Maharashtra Political News Today, 17 November 2023 : शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा आज (१७ नोव्हेंबर) ११ वा स्मृतीदिन आहे. या दिनाच्या पूर्वसंध्येला शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे नेते दर्शनासाठी गेले होते. यावेळी दोन्ही शिवसेनेत मोठा राडा झाला. या प्रकरणी दोन्ही गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर हा दुसरा स्मृतीदिन आहे. गेल्यावर्षीचा स्मृतीदिन शांततेत पार पडला होता. परंतु, यंदाच्या स्मृतीदिनाला गालबोट लागल्याने आज दिवसभर यावर प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलीसही आता अॅक्शन मोडवर आले आहेत. तर, दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस आहे. आज ते सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर आणि कराड असा दौरा करणार आहेत. तर, जालन्यात आज ओबीसी समाजाची सभा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण आणि समाजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी वाचा एका क्लिकवर.
Maharashtra Breaking News Updates : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
नागपूर: कुठल्याही प्रकारे आम्ही ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना केला.
यवतमाळ : शेतातील अनधिकृत वीज जोडणी कापण्यासाठी आलेल्या सहायक वीज अभियंत्यास संतापलेल्या शेतकऱ्याने बेदम मारहाण केली. ही घटना राळेगाव तालुक्यातील पिंपरी- सावित्री येथे बुधवारी घडली. या घटनेची चित्रफीत समाज माध्यमावर प्रसारित झाली आहे.
सुमन नगर जंक्शन येथे पूर्व द्रुतगती मार्ग ओलांडताना भरधाव वेगात आलेल्या एका वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.
तरुणाने केलेल्या तक्रारीवरून मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
नागपूर : सात डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी प्रशासनाकडून केली जात आहे. २७ नोव्हेंबरला विधिमंडळ सचिवालायचे कार्यालय उपराजधानीत सुरू होणार आहे.
ताब्यात घेण्याची कारवाई सुरु असतानाच २ ऑक्टोबर रोजी ललित बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा देऊन रुग्णालयातून पसार झाला.
डुकरे भरलेली मोटार, मोबाइल फोन असा नऊ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज घेऊन चोर पसार झाले.
खासगी बसच्या धडकेने एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दुसऱ्या एका अपघातात दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
नागपूर : चिमूर वनपरिक्षेत्रात मंगळवारी झालेल्या दोन वाघाच्या झुंजीत एकाचा मृत्यू तर एक वाघ जखमी झाला. मात्र, या जखमी वाघाने जंगलाचा रस्ता धरल्याने त्याच्या शोधासाठी वनखात्याने तब्बल ६५ वनकर्मचारी आणि १५ ट्रॅप कॅमेरे लावले.
दोन दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांची वाशी येथे जाहीर सभा झाली होती. त्यामुळे वाशी आणि परिसरातील वातावरण आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलेच तापले होते.
जरांगेंना भेटायला शिष्टमंडळ गेलं. त्यांच्यासोबत न्यायमूर्तीही गेले. ते पाचवीही न शिकलेल्यांना सर म्हणत होते - छगन भुजबळ
सामाविष्ट गावातील मिळकतधारकांना सवलतीसाठी ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
बुलढाणा : मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. यामुळे मोताळा तालुक्यात खळबळ उडाली असून सणासुदीला मृताच्या परिवारावर संकट कोसळले आहे. मोताळा तालुक्यातील रिधोरा येथे आज, शुक्रवारी ही दुर्देवी घटना घडली. सुरेश शिवराम कळमकर ( ४०, रा. रिधोरा, ता. मोताळा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणामार्फत (म्हाडा) काढण्यात येणाऱ्या घरांच्या सोडतीत पूर्वीप्रमाणेच प्रतीक्षा यादी जाहीर करण्याचा मुंबई गृहनिर्माण मंडळाचा मानस आहे. मात्र प्रतीक्षा यादीची मुदत वर्षभराची असावी, असा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
२०-५० एकर शेतकरी आज पाच एकरवर आला असेल पण ज्याच्याकडे दोन एकरही नाही तो वीस पिढ्यांतही कुठे असेल याचा विचार तुम्ही करणार नाही. मोठ्या भावाने मोठ्या भावासारखं वागलं पाहिजे. लहान भावाच्या ताटातलं काढायचा प्रयत्न कराल तर तुम्हाला तुमची जागा दिसल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जर ठरवायचं असेल तर आपण सर्व मिळून या देशाच्या पंपर्धानांना विनंती करायला जाऊ आणि सांगू एकदा जातनिहाय जनगणना करून टाका - विजय वडेट्टीवार
पीडित मुलीवर सतत तिचे वडील बलात्कार करत होते. या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी देत होते.
वाड्यांचे कमी असलेले क्षेत्रफळ, भाडेकरूंची संख्या आणि एक मीटरच्या साईड मार्जिनच्या अटीमुळे पुनर्विकासाला खीळ बसली होती.
मुंबई: राज्यातील जिल्हा, ग्रामीण रुग्णालयांमधील डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, तसेच औषधांच्या तुटवड्याबाबत वारंवार तक्रारी करण्यात येत आहेत.
मुंबई : भावी नगरसेवकांच्या अधिकारावर गदा आणून दक्षिण मुंबईमधील मलबार हिल विधानसभा मतदारसंघातील ऑपेरा हाऊस परिसरातील मॅथ्यू मार्गाचे श्रीमद राजचंद्र मार्ग असे नामकरण करण्याचा घाट घालण्यात आला असून त्याला गिरगावकरांकडून विरोध होऊ लागला आहे.
पुणे: दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला कोंढवा पोलिसांनी अटक केली. चोरट्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
यवतमाळ : जिल्ह्यात दिवाळापूर्वी बंद झालेली शेतमालाची खरेदी गुरुवारपासून पुन्हा सुरू झाली. बाजारपेठत पहिल्याच दिवशी कापसाच्या शुभारंभाला सात हजार २०० रुपये क्विंटलचा दर मिळाला, तर सोयाबीनला पाच हजार ३०० रुपये क्विंटलचे दर मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
बुलढाणा : कडाक्याच्या थंडीत ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. याला निमित्त आहे ते ४८ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीचे. जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले.
बुलढाणा : तिघांचे बळी घेणाऱ्या व अपघातानंतर फरार झालेल्या चालकास नांदुरा पोलिसांनी अटक केली. घटनेच्या तिसऱ्या दिवशी त्याला अटक करण्यात आली. संदीप विश्वनाथ पवार (रा. डिग्रस खुर्द, ता. पातुर, जि. अकोला ) असे आरोपी चालकाचे नाव आहे.
नवी मुंबईतील बोनकोडे गावातील मयुरेश नावाच्या इमारतीत घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे तातडीने रातोरात इमारत रिकामी करण्यात आली.
पुणे: शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मेट्रो स्थानकाच्या कामाच्या ठिकाणी तसेच रेडिमिक्स प्लान्टभोवती पत्रे उभारणे आणि हिरवे आच्छादन टाकणे बंधनकारक असतानाही मेट्रो प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
पुणे : महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधील मुद्रांक शुल्क आणि वस्तू आणि सेवा विधेयकाची रक्कम मिळावी, असा प्रस्ताव राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यातून महापालिकेला किमान ५०० कोटींचा निधी मिळण्याची शक्यता आहे.
नाशिक: शहरातील सिडको आणि गोविंदनगर भागात शुक्रवारी दोन बिबट्यांचा संचार आढळून आल्याने स्थानिकांमध्ये भीती पसरली. वन विभागाने तीन तासांच्या प्रयत्नानंतर सिडकोतील रायगड चौकात बिबट्याला जेरबंद केले.
मुंबई: दिवाळीनंतर मुंबईकडे परतीचा प्रवास करणारे आणि छटपूजेनिमित्त मुंबईबाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. संपूर्ण रेल्वे परिसर आणि स्थानके प्रवासी त्यांच्या सामानाने व्यापले आहे. त्यामुळे प्रवाशांना रहदारी करताना अडचणी येऊन, गोंधळ उडत आहे.
Maharashtra Breaking News Updates : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर