Maharashtra Breaking News Updates, 14 August 2024: राज्य विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर आलेल्या असताना दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर दौरा करून आपली भूमिका स्पष्टपणे मांडायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे अजित पवार गटाच्या यात्रेतून छगन भुजबळांनीही जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आरक्षणाचा मुद्दा तापण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.
Marathi News Today, 14 August 2024: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडी
येवला तालुक्यातील नगरसूल शिवारात बिबट्याचा वावर असून आमदार वस्तीवरील शेळी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाली आहे.
महाराष्ट्रात सावत्र कुणीच नाहीये. आमचे सावत्र भाऊ दिल्लीत आहेत. हे महाराष्ट्राला सावत्रपणाची वागणूक देत आहेत. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी जेवढं महाराष्ट्राचं नुकसान केलंय, तेवढं गेल्या १०० वर्षांत कुणी केलेलं नाही – संजय राऊत</p>
गणवेश खरेदीतील गैरव्यवहार पाहता काही वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या खात्यावर गणवेशासाठी पैसे दिले जात होते. मात्र ते पैसेही वेळेत येत नसल्याने पुन्हा गणवेश देण्यास सुरूवात झाली.
सिन्नरच्या रामनगर प्राथमिक आश्रमशाळेचा मुख्याध्यापक सुनील पाटील आणि शिपाई बाळू निकम यांना रंगेहात पकडण्यात आले.
अकोला : चारधाम यात्रेवर गेलेल्या अकोला जिल्ह्यातील भाविकांवर काळाने घाला घातला. उत्तराखंडमधील श्रीनगर गढवाल येथील श्रीकोट येथे अनियंत्रित भरधाव टँकरने महिलांना चिरडल्याची भीषण दुर्घटना मंगळवारी रात्री घडली. या अपघातात अकोला जिल्ह्यातील दोन भाविक महिलांचा मृत्यू झाला, तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी होत आहे.
माझी मुलगी श्रीजया सामाजिक क्षेत्रात काम करतेय. तिची जर इच्छा असेल, तर तिनं पक्षाकडे तिकीट मागावं, तिकिटासाठी प्रयत्न करावेत. पण मी तिच्या तिकिटासाठी प्रयत्न करणार नाही. तिनं स्वत: त्यासाठी प्रयत्न करावेत. मी तिच्यासोबत असेन – अशोक चव्हाण</p>
तुळजापूर : लोकसभा निवडणुकीत महायुतीला आलेल्या अपयशामुळेच राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत ही फसवी योजना सत्ताधार्यांना धडा शिकवेल, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
यवतमाळ : समाजातील दलित, वंचित, मागास घटकांना ‘जयभीम’ या एका नाऱ्याने लढण्याचे बळ देवून जगण्याचा मार्ग दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्चवर्णीयांच्या विळख्यात जगणं हरवलेल्या समाजाला दिशा देवून त्यांच्यातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय मागासलेपण दूर केले आणि समाज मुख्य प्रवाहात आला.
अमरावती : महायुतीचे सरकार निवडणुकीच्या तोंडावर अनेक योजना जाहीर करीत आहे, आता त्यांनी ‘लाडकी आमची खुर्ची’ ही योजना आणली आहे. महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण, हे आता त्यांनाच विचारले पाहिजे, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला.
गडचिरोली : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवाची बाजी लावून नक्षल्यांशी दोन हात करणाऱ्या गडचिरोली पोलीस दलातील १७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे शौर्य पदक जाहीर झाले आहे, तर एका पोलीस अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक घोषित झाले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ही घोषणा करण्यात आली. त्यामुळे जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अकोला : पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप आमदार नितेश राणे यांचे विरोधात पोलीस बॉईज संघटनेने आक्रमक भूमिका घेतली. एका कार्यक्रमासाठी अकोल्यात दाखल होत असलेल्या नितेश राणे यांच्या ताफ्याला पोलीस बॉईज संघटनेच्या सदस्यांनी बुधवारी दुपारी महामार्गावर काळे झेंडे दाखवले. यावेळी नितेश राणे यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.
गोंदिया: गोंंदिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात बुधवारी १४ ऑगस्टला जिल्हा नियोजन समितीच्या सभेत पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी समितीचे विशेष निमंत्रित सदस्य माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांना बोलण्यास मनाई केल्याने या भरगच्च सभेचे वातावरण काही काळाकरीता तणावपूर्ण झाले होते.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदाराने मात्र उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी पाहायचे आहे असे विधान केले. त्यांचे हे विधान समाजमाध्यमांवर सध्या प्रसारित होत आहे.
सदनिका खरेदी व्यवहारातील दस्तनोंदणीसाठी शुल्क भरल्यानंतर मोबदल्यापोटी तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या वकिलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. छत्रपती शिवाजी रस्त्यावरील मामलेदार कचेरीसमोर ही कारवाई करण्यात आली. सविस्तर वाचा…
मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू
२००४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना पराभूत करणारे भाजप नेते व माजी खासदार शिशुपाल पटले यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांना आता उधाण आले आहे.
माझ्या बहिणी साध्यासुध्या नाहीत. दुधखुळ्या नाहीत. देणारे कोण आणि घेणारे कोण हे त्यांना पक्कं माहिती आहे. ताई, माई, आक्का.. कपटी सावत्र भावांना मारा बुक्का – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे</p>
कृषी विभागातील भ्रष्टाचाराला विरोध केल्यामुळे राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने कृषी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांची बदली केल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी केला. सविस्तर वाचा…
भारतासह, भूतान, नेपाळच्या सीमाभागात गावेच्या गावे वसवून सीमा वाढवण्याचा खोडसाळपणा चीनने गेल्या काही वर्षांत सुरू केला आहे. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने याबाबतचा मॅपिंग, छायाचित्रांच्या पुराव्यासह विस्तृत अहवाल दिला आहे. हे नवे धोरण भारतासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
नागपूर: प्रथम करोना व त्यानंतर झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाची आर्थिक कोंडी झाली होती. परंतु विविध उपायांमुळे आता एसटी आर्थिक अडचणीतून हळू- हळू बाहेर येत आहे. जुलै महिन्यात एसटीच्या ३१ विभागांपैकी १८ विभागांनी नफा कमवला आहे. त्यामुळे मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा एसटीचा तोटा खूपच कमी झाला आहे.
ANI वर स्मिता प्रकाश यांनी अजित पवार यांची मुलाखत घेतली असून त्यासंदर्भात अजित पवारांनी त्यांच्या एक्स हँडलवर पोस्ट केली आहे.
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1823663905190612998
बुलढाणा : प्रारंभीपासून वादग्रस्त ठरलेल्या प्रस्तावित सिंदखेडराजा ते शेगाव या भक्ती महामार्गाच्या विरोधात शेतकरी एकवटले आहे. शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला हा मार्ग रद्द करावा या मागणीसाठी शेतकरी विविध टप्प्यात जहाल आंदोलन करीत आहे. आज बुधवारी, १४ ऑगस्ट रोजी भक्तिमार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने पैनगंगा नदी पात्रात प्रतिकात्मककरण्यात आले.
संबंधित गृहनिर्माण सोसायटीवर कायदेशीर कारवाई करु असा इशारा सिडकोच्या जनसंपर्क विभागाने दिला आहे.
मुंबई : अटलबिहारी वाजपेयी शिवडी – न्हावाशेवा सागरी सेतूच्या (अटल सेतू) जोडरस्त्यावर तडे पडल्याचे जूनमध्ये निदर्शनास आले होते. ही बाब निदर्शनास येताच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) तात्काळ जोडरस्त्याची दुरुस्ती केली. मात्र या प्रकरणी संबंधित कंत्राटदाराविरोधात कोणतीही कारवाई झाली नव्हती. आता कंत्राटदारावर कारवाई करून एक कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
नागपूर : महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होतील, असे भाकित केले आहे. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे कोणी उमेदवार असेल तर तो त्यांनी सांगावा, असे आवाहन केले. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेले विधान चर्चेत आहे.
सिडकोने ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना दिले जाणारे विद्यावेतन बंद केले आहे. ते सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
शासनाने इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील पर्ससीन मासेमारीला परवानगी द्यावी या मागणीसाठी स्वातंत्र्यदिनापासून मासेमारी बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
राधाई ही बेकायदा इमारत असल्याने ती जमीनदोस्त करण्याचे आदेश न्यायालयाने गेल्या महिन्यात कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाला दिले होते.
मुंबई : स्वातंत्र्य दिन, शनिवार – रविवार आणि रक्षाबंधन अशी सलग सुट्टी आल्याने अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहेत. सुट्ट्यांमुळे बाहेरगावी जाणाऱ्यांची रेल्वे गाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने १८ विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वेगाड्या एलटीटी – नागपूर, एलटीटी – मडगाव, सीएसएमटी – कोल्हापूर, पुणे – नागपूर आणि कलबुर्गी – बंगळुरू यादरम्यान धावतील.
Marathi News Today, 14 August 2024: राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा