Maharashtra Politics LIVE Updates: राज्यात गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणावरून चांगलंच राजकारण तापलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. तसेच आज खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. तसेच वाल्मिक कराड याचं एक सीसीटीव्ही फूटेज नुकतंच समोर आलं असून वाल्मिक कराडसोबत इतर आरोपी दिसत आहेत. त्यामुळे हा मुद्दाही चर्चेत आला आहे. तसेच दुसरीकडे सैफ अली खानवरील हल्ला आणि त्याचा हल्लेखोर यासंदर्भात मोठी चर्चा सध्या सुरु आहे. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केलंलं आहे. दरम्यान, या बरोबरच २२ जानेवारी रोजी जळगावच्या पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ मोठा रेल्वे अपघात घडला. पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या. मात्र, त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने अनेक प्रवाशांना चिरडलं. त्यात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवरही आता प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Mumbai Maharashtra News LIVE Update: राजकीय आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात.
राज्यातील जलजीवन अभियानाची कामे रखडली, राजू शेट्टी यांची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांकडे निधीची मागणी
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या जलजीवन अभियान या ग्रामीण भागातील महत्त्वाकांक्षी पेयजल योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांना सहा महिन्यांपासून निधी नसल्याने ही कामे रखडली आहेत.
टँकरच्या चाकाखाली सापडून एक वर्षांच्या बालकाचा मृत्यू
टँकरच्या चाकाखाली सापडून एक वर्षांचा बालकाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर-सासवड रस्त्यावरील उरूळी देवाची परिसरात घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सविस्तर वाचा
पाच राष्ट्रीय पक्ष्यांचा मृत्यू अन् बर्ड फ्ल्यू…
नागपूर : राष्ट्रीय पक्ष्याचा दर्जा असणारे आणि वन्यजीव संरक्षण कायद्यातील अनुसूची एकमध्ये समाविष्ट असणाऱ्या एक-दोन नाही तर तब्बल पाच मोरांचा मृत्यू झाला. देशभरात एकीकडे ‘बर्ड फ्ल्यू’चा प्रादुर्भाव असताना एकाचवेळी झालेल्या या मृत्युने खळबळ उडाली आहे.
दंडमाफीचा प्रस्ताव द्या, नगरविकास राज्यमंत्र्यांनी महापालिकेला काय केल्या सूचना ?
‘मिळकतकरावरील थकीत शास्तीमुळे (दंडामुळे) थकबाकीदारांवर बोजा वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने दंडमाफीचा प्रस्ताव सादर करावा,’अशा सूचना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी महापालिका प्रशासनाला केल्या. सविस्तर वाचा
जळगाव रेल्वे अपघातातील सहा मृतदेहांची डीएनए चाचणी होणार
मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई मार्गावर जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याजवळ बुधवारी झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांची संख्या १३ झाली आहे. त्यापैकी सात प्रवाशांची ओळख पटली असून ओळख न पटलेल्या उर्वरित सहा मृतदेहांची आता डीएनए चाचणी केली जाणार आहे.
बदलापुरात एका तपानंतरही बायोगॅसची प्रतीक्षाच; भाजपच्या नगरसेवकाच्या आरोपानंतर बायोगॅस प्रकल्प पुन्हा वादात
कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात १२ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेला बायोगॅस प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भाजप नगरसेवकाने केलेल्या आरोपानंतर बायोगॅस प्रकल्पावर लाखो रुपये खर्च केल्याचे समोर आले आहे. सविस्तर वाचा
पथदिव्यांची देखभाल दुरूस्ती वाऱ्यावर; अंबरनाथकरांना सोसावी लागतेय अंधारयात्रा
अंबरनाथ शहरातील पथदिव्यांच्या देखभाल दुरूस्तीबाबत पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होते आहे. त्यामुळे नागरिकांना रात्री अंधाराचा जाच सोसावा लागत आहे. तरीही एका कंत्राटदाराला अंबरनाथ नगरपालिका प्रशासन बिलाच्या माध्यमातून खैरात देत असून त्यामुळे नागरिकांच्या कराचा अपव्यय होत असल्याचे समोर आले आहे. सविस्तर वाचा
डोंबिवलीत आयरेगावमध्ये चार दुकानांमध्ये चोरी करणारा चोरटा अटकेत
डोंबिवली पूर्वेतील आयरे रस्ता भागातील पोलीस चौकीजवळ शनिवारी मध्यरात्री चार दुकानांमध्ये चोरी झाली. दुकानदारांंनी यासंदर्भात तक्रार करताच रामनगर पोलिसांनी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साहाय्याने चोरटा शोधून काढला.
दूषित पाणी अथवा अन्नामुळे गुइलेन बॅरे सिंड्रोम! काळजी काय घ्यावी जाणून घ्या…
पुणे : पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमची रुग्णसंख्या वाढली आहे. काही रुग्णांच्या तपासणीत त्यांना कॅम्पायलोबॅक्टर जेजूनी जीवाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दूषित पाणी अथवा अन्नातून हा संसर्ग होत असल्याने काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
कल्याणमध्ये दिलीप कपोते वाहनतळाच्या आवारात महिलांसाठी अत्याधुनिक प्रसाधनगृह
कल्याण : कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ दिलीप कपोते वाहनतळाच्या आवारात महिलांसाठी अत्याधुनिक पध्दतीचे वातानुकूलित प्रसाधनगृह उभारण्यात आले आहे. महिलांसाठी लागणाऱ्या आवश्यक सुविधा या प्रसाधनगृहात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
गुइलेन बॅरे सिंड्रोम रुग्णांवर उपचारांसाठी आमदार रासने यांची मोठी मागणी, म्हणाले…!
पुणे : ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ या आजाराच्या रुग्णांना त्वरित उपचार मिळण्यासाठी मोठ्या रुग्णालयांमध्ये स्वतंत्र विभाग तयार करावेत तसेच आर्थिक दुर्बल रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून देण्याची मागणी रासने यांनी केली.
खडकवासला, किरकिटवाडीला शुद्धीकरणाविनाच पाणी !
पुणे : महापालिकेच्या हद्दीत नव्याने समावेश झालेल्या खडकवासला, किरकिटवाडी, नांदोशी या भागात ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चे संशयित रुग्ण आढळून येत आहेत. या भागातील नागरिकांना ज्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो, त्या विहिरीच्या पाण्यात दूषित पाणी मिसळले जात आहे का, याचा शोध घेण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे.
“मावा नाटे मावा राज” चळवळीचा आधारस्तंभ हरपला, मोहन हिराबाई हिरालाल यांचे निधन
नागपूर : लेखा मेंढा गावाला देशपातळीवर ओळख निर्माण करुन देणारे आणि पर्यावरण व वनाधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांचे मध्यरात्री १२ वाजून ५० मिनिटांनी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.
नाशिकच्या पालक सचिवपदी एकनाथ डवले
नाशिक : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांची नाशिकच्या पालक सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मागील कुंभमेळ्यात डवले हे नाशिकचे विभागीय आयुक्त होते. त्यांच्या या अनुभवाचा उपयोग आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनात करण्याच्या दृष्टीने सरकारने ही नियुक्ती केल्याचे मानले जाते.
सध्या ग्रामविकास विभागाची जबाबदारी सांभाळणारे डवले हे २०१४ ते २०१७ या कालावधीत नाशिकचे विभागीय आयुक्त होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन झाले. हा धागा पकडून सरकारने त्यांची नाशिकच्या पालक सचिवपदी नियुक्त केली.
पनवेलमधील कचरा संकलन कार्याला गती मिळणार
पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील पनवेल शहर आणि कळंबोली उपनगर या दोन ठिकाणी बंदीस्त स्वरुपात नागरी घनकचरा व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीचे संकलन प्रकल्प बांधले जाणार आहेत. यासाठी २६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. प्रकल्प केंद्राजवळील नागरीवस्तीला या प्रकल्पाचा त्रास होऊ नये असा या प्रकल्पाचा उद्देश असून या दोन केंद्रांमुळे संकलित केलेला कचरा घोट गाव येथील कचरा व्यवस्थापन प्रकल्पापर्यंत नेण्यात येण्यासाठी लागणारा वेळ आणि इंधनावरील खर्च पालिकेचा वाचणार आहे. सोमवारी हे केंद्र बांधण्याच्या कामासाठी २६ कोटी रुपयांच्या खर्चाला नगरविकास विभागाचे उपसचिवांनी परिपत्रकाव्दारे मंजूरीचे आदेश दिले.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत पनवेल महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला सोमवारी राज्याच्या नगरविकास विभागाने मंजूरी दिली. पालिका क्षेत्रात सध्या ४०० मेट्रीक टन कचरा शंभर लहान वाहनांमध्ये जमा करुन तो घोट येथील कचरा व्यवस्थापन प्रकल्पापर्यंत पोहचवला जातो. यासाठी पालिका दरवर्षी कचरा संकलन आणि वाहतूकीवर सूमारे ३० कोटी रुपये खर्च करते. नवीन पनवेल आणि कळंबोली या उपनगरालगत बंदीस्त स्वरुपात शास्त्रोक्तपद्धतीने कचरा संकलन केंद्र ( स्थलांतरण स्थानक) उभारल्यानंतर तो कचरा दाबयंत्राने लहान आकाराचा करुन मोठ्या वाहनातून घोट येथील कचरा व्यवस्थापन प्रकल्पापर्यंत पोहचवला जाईल. पालिकेला कच-याचे वर्गीकरण नागरिकांनी घरातून किंवा गृहनिर्माण सोसायट्यांनी करुन दिल्यास या ट्रान्सफर स्टेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाहतूक खर्च व वेळ वाचेल अशी माहिती पालिकेचे आरोग्य व स्वच्छता विभागाचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी दिली.
मोरा-मुंबई रो रो सेवा मार्च २०२६ पर्यंत कार्यान्वित; अनेक महिने बंद असलेले काम पुन्हा सुरू
मोरा ते मुंबई व दरम्यान रो रो सेवेसाठी जेट्टी उभारण्याचे काम २०१८ सालापासून रखडले आहे. त्यानंतर जेट्टीचे काम अनेक महिने बंद होते. या कामाला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून मार्च २०२६ पर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचा दावा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. सविस्तर वाचा
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी बांगलादेशींच्या मुद्द्याची व्यूहरचना; भाजप. शिवसेना, एमआयएमला विषय मिळाला
माहिती आधिकारात मिळविलेल्या कागदपत्रांचा आधार घेत आरोप करण्याच्या कार्यशैलीतील ‘अग्रेसर’ असणारे भाजपचे किरिट सोमय्या यांनी सिल्लोड मतदारसंघात बांगलादेशी मुस्लिम आले आहेत व त्यांना चार हजार ७३० बनावट जन्म – मृत्यूचे प्रमाणपत्र दिले गेल्याचा आरोप केला. सविस्तर वाचा
अदानीविरोधात कुर्लावासीय रस्त्यावर; मदर डेअरीचा जागा धारावीसाठी देण्यास तीव्र विरोध
धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत मुलुंड, कुर्ला,अक्सा आणि अन्य ठिकाणच्या जागा नाममात्र दरात धारावी पुनर्विकास प्रकल्पास (डीआरपी) दिल्या जात आहेत. कुर्ल्यातील मदर डेअरीची काही एकर जागा धारावीसाठी देण्यास कुर्ल्यातील रहिवाशांचा तीव्र विरोध आहे.
“दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा होत असेल तर…”, शरद पवार आणि अजित पवारांबाबत रोहित पवारांचं मोठं विधान
पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार राजेश टोपे, माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. तसेच शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बंददाराआड चर्चा झाल्याची चर्चा आहे. यासंदर्भात बोलताना रोहित पवार यांनी म्हटलं की, “एखादी चर्चा होत असेल पण बंद दाराआड काय चर्चा होते हे आपल्याला सांगता येणार नाही. मात्र, मी एवढंच सांगतो की जर दोन पक्ष असतील, त्यामध्ये एक पक्ष सत्तेत असेल आणि एक विरोधी पक्षात असेल आणि दोन पक्षात सकारात्मक चर्चा होत असेल त्यात जर दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा होत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
गँगस्टर डीके रावसह सात जणांविरोधात खंडणीचा गुन्हा, गुन्हे शाखेची कारवाई
मुंबई : हॉटेल व्यावसायिकाकडे अडीच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली गँगस्टर डी. के. रावसह सात जणांविरोधात गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे.
शरद पवार यांच्या बाजूला बसणे अजित पवारांनी टाळले, नावाची प्लेट बदलण्यास…
पुणे : पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार राजेश टोपे, माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
अवैध गर्भपाताची माहिती देणाऱ्या महिलांच्या मानधनात वाढ – आबिटकर
कोल्हापूर : अवैध गर्भपात प्रकरणी शासन गांभीर्याने कार्यवाही करत असून अशा गुन्ह्यांमध्ये आरोपींना कठोर शिक्षा करण्यात येत आहे. तरीही अवैध गर्भपात प्रकरणांमध्ये अधिकाधिक पुराव्याच्या साहाय्याने प्रकरण मजबूत करून आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी कार्यवाही करण्याची गरज आहे.
जिल्हा बँक नोकरभरती : परीक्षा केंद्र बदलल्याने आर्थिक भुर्दंड, परीक्षार्थीचा आरोप…
चंद्रपूर : चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक आणि शिपाईपदाच्या ऑनलाइन परीक्षेत पहिल्याची दिवशी बिघाड झाल्याने केंद्र बदलण्यात आले. यामुळे परीक्षार्थ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला, असा आरोप परभणीचे दत्ता पौळ यांनी केला.
तुरीचे दर घसरणीला, तरीही शुल्कमुक्त आयातीला मुदतवाढ
अमरावती : खरीप हंगामातील सोयाबीनच्या घटत्या दराने शेतकऱ्यांची घोर निराशा केली असताना आता तुरीच्या दरालाही उतरती कळा लागली आहे. महिन्याभरापूर्वी तुरीला प्रतिक्विंटल दहा हजार रुपये दर होता त्यावेळेस सोयाबीनची भरपाई तुरीतून निघेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र तुरीचे दर हमीभावापेक्षा खाली आले आहेत.
ठाणे जिल्ह्यात उत्पन्न दाखले मिळेना, कारवाईच्या भितीमुळे तलाठींनी दाखले काम केले बंद
ठाणे : तलाठींच्या अहवालानुसार दाखला देण्यात येत असल्याचा उल्लेख उत्पन्नाच्या दाखल्यावर केला जात असल्यामुळे त्यात खोटी माहिती आढळल्यास तलाठींवर कारवाई होते. या कारवाईच्या भितीमुळे तलाठींनी उत्पन्न दाखल्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या तपासणीचे काम बंद केले असून यामुळे ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उत्पन्न दाखल्यांचे काम ठप्प झाले आहे.
ठाणे : प्रत्येक महिन्यात १९ ते २० जणांचा रस्ते अपघातात मृत्यू
ठाणे : ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी या क्षेत्रात २०२४ या वर्षभराच्या कालावधीत २३० जणांचा अपघाती मृत्यू तर ६०८ जण गंभीर जखमी झाल्याचे समोर येत आहे. मृतांच्या अपघाताची सरासरी केल्यास प्रत्येक महिन्यात किमान १९ ते २० जणांना प्राण गमवाला लागत आहे. २०२३ च्या तुलनेत २०२४ या वर्षात अपघाताचे प्रमाण अधिक आहे. २०२३ मध्ये २०० जणांचा मृत्यू झाला होता.
स्वदेशी मिल्स अवसायानात काढण्यास दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाकडून रद्द
मुंबई : स्वदेशी मिल्स कंपनी लिमिटेडच्या अवसायानात काढण्याच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला. त्यामुळे, ही प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे.
टोरेस कंपनीच्या १००० कोटींच्या फसवणूक प्रकरणात ईडीची मोठी कारवाई
मुंबईमधील दादर परिसरात टोरेस नावाच्या कंपनीनं कमी कालावधीत पैसे दुप्पट करुन देण्याचं अमिश दाखवत गुंतवणुकदारांची मोठी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला. या प्रकारानंतर महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. यानंतर या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात काहींना अटक करण्यात आलेलं आहे. दरम्यान, आता या फसवणुकीच्या प्रकरणात ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) एन्ट्री केली आहे. आता ईडीने मोठी कारवाई करत मुंबई आणि जयपूरमधील तब्बल १० ठिकाणी छापेमारी केली आहे.
एसटीच्या तिकीट दरात वाढ होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती
“एसटीच्या तिकीटाच्या दरात वाढ करण्यासाठीचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. मात्र, एक आहे की एसटी महामंडळाच्या ज्या बस आहेत. त्यामध्ये चांगल्या बससाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. मग त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रताप सरनाईक आणि आम्ही प्रयत्न करणार आहोत. आता उद्या जर एसटीच्या तिकीट दरात वाढ करायची म्हटलं आणि जर एसटीबसेस खराब असतील तर लोक म्हणतील की बस खराब आहेत, मग कुठे भाडेवाढ करता? त्यामुळे आम्ही एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याच्या संदर्भात चर्चा करू आणि योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

माहिती आधिकारात मिळविलेल्या कागदपत्रांचा आधार घेत आरोप करण्याच्या कार्यशैलीतील ‘अग्रेसर’ असणारे भाजपचे किरिट सोमय्या यांनी सिल्लोड मतदारसंघात बांगलादेशी मुस्लिम आले आहेत व त्यांना चार हजार ७३० बनावट जन्म – मृत्यूचे प्रमाणपत्र दिले गेल्याचा आरोप केला. सविस्तर वाचा…