स-लायसेस फोरास’ने  ‘हौसिंग प्राईस ट्रॅकर’ अहवाल जारी केला असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे.

सविस्तर बातमी

10:34 (IST) 18 Aug 2022
महामुंबई पुन्हा कोंडली; ठाणे-नवी मुंबई-डोंबिवली शहरांतील प्रवाशांचे सर्वाधिक हाल

गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गासह अंतर्गत मार्गावर पुन्हा खड्डे पडले. त्यातच चार दिवसांच्या सुट्टय़ांनंतर मार्गावर वाहनांची पुन्हा वर्दळ वाढल्याने बुधवारी ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली.

सविस्तर बातमी

10:33 (IST) 18 Aug 2022
देवेंद्र फडणवीस यांना पदोन्नती; भाजप केंद्रीय निवडणूक समितीत स्थान

भाजप संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या पुनर्रचनेत बुधवारी पक्षाने माजी अध्यक्ष, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना वगळले. त्याचवेळी निवडणूक समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थान देऊन भाजपने त्यांना पदोन्नती दिली.

सविस्तर बातमी

10:33 (IST) 18 Aug 2022
जशास तसे उत्तर द्या!; मुख्यमंत्र्यांचा आमदारांना आदेश

मुंबई विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या विरोधी पक्षांनी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आक्रमक घोषणाबाजी करताना  तिखट हल्ला शिंदे गटातील आमदारांवर चढवल्याने बंडखोर गट गांगरून गेला. पण नंतर शिंदे गटाची बैठक होऊन त्यात विरोधकांना जशास तसे आक्रमक उत्तर देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन बुधवारी सुरू झाले.

सविस्तर बातमी

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवण्यात आले. सरकारमध्ये सहभागी होणार नाही, असे त्यावेळी जाहीर करणाऱ्या फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा जाहीर आदेश पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिला होता. पण, पक्षाच्या निवडणूक समितीत फडणवीस यांना स्थान देऊन पक्षाने त्यांचे महत्त्व अधोरेखित केलं असल्याचं मानलं जात आहे. तसंच भविष्यात फडणवीस हे राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावू शकतात, हा संदेश पक्षाने दिला आहे.