Mumbai Maharashtra News Updates, 05 September 2024: लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले असताना चाकरमान्यांची गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे कोकणाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडीची स्थिती पाहायला मिळत आहे. दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील सर्व राजकीय पक्ष उमेदवारांप्रमाणेच मतदारांचीही विविध प्रकारचे कार्यक्रम, भेटीगाठींमधून चाचपणी करताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra News Live Today, 05 September 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीशी संबंधित सर्व महत्त्वाच्या बातम्या

19:36 (IST) 5 Sep 2024
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र अँड संग्राम देसाई यांची बार कौन्सिल अध्यक्षपदी निवड

सावंतवाडी : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोव्याच्या अध्यक्षपदी अँड संग्राम देसाई यांची निवड झाली आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोव्याचे सदस्य होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याला हा मान प्रथमच मिळाला आहे.

बार कौन्सिल वर निवडून गेल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात दोन वेळा ते उपाध्यक्ष व आता अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयातील बार कौन्सिलच्या सभागृहात झालेल्या विशेष कार्यक्रमात ही निवड करण्यात आली. या अध्यक्षपदाच्या माध्यमातून अँड देसाई यांना राज्यभरातील सुमारे अडीच लाख वकिलांचे नेतृत्व करण्याची व त्यांच्या कल्याणासाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. बार कौन्सिलचे विद्यमान अँड. राजेंद्र उमप यांचा कार्यकाल बुधवारी समाप्त झाला. यावेळी झालेल्या सदस्यांच्या बैठकीची ही बिनविरोध निवड करण्यात आली.

19:27 (IST) 5 Sep 2024
आदिवासी विद्यार्थ्यांना आता बोलीभाषेत शिक्षण, चौथीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक भाषांमध्ये रूपांतर

आदिवासी विकास विभागाने पहिली ते चौथीच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक बोलीभाषांमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. टप्याटप्याने ही पुस्तके उपलब्ध होणार असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या बोलीभाषेत शिक्षण मिळणार आहे.

सविस्तर वाचा…

18:50 (IST) 5 Sep 2024
पीएमपीने जाणार असाल तर मार्गातील ‘हे’बदल आधी जाणून घ्या, गणेशोत्सवाच्या काळात पीएमपीच्या संचलनात बदल

पुणे : गणेशोत्सवाच्या काळात शहरातील रस्ते सायंकाळी पाच नंतर वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने पीएमपीच्या ६६ मार्गातही बदल करण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा…

18:25 (IST) 5 Sep 2024
पुणे : विसर्जन मिरवणूक रद्द करून गणशोत्सवात आरोग्य जागर

पुणे : विसर्जन मिरवणूक रद्द करून गुरुवार पेठेतील हिंद युवक मित्र मंडळाने आरोग्य जागर करीत शैक्षणिक आणि वैद्यकीय उपक्रम आयोजित केले आहेत.

सविस्तर वाचा…

17:46 (IST) 5 Sep 2024
खुनाच्या प्रयत्नातील पसार आरोपी दोन तासात जेरबंद

पुणे : पूर्ववैमनस्यावरुन तरुणावर वार करून पळून गेलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने अवघ्या दोन तासांमध्ये वारजे येथे जेरबंद केले.

सविस्तर वाचा…

17:23 (IST) 5 Sep 2024
खुनाची दीड महिन्यांपासून रेकी, वनराज आंदेकर यांच्या हत्येसाठी तीन पिस्तुलांचा वापर

पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यासाठी तब्बल दीड महिन्यापासून रेकी करण्यात येत असल्याची माहिती उघडकीस आली आहे.

सविस्तर वाचा…

16:53 (IST) 5 Sep 2024
Ajit Pawar Social Post: अडचणी अनेक, उपाय एक – अजित पवारांची पोस्ट

अडचणी अनेक, उपाय एक.. तो म्हणजे आमचा महाराष्ट्रवादी व्हॉट्सॲप हेल्पलाइन क्रमांक – ९८६१७१७१७१ तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा आणि चिंतामुक्त व्हा. आम्ही तुमच्या सेवेकरताच बसलो आहोत. आम्हाला विचारून तर पहा. तुमच्या शंकेचं समाधान तत्काळ होणार. खालील लिंकवर क्लिक करा – अजित पवारांची पोस्ट व्हायरल

https://x.com/AjitPawarSpeaks/status/1831640485150007678

16:41 (IST) 5 Sep 2024
गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी दुपारी पावणेदोनपर्यंत मुहूर्त,गणेशोत्सवाच्या आनंदपर्वाचा उद्यापासून श्रीगणेशा

पुणे : वैभवशाली गणेशोत्सवाच्या आनंदपर्वाचा शनिवारपासून (७ सप्टेंबर) श्रीगणेशा होत असून गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४ वाजून ४० मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ५१ मिनिटांपर्यंत मुहूर्त आहे.

