Maharashtra Independence Day 2024 Updates, 15 August 2024 : आज ७८ व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह देशभरासह संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थान आणि मंत्रालयात ध्वजारोहण करत राज्यातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात ध्वजारोहण केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Live Updates

Marathi News Live Today, 15 August 2024 | महाराष्ट्र लाईव्ह न्यूज १५ ऑगस्ट २०२४

18:34 (IST) 15 Aug 2024
Marathi News Live : “निवडणूक हरल्यानंतर ते गुवाहाटीला पळणार, पण आम्ही…” – आदित्य ठाकरे

विधानसभा निवडणुकीनंतर मिंधे गटाला पुन्हा एकदा गुवाहाटीला पळून जावे लागेल, पण आम्ही त्यांना पळू देणार नाही, असे विधान शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केले आहे. चांदिवली विधानसभा मतदारसंघात ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त काढलेल्या प्रभातफेरीदरम्यान त्यांनी ही टीका केली.

17:10 (IST) 15 Aug 2024
Marathi News Live : अजित पवार निवडणूक लढणार नाहीत? सुनील तटकरे काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना बारामतीमधून निवडणूक लढविण्यात रस नसल्याचे म्हटले. बारामतीमधील कार्यकर्ते जय पवार यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी करत आहेत. या मागणीवर उत्तर देताना अजित पवार यांनी ही भूमिका मांडली. यावर आता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अजित पवार यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे? असे सुनील तटकरे म्हणाले.

15:44 (IST) 15 Aug 2024
पाषाणमध्ये मंदिरातील दानपेटी फोडून २५ हजारांची रोकड चोरी

पुणे : पाषाण परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी २५ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.

याबाबत मंडळाच्या पदाधिकाऱ्याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाषाण-सूस रस्त्यावर श्री विघ्नहर्ता गणेश मंडळ, तसेच श्री चापाजीबुवा गणपती मंडळ आहे. विघ्नहर्ता चौकात मंडळाचे मंदिर आहे. चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला.

चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडून २५ हजारांची रोकड चोरून नेली. दानपेटीची किंमत दहा हजार रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस कर्मचारी शिर्के तपास करत आहेत.

14:12 (IST) 15 Aug 2024
महिलांसाठी ‘रक्तक्षयमुक्त मुंबई’ अभियान राबवणार

बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान अभियानात सहभागी होणार

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने रक्तक्षय (ॲनिमिया) आजाराविषयी जनजागृती करण्याचा संकल्प सोडत ‘रक्तक्षयमुक्त मुंबई’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ‘लाल रंग, कमाल रंग’ या संकल्पनेवर हे अभियान बेतले आहे. या अभियानामध्ये बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान सहभागी होणार आहे. स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट २०२४ रोजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते या अभियानाला सुरुवात करण्यात आली.

रक्तक्षय ही जागतिक पातळीवर भेडसावणारी आरोग्याची समस्या असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) घोषित केले आहे. भारतात प्रामुख्याने तरूण मुली, मासिक पाळी येणाऱ्या किशोरवयीन मुली, गरोदर स्त्रिया आणि प्रसूती झालेल्या स्त्रियांमध्ये रक्तक्षय हा आजार आढळून येतो. रक्तक्षयामुळे रक्तातील हिमोग्लोबिनवर परिणाम होतो. त्यामुळे रक्तातील प्राणवायूच्या वहन क्षमतेवर परिणाम होतो. महिलांच्या शारीरिक रचनेनुसार मासिक पाळी आणि प्रसूती यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होण्यावर होतो. तसेच धकाधकीची जीवनशैली व अनियमित आहाराच्या सवयी रक्तक्षयाला कारणीभूत ठरतात. त्यामुळे रक्तक्षयाबाबत सर्व वयोगटातील महिलांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘रक्तक्षयमुक्त मुंबई’ अभियान हाती घेण्यात आले आहे.

