Mumbai News Today, 05 September 2023 : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्लावरून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा ८ वा दिवस आहे. त्यामुळे सरकारकडून जरांगे-पाटील यांची समजून काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी मंत्री गिरीश महाजन जरांगे-पाटील यांची भेट घेणार आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जळगावात सभा पार पडत आहे. यासह महाराष्ट्रातील विविध घडामोडी जाणून घेणार आहोत…

Live Updates

Maharashtra Breaking News : राजकीय, क्राइमसह विविध शहरांतील घडामोडी जाणून घ्या...

18:26 (IST) 5 Sep 2023
नवी मुंबई : कार चालकाची एनएमएमटीला मागून धडक, तलवार काढत बस चालकाला केली शिविगाळ

सुरक्षित अंतर न ठेवल्याने मागून येणाऱ्या कारने बसला जोरदार धडक दिली. मात्र या अपघातानंतर कार चालकाने गाडीतील तलवार काढून बस चालकाला धमकी शिवीगाळ करीत चालक दरवाजावर तलवारीचे वार केले.

वाचा सविस्तर...

18:09 (IST) 5 Sep 2023
"सरकारला आणखी चार दिवसांचा वेळ दिला आहे, कारण...", जरांगे-पाटील निर्णयावर ठाम

"समितीच्या अहवालासाठी आणखी वेळ लागत आहे. म्हणजे आपण आंदोलन मागे घेत नाही. सरकारला आणखी चार दिवसांचा वेळ दिला आहे. चार दिवसांत आरक्षणाचा जीआर घेऊन येतील. कारण, हे आरक्षण आपल्याला कायमस्वरूपी मिळवायचं आहे," असं मनोज जरांगे-पाटील यांनी सांगितलं.

17:50 (IST) 5 Sep 2023
"आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे", मनोज जरांगे-पाटील आपल्या निर्णयावर ठाम

"सरकारला तीन महिने दिले होते. आणखी चार दिवस देतो. पण, आरक्षणावर ठाम आहे," अशी भूमिका उपोषणकर्ते जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळासमोर घेतली आहे.

17:50 (IST) 5 Sep 2023
जालना घटनेच्या निषेधार्थ वाई बंद

जालना येथे मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज मंगळवारी वाई बंद पाळण्यात आला. सकाळपासूनच अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद होते.

वाचा सविस्तर...

17:42 (IST) 5 Sep 2023
“मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये अन्यथा…”, राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ आक्रमक

मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देवून कुणबी जातीचे दाखले देवू नये अन्यथा या अन्यायकारक निर्णयाविरोधात संपूर्ण राज्यात ओबीसी बांधव रस्त्यावर उतरून आंदोनल करतील.

सविस्तर वाचा

17:34 (IST) 5 Sep 2023
डोंबिवलीत रिजेन्सी इस्टेटमधील विकासकाच्या घरात चोरी

डोंबिवली: डोंबिवली जवळील दावडी भागातील रिजेन्सी इस्टेटमध्ये राहत असलेल्या एका विकासकाच्या घरातून एका महिलेने दोन लाख ९४ हजार रुपयांची रक्कम चोरुन नेली आहे.

सविस्तर वाचा...

17:31 (IST) 5 Sep 2023
बुलढाणा : पोलीस यंत्रणा बंदोबस्तात असल्याचा फायदा घेत दरोडेखोरांचा धुडघूस, चार घरे लुटली

पालखी मार्ग शेगाव – पंढरपूर व सुलतानपुर येथील राज्यमहामार्गापासून नजिकच वडगाव तेजन हे गाव आहे. जालना लाठीमार चे पडसाद उमटलेल्या जिल्ह्यात आंदोलने होत. यामुळे पोलीस यंत्रणा गुंतली आहे. याच फायदा येथे ४ सप्टेंबरच्या उत्तररात्री दरोडेखोरांनी धुडघूस घालून चार घरातून ऐवज लंपास केला.

वाचा सविस्तर...

<a href="https://www.facebook.com/LoksattaLive">

17:15 (IST) 5 Sep 2023
भारनियमन नाही, परंतु पावसात वीज पुरवठा नेहमी खंडित का होतो, जाणून घ्या…

नागपूरसह विदर्भाच्या अनेक भागात पावसाने मध्यंतरी दडी मारली होती. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यात तापमान वाढल्याने विजेची मागणी वाढली. त्यात मागणीच्या तुलनेत उपलब्ध वीजेचा तुटवडा निर्माण झाल्याने महावितरणला ५० टक्केहून जास्त वीज हाणी असलेल्या फिडरवर आपत्कालीन भारनियमन करावे लागले.

सविस्तर वाचा

16:57 (IST) 5 Sep 2023
सावधान! तुमच्याकडे ‘लव्ह बर्ड’ पिंजरा आहे, तर ‘हा’ आहे मोठा धोका, व्हिडीओ पाहून उडेल थरकाप…

अकोला : घरात ‘लव्ह बर्ड’ पिंजऱ्यात ठेवणे अत्यंत धोक्याचे ठरू शकते. ते पक्षी खाण्यासाठी अत्यंत विषारी-बिनविषारी साप घरात येऊ शकतात. त्याचा प्रत्यय अकोला शहरातील दोन कुटुंबांना आला. दोन वेगवेगळ्या घरांमध्ये ते पक्षी खाण्यासाठी आलेले साप पिंजऱ्यांमध्ये अडकले. ज्येष्ठ सर्पमित्र व मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांनी त्या सापांना पकडून त्या दोन कुटुंबियांना भयमुक्त केले.

सविस्तर वाचा...

16:40 (IST) 5 Sep 2023
मराठा आरक्षण आंदोलन : नागपूरहून पुणे, औरंगाबादच्या दिशेने एसटी रवाना; आणखी कोणत्या मार्गावर नियोजन, जाणून घ्या…

नागपूर: मराठा आरक्षणासाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनामुळे नागपूरहून मराठवाडा, पुणेच्या दिशेने निघालेल्या बसेस मधातच थांबवल्या जात आहेत अथवा रद्द होत आहेत. या मार्गावरील एसटीचे परिचालन सुरळीत करण्यासाठी मंगळवारी नागपुरहून पूणे, औरंगाबादच्या दिशेने पून्हा एसटी बसेस निघाल्या आहेत.

सविस्तर वाचा..

16:06 (IST) 5 Sep 2023
‘इंडिया’चे नाव ‘भारत’ करणे हा संघाचा अजेंडा? चार दिवसांआधी मोहन भागवत काय म्हणाले होते, वाचा

डॉ. मोहन भागवत यांनी गुवाहाटी येथे सकल जैन समाजच्या एका कार्यक्रमात बोलताना  ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ या नावाचा वापर करण्याचे आवाहन केले होते. ते म्हणाले, या देशाचे नाव अनेक शतकापांसून भारत आहे, इंडिया नाही. त्यामुळे आपल्याला जुन्या नावाचा उपयोग करायला हवा. 

सविस्तर वाचा

16:03 (IST) 5 Sep 2023
आपल्या देशाला ‘भारत’ नाव कशावरून पडले, त्याचे ‘इंडिया’ कसे झाले? वाचा

नागपूर: केंद्रातील मोदी सरकारने संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात मोदी सरकार ‘इंडिया’ हा शब्द संविधानातून हटवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावरूनच आता आपल्या देशाला भारत नाव कसे पडले. त्याचे ‘इंडिया’ नाव कसे झाले. याचा हा इतिहास.

सविस्तर वाचा...

15:59 (IST) 5 Sep 2023
भाजपाला मोठं खिंडार, 'या' नेत्याचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जळगावात सभा होत आहे. यावेळी खान्देशातील भाजपाचे मोठे नेते बी.एस.पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांची राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बी.एस.पाटील हे तीनवेळा आमदार राहिले आहेत.

15:53 (IST) 5 Sep 2023
काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेच्या नमनालाच नगरमध्ये विसंवादाचे ग्रहण

नगरः आगामी निवडणुकांची चाहूल घेत काँग्रेसने राज्यात जनसंवाद यात्रा सुरू केली आहे. त्यासाठी विभागवार नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्राची सुरुवात नगर शहरातून ज्येष्ठ नेते, माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थिती करण्यात आली, मात्र जिल्ह्यात काँग्रेस एकसंघ नसल्याचा फटका जनसंवाद यात्रेच्या नमनालाच बसला. त्यातून जनसंवाद ऐवजी काँग्रेसअंतर्गत विसंवादाचे चित्र निर्माण झाले.

सविस्तर वाचा...

15:47 (IST) 5 Sep 2023
डोंबिवली पश्चिमेतील राहुलनगरमध्ये दोन बेकायदा इमारतींची उभारणी, बनावट कागदपत्रांव्दारे सदनिकांची विक्रीची तयारी

डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीतील रेतीबंदर रस्त्यावरील राहुलनगर मध्ये खासगी जमिनींवर कल्याण डोंबिवली पालिकेच्या परवानग्या न घेता सात माळ्याच्या दोन बेकायदा इमारतींची उभारणी जमीन मालकांनी केली आहे. सविस्तर वाचा…

15:46 (IST) 5 Sep 2023
डायघर येथील कोयना प्रकल्पग्रस्त महिलेची जमीन हडप करण्याचा दिवा येथील व्यावसायिकाचा प्रयत्न

कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील डायरघर गावात कोयना प्रकल्पग्रस्त म्हणून शासनाकडून जमीन मिळालेल्या एका महिलेची २० गुंठे जमीन दिवा गावातील एक व्यावसायिक आणि त्याच्या मुंबईतील सहकाऱ्याने बनावट कुलमुखत्यार पत्राच्याव्दारे हडप करण्याचा प्रयत्न उघडकीला आला आहे. सविस्तर वाचा…

15:45 (IST) 5 Sep 2023
मोठागाव-दुर्गाडी वळण रस्ता ‘एमएमआरडीए’च्या कार्यकारी समितीच्या मंजुरी अभावी रखडला

कल्याण- टिटवाळा ते हेदुटणे ३० किलोमीटर बाह्य वळण रस्ते मार्गातील मोठागाव ते दुर्गाडी या सात किलोमीटर टप्प्याचे काम मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीची मंजुरी मिळाली नसल्याने अद्याप सुरू करण्यात आले नाही. सविस्तर वाचा…

15:17 (IST) 5 Sep 2023
Maharashtra Monsoon Update : महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, येत्या २४ तासात बंगालच्या उपसागरात…

बंगालच्या उपसागरात येत्या २४ तासात कमी दाबाचा पट्टा तयार होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

वाचा सविस्तर...

15:10 (IST) 5 Sep 2023
अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी सशस्त्र जवान दिमतीला; देवझिरी वनक्षेत्रात सागवानासह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

जिल्ह्यातील वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी सशस्त्र जवान तैनात करण्यात आले आहेत. चोपडा तालुक्यातील देवझिरी वनक्षेत्रातील देवझिरी- हंड्याकुंड्या- पाटी रस्त्यावर गस्त घालत असताना वनविभागाच्या पथकाला वनपरिक्षेत्रात अवैध वृक्षतोड आढळून आली असून सागवान लाकडासह दोन लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

15:07 (IST) 5 Sep 2023
"...तर अजित पवारांच्या गाडीसमोर उड्या मारणार", ठाकरे गटातील नेत्याचा इशारा

"मराठा आरक्षणाबाबत अजित पवार यांना आम्ही निवेदन देणार नाही. अजित पवार मराठ्यांचे मंत्री आहेत. मराठ्यांच्या मंत्र्यांकडून आम्हाला न्याय मिळत नसेल, तर अजित पवारांच्या दौऱ्यात आम्ही गाडीसमोर उड्या मारणार. मेल्यावर सरकार जागं होणार असेल, तर माझी तयारी आहे," असं कोल्हापूर शिवसेना ( ठाकरे गट ) जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी म्हटलं आहे.

15:04 (IST) 5 Sep 2023
गोंदिया : “…तर विमानांचे उड्डाण बंद पाडू,” बिरसी सरपंचासह ग्रामस्थांचा इशारा; कारण काय, जाणून घ्या…

गोंदिया : शहरापासून १५ किमी अंतरावर असलेल्या बिरसी येथील १०६ कुटुंबांचे विमानतळ विस्तारीकरणासाठी इतरत्र पुनर्वसन करण्यात आले. मात्र, ज्या ठिकाणी पुनर्वसन केले त्याठिकाणी रस्ते, पाणी, वीज या पायाभूत सुविधांची वानवा आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनी आता पुन्हा एकदा मोठ्या आंदोलनाची हाक दिली आहे. त्यासाठी ग्राम पंचायतीने निवेदनही दिले आहे.

सविस्तर वाचा..

14:41 (IST) 5 Sep 2023
पंतप्रधान मोदींच्या ‘स्मार्ट सिटी’ची ही काय अवस्था! २०१५ मध्ये झाली होती घोषणा, पण…

नागपूर : ‘स्मार्ट सिटी प्रकल्प’ जून २०२४ पर्यंत पूर्ण करायचा आहे. परंतु ज्या पद्धतीने काम सुरू आहे, त्यावरून नियोजित वेळेत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही. हा प्रकल्प १७३० कोटींचा आहे आणि एक हजार कोटींचे कार्यादेश देण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात ४२ कामांपैकी केवळ १५ कामे पूर्ण झाली आहेत.

सविस्तर वाचा...

14:41 (IST) 5 Sep 2023
धुळ्याजवळील लळिंग घाटात चार वाहनांचा विचित्र अपघात

शहराजवळील मुंबई-आग्रा महामार्गावरील लळिंग घाटात मंगळवारी चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातग्रस्त वाहनांमध्ये गॅस टँकरचाही समावेश असून टँकरला गळती लागली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

सविस्तर वाचा

14:21 (IST) 5 Sep 2023
"जालना लाठीहल्लाप्रकरणी फडणवीसांनी आधीच माफी मागितली असती, तर..."

"जालन्यातील लाठीहल्ल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी माफी मागितली. ही चांगली गोष्ट आहे. पण, तीन दिवस आधीच माफी मागितली असती, तर आंदोलनाची तीव्रता कमी झाली असती," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांनी म्हटलं.

14:14 (IST) 5 Sep 2023
Jalna Lathi Charge: वाशिम, मंगरूळपीर शहरात कडकडीत बंद, प्रतीकात्मक अंत्ययात्रा अन् मुखाग्नी देऊन निषेध

वाशिम: जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी (ता. अंबड) येथील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ आज सकल मराठा समाज व सर्वधर्मिय समाज बांधवांच्यावतीने वाशिम व मंगरूळपीर शहरात कडकडीत बंद पाळला जात आहे.

सविस्तर वाचा...

14:12 (IST) 5 Sep 2023
मुंबई :आयटीआयचे प्रवेश अर्ज ६ सप्टेंबरपर्यंत भरता येणार

शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत म्हणजेच आयटीआय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने ६ सप्टेंबरपर्यंत  मुदतवाढ दिली आहे.

सविस्तर वाचा…

13:49 (IST) 5 Sep 2023
विदर्भात सोयाबीनला ‘मूळकुज’चा धोका, अनेक भागात प्रादुर्भाव

अकोला : पश्चिम विदर्भात विविध जिल्ह्यांतील सोयाबीन पिकाला मूळकुजचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी प्रादुर्भाव आढळला. सध्या बुरशीला पोषक वातावरण तयार झाले. या रोगावर वेळीच उपाययोजना करण्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिला आहे.

सविस्तर वाचा...

13:49 (IST) 5 Sep 2023
सातारा:वाई वरून साताऱ्याकडे निघालेला मराठा मोर्चा महामार्गावर अडवला

जालना येथे मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आज मंगळवारी सकाळी वाईहुन साताऱ्याकडे शेकडो कार्यकर्त्यांचा पायी  निघालेला मोर्चा पुणे बंगळूर महामार्गावर पाचवड येथे प्रशासनाकडून अडविण्यात आला. सविस्तर वाचा…

13:16 (IST) 5 Sep 2023
PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेतून हजारो शेतकरी बाद होणार? ई-केवायसी व आधार सिडींग न केल्यास कारवाई

तप्रधान किसान योजनेची सन २०१९-२० पासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याचे ई-केवायसी प्रमाणीकरण, बँक खाते आधार संलग्न करणे व भूमी अभिलेख नोंदी अद्यावत करणे या बाबी केंद्र शासनाने अनिवार्य केल्या आहेत.

सविस्तर वाचा

13:10 (IST) 5 Sep 2023
जालना लाठीमार : यवतमाळ बंदला हिंसक वळण, दुकानावर दगडफेक; चौकाचौकांत टायर जाळून निषेध

यवतमाळ : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे संवैधानिकरित्या आंदोलन करीत असलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. या घटनेस राज्याचे गृहमंत्री जबाबदार असल्याचा आरोप करीत शासन व पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ यवतमाळ येथे आज, मंगळवारी सकाळपासून मराठा-कुणबी मोर्चाने बंद पुकारला आहे. या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले.

सविस्तर वाचा..

devendra fadanvis

जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेला लाठीमार दुर्दैवी असून निष्पाप नागरिकांना झालेल्या मारहाण- प्रकरणी राज्य सरकारने सोमवारी माफीनामा सादर करत मराठा समाजाला शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलीस अधीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. तसेच जालन्यातील आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेतल्याची घोषणाही त्यांनी केली.

Story img Loader