Maharashtra Breaking News Updates, 14 August 2024: राज्य विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर आलेल्या असताना दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर दौरा करून आपली भूमिका स्पष्टपणे मांडायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे अजित पवार गटाच्या यात्रेतून छगन भुजबळांनीही जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आरक्षणाचा मुद्दा तापण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi News Today, 14 August 2024: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडी

11:54 (IST) 14 Aug 2024
शहरबात : ‘मिशन ३२’ मोहीम फत्ते होणार कशी? वाहने ३९ लाख; वाहतूक पोलीस अवघे ९००

पुण्यातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे. वाहतूककोंडीतून मार्ग काढणाऱ्या पुणेकरांना अक्षरश: जीव मुठीत धरून जावे लागते. कोंडीमुळे होणारे वादावादीचे प्रसंग नित्याचे झाले आहेत. सविस्तर वाचा…

11:53 (IST) 14 Aug 2024
पुणे : विसर्जन मिरवणुकीत ‘लेझर’ प्रकाशझोतांवर बंदी; मानाच्या मंडळाच्या बैठकीत पोलीस आयुक्तांचा निर्णय

वैभवशाली विसर्जन परंपरा असलेल्या पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत गेल्या काही वर्षांपासून डोळे दिपवणाऱ्या प्रकाशझोतांचा (लेझर बीम) वापर करण्यात येत आहे. लेझर प्रकाशझोतांमुळे डोळ्यांना इजा पोहोचल्याच्या घटना गेल्या वर्षी घडली होती.

सविस्तर वाचा…

11:52 (IST) 14 Aug 2024
पिंपरी-चिंचवड: हप्ता वसुली करणाऱ्या भाईला बेड्या; पोलिसी खाक्या दाखवताच हात जोडून मागितली माफी

पिंपरी- चिंचवडच्या पिंपळे गुरव मध्ये पान टपरी वरून हप्ता वसुली करणाऱ्या भाईला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. हप्ता वसुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अखेर या भाईला पोलिसांनी योग्य ती समज देत चक्क माफी मागायला लावली आहे.

सविस्तर वाचा…

11:52 (IST) 14 Aug 2024
पनवेलमध्ये १२ हजार हेक्टर भातशेती हद्दपार

मुंबईतील वाढत्या लोकसंख्येसाठी पर्याय म्हणून नवी मुंबईनंतर पनवेलचा शहर म्हणून विकास केला जात आहे.

सविस्तर वाचा…

11:51 (IST) 14 Aug 2024
सीएसएमटी – दिवा लोकलसाठी दिवेकरांचे हाताला काळ्या फिती बांधून आंदोलन

दिवा ते सीएसएमटी रेल्वे सेवा आणि कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिव्यात थांबा मिळावा यासाठी बुधवारी सकाळी दिव्यातील प्रवाशांनी हाताला काळ्या फिती बांधून आंदोलन केले. तसेच दिवा-सीएसएमटी रेल्वे सेवा सुरू झालीच पाहीजे अशी मागणी केली.

सविस्तर वाचा…

11:50 (IST) 14 Aug 2024
ठाणे : वाहतुक शाखेच्या प्रमुखपदी कोणाची वर्णी? डॉ. विनयकुमार राठोड यांच्या बदलीनंतर पोलीस दलात कुजबुज

जनतेशी थेट संपर्क असलेले खाते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे वाहतुक शाखेच्या प्रमुखपदी उपायुक्त दर्जाचा अधिकारी असतो. गेल्याकाही वर्षांपासून या खात्याची ओळख ‘मलईदार’ खाते म्हणून झाली आहे. सविस्तर वाचा…

11:49 (IST) 14 Aug 2024
रत्नागिरीत महिला बचत गट सक्षम करण्यासाठी सिंधुरत्न विकास योजनेंतर्गत पर्यटन बस व हाऊसबोट प्रकल्प

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी आणि महिला बचत गटांच्या उत्पन्न वाढीसाठी  केरळ राज्याप्रमाणे रत्नागिरी जिल्हा परिषदेने सिंधुरत्न विकास योजनेंतर्गत  चार आधुनिक पर्यटन बस तसेच पाच हाऊसबोट विकत घेतल्या आहेत. सविस्तर वाचा…

11:48 (IST) 14 Aug 2024
सातारा : विरोधात काम केल्यास निवडणुकीनंतर ‘लाडकी बहीण’मधून नावे वगळणार; आमदार महेश शिंदेंचे वादग्रस्त वक्तव्य

सातारा:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे पैसे या महिन्यापासून मिळण्यास सुरुवात होईल. मात्र ज्या लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेऊनही विरोधात काम करतील, निवडणुकीनंतर त्यांची नावे या योजनेतून वगळली जातील.

सविस्तर वाचा…

11:39 (IST) 14 Aug 2024
नवी मुंबई: भक्कम इमारतीही पुनर्विकास सापळ्यात; घणसोली परिसरात माफियांचे पेव, खासगी संस्थांच्या अहवालावर इमारती धोकादायक ठरवण्याचे प्रकार

सिडकोने बांधलेल्या तसेच ३० वर्षांहूनही अधिक जुन्या झालेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचे वारे नवी मुंबईत वाहत असताना या लाटेत हात धुऊन घेण्यासाठी बांधकाम माफियांची टोळी सक्रिय झाली आहे.

सविस्तर वाचा…

11:35 (IST) 14 Aug 2024
खाशाबांना ‘पद्मविभूषण’साठी पाठपुरावा करू – मुरलीधर मोहोळ

कराड : ऑलिम्पिकवीर, ख्यातनाम मल्ल (कै.) खाशाबा जाधव यांचा मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान व्हावा या मागणीसाठी भेटलेल्या कुस्तीप्रेमींच्या शिष्टमंडळाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी खाशाबांच्या या सन्मानासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही दिली आहे.

पहिलवान रणजीत जाधव, दौलतराव इंगवले, श्रीनिवास डुबल आदी कुस्तीप्रेमींच्या शिष्टमंडळाने कराडमध्ये मंत्री मोहोळ यांची भेट घेवून त्यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले. यावर सकारात्मकता दर्शवत आपण स्वतः लक्ष घालून खाशाबांना ‘पद्मविभूषण’साठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही मुरलीधर मोहोळ यांनी दिली. त्यामुळे भारताला ऑलिम्पिकमधील वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिले कांस्यपदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव यांच्या यथोचित सन्मानाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे १९५२ साली झालेल्या स्पर्धेत फ्री स्टाईल ५७ किलो वजनी गटातील कुस्ती जिंकून खाशाबा जाधव यांनी इतिहास रचला. कराड लगतच्या गोळेश्वरचे सुपुत्र पहिलवान खाशाबा दादासाहेब जाधव यांनी अत्यंत प्रतिकूल व खडतर परिस्थितीवर मात करत ऑलिम्पिकमध्ये पदकाला गवसणी घातली. परंतु, केंद्र सरकारने त्यांच्या कार्याचा आजवर उचित गौरव केला नसल्याची खंत आहे.

11:32 (IST) 14 Aug 2024
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयास गज़ल गायक हरिहरन यांची भेट

सातारा: प्रसिद्ध गज़ल गायक हरिहरन यांनी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयास सदिच्छा भेट दिली.हरिहरन यांनी संग्रहालयाचे तक्त दालन, शस्त्र दालन, वाघनखे दालन, नाणी दालन तसेच जतन व संवर्धन कामाची पाहणी केली. संग्रहालयातील पुरातन शस्त्रे, शिवकालीन वाघनखे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा चंदनातील हाताचा ठसा, सोन्याची नाणी पाहून समाधान व्यक्त केले व छत्रपती शिवाजी महाराज एक रयतेचे महान राजे होते असे गौरवोद्गार काढले. हरिहरन यांनी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आपल्या कुटुंबीय आणि सहकाऱ्यांसह फिरून पाहिले. एवढा मोठा दुर्मीळ खजिना पाहून त्यांना खूप आनंद झाला. यावेळी संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी जतन संवर्धन टीम तज्ज्ञ अनंत शेळके, मधुरा शेळके, कीर्ती जोशी त्याचप्रमाणे नाणी तज्ज्ञ अशितोष पाटील. सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे उपस्थित होते.

11:26 (IST) 14 Aug 2024
Manoj Jarange Patil Ultimatum to Mah Govt: मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला अल्टिमेटम

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला २९ ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यावर ते म्हणाले, “२९ नंतर कुणावर परिणाम होतोय ते बघू. उभं करायचं की पाडायचं हे बघू. त्यांना खुर्ची प्रिय आहे. पण त्यांची खुर्ची आम्ही पाडणार हे नक्की. सहन करायची मर्यादा असते. तुम्ही वेड्यात काढता. वेळोवेळी कारणं सांगून तुम्ही टाळता. माणसाच्या अंगात किती चाळे असावेत”.

11:21 (IST) 14 Aug 2024
Supriya Sule on Maharashtra Assembly Election 2024: राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

आम्ही महाविकास आघाडी म्हणून २८८ जागांवर निवडणूक लढवणार आहोत. मुख्यमंत्रीपद हा विषयच आमच्यापुढे नाही. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार अशी खूप मोठी आव्हानं राज्याच्या आणि देशाच्या समोर आहेत. आम्ही सगळ्यांना न्याय देणारं, महाराष्ट्रात गुंतवणूक आणणारं आणि आलेली गुंतवणूक इथेच राखून ठेवणारं असं पारदर्शक सरकार आम्ही देणार आहोत – सुप्रिया सुळे</p>

छगन भुजबळ आणि मनोज जरांगे, (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Marathi News Today, 14 August 2024: राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा