Mumbai Maharashtra News Updates, 05 September 2024: लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले असताना चाकरमान्यांची गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे कोकणाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडीची स्थिती पाहायला मिळत आहे. दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील सर्व राजकीय पक्ष उमेदवारांप्रमाणेच मतदारांचीही विविध प्रकारचे कार्यक्रम, भेटीगाठींमधून चाचपणी करताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Live Updates

Maharashtra News Live Today, 05 September 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीशी संबंधित सर्व महत्त्वाच्या बातम्या

11:55 (IST) 5 Sep 2024
Video : चंद्रपूर शहरात बिबट्याचा धुमाकूळ

चंद्रपूर : शहरातील बिंनबा गेट परिसरातील एका मोकळ्या जागी वाढलेल्या झुडपात बिबट्या आल्याने खळबळ उडाली आहे. बिबट्याला बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. दरम्यान बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभाग, पोलिस विभाग तथा इको प्रो या वन्य जीव संघटनेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

वाचा सविस्तर…

11:55 (IST) 5 Sep 2024
सायबर भामट्यांनी केले ‘डिजिटल अरेस्ट’, वसईतील आयटी तज्ञाला दीड कोटींचा गंडा

वसई : आयबी अधिकारी असल्याचे भासवून वसईतील एका आयटी तज्ञाला सायबर भामट्यानी ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती घालून तब्बल १ कोटी ४१ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर…

11:25 (IST) 5 Sep 2024
ठाण्यात १५८ गणेशोत्सव मंडळे मंडप परवानगीच्या प्रतिक्षेत,३०७ पैकी १४९ गणेशोत्सव मंडपांना परवानगी

ठाणे : अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपलेला असतानाच, गणेशोत्सवाच्या मंडपासाठी अर्ज करणाऱ्या ३०७ मंडळांपैकी १४९ मंडळांना पालिका प्रशासनाने परवानगी देऊ केली आहे.

सविस्तर वाचा…

11:23 (IST) 5 Sep 2024
गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाच घेणाऱ्या, सहायक फाैजदारासह दोघांना पकडले‘एसीबी’ची वडगाव मावळ पोलीस ठाण्यात कारवाई

पुणे : दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी एकाकडून ३५ हजारांची लाच घेणाऱ्या वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील सहायक फौजदारासह पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले.

सविस्तर वाचा…

11:22 (IST) 5 Sep 2024
मुंबईत पावसाला पुन्हा सुरुवात

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबई शहर व उपनगरांत काल रात्रीपासून पुन्हा हजेरी लावली.

सविस्तर वाचा…

11:13 (IST) 5 Sep 2024
Amol Mitkari News: अमोल मिटकरींनी शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

“चुन चुन के मारेंगे” म्हणणाऱ्याने हा व्हिडिओ नीट बघावा. दरवर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीला गुरुकुंज मोझरी (अमरावती) येथे भगवी टोपी घालुन उभ्या असणाऱ्या लाखो लोकांमध्ये आजही अजान होते.खऱ्या संतांची हिच शिकवण आहे.जरा यावर्षी येऊन बघ.मानवधर्म काय असतो तो इथे दिसेल – अमोल मिटकरी</p>

https://x.com/amolmitkari22/status/1831506805819895827

10:25 (IST) 5 Sep 2024
Traffic Jam on Mumbai Goa Highway: वाहतूक कोंडीत अडकलात तर पर्यायी मार्ग कोणते?

मुंबईतून तळ कोकणात जाण्यासाठी पर्यायी मार्ग

1 मुंबई गोवा महामार्ग (मुंबई- नवीमुंबई-पनवेल-महाड)

2 मुंबई- वाशी- पामबीच- उरणफाटा- खारपाडा- वडखळ-महाड

3 मुंबई पुणे दृतगती मार्ग(मुंबई- खालापूर- पेण- महाड)

4 मुंबई पुणे दृतगती मार्ग( मुंबई-खालापूर- पाली- वाकण- माणगाव- महाड)

5 मुंबई पुणे दृतगती मार्ग (सातारा- उंब्रज- पाटण- चिपळूण)

6 मुंबई पुणे दृतगती मार्ग( सातारा- कराड- कोल्हापूर- राधानगरी मार्गे कणकवली)

7 मुंबई पुणे दृतगती मार्ग (सातारा- कराड- कोल्हापूर- आंबोली मार्गे सावंतवाडी)

८ मुबईतून अटल सेतू मार्गे पळस्पे येथून मुंबई गोवा महामार्ग

10:19 (IST) 5 Sep 2024
Maharashtra Assembly Election 2024: श्रीकांत शिंदेंकडून युतीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा? खानापूरबाबत जाहीर कार्यक्रमात म्हणाले…

श्रीकांत शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीही अधिकृत जागावाटप जाहीर होण्याआधी नाशिकमधील उमेदवारी जाहीर केली होती. आताही जागावाटप जाहीर होण्याआधीच श्रीकांत शिंदेंनी आटपाडीत केलेलं विधान चर्चेत आलं आहे.

वाचा सविस्तर

09:39 (IST) 5 Sep 2024
सोलापूर : व्यसनमुक्तीच्या नावाखाली छळ झाल्याने रुग्णाचा मृत्यू

सोलापूर : रुग्णांवर उपचार करतानाचा हलगर्जीपणाच्या दोन घटना उघड झाल्या असून यामध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील एका घटनेत व्यसनमुक्तीचा उपचार करताना रुग्णाचे दोन्ही हात-पाय पलंगाला अनेक तास बांधून नंतर त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि औषधोपचारासह जेवण-पाणी न देण्याचा क्रूर प्रकारही समोर आला. या दोन्ही घटनांबाबत संबंधित डॉक्टरांविरुद्ध तक्रारी दाखल झाल्या आहेत.

वाचा सविस्तर…

09:39 (IST) 5 Sep 2024
Rahul Gandhi, Mallikarjun Kharge in Maharashtra: राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गेंचा महाराष्ट्र दौरा

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा आज महाराष्ट्र दौरा आहे. पतंगराव कदम यांच्या सांगलीतील पुतळ्याचंं अनावरण यावेळी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांशी चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

09:39 (IST) 5 Sep 2024
शिक्षक दिन विशेष : विद्यार्थीच झाले विद्यार्थ्यांचे शिक्षक… कुठे आहे ही अनोखी शाळा?

पुणे : शाळा असे म्हटल्यावर विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक असे चित्र डोळ्यांसमोर येते. मात्र, सातारा जिल्ह्यातील विजयनगर (पर्यंती) जिल्हा परिषद शाळेत असे चित्र दिसत नाही. कारण या शाळेत विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना शिकवण्याची अभिनव पद्धत वापरली जात असून, त्या माध्यमातून स्वअध्ययनाला चालना मिळत असल्याचे निरीक्षण शिक्षकांकडून नोंदवण्यात आले आहे.

वाचा सविस्तर…

09:38 (IST) 5 Sep 2024
मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, कोकणात जाणारे गणेश भक्त लोणेरे जवळ अडकले

अलिबाग : कोकणात जाणाऱ्या वाहनांमध्ये वाढ झाल्यामुळे मुंबई<a href=”https://www.loksatta.com/about/goa/”&gt; गोवा महामार्गावर वहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे लोणारे परिसरात सहा ते सात किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

वाचा सविस्तर…

09:30 (IST) 5 Sep 2024
Traffic Jam on Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा..

गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रशासनाने मोठी तयारी केली होती. 600 हून अधिक पोलीस आणि गृहरक्षक दलाचे जवान महामार्गावर ठिकठिकाणी तैनात करण्यात आले होते. मात्र तरीही लोणारे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली. मोटर सायकल पेट्रोलिंगचे केले होते. माणगाव आणि इंदापूर येथे एसटीच्या बसेस मुळे दरवर्षी होणारी कोंडी लक्षात घेऊन येथील बस स्थानक तात्पुरते स्वरूपात शहरा बाहेर हलवण्यात आली होती. वाहतूक कोंडी वर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे तैनात ठेवण्यात आले होते. मात्र तरीही लोणारे परिसरात वाहतूक कोंडी झाल्याचा पाहायला मिळत आहे.

मुंबईतुन तळ कोकणात जाण्यासाठी पर्यायी मार्ग

3 मुंबई पुणे दृतगती मार्ग(मुंबई- खालापुर- पेण- महाड)

4 मुंबई पुणे दृतगती मार्ग( मुंबई-खालापुर- पाली- वाकण- माणगाव- महाड)

5 मुंबई पुणे दृतगती मार्ग (सातारा- उंब्रज- पाटण- चिपळुण)

6 मुंबई पुणे दृतगती मार्ग( सातारा- कराड- कोल्हापुर- राधानगरी मार्गे कणकवली)

7 मुंबई पुणे दृतगती मार्ग (सातारा- कराड- कोल्हापुर- आंबोली मार्गे सावंतवाडी)

09:29 (IST) 5 Sep 2024

कोकणात जाणाऱ्या वाहनांमध्ये वाढ झाल्यामुळे मुंबई<a href=”https://www.loksatta.com/about/goa/”&gt; गोवा महामार्गावर वहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे लोणारे परिसरात सहा ते सात किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

वाचा सविस्तर

पुणे पोलिसांकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे.<br />फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम

Maharashtra News Live Today, 05 September 2024: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या