Mumbai Maharashtra Today, 31 August 2023: भारताची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईत आज आणि उद्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीला २८ राजकीय पक्षांचे एकूण ६३ प्रतिनिधी हजर राहणार आहेत. यामध्ये ११ मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज नेते मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईतील ‘ग्रँड हयात’ हॉटेलमध्ये ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नेमके काय निर्णय घेतले जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दुसरीकडे, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिर्डी, प्रवरानगर दौऱ्यावर जाणार आहेत. दोन्ही नेते प्रवरानगर येथील ‘राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार’ सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तसेच आज मुंबईत जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं जाणार आहे. नीती आयोगाच्या बैठकीतील निर्णयावरून शरद पवार गट आक्रमक झाला आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर वाचा…
Marathi Breaking News : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई: गणेश मंडळांना महावितरणकडून तात्पुरत्या स्वरुपात आणि त्वरित वीजजोडणीची सुविधा उपलब्ध केली आहे. या जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे.
नाशिक: शहराप्रमाणेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातही चोरी, लुटमारीच्या घटनांमध्ये आता वाढ होऊ लागली असून येवला तालुक्यातील देवळाणे येथे भ्रमणध्वनी दुकानातून भ्रमणध्वनींसह रोख रक्कम असा सुमारे एक कोटी रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला.
पनवेल : महापालिका क्षेत्रात कामोठे आणि नवीन पनवेल येथे 78 किलो वजनाचे प्लास्टिक चमचे, प्लास्टिक डबे, कॅरीबॅग जप्त करुन ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कामोठेमधील कारवाईत ७० किलो प्लास्टिक पिशवी, ग्लास, आणि कंटेनर जप्त करून १५ हजार रुपये दंड वसुल केला. आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी शिवानंद बासमते यांच्या पथकाने कारवाई केली. तसेच नवीन पनवेल, पनवेल विभागामधील कारवाईत 20 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला.
अमरावती: परतवाडा नजीक पोलिसांना २७ गावठी बॉम्ब सापडल्याने अचलपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मुंबईतील 'इंडिया' आघाडीच्या बैठकीआधी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अदाणी समूहाचे प्रमुख गौतम अदाणी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी राहुल गांधी म्हणाले, जी-२० परिषदेच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशातील नेते सध्या भारतात येत आहेत. आज सकाळी एक गंभीर प्रकरण समोर आलं आहे. द गार्डीयन आणि Financial times सारख्या जगातील दोन प्रसिद्ध वृत्तपत्रांनी मोठं वृत्त दिलं आहे.
"पंतप्रधान मोदी यांच्या जवळच्या एका कुटुंबाने आपल्याच शेअर्समध्ये पैसे गुंतवले. म्हणजे अदाणींच्या कंपनीच्या नेटवर्कद्वारे एक बिलीयन डॉलर्स (अंदाजे ८२७० कोटी) भारतातून वेगवेगळ्या देशात गेले आणि पुन्हा भारतात आले. त्या पैशांच्या माध्यमातून अदाणींनी आपल्या कंपनीचे शेअर्स वाढवले. यातून मिळणाऱ्या नफ्यातून अदाणी विमानतळं, बोटी विकत घेत आहेत. आता त्यांना धारावीतील मोठा प्रकल्प मिळाला आहे. सध्या अदाणी देशाची संपत्ती याच पैशातून खरेदी करत आहेत. यावरच या वृत्तपत्रांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे" असं राहुल गांधी म्हणाले.
नागपूर: ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (बीआयएस)च्या नागपूर शाखेच्या चमूने जालना जिल्ह्यातील पारडगाव रोड येथील मेसर्स प्रयाग फूड प्राॅडक्स या बाटलीबंद पाणी उत्पादकावर छापा टाकला.
अलिबाग – मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यानची फेरीबोट जलवाहतूक सेवा १ सप्टेंबरपासून सुरु करण्यास मेरीटाईम बोर्डाने अनुमती दिली आहे.
