Mumbai Pune Updates Today, 30 September 2024 : राज्यात नुकताच धर्मवीर-२ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यावरून आता राजकारणदेखील तापलं आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच आता उद्धव ठाकरे हे आनंद दिघे यांचे खच्चीकरण करत होते, असा आरोप शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला आहे. यानंतर आता ठाकरे गटाकडूनही त्यांना प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काल नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झालं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपावर जोरदार टीका केली. या टीकेला आज शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे. याशिवाय राज्यातील इतरही घडामोडींवर आपलं लक्ष राहणार आहे.

Live Updates

Maharashtra News Live Today, 30 September 2024 : अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज उदगीरमध्ये

18:35 (IST) 30 Sep 2024
Bees Attacked on Tourists : शितकडा धबधब्याजवळ गेलेल्या पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला, निरीक्षणासाठी उडवलेल्या ड्रोनमुळे झाली घटना

नाशिकमध्ये हरिहर किल्ल्याजवळील शितकडा धबधब्यावर प्रस्तरावारोहणासाठी जमलेल्या पर्यटकांवर रविवारी दुपारी मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात २० ते २५ जण किरकोळ जखमी झाले. रॅपलिंगसाठी निरीक्षणासाठी उडवलेल्या ड्रोनमुळे मधमाश्यांनी पर्यटकांवर हल्ला केला.

वाचा सविस्तर...

18:15 (IST) 30 Sep 2024
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून सायबर चोरट्यांविरुद्ध कारवाई; पुण्यासह देशभरात ३२ ठिकाणी छापे, २६ जणांना अटक

पुणे : वेगवेगळ्या प्रकारची आमिषे, तसेच केंद्रीय तपास यंत्रणाकडून कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांविरुद्ध केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) देशभरातील ३२ शहरात कारवाई करण्यात आली.

सविस्तर वाचा

18:15 (IST) 30 Sep 2024
नागपूर हिट अँन्ड रन: रितिका मालूला मध्यरात्री अटक, सत्र न्यायालयाकडून दखल, स्वत:हून याचिका...

नागपूर : रामझुला अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी रितिका मालू हिला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) मागील आठवड्यात बुधवारी मध्यरात्री अटक केली होती. मध्यरात्री झालेल्या या अटकेची दखल नागपूर सत्र व जिल्हा न्यायालयाचे प्रमुख न्या.दिनेश सुराणा यांनी घेत स्वत:हून याचिका दाखल करण्याचे आदेश दिले.

सविस्तर वाचा

17:10 (IST) 30 Sep 2024
रत्नागिरी : लांजा येथे रॉयल पार्क इमारतीत अज्ञात चोरट्याने फ्लॅट फोडला; पावणे तीन लाखांचा ऐवज लंपास

लांजा शहरातील कोर्ले फाटा येथील रॉयल पार्क या निवासी इमारतीमध्ये अज्ञात चोरट्याने फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी २९ सप्टेंबर रोजी घडली आहे.

16:45 (IST) 30 Sep 2024
कारागृह पोलीस भरतीत कॉपी करणाऱ्या ‘मुन्नाभाई’ला अटक

नागपूर : राज्यभरात पोलीस भरती सुरु असून सध्या लेखी परीक्षा घेण्यात येत आहे. पोलीस भरतीत अनुचित प्रकार घडू नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी डोळ्यात तेल घालून काम करीत आहेत. परीक्षेत कुणीही कॉपी करु नये म्हणून दक्षता घेण्यात येत आहे. मात्र, पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणीत पात्र ठरल्यानंतर केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी राज्यभरातील परीक्षा केंद्रावर काही ‘मुन्नाभाई’ सक्रिय झाले आहेत.

सविस्तर वाचा

16:29 (IST) 30 Sep 2024
बारामतीत पिस्तुलाच्या धाकाने व्यापाऱ्याची लूट, ग्रामीण पोलिसांकडून तिघे गजाआड

पुणे : पिस्तुलाच्या धाकाने भंगार माल खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला लुटण्यात आल्याची घटना बारामतीतीत लोखंडे वस्ती परिसरात नुकतीच घडली.

