Maharashtra Latest News Updates, 27 January 2023 : शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्याची घोषणा २३ जानेवारी रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. यावरून महाविकास आघाडीमध्ये धुसपूस असल्याची चर्चा रंगू लागली होती. अशातच शरद पवार हे आजही भाजपाबरोबर असल्याचं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं. दरम्यान, यावरून पुन्हा एकदा राजकारण तापू लागलं आहे. नाना पटोले यांनी वंचित आघाडी ही महाविकास आघाडीचा भाग नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर अशा प्रकारची विधानं कोणीही करु नये. देशात भाजपाविरोधी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न होतोय, त्याचे स्तंभ शरद पवार आहेत, असं संजय राऊत म्हणाले. आजही दिवसभर हा मुद्दा चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दरम्यान, आज पंतप्रधान मोदी हे देशभरातील विद्यार्थ्यांबरोबर ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम करणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी विद्यार्थांना काय संदेश देतात, याकडेही लक्ष असणार आहे.
Marathi News Updates : प्रकाश आंबेडकरांच्या शरद पवारांवरील विधानावरून राजकारण तापल!
काश आंबेडकरांच्या विधानावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझा सल्ला मानावा असे मी म्हणालोच नाही. त्यांनी महाविकास आघाडीला तडा जाईल अशी विधाने करू नये, असे माझे म्हणणे आहे; असे राऊत म्हणाले. ते मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. वाचा सविस्तर
एकीकडे सर्व पक्ष निवडणुकीची तयारी करत असताना दुसरीकडे ‘इंडिया टुडे’ने ‘सी-वोटर’बरोबर ‘मूड ऑफ द नेशन’ सर्व्हे केला असून या सर्व्हेमध्ये सध्या लोकसभेची निवडणू झाली तर भाजपाच्या जागा कमी होतील ,असे या सर्व्हेमध्ये सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. यावरच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ४ ते ६ जागा जागा राखता आल्या तरी पुरेसे आहे, असे शिंदे म्हणाले आहेत. वाचा सविस्तर
खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची ‘भारत दोडो यात्रा’ सध्या अंतिम टप्प्यात आहे. येत्या ३० जानेवारी रोजी राहुल गांधी काश्मीरमध्ये तिरंगा फडकवणार असून त्यानंतर या यात्रेची सांगता होणार आहे. दरम्यान, या राहुल गांधी यांच्या सुरक्षेत पुन्हा एकदा त्रुटी असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. विशेष म्हणजे यावेळी सुरक्षेच्या कारणामुळे काँग्रेसने आपली यात्रा सध्या स्थगित केली आहे. याआधीही राहुल गांधी यांच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचा आरोप राहुल काँग्रेसने केला आहे. वाचा सविस्तर
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जयंतीच्या निमित्ताने ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी समाजमाध्यमावर एक चित्रफित प्रसारित केली आहे. या चित्रफितीत त्यांनी शिंदे गटावर थेट निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे खासदार राजन विचारे हेदेखील आनंद दिघे यांचे शिष्य मानले जातात. विचारे यांची ही चित्रफित सध्या चांगलीच चर्चेचा विषय ठरतेय. या चित्रफितीत आनंद दिघे यांची दुर्मिळ छायाचित्रं आणि काही व्हिडीओंचा सामावेश आहे. वाचा सविस्तर
नागपूर: घराच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून निर्माण वीज स्वतः वापरायची आणि जास्त वीज महावितरणला विकण्याच्या ‘रूफटॉप सोलर’, योजनेला ग्राहकांची पसंती मिळत आहे. २०१६- १७ मध्ये महावितरणच्या १०७४ ग्राहकांकडून राज्यात २० मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती होत होती. २०२१- २२ मध्ये ही ग्राहकसंख्या ७६, ८०८ होऊन सौर वीज निर्मिती १,३५९ मेगावॅटवर पोहोचली आहे.
सांगली-मिरज रस्त्यावर भारती हॉस्पिटलसमोर वानलेसवाडी हायस्कूलमध्ये शालेय पोषण आहारातून ३० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. यापैकी २३ विद्यार्थ्यांवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकाराची माहिती मिळताच उपायुक्त स्मृती पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे.
सविस्तर बातमी
नागपूर : देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते तेव्हा मध्य प्रदेश सरकारची उदाहरणे देत शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्याची मागणी करीत होते. आता ते स्वत:च अर्थमंत्री आहे तर त्यांना वीजबिल माफीच्या मागणीचा विसर पडलेला आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. ते नागपूर विमानतळावर पत्रकारांशी गुरुवारी बोलत होते.
नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जनता माध्यमिक विद्यालयातील नववीच्या विद्यार्थिनीचा प्रभातफेरी सुरू असतांना चक्कर आल्याने मृत्यू झाला.
नागपूर : एसटीच्या नियमित कर्मचाऱ्यांनी साडेपाच महिने केलेल्या संपामुळे एसटीच्या प्रवासी फेऱ्या ठप्प पडल्या होत्या. हा संप संपुष्टात आणण्यात महामंडळ अपयशी ठरले होते. आता निवृत्त कर्मचाऱ्यांनी २०१९ पासूनची येणे असलेली रक्कम मिळावी आणि इतर मागण्यांसाठी ३० जानेवारीपासून पूर्व विदर्भात आंदोलनाची घोषणा केली आहे.
ठाणे : काल इतक्या घाई घाईत मतांसाठी जैन मुनींना भेटायला गेले! दिघे साहेबांचे समाधीस्थळ मात्र लक्षात नाही राहिले. उद्धवजी, समाधी शिंदे साहेबांनी बांधली म्हणून तिथे तुमची पावले नाही वळली की बाळासाहेबांचे स्मारक अजून करू शकलो नाही, याची लाज वाटली? अशी टिका शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
नागपूर : ताडोबातील वाघ माणसाळलेले आहेत. त्यांना ना आता जिप्सीची भीती वाटते, ना त्यातील पर्यटकांची. म्हणूनच ते अगदी सहजपणे जिप्सीजवळ येतात. कधी चक्कर मारतात, कधी आरसा चाटतात, तर कधी सायलेंसर चाटतात. मात्र, यातूनच एखादेवेळी पर्यटकांवर वाघाने हल्ला केला तर ताडोबा व्यवस्थापन त्याची जबाबदारी घेणार का, असा प्रश्न दोन दिवसांपूर्वी झालेल्या घटनेनंतर उपस्थित झाला आहे.
नोकरभरती करण्यासह विविध मागण्यांसाठी महाबँकेच्या कर्मचारी शुक्रवारी (२७ जानेवारी) संपावर गेले आहेत. त्यामुळे या बँकेच्या देशभरातील दोन हजारपेक्षा जास्त शाखा आज बंद असून रोखीचे आणि धनादेश वटवण्याचे व्यवहार थांबले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रमधील सर्व कर्मचारी आणि अधिकारी संघटनांनी मिळून स्थापन केलेल्या युनायटेड फोरम ऑफ महाबँक युनियमनच्यावतीने शुक्रवारी एकदिवसीय देशव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे.
मविआ सरकारच्या काळात मालाड येथील उद्यानाला टिपू सुलतान उद्यान असे नाव देण्यात आले होते. मात्र, हे नाव आता हटविण्यात आल्याचे मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जाहीर केले आहे.
पक्षांतर्गत धुसफूस, उमेदवाराविषयी असलेली नाराजी आणि जुनी पेन्शन योजनेविरोधात असल्याचा मुद्दा यावरून भाजपाने पाठिंबा दिलेले शिक्षक परिषदेचे उमेदवार व विद्यमान आमदार नागोराव गाणार यांच्यापुढे ही जागा राखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मात्र, असे असले तरी नागपूरच्या जागेवर गडकरी-फडणवीस- बावनकुळे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार असल्याने शेवटच्या टप्प्यात फडणवीस चमत्कार घडवतील, असा विश्वास शिक्षक परिषदेला आहे.
गोंदिया : वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची उद्धव ठाकरे यांच्याशी युती झाली असेल तरी याचा महाविकास आघाडीशी काहीही संबंध नाही, असा महाविकास आघाडीला प्रस्तावही नसल्याचे पटोले म्हणाले. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीत प्रवेश ही केवळ कहानी असल्याचे पटोले म्हणाले. ते गोंदियात एका लग्न सोहळ्यात आल्यावर माध्यमांशी बोलत होते.
शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्ताने शिंदे गटाकडून खारकर आळी येथील दिघे यांच्या स्मृतिस्थळी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार असून, ते कार्यक्रमस्थळी येण्याआधी ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी कार्यकर्त्यांसह स्मृतिस्थळी येऊन दर्शन घेऊन निघून गेले.
कल्याणमधील पत्रीपुला जवळील हनुमान नगर कुष्ठ रुग्ण वसाहतीत ४० वर्ष कुष्ठ रुग्णांच्या विकासासाठी कार्य करणारे डोंबिवलीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि निवृत्त सैनिक गजानन माने यांना केंद्र शासनाचा पद्मश्री हा सन्मान जाहीर झाला आहे.
सविस्तर बातमी
चंद्रपूर : गुरुवारी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आटोपून सायंकाळी तीन शाळेकरी मित्र गडचांदूर शहरालगतच्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने खोदलेल्या एका खोल खड्डयात पोहण्यासाठी गेले. अंधारात पाण्याचा अंदाज न आल्याने या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. आज, शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्याने एकाच खळबळ उडाली.
मुंबई : तामिळ, हिंदी चित्रपटसृष्टीत ५०-६० च्या दशकांत विविधांगी भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री जमुना यांचे हैदराबादमध्ये निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने जमुना यांनी अखेरचा श्वास घेतला.
नांदेडमध्ये ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी माहिपाल येथे कुटुंबीयांनीच वैद्यकीयचे शिक्षण घेत असलेल्या आपल्या मुलीची हत्या केली. शुभांगी जोगदंड (वय २३ वर्षे) असं मृत मुलीचं नाव आहे. गावातील तरुणासोबत असलेल्या प्रेम संबंधाच्या विरोधातून कुटुंबातील सदस्यांनीच तिचा खून करून प्रेत जाळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
“कॉपी करण्यात काही विद्यार्थी खूपच कल्पकता दाखवतात. जेवढ्या वेळात अभ्यास होऊ शकतो, तेवढा वेळ ते कॉपी करण्याचे मार्ग शोधत असतात. बारीक बारीक अक्षरात नोट बनवतात. पर्यवेक्षकाला कसं फसवलं? हे ते अभिमानाने इतरांना सांगतात. आजकाल मूल्यांमध्ये बदल झाल्यामुळे कॉपी करण्यात कुणाला गैर वाटत नाही, असंही पंतप्रधान म्हणाले.
भुसावळसह सावदा परिसराला भूकंपाचे हादरे बसले. नाशिक येथील भूकंपमापन केंद्रात सकाळी १०.३५ वाजता हे हादरे बसल्याची नोंद झाली असून त्यांची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल इतकी असल्याची माहिती केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
'परिक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. विद्यार्थांना दबावात न राहता, आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करावं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच सोशल स्टेटसमुळे विद्यार्थ्यांवर दबाव टाकणंं चुकीचं असल्याचेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 'परिक्षा पे चर्चा'च्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. दिल्लीतील तालकटोरा इनडोअर स्टेडियमवर हा कार्यक्रम सुरू आहे. तसेच राज्यातील विविध शाळांमध्येही हा कार्यक्रम दाखवला जात आहे.
गोंडवाना विद्यापीठातील सभागृहाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक सदस्य स्व. दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देण्याचा ठराव रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी प्रसिद्ध आदिवासी कार्यकर्ते आणि वीर बाबुराव आदिवासी विकास प्रबोधन समितीचे संस्थापक अध्यक्ष वसंत कुलसंगे विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ उपोषणाला बसले आहेत.
मुंबई आणि ठाणे शहराच्या वेशीवर असलेल्या आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कोपरी रेल्वे उड्डाणपुलाच्या मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्यातील काम जवळ-जवळ संपुष्टात आले आहे. गुरुवारपासून प्रशासनाने कोंडी टाळण्यासाठी दोन्ही दिशेकडील एक-एक पदरी मार्गिका सुरू केली आहे. त्यामुळे ही मार्गिका आता तीन-तीन पदरी सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत मार्गिकेतील उर्वरित एक-एक पदरी मार्गही सुरू केला जाणार आहे. त्यामुळे ठाणेकरांची कोपरी पुलावर होणारी कोंडी टळणार आहे.
बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या खातेधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आज बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप घोषित करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांची अपुरी कर्मचारी संख्या, नोकरभरती बंद असल्याने कर्मचारी आक्रमक झाले आहेत.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प वाघांसाठी जेवढा प्रसिद्ध आहे, तेवढेच या प्रकल्पावरील व्यवस्थापनाची पकड मात्र ढिली होत चालली आहे. पर्यटकांचा अनियंत्रित वाढता ओघ या व्याघ्रप्रकल्पासाठी मारक ठरणार, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
माथाडी संघटनेच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या तिघांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली. पुण्यातील विमाननगर भागातील ॲरो माॅलमधील साहित्य उचलण्याचे काम एका व्यावसायिकाकडे देण्यात आले होते. हे काम आमच्या माथाडी संघटनेकडून करण्यात येणार आहे, असे सांगून आरोपींनी व्यावसायिकाकडे खंडणी मागितली हाेती.
भिवंडी येथील खाडीपार भागात दुमजली इमारतीचा भाग कोसळल्याने एकाचा मृत्यू झाल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटे उघडकीस आला आहे. माजीद अन्सारी (२५) असे मृताचे नाव असून भिवंडी अग्निशमन दलाकडून इमारतीच्या ढिगाऱ्यात शोधकार्य सुरू आहे.
प्रकाश आंबेडकरांच्या शरद पवारांवरील विधानावरून राज्याचील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. नाना पटोले यांनी वंचित आघाडी ही महाविकास आघाडीचा भाग नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर अशा प्रकारची विधानं कोणीही करु नये, असं संजय राऊत म्हणाले.