एपीएमसी बाजारात ९०% आकाराने लहान तर १०% मोठ्या आकाराची सीताफळ दाखल होत आहेत. त्यामुळे दर्जात्मक उत्पादनासाठी पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.
दुर्लक्ष वा उपचारात हयगय केल्यास अंतिम स्थितीत धोकादायक ठरु शकणाऱ्या डेंग्यूचा जिल्ह्यातील ८ तालुक्यात प्रादुर्भाव झाल्याचे वृत्त आहे. सध्यस्थितीत या रोगाचे तब्बल ४५ रुग्ण आढळून आले आहे.
बुलढाणा: अपुरा पाऊस, मागील पंधरा दिवसांपासून वरुण राजाने मारलेली दडी अन यावर कळस म्हणजे हुमणी अळीचा झालेला भीषण प्रकोप यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्याने दोन एकरातील सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवला. वाढ खुंटलेल्या अळीग्रस्त सोयाबीनमध्ये त्याने जनावरे चरण्यास सोडली आहे.
कचऱ्याच्या घाणीने निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे उरणमधील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अमरावती : ऑनलाइन केलेली ऑर्डर रद्द झाल्यानंतर रक्कम परत मिळवून देण्याच्या नावावर एका महिलेला ९४ हजार २३७ रुपयांनी गंडविण्यात आले. ही घटना फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून संबंधित मोबाइल क्रमांकधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कंपन्यामधून होत असलेल्या जल आणि वायू प्रदूषण विरोधात प्रदूषण मंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
अमरावती : ऑनलाइन केलेली ऑर्डर रद्द झाल्यानंतर रक्कम परत मिळवून देण्याच्या नावावर एका महिलेला ९४ हजार २३७ रुपयांनी गंडविण्यात आले. ही घटना फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून संबंधित मोबाइल क्रमांकधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वाचा..
सध्या ही बँक ९०९ कोटींच्या तोट्यात आहे. नाबार्डने बँकेला बँकिंग परवाना रद्द करण्याबाबत अंतिम नोटीस पाठवली आहे.
नाशिक: सुरुवातीला रिमझिम स्वरुपात कधीतरी हजेरी लावणारा पाऊस महिनाभरापासून गायब आहे. यंदाच्या हंगामात आजतागायत मुसळधार पावसाची अनुभूती शहरवासीयांसह अनेक भागास मिळालेली नाही.
कोल्हापूर : शरद पवार यांच्या सभेनंतर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तेथेच सभा घेण्याच्या अजित पवार गटाच्या योजनेनुसार येत्या रविवारी कोल्हापूरमध्ये सभा होणार आहे. शरद पवारांपेक्षा अजित पवारांची सभा अधिक मोठी करण्याचा प्रयत्न स्थानिक नेते हसन मुश्रीफ यांनी सुरू केला आहे.
नागपूर : राजस्थान, गुजरातसहीत हिमालयाच्या पायथ्याशी आढळणारा ‘ब्लॅक ईगल’ काही महिन्यांपूर्वी नागपुरात आला आणि मांज्यामुळे त्याला एक पंख गमवावा लागला. मात्र, येथील ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’मध्ये त्याच्यावर उपचार झाले आणि पुन्हा एकदा हा दुर्मिळ पक्षी उडण्यास सक्षम झाला.
पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती या 'इंडिया' आघाडीच्या तिसऱ्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुंबईत दाखल झाल्या. यावेळी मेहबूबा मुफ्ती यांनी "जुडेगा भारत, जीतेगा इंडिया" अशी घोषणा दिली.
नागपूर : नागपूरच्या नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड युज प्लॅनिंग (एनबीएसएसएलयूपी) या संस्थेद्वारे महाराष्ट्रातील पाच हजार गावांमध्ये वातावरण बदलास अनुकूल माती संशोधन केले जात आहे.
