Mumbai News Today, 05 September 2023 : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्लावरून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा ८ वा दिवस आहे. त्यामुळे सरकारकडून जरांगे-पाटील यांची समजून काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी मंत्री गिरीश महाजन जरांगे-पाटील यांची भेट घेणार आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जळगावात सभा पार पडत आहे. यासह महाराष्ट्रातील विविध घडामोडी जाणून घेणार आहोत…
Maharashtra Breaking News : राजकीय, क्राइमसह विविध शहरांतील घडामोडी जाणून घ्या…
नागपूर : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना नागपूर आयुक्तालयाची धुरा सांभाळून तीन वर्षे पूर्ण झाले असून त्यांचा कार्यकाळ ‘कभी खुशी-कभी गम’ असा राहिला आहे. तीन वर्षांत गुन्हेगारांवर नियंत्रण मिळवल्याचा दावा आयुक्त करीत असले तरी गुन्हेगारी मात्र कमी झालेली नाही. तसेच शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र, त्यातही अपेक्षित यश आलेले दिसत नाही.
“आम्ही पंकजा मुंडे यांच्याबरोबर युती करण्यास तयार आहोत. त्यांच्यात क्षमता आहे, यात मला शंका नाही. पंकजा मुंडे यांच्यात किती क्षमता आहे, हे त्यांनी तपासून पाहावे. स्वत:चे दहा पंधरा आमदार असतील, तर आम्ही पंकजा मुंडेबरोबर युती करू,” असं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली येथे ९ आणि १० सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या जी २० शिखर परिषदेमुळे सुमारे २०० रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यातला आला आहे. आणखी १०० गाड्यावर त्याचा परिणाम होणार आहे. काही गाड्याचे मार्ग बदलण्यात आले तर काही सुटण्याचे स्थानक बदलण्यात आले आहे.
नागपूर : अंबाझरीतील बॅरेल पबमध्ये वाद झाल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोन विभाग उपाध्यक्षाला जबर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी संतप्त मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अंबाझरी पोलीस ठाण्याला घेराव घातला. त्यामुळे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.
उरण: गुरुवारी साजरा होणाऱ्या गोकुलकाला निमित्ताने उरण मध्ये शहरी व ग्रामीण भागातही लाखोंच्या हंड्या घोषीत झाल्या आहेत. यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षनेते आणि पक्षांच्याही हंड्या जाहीर झाल्या आहेत.
नागपूर : मैत्रिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणाने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, मैत्रीण गर्भवती झाल्यानंतर त्यांचे प्रेमप्रकरणाचे बिंग फुटले. मैत्रिणीच्या आईने मुलीला थेट पोलीस ठाण्यात नेले. आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलीच्या मित्रावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
नागपूर : पावसाने यंदा देशभरातील अनेक राज्यांत दीर्घ कालावधीपर्यंत दडी मारली. त्यामुळे ऑगस्ट उलटूनही वातावरणातील उकाडा कायम आहे. आता महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये सात सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
नागपूर : नरेंद्र मोदी सरकारने ‘एक देश, एक निवडणूक’चा नारा दिला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीही स्थापन केली आहे. लवकरच संसदेचे अधिवेशनही बोलावण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांमध्ये ‘एक देश, एक निवडणूक’बाबत कुतूहल निर्माण झाले आहे.
नागपूर: शहराच्या विविध भागातून वाहणाऱ्या नागनदी व पिवळी नदीवरील ४० पेक्षा अधिक पूल असून त्यातील बहुतांश जीर्ण धोकादायक अवस्थेत आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
पिंपरी: शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये गेल्या काही वर्षांत वाहतूक नियंत्रक दिवे लावण्यात आले असून, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचे प्रमाण वाढले आहे.
वर्धा: सासू सुनेची भांडणे नवी नाहीत. एकाच घरात राहणाऱ्या असतील तर भांड्याला भांडे लागण्याची बाब नित्याचीच.
वर्धा: काँग्रेसची जनसंवाद यात्रा जिल्ह्यात सध्या सुरू आहे. आष्टी शहीद येथून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात ही यात्रा निघाली.
कांदा उत्पादकांना प्रलंबित अनुदान मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच पावणे दोन लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ४३५ कोटी रक्कम जमा होणार असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी म्हटले होते. तथापि, आता हे अनुदान एकरकमी न देता विभागून दिली जाण्याची चिन्हे आहेत.
“मराठा हा कुणबीच आहे. हे सूर्यप्रकाशइतके सत्य आहे. त्यामुळे मराठा हा कुणबी असून ओबीसीचं प्रमाणपत्र दिल्यास प्रश्न सुटेल,” असं विधान आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे.
“राज्य सरकारने केवळ मराठवाड्यातील मराठा समाज कुणबी असल्याची अधिसूचना (जीआर) काढावा. या जीआरला न्यायालयात आव्हान मिळणार नाही. हा निर्णय कायदेशीर कसोटीवर टिकेल,” असा दावा मनोज जरांगे-पाटील यांनी केला आहे.
सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात सुमारे एक महिन्यापूर्वी गोंदिया वनविभागातून एक व नागपूर शहराजवळून एक असे दोन लांब चोचीचे गिधाड उपचारासाठी आणले होते. मरणासन्न अवस्थेतील या गिधाडांना वाचवण्यात केंद्राच्या चमूला यश आले आणि नुकतेच त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
शिक्षक संघटना कृती समितीच्या वतीने शिक्षण दिनाच्या दिवशी आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळेतील शिक्षकांना धन्वंतरी योजना लागू करण्याचा निर्णय आयुक्त सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी घेतला.
रिझर्व्ह बँकेकडून मागील दोन वर्षांत नागरी सहकारी बँकांवरील कारवाईचे प्रमाण वाढले होते. याबाबत बँकांनी तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नव्हती. मात्र, आता रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकांबाबत नरमाईची भूमिका घेतली आहे.
बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांना धक्का देऊन हडपसरमधील मगरपट्टा चौकीतून पसार झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. प्रीतम चंदूलाल ओसवाल (वय ३२, रा. ऊरळी देवाची, सासवड रस्ता) असे पसार झालेल्याचे नाव आहे.
म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ५ हजार ८६३ घरांसाठी आज, मंगळवारी जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यानुसार आज दुपारी १२ वाजल्यापासून ऑनलाईन अर्जविक्री- स्वीकृतीस सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया २९ सप्टेंबरपर्यंत सुरु रहाणार आहे तर १८ ऑक्टोबरला सोडत काढली जाणार आहे.
केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर या हंगामात निर्बंध घातले आहेत. या हंगामातील निर्यातीचा कोटा पूर्ण झाल्याने सध्या साखरेची निर्यात बंद आहे. हे साखरेवरील निर्यात निर्बंध रेल्वेसाठी कडू ठरले आहेत. कारण चालू आर्थिक वर्षात मध्ये रेल्वेच्या पुणे विभागाला यामुळे सुमारे २० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
शहर पोलीस दलातील एका महिला पोलीस शिपायाला शीतपेयातून गुंगीचे ओैषध देऊन तिच्यावर पोलीस शिपायाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. महिला पोलीस शिपायाला पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्याकडील दागिने, लॅपटाॅप असा मुद्देमाल चोरल्याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात पहिल्या सहामाहीत पुनर्विक्री वगळून ४५ हजार घरांची विक्री झाली आहे. त्यांची किंमत २८ हजार कोटी रुपये आहे. एकूण व्यवहारात २०१९ च्या तुलनेत ९० टक्के वाढ झाली आहे. देशातील इतर महानगरांच्या तुलनेत पुण्यातील गृहनिर्माण बाजारपेठ ही परवडणारी आणि प्राधान्याने वाढणारी असल्याचे क्रेडाई सीआरईच्या अहवालातून समोर आले आहे.
मराठा आरक्षणासह मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आठ दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाची दखल घेत सरकारने अतरिक्त मुख्य सचिवांच्या समितीने महिन्यात अहवाल देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. अशातच प्रहार संघटनेचे प्रमुख, आमदार बच्चू कडू यांनी सरकारला इशारा आहे.
जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला होता. यावरून सकल मराठा समाजासह विरोधकांनी सरकारला घेरलं होतं. मात्र, सोमवारी ( ४ सप्टेंबर ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जखमींची माफी मागितली आहे. बळाच्या वापरामुळे ज्यांना इजा झाली आहे, जखमी झालेत, त्यांची क्षमा मागतो, असं फडणवीसांनी म्हटलं. यावरून आमदार रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.
सरकार कुणबी प्रमाणपत्र देत असेल, तर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणार का? मराठा आरक्षणाला आरक्षण देत असाल, तर ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवा. टक्का वाढवून देत नसाल, तर आम्ही मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ देणार नाही, अशी भूमिका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घेतली आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.