14:10 (IST) 15 Aug 2024
शिक्षकाकडून १३ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग- पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल

कांदिवलीमधील एका शाळेतील १३ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने शाळेच्या मुख्याध्यापिकेला घडलेला प्रकार सांगितला. सविस्तर वाचा…

14:01 (IST) 15 Aug 2024
भाजपकडून रायगड मध्ये संविधान वाटप उपक्रमाची सुरुवात

अलिबाग : स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यात भाजपच्या वतीने जिल्ह्यात संविधान वाटप उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी येत्या महिन्याभरात संविधानाच्या सुधारीत अवृत्तीचे वितरण केले जाणार आहे.

लोकसभा निवडणूकीत संविधान बदलण्याबाबत झालेल्या अपप्रचाराचा फटका महायुतीला बसला होता. संविधान बदलाबाबत सुरू असलेल्या अपप्रचार मोडून काढण्यासाठी तसेच जनमानसात महायुतीबाबात या पार्श्वभूमीवर भाजपने संविधान वाटप उपक्रमाची सुरुवात केली आहे.

13:47 (IST) 15 Aug 2024
‘मेट्रो ३’ स्थानक परिसरात २९३१ वृक्ष लागवडीसाठी तीन कंत्राटे; प्रती झाड ४१ हजार रुपये खर्च – एकूण खर्च १२ कोटी रुपयांवर

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसीएल) ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेतील मेट्रो स्थानक परिसरात २,९३१ झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. या वृक्ष लागवडीसाठी एकूण १२ कोटी १ लाख ६६ हजार १३६ रुपयांची तीन कंत्राटे देण्यात आली आहेत. सविस्तर वाचा…

13:46 (IST) 15 Aug 2024
सायबर फसवणुकीच्या घटना वाढत असताना हा विभाग, राज्य शासन करते काय? मंत्री हसन मुश्रीफ यांचा घरचा आहेर…

‘राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाठी मनी लाँड्रिंगचे काम करीत आहात, असे सांगून तोतया पोलीस उपायुक्ताने पुण्यातील निवृत्त शिक्षकेची २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पाहून मी उडालो आहे. सविस्तर वाचा…

13:08 (IST) 15 Aug 2024
‘पीएमजीपी’ वसाहत पुनर्विकासाकडे विकासकांची पाठ; निविदेस अनेकदा मुदतवाढ देऊनही शून्य प्रतिसाद

जोगेश्वरीतील पीएमजीपी वसाहतीतील १७ इमारतींचा पुनर्विकासासाठी म्हाडाने विकासकाची नियुक्ती करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. तीनदा मुदतवाढ देऊनही निविदा सादर झालेली नाही. यामुळे या इमारतींचा पुनर्विकास लांबणीवर पडला आहे. सविस्तर वाचा…

13:07 (IST) 15 Aug 2024
‘धारावी’साठी आणखी तीन जागांची मागणी

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी मुंबईतील आणखी तीन ठिकाणच्या जागांची मागणी केली आहे. कांजूरमार्ग येथील कास्टिंग यार्डसाठी आरक्षित केलेली जागा आणि धारावी प्रकल्पाच्या क्षेत्रातील महापालिका आणि एमएमआरडीए व जिल्हाधिकारी यांच्या मालकीच्या जागांची मागणी करण्यात आली आहे. सविस्तर वाचा…

13:05 (IST) 15 Aug 2024
नितेश राणे यांच्या विधानाकडे देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने पाहावे, मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी

नितेश राणे यांचे विधान गांभीर्याने घेण्याची गरज आहे. त्याकडे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही गांभीर्याने पाहिले पाहिजे,’ असे मत मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. ‘गणपतीच्या मिरवणुकीमध्ये विघ्न आणत असाल, तर मोहरमच्या मिरवणुकीवेळी तसेच प्रत्युत्तर मिळेल,’ असे विधान आमदार नितेश राणे केली यांनी केले आहे. सविस्तर वाचा…

13:00 (IST) 15 Aug 2024
‘लाडकी बहीण’ योजनेच्‍या समितीवर चक्‍क काँग्रेसच्‍या आमदार! या किमयेची चर्चा….

अमरावती : मुख्‍यमंत्री लाडकी बहीण योजनेच्‍या विधानसभा क्षेत्रनिहाय समित्‍यांवर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्‍ट्रवादी अजित पवार गटाचा वरचष्‍मा असताना अमरावतीत मात्र ही संधी काँग्रेसच्‍या आमदार सुलभा खोडके यांना मिळाल्‍याने राजकीय वर्तुळात त्‍याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

सविस्तर वाचा…

12:59 (IST) 15 Aug 2024
RSS Chief Mohan Bhagwat : “बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी,” सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे मत

नागपूर : बांगलादेशात असलेल्या हिंदू बांधवांना त्रास होऊ नये, हे पाहणे एक देश म्हणून सरकारची जबाबदारी आहे, तेवढीच आपलीपण आहे. सरकार आपले काम करेलच, मात्र त्यासाठी देशाच्या नागरिकांचा पाठिंबाही आवश्यक आहे. देशात योग्य आणि शांततेचे वातावरण निर्माण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे.

सविस्तर वाचा…

12:56 (IST) 15 Aug 2024
धक्कादायक ! पुण्यातील सरकारी वकील महिलेने घेतली दहा हजारांची लाच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

पुणे : गुन्ह्यात जप्त असलेली मोटार परत ताब्यात मिळण्यासाठी लष्कर न्यायालयात दाखल अर्जावर ‘म्हणणे’ (से) मांडण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या लष्कर न्यायालयातील सहायक सरकारी वकील महिलेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला.

सविस्तर वाचा…

12:52 (IST) 15 Aug 2024
Live: “आमच्यात मतभेद….”, मंत्रिमंडळातल्या कथित वादावर अजित पवारांचे स्पष्टीकरण

राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वादावादी झाली, अशा बातम्या कालपासून चर्चेत होत्या. त्यावर आज अजित पवार यांनीच स्वतःहून माहिती दिली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आमच्यात सर्व काही सुरळीत चालू आहे. संघर्षाचा कोणताही प्रसंग उद्भवलेला नाही.

12:35 (IST) 15 Aug 2024
बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले… असं आमचं सरकार – अजित पवार

पुणे : पुणे शहरातील सिंहगड रोडवरील पुलाचे उदघाटन उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी,स्थानिक आमदार माधुरी मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर,पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

सविस्तर वाचा…

12:16 (IST) 15 Aug 2024
पिंपरी : एकाच जागी अनेक वर्षे नेमणुकीस असलेल्या कर्मचाऱ्यांची लवकरच उचलबांगडी

पिंपरी : महापालिकेत वर्षानुवर्षे एकाच जागी अधिकारी, कर्मचारी ठाण मांडून बसले आहेत. त्यात ‘अ’ आणि ‘ब’ संवर्गातील ३४ अधिकारी तर ‘क’ मधील ३३२ कर्मचारी आणि तांत्रिक संवर्गातील ७१ असे ४३७ कर्मचारी हे बदलीसाठी पात्र झालेले आहेत.

सविस्तर वाचा…

12:15 (IST) 15 Aug 2024
पुणे : स्वातंत्र्यदिनाची अनोखी भेट; गहाळ झालेले ५३ मोबाइल संच परत; तक्रारदारांना दिलासा

पुणे : नागरिकांचे गहाळ झालेले, तसेच चोरी गेलेले मोबाइल संचाचा शोध घेणे तसे अवघड आहे. शिवाजीनगर पोलिसांनी नागरिकांचे ५३ मोबाइल संच परत मिळवून दिले आहेत. गहाळ झालेले मोबाइल संच परगावात आणि परराज्यात वापरत असल्याचे तांत्रिक तपासात उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी वापरकर्त्यांशी संपर्क साधून मोबाइल संच परत करण्याची सूचना केली.

सविस्तर वाचा…

12:14 (IST) 15 Aug 2024
महिलांच्या सबलीकरणासाठी चेंबूरमध्ये अहिल्या भवन

उभारणीसाठी ४७ कोटी रुपये खर्च अपेक्षित; विविध कार्यालये एकाच छताखाली

मुंबई : पूर्व उपनगरातील मानखुर्द येथे महिला व बालकांच्या सबलीकरणासाठी अहिल्या भवन उभारण्यात येईल. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याबाबतची घोषणा केली. हे भवन उभारण्यासाठी ४७ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा निधी उपलब्ध करण्यात येईल. एकूण ३५,५०० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर हे भवन उभारण्यात येणार आहे. अहिल्या भवनात मुंबई उपनगरातील महिला आणि बालविकास विभागाची विविध कार्यालये एकाच छताखाली येईल.

‘चेंबूर एज्युकेशन सोसायटी’च्या माध्यमातून अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त चेंबूर येथील ‘फाईन आर्ट्स सोसायटी’ येथे कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात लोढा यांनी वरील घोषणा केली. यावेळी लोढा म्हणाले की, भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाचे अहिल्या भवन उभारले जाणार आहे. या भवनात संकटात सापडलेल्या, हिंसाचाराचे बळी ठरलेल्या महिलांना मानसिक आणि कायदेविषयक समुपदेशन करण्यासाठी अद्यायावत समुपदेशन केंद्र कार्यरत होईल. याद्वारे पीडित महिलांना आवश्यक ते समुपदेशन करून त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जाईल. सोबतच महिलांना विविध कायदे, योजना आणि विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक प्रशिक्षण देण्यासाठी २०० व्यक्तींची क्षमता असलेला अद्यायावत सभागृह या संकुलात उभारण्यात येईल. राज्यभरातील अधिकाऱ्यांना मुंबईत विश्रामगृहही बांधण्यात येईल.

12:13 (IST) 15 Aug 2024
Independence Day 2024: उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंह रजपूत यांना विशेष मोहिम पदक

राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह रजपूत यांना विशेष मोहिम पदक जाहीर झाले आहे. राज्य शासनाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पदकाची घोषणा करण्यात आली आहे. सविस्तर वाचा…

12:12 (IST) 15 Aug 2024
पिंपरी : ध्वजारोहण सुरु असताना आयुक्त शेखर सिंह यांच्या मोटारीवर हल्ला; दिव्यांग व्यक्तीने फोडली काच

स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सुरु असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मोटारीची दिव्यांग व्यक्तीने काच फोडली.

वाचा सविस्तर….

12:12 (IST) 15 Aug 2024
लाडकी बहीण’ योजनेत सत्ताधारी आमदारांचीच वर्णी

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या पिछेहाटीमुळे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सावध झालेल्या राज्यातील महायुती सरकारने नुकतीच जाहीर केलेल्या ‘लाडकी बहिण’ योजनेत अंमलबजावणीची धुरा सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांकडेच सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर वाचा…

12:12 (IST) 15 Aug 2024
महिलांच्या सबलीकरणासाठी चेंबूरमध्ये अहिल्या भवन, उभारणीसाठी ४७ कोटी रुपये खर्च अपेक्षित; विविध कार्यालये एकाच छताखाली

11:39 (IST) 15 Aug 2024
ठाणे पालिकेच्या ५७ शाळा मुख्याध्यापकाविना, शिक्षक उलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा

ठाणे महापालिका शाळांना नव्या भरती प्रक्रीयेतून १८१ शिक्षक उपलब्ध झाल्याने शाळेतील शिक्षकांची कमतरता दूर होताना दिसत असतानाच, या शाळांमध्ये मुख्याध्यापकच नसल्याची बाब पुढे आली आहे.

वाचा सविस्तर…

11:38 (IST) 15 Aug 2024
Maharashtra News Live: १७ ऑगस्टपर्यंत १ कोटी भगिनींच्या खात्यात पैसे जमा होणार – देवेंद्र फडणवीस

“भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तमाम भारतवासियांना शुभेच्छा देतो. भारत विकसित होत राहो. आमच्या भारताची लोकशाही अशीच प्रगल्भ होत राहो. भारताचा तिरंगा ध्वज जगात सातत्याने फडकत राहो. लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाची सुरुवात कालपासून केली आहे.१७ ऑगस्ट पर्यंत १ कोटी भगिनींना निधी वितरीत करण्यात येईल. तसेच यापुढेही जे अर्ज येतील, त्यावरही प्रक्रिया केली जाईल. भाऊबि‍जेच्या निमित्ताने भावाने बहिणीला ओवाळणी दिली आहे”, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्याला संबोधित केले. (Photo – Video Screenshot from CM Eknath Shinde Live)