Maharashtra Latest News Updates, 10 February 2023 : राज्यात आधी विधान परिषद निवडणूक आणि आता कसबा-पिंपरी चिंडवड पोटनिवडणुकीने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानेच ताकद लावण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वीच मुंबई मेट्रो आणि इतर विकास कामांचं उद्घाटन करण्यासाठी येऊन गेलेले असताना आता पुन्हा एकदा मुंबईत येत आहेत. त्यामुळे भाजपाकडून होणारी मोर्चेबांधणीही दिसत आहे. यावर महाविकासआघाडीकडून सडकून टीकाही होतेय. एकूणच राज्यातील राजकारणाचा पारा चढताना दिसत आहे. राज्यातील अशाच सर्व घडामोडींच्या या लाईव्ह अपडेट्स…
Maharashtra Breaking News Updates : राजकारणासह महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीच्या अपडेट्स एका क्लिकवर…
देशाची सत्ता, सेना, पोलीस दल हे पाठिशी असल्याने कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडाल तर त्यांच्याशी संघर्ष करायला तयार असल्याचे सांगणारे लढवय्ये देशाला नको आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. कष्टकऱ्यांच्या हिताची जपणूक करणारे, त्यांच्यासाठी संघर्ष करणाऱ्यांची देशाला गरज असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १८ आणि १९ फेब्रुवारी असे दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांचा अद्याप अधिकृत दौरा प्राप्त झाला नाही. प्राथमिक माहितीनुसार अमित शहा यांचा १८ तारखेला नागपूरमध्ये कार्यक्रम असून १९ तारखेला कोल्हापूर येथे जाणार आहेत.
विद्यमान वीज देयक भरून सामान्यांचे आर्थिक गणीत बिघडले असतांनाच महावितरणने राज्य वीज नियामक आयोगाकडे आणखी वाढीव वीज दरवाढीची याचिका दाखल केली आहे. या दरवाढीने चिंता वाढली असतांनाच ‘गो ग्रीन’च्या माध्यमातून छापील वीज देयकाऐवजी ई- मेल व भ्रमनध्वनीवर एसएमएसचा पर्याय स्विकारून ग्राहक वर्षाला १२० रुपयांची बचत करू शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बोहरा समाजाच्या अलजेमा-तूस-सैफी संकुलाचं उद्घाटन , मोदींकडून संकुलाची पाहणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी मरोळमध्ये दाखल, बोहरा मुस्लीम समुदायाचं अलजेमा-तूस-सैफी या संकुलाचं उद्घाटन करणार, मद्रास बँडकडून मोदींचं स्वागत
राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख तब्बल २१ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर शनिवारी त्यांच्या नागपूर येथील स्वगृही परत येणार असून त्यानिमित्ताने त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते आणि कुटुंबीयांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
२०१४ च्या आधी काय परिस्थिती होती तुम्ही पाहा. जे लोक २ लाखापेक्षा जास्त कमावत होते त्यांनाही कर भरावा लागत होता. भाजपा सरकारने आधी ५ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं. आता या अर्थसंकल्पात ७ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं. आज मध्यमवर्गीयांच्या ज्या उत्पन्नावर शून्य कर आहे, त्यावर युपीए सरकार २० टक्के कर आकारत होतं – नरेंद्र मोदी
अर्थसंकल्पात मध्यवर्गीयांना मजबूत करण्यात आलं आहे. याबाबत मला मुंबईच्या लोकांना विशेष माहिती द्यायची आहे. पगारी लोकं असो की व्यापारी, दोघांनाही या अर्थसंकल्पाने खूश केलं आहे – नरेंद्र मोदी
आज देश में आधुनिक ट्रेनें चलाई जा रही हैं, मेट्रो का विस्तार हो रहा है, नए-नए एयरपोर्ट्स और पोर्ट्स बनाए जा रहे हैं।
— BJP (@BJP4India) February 10, 2023
भारत के इतिहास में पहली बार 10 लाख करोड़ रुपये भारत में इंफ्रास्ट्रक्चर के विकास के लिए रखे गए हैं।
– पीएम @narendramodi #MahaWithModi pic.twitter.com/e70MSuMJhj