सविस्तर वाचा…

16:14 (IST) 5 Sep 2024
‘करिअर अकॅडमी’ने विद्यार्थ्यांना कोट्यवधी रुपयांना गंडविले; विदर्भासह मराठवाड्यातील पालकांना फटका…

बुलढाणा: सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेनेच सैन्यात नोकरीला लावून देण्याचे अमिष दाखवत गोरगरीब विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळत फसवणूक केल्याचा प्रकार मेहकर येथे उघडकीस आला आहे.

वाचा सविस्तर…

16:13 (IST) 5 Sep 2024
“…तरी विरोधक देवेंद्र फडणवीस यांचेच नाव घेतील”, सुधीर मुनगंटीवार यांची टीका

नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, ते अन्य कुठल्याही नेत्यांचे नाव घेणार नाही तर देवेंद्र फडणवीस यांचेच नाव घेतील. मी मंत्री होतो म्हणून आमच्यावर कुठली केस करू नये, असे त्यांना वाटत असेल तर ते चूक आहे. त्यांनी चुक केली असेल तर गुन्हा दाखल होईलच. मात्र राज्यात कुठलीही घटना घडली की विरोधी पक्षाकडून देवेंद्र फडणवीस यांचेच जबाबदार म्हणून नाव घेतले जाते.

वाचा सविस्तर…

15:53 (IST) 5 Sep 2024
मुंबई : बहुमजली इमारतीच्या छताचा भास कोसळून तिघे ठार, तर तिघे जखमी

मुंबई : मालाड येथील हाजी बापू मार्गावरील गोविंद नगर येथील बांधकाम सुरू असलेल्या नवजीवन या इमारतीच्या २० व्या मजल्याच्या छताचा काही भाग गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास अचानक कोसळला. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत.

वाचा सविस्तर…

15:53 (IST) 5 Sep 2024
मेट्रो ३ प्रकल्पात स्थानकांच्या बांधकामासाठी झाडे तोडल्याचे प्रकरण, ३०९३ झाडांपैकी केवळ ७२४ झाडांचेच पुनर्रोपण

मुंबई : कुलाबा ते सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पाच्या स्थानकांच्या बांधकामासाठी तोडलेल्या झाडांचे आच्छादन पुनर्संचयित करण्याचे वारंवार आदेश देऊनही मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसीएल) २८ पैकी १८ स्थानक परिसरात आतापर्यंत ३०९३ झाडांपैकी केवळ ७२४ झाडांचेच पुनर्रोपण केल्याबाबत उच्च न्यायालयाच्या विशेष समितीने बुधवारी नाराजी व्यक्त केली.

वाचा सविस्तर…

15:52 (IST) 5 Sep 2024
म्हाडा मुंबई मंडळाच्या २०३० घरांसाठी सोडत, लवकरच सोडतीच्या तारखेची घोषणा

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या सोडतीसाठी १३ सप्टेंबरला सोडत काढली जाणार होती. मात्र काही कारणाने अर्जविक्री-स्वीकृतीसह सोडतपूर्व प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याने सोडत लांबणीवर पडली आहे. त्यामुळे आता नक्की सोडत केव्हा जाहीर होणार याकडे अर्जदारांचे, इच्छुकांचे लक्ष लागले आहे. त्यानुसार मुंबई मंडळाकडून सोडतीची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

वाचा सविस्तर…

15:44 (IST) 5 Sep 2024
CM Eknath Shinde Speech: एकनाथ शिंदेंची दीपक केसरकरांना कोपरखळी!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शिक्षक दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी शिक्षकांसमोर केलेल्या भाषणात त्यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना मिश्किल शब्दांत कोपरखळी मारताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. “तुम्हीही नेहमीच सहकार्याची भूमिका घेत असतात. तुमचे मंत्रीही चांगले आहेत. ते हळूहळी पिकअप घेतात आणि मग टॉप गिअर टाकतात. तसे ते गुवाहाटीमध्ये हळूहळू पिकअप घेत होते. ते सगळ्या गोष्टी विचारपूर्वक करतात”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

15:32 (IST) 5 Sep 2024
आधी मोटारसायकलींची चोरी, नंतर दोघांंमध्ये वाटणी चोरांचा अनोखा समन्वय

धुळे – चोरी करणारे दोघेच. परंतु, त्यांचा आपसातील समन्वय मजबूत. त्यामुळेच ही जोडी धुळे जिल्ह्यात सहजपणे मोटारसायकलींची चोरी करत असे.

सविस्तर वाचा…

15:06 (IST) 5 Sep 2024
बिबवेवाडीतून तीन शाळकरी मुली बेपत्ता; पोलिसांच्या तत्परतेमुळे शोध मुली कल्याणमध्ये सुखरुप सापडल्या

पुणे : बिबवेवाडी भागातून बेपत्ता झालेल्या तीन शाळकरी मुलींचा शाेध पोलिसांच्या तत्परतेमुळे लागला. मुली बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला.

सविस्तर वाचा…

14:56 (IST) 5 Sep 2024
राज्यातील ‘या’ प्रसिद्ध धरणाचे नाव बदलले, आता ‘आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय’ म्हणून ओळखले जाणार

नगर जिल्ह्याच्या उत्तर भागाची भाग्यरेखा असणारे आणि अभिजात निसर्ग सौन्दर्याचे कोंदण लाभलेले अकोले तालुक्यातील धरण आता ‘आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय’ म्हणून ओळखले जाणार आहे.

वाचा सविस्तर…

14:29 (IST) 5 Sep 2024
पंकजा मुंडेंच्या बैठकीला माजी आमदार बापू पठारे यांच्यासह सहा नगरसेवकांची दांडी; चर्चेला उधाण

पुणे : आगामी विधानसभेच्या निवडणुका राज्यात सत्ताधारी असलेल्या एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी महायुतीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा…

14:21 (IST) 5 Sep 2024
सिद्धाराम म्हेत्रे यांच्या कारखान्याच्या थकबाकीच्या निषेधार्थ आंदोलन

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मातोश्री साखर कारखान्याकडून ऊस उत्पादकांना देय असलेल्या रकमा अदा न झाल्याने या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सोलापुरात थेट काँग्रेस भवनासमोर आमरण उपोषण सुरू केले. हे सर्व आंदोलक मराठवाड्यातील उमरगा भागातील आहेत. दुसऱ्या दिवशीही या आंदोलनावर कोणताही तोडगा निघाला नव्हता.

अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे म्हेत्रे यांचा मातोश्री साखर कारखाना कार्यरत आहे. मागील वर्षीच्या गळीत हंगामात धाराशिव जिल्ह्यातील उमरगा व अन्य भागातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या साखर कारखान्यासाठी पाठविलेल्या उसाची थकीत देयके प्रलंबित आहेत. या प्रश्नावर यापूर्वी शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते.

14:09 (IST) 5 Sep 2024
कशेडी बोगद्यात कंटेनरने अचानक ब्रेक मारल्यामुळे दोन एसटी बसला अपघात ; प्रवाशी सुदैवाने बचावले

खेड : मुंबई येथून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या दोन एसटी बस कंटेनरवर धडकल्या. या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही.

वाचा सविस्तर…

13:54 (IST) 5 Sep 2024
घराचा भाग कोसळून लहान मुलीचा मृत्यू

मुंबई: चेंबूरच्या पीएल लोखंडे मार्ग परिसरात बुधवारी सायंकाळी एका घराच्या पोटमाळ्याचा काही भाग अचानक कोसळला. यामध्ये एका दीडवर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून एक महिला जखमी झाली आहे. ही घटना चेंबूर लोखंडे मार्गावरील एकता मित्रमंडळ परिसरात बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. येथील कविता साळवे यांच्या घराच्या पोटमाळ्याचा काही भाग अचानक कोसळला. घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ साळवे यांच्या घराकडे धाव घेत कविता साळवे (३५) आणि त्यांची मुलगी खुशी साळवे (दीड वर्ष) यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच खुशीचा मृत्यू झाला.

13:52 (IST) 5 Sep 2024
महावितरणचे वीज ग्राहक वाढले, दोन वर्षात ७४ हजार नवीन वीज जोडण्या

वसई : वसई विरार शहरातील वाढत्या नागरीकरणामुळे विजेची मागणी वाढत आहे. याशिवाय सातत्याने महावितरण वीज चोरट्यांवर होणारी कारवाई यामुळे नवीन वीज जोडण्या घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. मागील दोन वर्षात ७४ हजार २७४ इतक्या नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

वाचा सविस्तर…

13:50 (IST) 5 Sep 2024
गणेशोत्सवात ‘पीओपी’ मूर्ती नकोच, थेट उत्पादकांवर कारवाई…

नागपूर : पर्यावरणासाठी हानिकारक असणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) आणि तत्सम वस्तूंपासून देवी-देवतांच्या मूर्तीवर बंदी आणण्याचा न्यायालयाचा मानस आहे. यासाठी मागील सुनावणीत महापालिकेला सार्वजनिक मंडळांना परवानगी देताना पीओपीबाबत स्पष्ट अट ठेवण्याचे आदेश दिले होते, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट केले.

वाचा सविस्तर…

13:50 (IST) 5 Sep 2024
‘ईदच्या मिरवणुकीत डीजे, लेझर दिव्यांच्या वापरावर बंदी आणा’

मुंबई : पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन म्हणून साजरा केल्या जाणाऱ्या ‘ईद मिलाद उन-नबी’निमित्त राज्यात अनेक ठिकाणी मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर डीजे आणि प्रखर दिव्यांचा (लेझर बीम) वापर करण्यात येत असून त्यावर बंदी घालण्याची मागणी पुण्यातील काही ज्येष्ठ मुस्लिम बांधवांनी उच्च न्यायालयात केली आहे.

वाचा सविस्तर…

13:42 (IST) 5 Sep 2024
नाशिक: पंचवटी, राज्यराणी एक्स्प्रेसला विलंब, रेल्वेला नोटीस

नाशिक – पंचवटी आणि राज्यराणी एक्स्प्रेस काही महिन्यांपासून दररोज अर्धा ते पाऊण तास विलंबाने धावत असल्याच्या पार्श्वभूमीवर, मासिक पासधारक व प्रवासी वेल्फेअर असोसिएशनने मध्य रेल्वेला कायदेशीर नोटीस बजावली आहे.

सविस्तर वाचा…

13:41 (IST) 5 Sep 2024
वसई विरारमध्ये तब्बल २१ हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित, ८६ कोटी रुपये थकवल्याने महावितरणची कारवाई

वसई विरारमधील २१ हजार वीज ग्राहकांनी महावितरणचे वीज देयक न भरल्याने महावितरणने त्यांच्या वीज जोडण्या खंडित केल्या आहेत.

वाचा सविस्तर…

13:37 (IST) 5 Sep 2024
कोंडीच्या चक्रव्यूहात घोडबंदरकर, सलग दुसऱ्या दिवशी वाहतुक कोंडी, वाहन चालकांकडून संताप व्यक्त, महिला प्रवासी रडकुंडीला

ठाणे : सलग दुसऱ्या दिवशी या मार्गावर वाहतुक कोंडी झाली. मेट्रो मार्गिकेच्या तुळई उभारण्याच्या काम सकाळी उशीरापर्यंत सुरू राहिल्याने ही वाहतुक कोंडी झाली. कोंडीमुळे अनेक विद्यार्थी सकाळच्या सत्रात वेळेत शाळेमध्ये पोहचू शकले नाही. रोंजदारीवर असलेल्या नोकरदारांना वेळेत कामाच्या ठिकाणी जाता आले नाही.

वाचा सविस्तर…

12:37 (IST) 5 Sep 2024
मुंबई : आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू

मुंबई : एमबीबीएस आणि बीडीएस या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी जाहीर झाली. त्यानंतर आता सीईटी कक्षाने आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आले. त्यानुसार ९ सप्टेंबरपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

वाचा सविस्तर…

11:59 (IST) 5 Sep 2024
मुंबईहून ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये,९६ विशेष गाड्या

नागपूर : रेल्वेने दिवाळी आणि छट पूजेसाठी आपल्या मूळ शहरात, गावाकडे जाणाऱ्यांसाठी ९६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा…

11:56 (IST) 5 Sep 2024
बदलापूरनंतर बल्लारपूर, बलात्काराच्या दोन घटनांनी शहर हादरले

चंद्रपूर: जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात दोन बलात्काराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले. बदलापूरची घटना ताजी असतांना बल्लारपूरात एका अल्पवयीन मुलीवर व एका मंतिमंद मुलींवर बलात्कार केल्याची घटना मंगळवार २ सप्टेंबरला उघडकीस आली आहे. दरम्यान अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्कारामुळे बदनामीच्या भीतीने पिडीत मुलीने घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

वाचा सविस्तर…

पुणे पोलिसांकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे.<br />फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम

Maharashtra News Live Today, 05 September 2024: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या