सविस्तर वाचा...

16:16 (IST) 30 Sep 2024
मुख्यमंत्र्यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या ४०० कोटींच्या निविदांचे धोरण फसले, लाखो विद्यार्थी वंचित

नागपूर : बार्टी, सारथी, महाज्योती, ‘टीआरटीआय’ या संस्थांसाठी असलेल्या ‘समान धोरण’मधून ‘महाज्योती’ने बाहेर पडण्याचा निर्णय सरकारला कळवला असला तरी त्यावर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. दुसरीकडे आता ‘टीआरटीआय’ वगळता अन्य संस्थांचाही ‘समान धोरण’ला विरोध आहे. या संपूर्ण गोंधळामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी प्रशिक्षणापासून वंचित आहेत.

सविस्तर वाचा

15:45 (IST) 30 Sep 2024
नागपूर: नवीन 'फॅड'! तोंडातून धूर सोडणारी बिस्किटे...

नागपूर : लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांमध्ये धूर सोडणाऱ्या बिस्किटांचे आकर्षण वाढले आहे.हे बिस्कीट नायट्रोजनमध्ये बुडवले जात असल्याने त्यातून धूर निघतो. हा धूर मानवाच्या फुफ्फुसापर्यंत जाऊन इजा करतो. त्यामुळे श्वसन विकार संभवतात, असे निरीक्षण क्रीम्स रुग्णालयाच्या अभ्यासात नोंदवण्यात आले आहे.

सविस्तर वाचा

15:30 (IST) 30 Sep 2024
नागपूर:‘लोकसभा’ जिंकण्यासाठी गडकरींनी केला होता 'हा' नवस...

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची देशभरात भाजपचा प्रसिद्ध चेहरा आहेत. रस्त्याच्या विकासाच्या केलेल्या कार्यामुळे त्यांची देशभर सकारात्मक ख्याती आहे.अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणूकीत ते तिसऱ्यांदा नागपूर लोकसभा क्षेत्रातून निवडून आले आहे.

सविस्तर वाचा

14:57 (IST) 30 Sep 2024
चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट शेतात गेली; ४२ प्रवाशी जखमी

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात महुडे येथून भोरच्या दिशेने सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एक (एमएच ०६ एस ८२८९) 45 एसटी बस प्रवाशांना घेऊन जात होती. मात्र, यावेळी अचानक बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे बस एका वळणावर गेली. या घटनेत घटनेत ३ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, तर ४२ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. किरकोळ दुखापत असणाऱ्या जखमींवर भोर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती समोर आली आहे.

14:40 (IST) 30 Sep 2024
मुंबई : अटल सेतूवर मोटरगाडी थांबवून समुद्रात मारली उडी, शोधमोहिम सुरू

मुंबई : अटल सेतूवर मोटरगाडी थांबवून एका व्यक्तीने उडी मारल्याचा प्रकार सोमवारी घडला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर शिवडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन शोध मोहिम राबवली. त्या व्यक्तीचा अद्याप शोध सुरू असून त्याच्या कुटुंबियांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

वाचा सविस्तर...

14:34 (IST) 30 Sep 2024
अपघातात मृत पावलेल्या दुचाकीस्वाराच्या कुटूंबियांना साडेचार कोटींची नुकसान भरपाई, मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचे आदेश

ठाणे : नवी मुंबई येथील पनवेल-मुंब्रा मार्गावर दोन वर्षांपुर्वी ट्रकच्या धडकेत मृत पावलेल्या एका दुचाकीस्वाराच्या कुटुंबीयांना साडे चार कोटी रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने शनिवारी झालेल्या लोकअदालतमध्ये दिले.

सविस्तर वाचा...

14:23 (IST) 30 Sep 2024
राज्यात २३ जिल्ह्यांमध्ये सुरू होणार कॅथलॅब

मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे हृदय विकाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून त्यामुळे रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील २३ रुग्णालयांमध्ये कॅथलॅब सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाचा सविस्तर...

13:53 (IST) 30 Sep 2024
कल्याण शहराचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या बारावे येथील जलशुध्दीकरण केंद्रात महावितरणकडून मंगळवारी ((ता.१) रोहित्र दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.

सविस्तर वाचा...

13:39 (IST) 30 Sep 2024
“उद्धव ठाकरेंनी कोणत्याही मतदारसंघातून जिंकून दाखवावे,” भाजप प्रदेशाध्यक्षांचे आवाहन

चंद्रपूर :अडीच वर्षाचा एकूणच कारभार बघता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) मुख्यमंत्री पदासाठी उध्दव ठाकरे यांचा चेहरा मान्य करायला तयार नाहीत. त्यामुळे उध्दव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यातूनच ते वायफळ बडबड करीत आहेत.

सविस्तर वाचा

13:12 (IST) 30 Sep 2024

राज्यात गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नाही -सुप्रिया सुळे

बारामती येथील एका महाविद्यालयात एका तरुणाची दिवसाढवळ्या हत्या झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. राज्यातील कायदा व्यवस्थेचा आलेख दिवसेंदिवस ढासळत चाललेला असून गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नाही. दिवसाढवळ्या कुणीही तलवार, कोयता, गावठी पिस्तुल घेऊन येतो आणि खून करतो अशी स्थिती आहे. गृहमंत्री महोदयांच्या अपयशामुळे महाराष्ट्रात सुरु झालेले हे गुंडाराज राज्याला अनेक वर्षे मागे घेऊन गेले, ही वस्तुस्थिती आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

https://twitter.com/supriya_sule/status/1840656016314372157

13:10 (IST) 30 Sep 2024
डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीत घरफोड्या वाढल्याने नागरिक हैराण

डोंबिवली : येथील पश्चिमेतील विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीत गेल्या आठवड्यापासून घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे.

सविस्तर वाचा...

13:09 (IST) 30 Sep 2024
बाणेर टेकडीवर तरुणाला लुटले

पुणे : मित्रासोबत फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणाला बेदम मारहाण करून लुटण्यात आल्याची घटना बाणेर टेकडी परिसरात घडली.

सविस्तर वाचा...

12:54 (IST) 30 Sep 2024
“मुख्यमंत्री साहेब, हीच तुमच्या महायुती सरकारची क्वालिटी का?” शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशावरून रोहित पवारांचं टीकास्र!

राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांना वाटलेल्या गणवेशाच्या दर्जावरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावरूनच शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार शिंद सरकारवर टीकास्र सोडलं आहे. तसेच सभागृहात गणवेश दाखवताना “रोहित क्वालिटी बघ” असं मुख्यमंत्री म्हणाले होते. आता हे गणवेश बघून हीच का महायुती सरकारची क्वालिटी? असा प्रश्नही रोहित पवार यांनी शिंदे सरकारला विचारला आहे.

सविस्तर वाचा -

12:50 (IST) 30 Sep 2024
राज्यात पावसासाठी पुन्हा एकदा पोषक वातावरण! येत्या२४ तासात...

नागपूर : पावसाची वाटचाल थांबली आहे असे वाटत असतांनाच आता हीच वाटचाल अडखळली आहे. राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे येत्या२४ तासात राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

12:49 (IST) 30 Sep 2024
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील रुग्णालयांचे ३८८ कोटी थकवले! युनायटेड इंडिया इन्शुरन्सबरोबरचा ३ हजार कोटींचा करार रद्द…

मुंबई: राज्यातील लाखो रुग्णांसाठी जीवनदायी असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील रुग्णालयांचे तब्बल ३८८ कोटी रुपये थकविल्यामुळे तसेच बँक गॅरंटीचे ९३ कोटी न भरल्यामुळे राज्य सरकारने युनायटेड इंडिया इन्शुरन्सबरोबरचा ३००० कोटी रुपयांचा विमा करार रद्द केला आहे.

वाचा सविस्तर...

12:34 (IST) 30 Sep 2024
मुंबई : वृद्धांच्या घरात शिरून चोरी, आरोपी महिलेला अटक

मुंबई : घरकामगार महिलेने बदली कामासाठी पाठविल्याचे खोटे सांगून घरात शिरलेल्या महिलेने वयोवृद्धाच्या घरात चोरी केल्याचा प्रकार विलेपार्ले परिसरात घडला होता.

सविस्तर वाचा...

12:21 (IST) 30 Sep 2024

देशी गायी 'राज्यमाता-गोमाता' म्हणून घोषित; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

देशी गायींना 'राज्यमाता-गोमाता' म्हणून घोषित करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

12:09 (IST) 30 Sep 2024

खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा करण्यात आले. पहिल्या टप्प्यात ४९ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये २३९८ कोटी ९३ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1840641456379162755

11:47 (IST) 30 Sep 2024
वाहनकोंडीमुळे ' संजुबा'च्या विद्यार्थ्यांना अपघाताचा धोका

नागपूर: अतिशय गजबजलेल्या चौकात संजुबा माध्यमिक शाळा असल्यामुळे विद्यार्थिनी आणि पालकांची मोठी कसरत सुरू आहे. शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेला वाहतुकीची कोंडी व पालकांची गर्दी होत असल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. भविष्यात त्या चौकात एखादी अनुचित घटना घडण्याची वाट वाहतूक पोलीस बघत आहेत का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

सविस्तर वाचा

11:27 (IST) 30 Sep 2024
गडकरींची कबुली, विदर्भात पाचशे-हजार कोटी गुंतवणूक करणारे सापडत नाही ...

नागपूर: विदर्भात मोठी गुंतवणूक आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे, पण कुणी हाती लागत नाही. विदर्भात पाचशे, हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करायला कुणी तयार नाही होत आहे. प्रत्येक वेळी अंबानी-टाटा यांना बोलविता नाही येत. विदर्भात मोठी गुंतवणूक आली नाही तर विदर्भाचा विकास कठीण आहे, अशी कबुली स्वत: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात दिली.

सविस्तर वाचा

11:22 (IST) 30 Sep 2024
काच कारखान्यातील दुर्घटनेप्रकरणी मालकासह पाचजणांविरुद्ध गुन्हा, येवलेवाडीतील दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू

पुणे : कोंढव्यातील येवलेवाडी परिसरातील काच कारखान्यात रविवारी दुपारी अवजड काचा उतरविताना झालेल्या दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला, तसेच दोघे जण गंभीर जखमी झाले.

वाचा सविस्तर...

11:20 (IST) 30 Sep 2024
गडकरींची कबुली, विदर्भात पाचशे-हजार कोटी गुंतवणूक करणारे सापडत नाही ...

नागपूर: विदर्भात मोठी गुंतवणूक आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे, पण कुणी हाती लागत नाही. विदर्भात पाचशे, हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करायला कुणी तयार नाही होत आहे. प्रत्येक वेळी अंबानी-टाटा यांना बोलविता नाही येत. विदर्भात मोठी गुंतवणूक आली नाही तर विदर्भाचा विकास कठीण आहे, अशी कबुली स्वत: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात दिली .

सविस्तर वाचा

11:08 (IST) 30 Sep 2024
अलिबागच्या नाट्यगृहासाठी ९ कोटी ३२ लाखांचा निधी

अलिबाग : दोन वर्षापूर्वी लागेल्या आगीत जळून भस्मसात झालेल्या अलिबागच्या पीएनपी नाट्यगृहाला नवी झळाळी प्राप्त होणार आहे. नाट्यगृहाच्या दुरुस्ती आणि नुतनीकरणायासाठी राज्यसरकारने तब्बल ९ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

वाचा सविस्तर...

11:01 (IST) 30 Sep 2024
“उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचं खच्चीकरण करण्याचं काम केलं”, रामदास कदम यांचा गंभीर आरोप; म्हणाले, “त्यांचा मृत्यू... ”

आनंद दिघे यांना मारण्यात आलं होतं, त्यांचा घातपात झाला होता. हे ठाणे जिल्ह्याला माहीत आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यासंदर्भात आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीही प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

सविस्तर वाचा

Ajit Pawar

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा उदगीरमध्ये दाखल होणार आहे. यावेळी उदगीरमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात्रेदरम्यान महिलांसाठी विशेष मेळावाही घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Story img Loader