Maharashtra Breaking News Updates, 14 August 2024: राज्य विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर आलेल्या असताना दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर दौरा करून आपली भूमिका स्पष्टपणे मांडायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे अजित पवार गटाच्या यात्रेतून छगन भुजबळांनीही जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आरक्षणाचा मुद्दा तापण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.
Marathi News Today, 14 August 2024: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडी
मुंबई : राज्य सरकारच्या एकात्मिक नगर वसाहत योजनेअंतर्गत पनवेल, खालापूरमध्ये सध्या १,८२३ घरांचे बांधकाम सुरू आहे. या घरांचे काम येत्या दीड वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २०२६मधील सोडतीसाठी मंडळाला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) ही १,८२३ घरे उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या घरांमधील १,२२० घरे ही हिरानंदानी यांच्या गृहप्रकल्पातील आहेत.
डोंबिवली पश्चिमेतील जुनी डोंबिवलीत अग्निदेव मंदिराच्या बाजुला पायवाट बंद करून भूमाफियांनी सात माळ्याची बेकायदा इमारत उभारली आहे.
एका बंदूकधारीने हवेत गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
वर्धा : गुन्हा करीत पोबारा करणारे अनेक आरोपी असतात. त्यांचा शोध घेता घेता पोलिसांच्या नाकी नऊ येतात. महिने उलटतात, तेव्हा कुठे आरोपी हाती लागण्याची उदाहरणे दिसतात. या पार्श्वभूमीवर ५ ऑगस्ट रोजी चार व्यक्तींना उडवून पळ काढणाऱ्या एका ट्रक चालकास आठच दिवसात पकडून आणण्याची कामगिरी पोलिसांनी यशस्वी करुन दाखविली आहे.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा, मंजुरी आणि पुनर्विकास) कायद्याचा फेरआढावा घेण्यासाठी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी मंगळवारी न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाची स्थापना केली.
मुंबई : तीन वर्षांपूर्वी पुण्यातील तरूणीच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते संजय राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी फौजदारी जनहित याचिका केली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना लाभाचे वितरण १७ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. आतापर्यंत जवळपास १ कोटी ३५ महिला पात्र ठरल्या असून त्यांच्या खात्यात १७ ऑगस्ट रोजी पैसे जमा होणार आहेत. ज्यांचे बँक खाती आधार कार्डशी लिंक नाहीत, त्यांची खाती लिंक करून झाल्यानंतर बँक खात्यात पैसे जमा होतील, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. तसंच, ३१ ऑगस्ट रोजी या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया संपणार होती. परंतु, यासंदर्भात आदिती तटकरे यांनी आता महत्त्वाची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरता अर्जदार महिलांचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं अनिवार्य आहे. परंतु, या अर्ज प्रक्रियेतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अर्ज केलेल्या अनेक महिलांची बँक खाती आधार कार्डशी लिंक नसल्याचं आढळून आलं आहे. यासंदर्भात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
अजित पवार यांनी पवारसाहेबांना सोडून भाजपाचं मांडलिकत्व स्वीकारलं आणि क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरला याचं दुःख मला कायम राहील, असे रोहित पवार यांनी अजित पवार यांना म्हटले आहे. सविस्तर वाचा…
अचानक बिबट्या घरात घुसल्याने जीव वाचवण्यासाठी घरातील लोक कसेबसे बाहेर पडले. मदतीसाठी आलेल्या एकाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखत घराची कडी लावून बिबट्याला आत कोंडले. सविस्तर वाचा…
कोलकत्यातील वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या पार्श्वभूमीवर बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयातील महिला निवासी डॉक्टरांची सुरक्षितता वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सविस्तर वाचा
कर्वेनगर भागातील एका सोसायटीतील चार सदनिकांचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. या सोसायटीत राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सविस्तर वाचा…
ईडीच्या तपासानुसार उप कंपन्यांना कर्ज देण्यात आले. ही रक्कम पुढे कोलकाता येथील २५० हून अधिक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून वळविण्यात आली.
मुंबई : उद्योगपती राज कुंद्रा यांच्या घरावरील छाप्यामध्ये तुमच्या बँक खात्याची माहिती मिळाल्याचे सांगून अटकेची धमकी देत ७५ वर्षीय व्यक्तीची सायबर फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून बँक व्यवहारांच्या माध्यमातून तपास सुरू आहे.
पुणे : मंगळवार पेठ येथील महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात दहशतवादी शिरल्याची अफवा पसरल्याने घबराट उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांना ताब्यात घेतले असून ते मूळचे बिहारचे असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे.
अकोला : गद्दारांच्या पक्षाला ॲड. प्रकाश आंबेडकर खरी शिवसेना म्हणत असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार रामदास आठवले आहेत, असे मानले पाहिजे, असा टोला शिवसेना उबाठाचे नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आज येथे लगावला.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमिवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी ऐरोली टोलनाक्यावर करण्यात आलेल्या नाकाबंदीत दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले.
पर्यावरण रक्षणासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ लाखो रुपये खर्च करीत आहे. मात्र मूर्तिकार अनुदानापासून वंचित आहेत.
नागपूर : उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र द्वेषी आहे. ते राज्याला लागलेली कीड असून येत्या निवडणुकीत ती कायमस्वरूपी काढून टाकू ,अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार नितेश राणे यांनी केली. अकोल्याला जाण्यापूर्वी नितेश राणे नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
खा. सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असूच शकत नाही अशी खात्री होती. ती चूक होती म्हणून एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्याची तुम्ही कबुली दिली, परंतु तुमचे मित्रपक्ष मात्र उलट प्रचार करत हा दादांचाच निर्णय असल्याचे सांगतात. याला तुम्ही ‘चूक झाल्याचे नाव देत असलात’ तरी प्रत्यक्षात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता. आता विधानसभेला ‘असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची’ चर्चा आहे. दबावाला बळी पडणे हा वैयक्तिक विषय असला तरी स्वाभिमान, विचारधारा आणि साहेबांना सोडून तुम्ही भाजपचं मांडलिकत्व स्वीकारलं आणि यामध्ये एक क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरला, याचं मात्र पक्षाचा एक कार्यकर्ता आणि एक पुतण्या म्हणून कायम दुःख राहील. पण ही कटकारस्थाने करणाऱ्या तसंच महाराष्ट्र नासवणाऱ्या ाकाराला मात्र महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेच्या सहकार्याने राज्याच्या राजकीय पटलावरून एक दिवस नक्की बाजूला सारेल, हा माझा तुम्हाला पक्का वादा आहे – रोहित पवार
शुक्राणू किंवा स्त्री बीज दात्याचा कृत्रिम मातृत्वाद्वारे (सरोगसी) जन्मलेल्या बाळावर जन्मजाता म्हणून कोणताही कायदेशीर अधिकार नाही.
मुलाच्या बारावी प्रवेशाचे शुल्क भरण्यासाठी विठ्ठलवाडी येथील एका महिलेने शहाड रेल्वे स्थानकात एका प्रवासी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरली.
इतिहासाचे जतन करण्यासाठी शासनाकडे वेळ आणि पैसा नसावा यासारखे दुर्दैव नाही. केंद्र सरकारने प्राचीन व ऐतिहासिक वारसास्थळे खासगी संस्था व कंपन्यांना दत्तक देण्याच्या गोंडस नावाखाली भाडेतत्वावर देण्याचा घाट घातला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गड- किल्ले, तथागत गौतम बुद्ध यांची शिकवण देणारी व जागतिक वारसा असणारी लेणी, मंदिरे, वाडे आदी सर्व खासगी क्षेत्राला आंदण दिली जाणार आहेत.सरकारी मालकीचे उद्योग विकूनही मन भरले नाही म्हणून आपली परंपरा आणि इतिहास विकण्याचा हा नवा धंदा सरकारने सुरु केला. हि अतिशय संतापजनक गोष्ट आहे.आम्ही याचा निषेध करीत असून शासनाने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा – सुप्रिया सुळे</p>
इतिहासाचे जतन करण्यासाठी शासनाकडे वेळ आणि पैसा नसावा यासारखे दुर्दैव नाही. केंद्र सरकारने प्राचीन व ऐतिहासिक वारसास्थळे खासगी संस्था व कंपन्यांना दत्तक देण्याच्या गोंडस नावाखाली भाडेतत्वावर देण्याचा घाट घातला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गड- किल्ले,… pic.twitter.com/nQYgOnKNsi
— Supriya Sule (@supriya_sule) August 14, 2024
चंद्रपूर : गेल्या काही वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. गुन्हेगारीचे राजकीयकरणं झाले. गुन्हेगारांना राजकीय संरक्षण देण्यात आले. या सर्व घडामोडी बघता गुन्हेगार व गुंडांसाठी राजकीय नेत्यांचे फोन आले तर ते प्रसिद्ध करावे, अशी सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना केली आहे.
उल्हासनगरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणपती आगमन मिरवणुकीची परवानगी न घेता रविवारी मिरवणूक काढली.
मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्याचे ‘अर्थपूर्ण’ काम एकीकडे जोरात सुरु आहे. मात्र त्याचवेळेस ग्रामीण आरोग्याची मदार असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था अत्यंत वाईट असून जवळपास २३३ प्राथमिक आरोग्य केंद्र एक तर मोडकळीला आली आहेत वा धोकादायक म्हणून जाहीर झालेली असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
दर्जाहीन कामामुळे एक-दीड महिन्यात हे रस्ते उखडल्याचे चित्र पाहायला मिळत असून पालिकेला ठेकेदाराने डांबरीकरणात चक्क वाळू भरल्याचे उघड झाले आहे.
मनीष सिसोदियांना जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने ओढलेल्या ताशेऱ्यांमुळे तुरुंगात खितपत पडलेल्या कैद्यांच्या मनात आशा निर्माण झाल्या आहेत. सविस्तर वाचा…
पंकज फणसे
नुकत्याच २०२४ च्या ऑालिम्पिक स्पर्धा संपल्या आहेत. त्यानिमित्त खेळाच्या मैदानावर जगभरचे राजकारण कसे खेळवले जाते, याचा आढवा. सविस्तर वाचा…
पुणे पोलिसांच्या परिमंडळ पाचमधील अवैध व्यवसाय करणाऱ्या आठ गुन्हेगारांना तडीपार करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी दिले. मुंढवा, बिबवेवाडी, मार्केटयार्ड , तसेच हडपसर पोलीस ठाण्यातील गुंडांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली.
Marathi News Today, 14 August 2024: राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा