Maharashtra Political Crisis News : राज्यात एकीकडे मुसळधार पावसाने विविध ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय. काही ठिकाणी नागरिकांना स्थलांतरीत व्हावं लागलंय. विरोधी पक्षांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे राज्यातील राजकारणालाही वेग आलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीत अनेक गंभीर आरोप केलेत. यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. याशिवाय काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेसही आक्रमक झाल्याचं दिसत आहे. वाचा राज्यातील प्रत्येक प्रत्येक घडामोडींचा एकाच ठिकाणी आढावा.
Maharashtra Breaking News Updates : पाऊस, शेतीचं नुकसान, राजकीय घडामोडी व आंदोलन अशा राज्यातील प्रत्येक प्रत्येक घडामोडींचा एकाच ठिकाणी आढावा...
सामिष खवय्यांच्या आवडत्या आखाड महिन्याची सांगता गुरूवारी (२८ जुलै) होणार आहे. गुरूवारी सामिष खादपदार्थांचे सेवन वर्ज्य मानले जाते. त्यामुळे खवय्यांनी आदल्या दिवशी आखाडाची सांगता केली. हजारो किलो मटण, मासळी, चिकनवर ताव मारुन खवय्यांनी गटारी अमावस्या साजरी केली.
मागील वीस दिवसांपासून अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावात हाहाकार मजला आहे. शेती, घरे यांची नुकसान झाले. त्याचा फटका शालेय विद्यार्थ्यांनी बसला. अशातच गावात पाहणी करण्यासाठी खासदार येणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली.
एकनाथ शिंदें रिक्षा सोबत असं सांगणारा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून रिक्षावाल्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. शिंदे हे स्वतः रिक्षा चालक होते. त्यामुळं रिक्षावाल्यांना देखील त्यांचं कौतुक आहे. एकनाथ शिंदेंचा रिक्षा सोबतचा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाणे जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक शिंदे गटात सामील झाल्याने, ठाणे शहरात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक दरवर्षीपेक्षा कमी लागले आहेत. असे असतानाच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपखाडी मतदार संघात काही ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसांचे फलक लागले होते.
बेकायदा सावकारी करणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील एका सराफाला खंडणी विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली. या प्रकरणात तक्रारदाराने साडेतीन लाख रुपयांची मूळ रक्कम व्याजासह परत केल्यानंतर सराफाने सात लाख रुपयांची मागणी केली होती.
डोंबिवली पूर्वेतील दावडी येथील साई ऑर्किड इमारतीमधील सदनिका विक्री करण्याचे करारनामे आम्ही केले आहेत, अशी खोटी माहिती डोंबिवलीतील सदनिका खरेदीदारांना देऊन त्यांच्याकडून सात लाख ६० हजार रुपये उकळून त्यांची फसवणूक करणाऱ्या विकासका विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सक्त वसुली संचालनालयातर्फे (ईडी) होत असलेल्या चौकशीच्या निषेधार्थ शहर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला सदबुद्धी दे भगवान… असे भजन गायन करून आंदोलन केले.
दारव्हा मार्गावरील बोरी अरब येथील अडाण नदीवरील अपूर्ण पूल स्थानिक नागरिकांसह प्रवाशांना मरण यातना देत आहे. मंगळवारी सायंकाळी बांधकामाअभावी रखडलेल्या या पुलावरून पाणी वाहत असताना रस्ता पार करत असलेला एक जण वाहून गेला.
औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. न्यायालयाने या याचिकेवर सोमवारी सुनावणी ठेवली आहे. औरंगाबाद येथील रहिवासी मोहम्मद मुश्ताक अहमद, अण्णासाहेब खंदारे आणि राजेश मोरे या तिघांनी ही याचिका केली आहे.
नापगुरातील यश बोरकर या चिमुकल्याचे अपहरण करून खून करणाऱ्या संतोष कळवे (२०) याची फाशीची शिक्षा नागपूर उच्च न्यायालयाने रद्द करीत फाशीऐवजी जन्मठेेपेची सुधारित शिक्षा सुनावली आहे . हा निर्णय बुधवारी न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि गोवींद सानप यांनी दिला.
रेल्वे प्रवासा दरम्यान ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी चार लाख ९३ हजारांचे सोन्याचे दागिने आणि एक हजाराची रक्कम चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली. त्याबाबत एका ज्येष्ठ महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मध्य रेल्वेच्या आसनगाव आणि आटगाव रेल्वे स्थानका दरम्यान इंजिनच्या चाकामध्ये झालेला बिघाड आणि वासिंद- आसनगाव रेल्वे स्थानकामधील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने बुधवारी सकाळी कसारा दिशेकडेल रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. या बिघाडामुळे प्रवाशांचे हाल झाले. दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास येथील वाहतूक पूर्ववत झाली.
विवाह नोंदणी संकेतस्थळावर झालेली ओळख तसेच परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने चोरट्याने संगणक अभियंता तरुणीला ११ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत एका २९ वर्षाच्या तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सायबर गुन्ह्यांची तक्रारदार देणाऱ्या नागरिकांची ससेहोलपट थांबणार आहे. शहरात सायबर गुन्ह्यांची संख्या वाढती असून तक्रारदारांना सायबर गुन्ह्याची तक्रार देण्यासाठी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील सायबर पोलीस ठाण्यात जावे लागते.
मुंबईमध्ये भारतातील पहिली रेल्वे धावल्यानंतर पुढील पाच ते सहा वर्षांतच पुण्याची रेल्वे सुरू झाली. पुणे हे लष्कराचे प्रमुख ठाणे असल्याने ब्रिटिशांनी पुण्यातील रेल्वेसाठी विशेष लक्ष दिले. त्यातूनच रेल्वे स्थानकासाठी विशेष रचनेची एक देखणी इमारत उभी राहिली आणि मोठ्या दिमाखात तिचे उद्घाटन झाले.
अकोला-पूर्णा सुपरफास्ट रेल्वेगाडी आणि अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे यांचे घर बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार २६ जुलैला रात्री घडला.
मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला या धमकीचा फोन आला होता.
प्रसूतीदरम्यान एखाद्या गर्भवती महिलेचे बाळ अर्धवटच बाहेर आल्याने डॉक्टरांची होणारी धावपळ, बाळ आणि आई दोघांनाही वाचवण्यासाठी डॉक्टरांच्या प्रयत्नानंतर बाळ आणि आई सुखरूप असण्याचा आनंद आपल्यापैकी अनेकांनी अनुभवला किंवा ऐकला तरी नक्कीच असेल.
मध्य रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका लांबपल्ल्याच्या प्रवाशांना बसला आहे. सोलापूर विभागाच्या दौंड – कुरुडवाडी विभागादरम्यान २५ जुलैपासून तांत्रिक कामांनिमित्त ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. मात्र या कामासाठी मुंबईसह सोलापूर, तसेच अन्य काही विभागांतील मेल, एक्स्प्रेस रद्द कराव्या लागल्या आहेत.
उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतील मराठा नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. मला आणि माझ्या मुलाला संपवण्याचा कटही त्यांनी आखला होता असा गंभीर आरोप शिंदे गटात सामील झालेले रामदास कदम यांनी केला आहे. शरद पवारांच्या मांडीवर बसून पक्ष चालवणाऱ्यांना पक्षप्रमुख का म्हणायचं? अशी विचारणा त्यांनी केली आहे. पालापोचाळा कोणाचा झाला आहे याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं असा सल्लाही त्यांनी टीव्ही ९ शी बोलताना दिला आहे.
उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतील मराठा नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. मला आणि माझ्या मुलाला संपवण्याचा कटही त्यांनी आखला होता असा गंभीर आरोप शिंदे गटात सामील झालेले रामदास कदम यांनी केला आहे. शरद पवारांच्या मांडीवर बसून पक्ष चालवणाऱ्यांना पक्षप्रमुख का म्हणायचं? अशी विचारणा त्यांनी केली आहे. पालापोचाळा कोणाचा झाला आहे याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
आरे वन आहे की नाही आणि तेथे जैवविविधता आहे की नाही यावरून राजकीय वाद विकोपाला पोहोचलेला असतानाच येथील केलटी पाड्यातील एका घराच्या दारातच मंगळवारी रात्री बिबट्याचा वावर सीसी टीव्ही कॅमऱ्यात कैद झाला.
चंद्रपूर जिल्ह्यात व्याघ्रदर्शनासाठी देशविदेशातून पर्यटक येतात. वाघ व बिबट्या इथले वन्यजीव जिल्ह्याचे वैभव ठरले असले तरी मानव-वन्यजीव संघर्षही इथं टोकाला गेलेला आहे. मात्र, वरोरा तालुक्यात घडलेल्या एका घटनेने मानव-वन्यजीव प्रेमाचा नवा अध्याय लिहिला.
करोनाकाळात पोलिसांच्या रिक्त पदांची संख्या तीन पटीने वाढल्याचे खुद्द राज्य सरकारनेच उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात उघड केले आहे. पोलिसांच्या रिक्त पदांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याचे प्राथमिक कारण हे करोना असून करोनाकाळात भरती प्रक्रियेला स्थगिती दिली गेली.
हवामान बदल आणि डिजिटल परिवर्तन यासारख्या नव्या स्थितीला समर्थपणे तोंड देण्यास सज्ज उद्योग-व्यापारी संस्था उभी करणे हे सध्याच्या काळात नेतृत्वपदी असलेल्या व्यक्तींसाठी सर्वात मोठे आव्हान आहे, असे मत प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी व्यक्त केले.
नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याला समर्थन करणारे उमेश कोल्हे यांची हत्या करणारा आरोपी शाहरूख पठाण याला पाच कैद्यांनी आर्थररोड तुरुंगात मारहाण केली. त्यामुळे नुपूर शर्मा वक्तव्याचा वाद आता देशातील अतिसंवेदनशील अशा आर्थर रोड तुरुंगापर्यंत पोहोचला आहे.
शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून कात्रज, सोलापूर रस्ता परिसरात वेगवेगळ्या घटनेत तिघांना लुटण्यात आल्याची घटना घडली. कात्रज भागातील सावंत विहार सोसायटी परिसरातून जात असलेल्या पादचारी महिलेच्या हातातील ७० हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पालिकेने गेल्या वर्षी टाटा मोटर्स कंपनीला बजावलेली २६२ कोटींच्या करआकारणीची नोटीस अखेर रद्द करण्यात आली आहे. दोन इमारतींच्या बांधकामाची नोंद केली नसल्याचे कारण देत तत्कालिन करसंकलन विभागाच्या प्रमुख स्मिता झगडे यांनी ही कारवाई केली होती.
स्थगिती आदेशाच्या कचाट्यात अडकलेली भारतीय जनता पक्षाची महत्त्वाकांक्षी नदीकाठ संवर्धन, पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात ६०० कोटींचा खर्च होणार असून त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा महापालिकेकडून तयार करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील गावठाणांमधील मिळकतींचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून मालमत्तेचा पुरावा असलेली मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) देण्यास सुरूवात झाली आहे. त्यानुसार दौंड, पुरंदर, इंदापूर, हवेली, मुळशी आणि बारामतीमधील १९ हजार ३०९ नागरिकांना त्यांच्या घराच्या मालमत्तेचा पुरावा असलेली मिळकत पत्रिका प्रथमच वाटप करण्यात आली आहे.
कनिष्ठ महिला वकिलाचा विनयभंग केल्या प्रकरणी एका वकिलाच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.ॲड. धर्मराज विनायक जाधव (वय ४०, रा. वाघोली) असे गुन्हा दाखल केलेल्या वकिलाचे नाव आहे. याबाबत एका महिला वकिलाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.