आज देशात आधुनिक रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. मेट्रोचा विस्तार होत आहे. नवे विमानतळ आणि बंदरं तयार केली जात आहेत. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा १० लाख कोटी रुपये भारतातील पायाभूत सुविधांच्या (इंफ्रास्ट्रक्चर) विकासासाठी देण्यात आले आहेत – नरेंद्र मोदी
वंदे भारत ट्रेन आज के आधुनिक होते भारत की बहुत ही शानदार तस्वीर है।
— BJP (@BJP4India) February 10, 2023
यह भारत की स्पीड और स्केल दोनों का प्रतिबिंब है।
अभी तक 10 ऐसी ट्रेनें शुरू हो चुकी हैं और 17 राज्यों के 108 जिले वंदे भारत एक्सप्रेस से कनेक्ट हो चुके हैं।
– पीएम @narendramodi#MahaWithModi pic.twitter.com/uaKHIJkCOt
वंदे भारत ट्रेन आजच्या आधुनिक भारताचं खूपच अभिमानास्पद चित्र आहे. ही ट्रेन भारताचा वेग आणि 'स्केल' अशा दोन्ही गोष्टींचं प्रतिक आहे. आतापर्यंत अशा १० रेल्वे देशभरात सुरू झाल्या आहेत. एकूण १७ राज्यातील १०८ जिल्हे वंदे भारत एक्स्प्रेसने जोडले गेले आहेत – नरेंद्र मोदी
आज का दिन भारतीय रेल और विशेष रूप से मुंबई और महाराष्ट्र की कनेक्टिविटी के लिए बहुत बड़ा है।
— BJP (@BJP4India) February 10, 2023
आज एक साथ 2 वंदे भारत ट्रेनें शुरू हुई हैं।
इससे सभी को सुविधा मिलेगी और यह महाराष्ट्र में पर्यटन और तीर्थ यात्रा को बहुत अधिक बढ़ावा देने वाली है।
– पीएम @narendramodi #MahaWithModi pic.twitter.com/0e5BwkDCvF
रेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. देशाला आज नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन समर्पित करताना मला अत्यंत आनंद होत आहे – नरेंद्र मोदी (मराठीत भाषणाला सुरुवात)
एकनाथ शिंदे म्हणाले, “रेल्वे विभागाकडे दुर्लक्ष झालं होतं. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागील ८-९ वर्षांच्या कार्यकाळात यात बदल झाला. गरिबातील गरिब लोक रेल्वेचा वापर करतात. अर्थसंकल्पात रेल्वेसाठी मोठी तरदूत करण्यात आली.”
Mumbai | Prime Minister Narendra Modi flags-off Mumbai-Solapur Vande Bharat Express.
— ANI (@ANI) February 10, 2023
Railway Minister Ashwini Vaishnaw, CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis present at the occasion. pic.twitter.com/jaoypVB4bz
पंतप्रधान मोदींकडून वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा, मुंबईहून शिर्डी सोलापूरचा प्रवास करता येणार, वंदे भारत ट्रेन साडे सहा तासात सोलापूरला पोचणार अशी रेल्वे विभागाची माहिती
A few people say what did Maharashtra get in the budget. But they didn't read. As Railway Minister and Deputy CM said, Maharashtra had never received Rs 13,500 cr for the railway. For the first time this amount has been allocated for railway in state: Maharashtra CM Eknath Shinde pic.twitter.com/TfeWHNCIGF

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यात सत्तेत असलेल्या बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये प्रवेश करण्याची मालिका सुरु झाली असून शुक्रवारी मनसेचे ठाण्यातील माजी विभाग अध्यक्ष महेश कदम आणि भीम आर्मीचे ठाणे जिल्हाप्रमुख नितीन मधुकर वाघमारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. सविस्तर वाचा…
पुण्यातील सारसबागेजवळील कॅनॉलमध्ये जन्मदात्यानेच १३ वर्षीय मुलींला ढकलून देऊन मारल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. संदीप विष्णु शिंदे (वय ४० रा.दत्तवाडी) आरोपी वडिलांचे नाव आहे. या घटनेनंतर आरोपी वडिलांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
राहुल कलाटे म्हणाले, “मला उद्धव ठाकरेंसह अनेकांचे फोन आले, पण मी चिंचवड पोटनिवडणुकीतून माघार घेणार नाही, कारण या जनतेने राहुल कोणत्याही परिस्थितीत तू निवडणुकीत उभं राहा असं सांगितलं आहे.”
कल्याण- मुंबई ते शिर्डी (साईनगर) रेल्वे मार्गावरील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आसनगाव, कसारा रेल्वे स्थानकांमध्ये वंदे भारत एक्सप्रेसला थांबा देण्यात यावा, अशी जोरदार मागणी या भागातील प्रवाशांकडून रेल्वे अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. शहापूर, कसारा परिसरातील नागरिकांची मागणी विचारात घेऊन ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचे शहापूर उपतालुका प्रमुख भरत उबाळे यांनी रेल्वे प्रशासनाकडे वंदे भारत एक्सप्रेसला आसनगाव, कसारा रेल्वे स्थानकात थांबा देण्याची मागणी केली आहे. सविस्तर वाचा…
ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावरील कचोरे गावातील गावदेवी मंदिरात जाऊन चोरट्याने बुधवारी दुपारी मंदिरातील पितळी वस्तू चोरुन नेल्या आहेत. ग्रामस्थांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यावर टिळकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे. दुपारच्या वेळेत मंदिरात चोरी झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. सविस्तर वाचा…
कसबा विधानसभा पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने घेतला आहे. या निर्णयानुसार आपचे उमेदवार किरण कद्रे यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेतला. दरम्यान, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत ‘आप’च्या उमेदवाराचा अर्ज छाननी प्रक्रियेत अवैध ठरला होता. सविस्तर वाचा…
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रचार करताना भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार हेमंत रासने यांनी शाळेत प्रचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यावरून विरोधकांनी भाजपला कोंडीत पकडण्यास सुरूवात केल्यानंतर भाजपकडूनही महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा शाळा परिसरातील प्रचाराची चल चित्रफीत प्रसारित आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, स्वागतासाठी राज्यपाल कोश्यारी हजर, २२ दिवसात मोदी दुसऱ्यांदा मुंबईत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही हजर
केवळ मुंबईकरच नव्हे तर आसपासच्या उपनगरवासियांचे आकर्षण बनलेल्या काळा घोडा महोत्सवातील टाकाऊ वस्तूंपासून साकारलेली ‘द रायझिंग ऑफ फिनिक्स’ कलाकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
शरीरावर राखाडी तपकिरी गडद ठिपणे असलेला आणि पाठीवर पटकोनी खुणा असलेल्या दुर्मिळ तपकिरी रंगाचा हरणटोळ बदलापुरात आढळला आहे. सर्पमित्रांच्या सहाय्याने वन विभागाने या सापाची निसर्गमुक्तता केली.
भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळा प्रकरणी एकनाथ खसडेंना मोठा दिलासा, पुरवणी आरोपपत्र दाखल न करण्याचे उच्च न्यायालयाचे ईडीला आदेश, २० मार्चपर्यंत कोणतीही कारवाई होणार नाही, या प्रकरणात खडसेंसह पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावयावर गुन्हा दाखल आहे
डोंबिवली येथील मानपाडा पोलीस ठाण्यातर्फे रविवारी एमआयडीसीतील जीएनपी गॅलरी ते आर. आर. रुग्णालय रस्त्यावर हॅप्पी स्ट्रीटचे आयोजि करण्यात आले आहे. आठवड्यातून एक दिवस नोकरी, व्यवसायात व्यक्त असलेल्या रहिवाशांना रस्त्यावर आनंदी दिवस साजरा करता यावा.
नाना पटोले म्हणाले, “माझी एच. के. पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. १५ फेब्रुवारीला कार्यकारणीची बैठक आहे. त्यानुसार मी माझा पुण्याचा दौरा तयार केला आहे. तो प्रचाराचा कार्यक्रम आहे. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की, त्या बैठकीला आमचे सर्व कार्याध्यक्ष राहतील.”
ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्यासह चार माजी नगरसेवक तसेच दिवंगत ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्या पत्नी सुलेखा चव्हाण यांचा बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश अखेर निश्चित झाला आहे.
वेगवेगळ्या भागातून लोकांचे मला फोन येत आहेत. ते म्हणत आहेत की, राहुल तू कुठल्याही परिस्थितीत लढ, आम्ही तुझ्याबरोबर आहोत. त्यामुळे ही लोकभावना रोखण्याचं काम मी करणार नाही. कारण या लोकांनी वेळोवेळी माझ्यावर खूप प्रेम केलं आहे. २०१४, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या लोकांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. त्यांना अपेक्षित काम मी मागील चार ते पाच वर्षात केलं आहे. त्यामुळे ही जनभावना मी दुखावणार नाही – राहुल कलाटे (टीव्ही ९ मराठीशी बोलताना)
अपेक्षेपेक्षा अधिक खर्च झालेल्या गृहप्रकल्पांची तपासणी करण्यास महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाकडून (महारेरा) सुरुवात करण्यात झाली आहे. पहिल्या टप्प्यात १२ प्रकल्पांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
सविस्तर वाचा