प्रायोगिक तत्वावर नंदुरबार जिल्ह्यात सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली असून आठ महिन्यात हे सर्वेक्षण पूर्ण केले जाईल.
महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील यांनी आपल्या प्रशासकीय कामकाजाच्या पद्धतीचा पहिला झटका कामचुकार, दांडीबहाद्दर आणि ओळखपत्र न वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिला आहे.
पावसाअभावी जिल्ह्यातील लहान-मोठ्या प्रकल्पांत सरासरीपेक्षा कमी म्हणजे ४२.५३ टक्के जलसाठा असून, अग्नावती आणि हिवरा हे मध्यम प्रकल्प कोरडेठाक आहेत.
प्रारंभी डाॅ. पवार यांनी कांदा शुल्क निर्णयाचे समर्थन केले होते. परंतु, शेतकऱ्यांमधील रोष लक्षात घेऊन त्यांनी निवेदनातून शेतकऱ्यांची भावना मांडली आहे.
गावी असताना एपीएमसी पोलिसांनी तीन मोबाईल चोरांना अटक केली असून अनेक मोबाईल जप्त केल्याची बातमी त्यांच्या वाचनात आली.
तालुक्यातील आदई धबधब्यावर पाय निसटून सूकापूर येथे राहणाऱ्या मामा, भाच्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या घटनेमध्ये प्रदीप कामी (वय ७ वर्ष) आणि पारस बाकी (वय ३५ वर्ष) या मामा भाच्याचा मृत्यू झाला आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील म्हणाले की, मुंबईच्या विकास आराखड्याचे काम केंद्राच्या नीती आयोगाकडे सोपवणे म्हणजे महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न आहे. केंद्राचा हा निर्णय म्हणजे महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव आहे. कोणत्याही परिस्थितीत मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे होऊ देणार नाही. मुंबईला महाराष्ट्रात ठेवण्यासाठी आम्ही पडेल ती किंमत देऊ. हुतात्म्यांच्या बलिदानाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला आहे. हे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं.
जयंत पाटील पुढे म्हणाले की, आधीच्या काळामध्ये नियोजन आयोग होता. आता त्याच रूपांतर नीती आयोगात करण्यात आलेल आहे. पण हे आयोग फक्त मार्गदर्शनाचं काम करतात केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी पहिली स्टेप ही अशा पद्धतीने केली जाते, असे आम्हाला वाटतं. कारण अशा पद्धतीने आर्थिक नाड्या अडकवायचा प्रयत्न केला जात आहे. मुंबईकर सावध आहे. देशातील सध्या चालू असलेल्या घाणेरड्या राजकारणाला साथ देण्याचा निर्णय जर राज्य सरकार घेणार असेल तर त्यांना वेळीच रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबईकर जनतेच्या मागे उभी राहील, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे
भंडारा : भंडारा अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे वसुली अधिकारी बन्सीधर कारेमोरे (५८) यांनी निवृत्तीला दोन दिवस असतानाच वैनगंगा नदीत उडी मारून आत्महत्या केली. कारेमोरे यांचा मृतदेह तब्बल ३० तासांनंतर, बुधवारी सायंकाळी ५ वाजता गणेशपूर स्मशानभूमीजवळ नदीपात्रात आढळून आला. या घटनेमुळे बँक वर्तुळासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगर : अजित पवार व त्यांचे सहकारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेल्या अस्वस्थेच्या काळात पंकजा मुंडे यांची आता ‘तीर्थ’यात्रा निघणार आहे. ४ सप्टेंबरपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून या यात्रेला सुरुवात होईल.
नागपूर : इंडिया आघाडीच्या बैठका केवळ नावापुरत्या आहेत. उद्या निवडणुका झाल्या तर यांना विरोधी पक्षनेता बनवता येईल एवढ्या जागा मिळणार नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते नागपुरात बोलत होते.
मुंबईतील 'इंडिया' आघाडीच्या बैठकीपूर्वी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली...