Mumbai Maharashtra Today, 31 August 2023: भारताची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईत आज आणि उद्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीला २८ राजकीय पक्षांचे एकूण ६३ प्रतिनिधी हजर राहणार आहेत. यामध्ये ११ मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज नेते मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईतील ‘ग्रँड हयात’ हॉटेलमध्ये ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नेमके काय निर्णय घेतले जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसरीकडे, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिर्डी, प्रवरानगर दौऱ्यावर जाणार आहेत. दोन्ही नेते प्रवरानगर येथील ‘राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार’ सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तसेच आज मुंबईत जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं जाणार आहे. नीती आयोगाच्या बैठकीतील निर्णयावरून शरद पवार गट आक्रमक झाला आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर वाचा…

Live Updates

Marathi Breaking News : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

12:34 (IST) 31 Aug 2023
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी ‘या’ दिवशी होणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षणाबाबतची सर्वोच्च न्यायालयातील याचिकेची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली आहे. ही सुनावणी १ सप्टेंबरला होणार होती. मात्र, कामकाजाच्या वेळापत्रकात या याचिकेचा समावेश नसल्याने ही सुनावणी आता नंतर होणार आहे. यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत.

सविस्तर वाचा…

12:33 (IST) 31 Aug 2023
“शिंदे-फडणवीस यांनी अजित पवार यांचे पंख छाटले”; विजय वडेट्टीवार म्हणाले, “एखाद्याला जेवायला…”

अजित पवार यांच्याकडून फाईल थेट मुख्यमंत्र्यांकडे न जाता फडणवीस यांच्या माध्यमातून जाणार आहे. हा एक प्रकारे अजित पवारांचे पंख छाटण्याचाच प्रयत्न असल्याची कुजबुज मंत्रालयाच्या वर्तुळात सुरू आहे. यावर आता काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली.

सविस्तर वाचा…

12:32 (IST) 31 Aug 2023
विश्लेषण : अप्पर वर्धा धरणग्रस्तांचा संघर्ष कधी संपणार?

गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांनी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मंगळवारी मुंबईत मंत्रालयातील दुसऱ्या मजल्यावरील सुरक्षा जाळीवर उड्या मारून आंदोलन केले. या प्रकल्पग्रस्तांचे नेमके प्रश्न काय आहेत, त्यावर अद्याप तोडगा का निघू शकला नाही, याची चर्चा आता सुरू झाली आहे.

सविस्तर वाचा…

12:32 (IST) 31 Aug 2023
विश्लेषण : झोपु योजनेतील सदनिका वितरणातील बदल काय?

झोपु योजनेत पारदर्शकता येईल असा दावा केला जात आहे. ही ऑनलाइन सोडत नेमकी कशी असेल आणि त्यामुळे झोपडीधारकांना कसा फायदा होईल याचा हा आढावा…

सविस्तर वाचा…

12:11 (IST) 31 Aug 2023
रेल्वे मालवाहतूक क्षमता वाढीसाठी लांब पल्ल्याच्या गाड्यांचा प्रयोग, पाच महिन्यांत ५७ गाड्या धावल्या

अकोला : मध्य रेल्वेकडून गेल्या पाच महिन्यांत ५७ लांब पल्ल्याच्या मालवाहतूक गाड्या चालविल्या जात आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या चालवण्यामुळे रेल्वे विभागांमध्ये क्षमतेच्या कमतरतेच्या समस्येवर अतिशय प्रभावी उपाय मिळतो. अधिक गाड्यांसाठी ‘लूप लाईन’ तयार केली जात आहे. यामध्ये भुसावळ विभागातून २३, तर नागपूर विभागातून ३४ लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जात आहेत.

सविस्तर वाचा…

11:36 (IST) 31 Aug 2023
मेडिकल रुग्णालयात अनोखे रक्षाबंधन, चंद्रभागेत सापडलेल्या शंकरबाबांच्या मानस कन्येने बांधली डॉक्टरांना राखी

नागपूर : पंढरपूरच्या चंद्रभागा नदीपात्रात सापडलेल्या अपंग मुलीला (रूपा) समाजसेवक शंकरबाबा पापडकर यांनी स्वत:चे नाव देत तिचे पालन केले. रुपाची प्रकृती खालावल्यावर तिला मेडिकल रुग्णालयात दाखल केले गेले. येथे तिच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाली असून येथे सर्वच डॉक्टर तिच्यावर विशेष लक्ष देत आहेत. रक्षाबंधनाला रुपाने मेडिकलच्या निवासी डॉक्टरांना राखी बांधली.

सविस्तर वाचा…

11:36 (IST) 31 Aug 2023
धक्कादायक! सिगारेटचे चटके देऊन चिमुकलीचा अनन्वित छळ, घरकामासाठी परराज्यातून आणले

नागपूर : पिपळा-बेसा रोडवरील अथर्व नगरीतील एका सदनिकेत राहणाऱ्या एका दाम्पत्याने घरी काम करण्यासाठी आणलेल्या ७ वर्षीय मुलीच्या छातीला आणि खासगी जागेवर सिगारेटचे चटके देऊन अनन्वित छळ केला.

सविस्तर वाचा..

11:31 (IST) 31 Aug 2023
नवरा-बायकोतील वादाचा भयानक अंत! सासरच्‍यांनीच केली जावयाची हत्‍या; रहस्‍यमय हत्‍याकांडाचा अखेर उलगडा

अमरावती: सासरच्यांनी जावयाची मान पिरगळून हत्या केल्‍याची घटना चिखलदरा पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीत उघडकीस आली आहे. ही घटना गेल्‍या १४ जून रोजी चुनखडी येथे घडली होती. आपल्या पतीला माहेरकडील लोकांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली होती.

सविस्तर वाचा…

11:22 (IST) 31 Aug 2023
‘मॅट’चे नागपूर विभागीय खंडपीठ बंद असल्याने दोन हजारांवर प्रकरणे प्रलंबित; कारण काय, वाचा…

राज्यातील उच्च न्यायालयावरील भार कमी व्हावा तसेच राज्यातील प्रशासकीय बाबींचे वाद लवकर सुटावे, या उद्देशाने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाची (मॅट) स्थापना करण्यात आली.

सविस्तर वाचा…

11:09 (IST) 31 Aug 2023
“महाराष्ट्रात उबाठा वाजत गाजत…”, भाजपा नेत्याची बोचरी टीका

मुंबईत डरपोकांचा मेळावा “घमेंडीया” नावाने संपन्न होत आहे. ज्यांनी ज्यांनी काल-परवा पर्यंत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचा द्वेष केला… ज्या काँग्रेसने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान केला, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्म्यांवर गोळ्या झाडल्या, अशा सगळ्यांचे महाराष्ट्रात उबाठा वाजत गाजत जोरदार स्वागत करीत आहे. महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्यांना मोदक आणि पंचपक्वान्नाचे पंचतारांकित जेवण घालून त्यांची तोंडं गोड करीत आहेत. पंगती बसू दे आणि जेवणावळीही उठू दे… फक्त काल-परवा पर्यंत स्वाभिमानाने जगणाऱ्यांना… महाराष्ट्र द्रोह्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलताना जनाची नाही, किमान मनाची तरी वाटू दे!

11:04 (IST) 31 Aug 2023
उमदी शाळेतील विषबाधा प्रकरणी मुख्याध्यापकासह चौघे निलंबित; गुन्हा दाखल

सांगली: उमदी (ता. जत) येथील आश्रमशाळेतील विषबाधेप्रकरणी संस्थेच्या सचिवासह पाच जणांविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून समाज कल्याण विभागाने चौघांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

सविस्तर वाचा…

10:56 (IST) 31 Aug 2023
पिंपरी महापालिकेतील ‘या’ पदांच्या ३५३ जागांचा निकाल जाहीर

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागातील ३८८ जागांसाठी राज्यातील २६ शहरातील ९८ केंद्रांवर टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) माध्यमातून २६, २७ आणि २८ मे रोजी परीक्षा झाली.

सविस्तर वाचा…

10:53 (IST) 31 Aug 2023
ताडोबात व्याघ्र पर्यटनासाठी आता सहा विशेष वाहने, १ ऑक्टोबरपासून पर्यटकांसाठी उपलब्ध

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना नाममात्र दरात जिप्सीसारख्या वाहनात बसून व्याघ्र पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे.

सविस्तर वाचा…

10:52 (IST) 31 Aug 2023
ठाण्यात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या

अक्षय ठुबे हे वसंत विहार येथील धर्मवीर नगर परिसरात राहतात. ते शिंदे गटात असून तेथील उपशाखा प्रमुख आहेत.

सविस्तर वाचा…

10:51 (IST) 31 Aug 2023
उरण : खारकोपर लोकलवरील गव्हाण स्थानक अपूर्णच; काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिने लागणार

उरण ते खारकोपर लोकल सेवा सुरू होण्याची उत्सुकता वाढलेली असतानाच उरणच्या प्रवासी व नागरिकांची ही सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी, अशी इच्छा आहे.

सविस्तर वाचा…

10:50 (IST) 31 Aug 2023
गडचिरोली : शालेय शिक्षणातून ‘फुलोरा’ उपक्रप वगळा, शिक्षकांसह मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचाही विरोध

गडचिरोली : जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पहिली ते आठव्या वर्गासाठी सुरू केलेला ‘फुलोरा’ हा उपक्रम विद्यार्थ्यांना अभासक्रमापासून दूर नेणारा आहे. त्यामुळे सदर उपक्रम बंद करण्यात यावा, असे निर्देश राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांना पत्र लिहून दिले आहे.

सविस्तर वाचा…

10:49 (IST) 31 Aug 2023
खळबळजनक! आमदाराच्या आश्रमशाळेत मुलाचा मृतदेह आढळला

वर्धा : कारंजा तालुक्यातील नारा येथील यादवराव केचे आदिवासी आश्रमशाळेत शिवम उईके या बारा वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तो मेळघाट येथील डोमा गावचा रहिवासी होता.

सवस्तर वाचा…

10:48 (IST) 31 Aug 2023
नागपूर मेट्रोच्या पुलाला तडे, गाडीचा वेग मंदावला!

नागपूर : बांधकामाच्या क्षेत्रात अनेक पुरस्कार पटकावणाऱ्या महामेट्रोला आता कामातील त्रुटींमुळे नामुष्कीला तोंड द्यावे लागत आहे. नागपुरात कामठी मार्गावर गड्डीगोदाममधील आणि वर्धा मार्गावरील मेट्रोच्या पुलाला तडे गेल्याने त्यावरून धावणाऱ्या मेट्रोची गती कमी करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा..

10:35 (IST) 31 Aug 2023
छाती व पोटातील अवयव विरुद्ध दिशेला; दुर्मीळ जनुकीय समस्या असलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया

पुणे : पोटदुखीचा त्रास होत असल्याने एक रुग्ण रुग्णालयात आला. त्याची तपासणी केल्यानंतर त्याचे छाती व पोटातील अवयव सर्वसाधारणा व्यक्तीच्या विरुद्ध दिशेला असल्याचे निदर्शनास आले. ही दुर्मीळ जनुकीय समस्या असून, तिला साईटस इर्न्व्हसस असे म्हणतात.

वाचा सविस्तर…

10:35 (IST) 31 Aug 2023
सौदी अरेबियात व्यवसाय सुरू करण्याच्या आमिषाने ‘अशी’ झाली लाखोंची फसवणूक

पुणे : सौदी अरेबियात व्यवसाय सुरू करण्याच्या आमिषाने एका व्यावसायिकाची ९० लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वाचा सविस्तर…

10:33 (IST) 31 Aug 2023
कुटुंब मोटारीनं निघालंय लंडनला!…कशासाठी?… ‘याच्यासाठी’

पिंपरी : ‘वसुधैव कुटुम्बकम्’ आणि ‘ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या’ हा संदेश जगभरातील लोकांना देण्यासाठी पिंपळे निलखमधील विवेक सोनवणे हे पत्नी व दोन मुलांसह मोटारीने पिंपरी-चिंचवड ते लंडन असा प्रवास करणार आहेत.

वाचा सविस्तर…

10:32 (IST) 31 Aug 2023
नागपूर: शहरातील युवावर्ग पुन्हा हुक्का पार्लरच्या वाटेवर; पार्लरमालकांचे पोलिसांसोबत ‘अर्थपूर्ण’ संबंध!

नागपूर: शहरातील युवावर्ग गजबजलेल्या भागातील मोठ्या झगमगाटात सुरू असलेल्या हुक्का पार्लरच्या वाटेवर आहे. मध्यरात्रीच्या सुमारास तरुण-तरुणींचे घोळके हुक्का पार्लरमध्ये धूर उडवत आनंद घेत असल्याचे चित्र पहायला मिळते.

सविस्तर वाचा…

10:31 (IST) 31 Aug 2023
चक्क सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या घरी चोरीचा प्रयत्न

नागपूर: सिव्हिल लाईनमध्ये राहणाऱ्या माजी न्यायाधीशांच्याच घरी एका अट्टल चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला.

सविस्तर वाचा…

10:29 (IST) 31 Aug 2023
हुश्श!… ‘राष्ट्रवादी’ चिंचवड, भोसरीवरील दावा सोडणार?

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती म्हणून लढेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याने पिंपरी-चिंचवडमधील विद्यमान लोकप्रतिनिधींनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

वाचा सविस्तर…

10:21 (IST) 31 Aug 2023
अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवारांनी काय कानमंत्र दिला? रोहित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट आमने-सामने आले आहेत. दोन्ही गटांकडून एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या अनुषंगाने राजकीय खेळी केल्या जात आहेत. दरम्यान, अजित पवार यांना शह देण्यासाठी शरद पवारांनी कोणता कानमंत्र दिला आहे का? या प्रश्नावर रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे.

सविस्तर बातमी…

10:19 (IST) 31 Aug 2023
भाजपाबरोबर जाण्याआधी अजित पवारांनी ऑफर दिली? रोहित पवारांचं थेट भाष्य, म्हणाले…

अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर आमदार रोहित पवार हे शरद पवार गटाची भूमिका प्रखरपणे मांडताना दिसत आहे. असं असलं तरी सत्तेत सहभागी होण्यापूर्वी अजित पवारांनी रोहित पवारांना ऑफर दिली होती का? हा प्रश्न अनुत्तरित आहे. यावर आता रोहित पवारांनी स्वत: उत्तर दिलं आहे.

सविस्तर वृत्त

मुंबईतील 'इंडिया' आघाडीच्या बैठकीपूर्वी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली…