Maharashtra Politics Updates : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. याप्रकरणावरुन अजूनही राज्यातील राजकारण तापलेलं आहे. तसेच ठाकरे गटाचे काही खासदार शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. याबरोबरच अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यात उमटताना दिसत आहेत. या प्रकरणात प्रशासन काही कारवाई करणार का हे पाहावे लागणार आहे. यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले आहेत. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यासह राजकीय व इतरही महत्त्वाच्या घडामोडीची अपडेट आपण लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमांतून जाणून घेऊयात…

Live Updates

Marathi News Live Update Today | महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

20:03 (IST) 10 Feb 2025

माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता, पोलिसांकडून तपास सुरु

शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हा पुण्यातून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे विमानतळावरून ऋषीराज सावंत दुपारपासून बेपत्ता झाला आहे. दरम्यान, याबाबातची माहिती पोलिसांना समजताच पुणे पोलीस विमानतळावर दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे. या घटनेमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

सविस्तर वाचा

18:32 (IST) 10 Feb 2025

भयंकर कृत्य : चंद्रपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलाचा तीन वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

चंद्रपूर : जिल्ह्यातील पडोली पोलीस ठाण्यांतर्गत पडोली-घुग्घुस मार्गावर असलेल्या चिंचाडा गावाजवळच्या एका वीटाभट्टीवर काम करणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलाने तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घृणित कृत्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

सविस्तर वाचा...

18:19 (IST) 10 Feb 2025

निळजे रेल्वे पुलाचे काम विहित वेळे अगोदरच पूर्ण

कल्याण : निळजे रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे अवजड काम विहित वेळेच्या एक दिवस अगोदरच पूर्ण झाले. पुलाची लहान, किरकोळ स्थापत्य कामे आता पूर्ण केली जात आहेत. ही कामे आता पुलाखालील किरकोळ कामे असल्याने वाहतुकीचा या कामांशी संबंध नाही. त्यामुळे पुलावरील वाहतूक सोमवारी रात्री १२ वाजल्यानंतर आता नियमित सुरू होऊ शकेल, असे रेल्वेच्या अभियंत्याने सांगितले

सविस्तर वाचा...

18:08 (IST) 10 Feb 2025

विद्यार्थ्यांनो स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा .. !! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पत्र

ठाणे : विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण हा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. आगामी परीक्षांच्या काळात तुम्ही निर्धास्त, आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे परीक्षेस सामोरे जावे, यासाठी जिल्हा प्रशासन आपल्यासोबत आहे. '' भयमुक्त कॉपीमुक्त परीक्षा '' या संकल्पनेला बळ देण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा.

सविस्तर वाचा...

17:55 (IST) 10 Feb 2025

कल्याण पूर्वेत आडिवली भागात कोयता टोळीकडून कलिंगड विक्रेत्यांवर हल्ला

कल्याण : कल्याण पूर्व भागातील गुन्हेगारांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी पोलिसांनी या भागातील गुन्हेगारांना तडीपार केले. विशाल गवळी तुरुंगात आहे. तरीही कल्याण पूर्वेतील गुन्हेगारांचे दहशत माजविण्याचे उद्योग कमी होत नसल्याने नागरिक भयभीत आहेत. कल्याण पूर्वेतील आडिवली ढोकळी भागात शनिवारी रात्री एका कलिंगड विक्रेता आणि त्याच्या सहकाऱ्यावर कोयता टोळीने कोयत्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे

सविस्तर वाचा...

17:49 (IST) 10 Feb 2025

वेगळा पक्ष काढण्याच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “त्या विधानाचा अर्थ…”

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी (९ फेब्रुवारी) नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना एक मोठं विधान केलं होतं. “गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या एवढी मोठी आहे की एकत्रित केल्यास एखादा पक्ष उभा राहील”, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं. मात्र, यानंतर आता पंकजा मुंडे यांनी त्यांच्या विधानासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. “आता त्या विधानाचा अर्थ तुम्हाला जसा लावायचा तसा लावण्याचा प्रयत्न केला तरी तो अर्थ तसा निघणार नाही”, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

सविस्तर वाचा

17:09 (IST) 10 Feb 2025

अहिल्यानगर : जगदंबा देवीला दोन किलो वजनाचा सोन्याचा मुकुट

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील तेराशे वर्ष पुरातन असणाऱ्या श्री जगदंबा देवी मंदिरामध्ये दोन किलो वजनाचा सोन्याचा मुकुट बसवण्यात आला.

वाचा सविस्तर...

16:41 (IST) 10 Feb 2025

कुंभमेळाच्या विशेष गाडीसाठी दोन दिवस पॅसेंजर गाडीला ब्रेक

नागपूर : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेतर्फे कुंभमेळासाठी विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येत आहे. या गाडीला गोंदिया - जबलपूर -गोंदिया पॅसेंजर गाडीचे डबे वापरण्यात येणार आहे. त्यामुळे नियमित धावणारी पॅसेंजर गाडी दोन दिवस रद्द करण्यात येत आहे. कुंभमेळा स्पेशल ट्रेन सुरू करण्यासाठी जबलपूर-गोंदिया-जबलपूर ट्रेनचा ‘रेक’ वापरण्यात येत आहे.

सविस्तर वाचा...

16:28 (IST) 10 Feb 2025

बदलापुरातील ” ती ” शाळा अखेर बंद .. ! विनयभंग प्रकरणातील अनधिकृत शाळेवर जिल्हा प्रशासनाची कारवाई

बदलापूर येथील एका शाळेत १४ वर्षाच्या मुलीचा शाळेतील शिक्षकानेच विनयभंग केल्याची संतापजनक घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. ही शाळाच अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. या शाळेवर आता कारवाई करण्यात आली आहे.

वाचा सविस्तर...

16:11 (IST) 10 Feb 2025

नंदुरबारमधील शहादा येथे भीषण आग! ८-९ दुकाने जळून खाक

नंदुरबारच्या शहादा येथील प्रकाशा रोडवर भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत कार दुरुस्ती गॅरेज, इलेक्ट्रिकल स्टोअर आणि मंडप साहित्य दुकानासह ८-९ दुकाने जळून खाक झाली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान काम करत आहेत. अंदाजे ५०-६० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, वाहनांचेही नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

15:59 (IST) 10 Feb 2025

पुण्यात उच्चभ्रू सोसायटीत सापडले पाकिस्तानी चलन

पुण्याच्या बावधन मध्ये पाकिस्तानी चलनातील नोट सापडली आहे. यामुळं पिंपरी- चिंचवड पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

वाचा सविस्तर...

15:44 (IST) 10 Feb 2025

नांदेड पुन्हा गोळीबाराने हादरले, एकाचा मृत्यू, गुरुद्वारा गेट क्र.६ भागातील घटना

नांदेड : पूर्ववैमनस्यातून नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरात गोळीबाराची घटना घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना सोमवार (दि.१०) रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली.

वाचा सविस्तर...

15:36 (IST) 10 Feb 2025

‘एमपीएससी’च्या शेकडो विद्यार्थ्यांचा मुंबईमध्ये आंदोलनाचा इशारा, सरकारच्या या धोरणा विरोधात…

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) राजपत्रित आणि अराजपत्रित अधिकाऱ्यांच्या विविध पदांसाठी परीक्षा घेतली जाते. परंतु, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत, असा मोठा टप्पा सर करून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि अन्य महत्त्वाच्या पदांवर निवड झालेल्या अधिकाऱ्यांना अनेक वर्षे नियुक्तीची प्रतीक्षा करावी लागते, असे चित्र आहे.

सविस्तर वाचा...

15:05 (IST) 10 Feb 2025

दंड वसुलीनंतरही अवैध प्रवाशांची संख्या कमी होईना

नागपूर : दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, सोबतच वाढणारी प्रवासी संख्या या तुलनेत रेल्वेगाड्या उपलब्ध होत नसल्याने विनातिकीट किंवा सर्वसाधारण तिकीट घेऊन शयनयान डब्यातून प्रवास करणाऱ्या अवैध प्रवाशांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे.

सविस्तर वाचा...

14:24 (IST) 10 Feb 2025

हत्या करून दुचाकीवरून मृतदेह नेला, तीन तासात महिलेसह दोघांना अटक

मुंबई : धारदार शस्त्राने पतीची हत्या करणाऱ्या पत्नीसह दोघांना अटक करण्यात मालवणी पोलिसांना यश आले आहे. आरोपी महिलेने घरातच धारदार शस्त्राने तिच्या पतीची हत्या केली व परिचीत व्यक्तीच्या मदतीने दुचाकीवरून मृतदेह नेऊन फेकून दिला होता. पण सीसीटीव्ही चित्रिकरणाच्या मदतीने पोलिसांनी तीन तासांत दोघांना अटक करून हत्येच्या गुन्ह्यांची उकल केली.

वाचा सविस्तर...

14:23 (IST) 10 Feb 2025

एटीएममधून पैसे काढणारे ज्येष्ठ नागरिक ‘लक्ष्य’, मदतीच्या बहाण्याने फसवणुकीचे तीन गुन्हे

पुणे : एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांवर पाळत ठेवून त्यांची फसवणूक करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. मदत करण्याच्या बहाण्याने एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठांचे एटीएम कार्ड आणि सांकेतिक शब्द घेऊन चोरटे फसवणूक करत असल्याचे दिसून आले आहे. अशा प्रकारचे तीन गुन्हे लष्कर, कोथरुड आणि पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.

वाचा सविस्तर...

14:23 (IST) 10 Feb 2025

कळसच्या माळरानावर फुलतोय, फुलांचा राजा ‘गुलाब’

निसर्गाच्या लहरीपणामुळे परंपरागत शेतीला फाटा देत कळस ता. इंदापूर येथील सुमारे २५ शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रात गुलाबाची लागवड केली आहे. त्यांनी श्रमातून फुलवलेल्या गुलाब शेतीचा सुगंध आता चांगलाच दरवळत आहे.

वाचा सविस्तर...

14:11 (IST) 10 Feb 2025

टिटवाळा बल्याणी टेकडी परिसरातील १३० बेकायदा चाळी जमीनदोस्त, चार दिवस सलग कारवाई

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बल्याणी टेकडी परिसर बेकायदा बांधकामांचे आगर झाली होती. या बेकायदा बाधकामांमध्ये समाजकंटकांचा निवास होण्याची भीती स्थानिकांकडून पालिका, पोलिसांकडे व्यक्त केली जात होती. सविस्तर वाचा…

13:56 (IST) 10 Feb 2025

चोरी करण्यासाठी चोर वापरायचा महागडी कार…पाच हजाराची जीन्स आणि तीन हजाराची…

नागपूर : सुट-बूट घालून एक युवक कारने वस्तीत येत होता. हातात लाखभर किंमतीचा भ्रमणध्वनी घेऊन वस्तीतील लग्न घर हेरायचा. कार उभी करुन लग्नघरातील दागिने, सामान आणि दागिन्यांवर हात साफ करायचा. चोरीच्या पैशांवर मौजमजा करायचा. पैसे संपल्यानंतर पुन्हा अशाचप्रकारे चोरी करायला निघायचा. अशा ‘हायफाय’ असलेल्या चोरट्याला हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली.

सविस्तर वाचा...

13:40 (IST) 10 Feb 2025

निम्मी रात्र अंधारात, सकाळी पाणीही कमी दाबाने अंबरनाथकरांचे हाल, पडघा येथून येणाऱ्या वाहिनीवर झालेला बिघाड

अंबरनाथ : पडघा येथील विद्युत केंद्रातून निघणाऱ्या वाहिनीवर झालेल्या बिघाडामुळे अंबरनाथकरांची रविवारची रात्र अंधारात गेली. संपूर्ण वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी मध्यरात्रीच्या तीन वाजेपर्यंतची वाट पहावी लागली. स्थानिक महावितरण अधिकाऱ्यांनी चक्राकार पद्धतीने वीज पुरवठा केल्याने काही अंशी दिलासा मिळाला.

सविस्तर वाचा...

13:22 (IST) 10 Feb 2025

"अजब योगायोग आहे", हरियाणा आणि दिल्ली निवडणूक निकालाबाबत राऊतांची पोस्ट चर्चेत

"हरियाणामध्ये मतदान ५ तारखेला आणि मतमोजणी ८ तारखेला भाजपाच्या जागा ४८. दिल्ली देखील ५ तारखेला मतदान ८ तारखेला मतमोजणी भाजपाच्या जागा आल्या ४८. अजब योगायोग आहे," अशी पोस्ट संजय राऊत यांनी एक्सवर केली आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

13:18 (IST) 10 Feb 2025

क्रांतिभूमी चिमूरमध्ये दरवर्षी भरते घोडा यात्र, ३९७ वर्षाची परंपरा

चंद्रपूर : चिमूर येथील बालाजी महाराज मंदिराला व घोडा यात्रेला ३९७ वर्षाच्या इतिहासाची परंपरा आहे. श्री बालाजी महाराज मंदिराला महाराष्ट्राचा तिरुपती बालाजी म्हणून ओळखले जाते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत चिमूर येथे श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान हे अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान ठरले आहे

सविस्तर वाचा...

13:15 (IST) 10 Feb 2025
परीक्षापे चर्चा कार्यक्रमाच्या निमित्ताने फडणवीसांचा विद्यार्थ्यांशी संवाद

"प्रत्येकामध्ये सकारात्मकता असली पाहिजे, आव्हानं तर आहेतच. जगातील सगळ्यात श्रीमंत आणि गरीब व्यक्तीपुढेही आव्हाने आहेत. पंतप्रधान आणि तुमच्या पुढेही आव्हानं आहेत. या सर्व आव्हानांना सामोरे जात असताना सकारात्मकता हा त्यांनी (पीएम मोदी) दिलेला मंत्र आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. दुसरा मंत्र म्हणजे, स्वतःशी स्पर्धा करणं. ही स्पर्धा केली तर मनातील भीती निघून जाते", परीक्षापे चर्चा कार्यक्रमाच्या निमित्ताने फडणीसांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

दादर शिवाजी पार्क येथे स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी 'परीक्षा पे चर्चा 2025' या कार्यक्रमात ऑनलाईन सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सहभागी झाले होते.

13:01 (IST) 10 Feb 2025

माझी पुन्हा एन्ट्री होणार, बच्चू कडूंचे वक्तव्य, माझ्यावर कारवाईमुळे विरोधकांना फार लाभ होणार नाही

अंबरनाथ : मी क्रिकेट खेळाडू नाही तर कबड्डीवाला आहे. कबड्डीमध्ये मेलेला गडी पुन्हा जिवंत होतो. त्याचप्रमाणे माझी पण पुन्हा इन्ट्री होणार, असे वक्तव्य प्रहारचे बच्चू कडू यांनी केले आहे.

सविस्तर वाचा...

12:49 (IST) 10 Feb 2025

ठाकुर्लीतील संतवाडीतील रस्ते बाधितांंना खंबाळपाडा, ‘बीएसयुपी’मधील घरे

कल्याण : डोंबिवलीजवळील ठाकुर्ली रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाने बाधित होत असलेल्या संतवाडीमधील ६० रहिवाशांना ठाकुर्ली खंबाळपाडा भोईरवाडीमधील केंद्र, राज्य सरकारच्या निधीतून उभारलेल्या शहरी गरीबांसाठी घरे योजनेतील इमारतीत (बेसिक सर्व्हेिसेस फाॅर अर्बन पुअर) घरे देण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली पालिकेने घेतला आहे.संतवाडीमधील ६० रहिवाशांना सोडत पध्दतीने खंबाळपाडा भोईरवाडीतील ६० घरांचा ताबा देण्याची पत्रे पालिकेकडून देण्यात आली.

सविस्तर वाचा...

12:45 (IST) 10 Feb 2025

पोलीसांच्या मदतीने सराफांना दीड कोटींना लुटले, दोन पोलीसांसह चौघांना अटक, रायगडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सदरक्षणाय खल निग्रणाय हे पोलीस दलाचे ब्रीद वाक्य आहे. पण रायगड पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांना याचा विसर पडला की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण पोलीसांच्या मदतीने सराफांना दीड कोटी रुपयांना लुटल्याची बाब समोर आली आहे.

वाचा सविस्तर...

12:33 (IST) 10 Feb 2025

राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या, पुढील २४ तासात असे असेल तापमान

रात्री आणि पहाटे थंडी तर दिवसा मात्र उन्हाच्या तीव्र झळा. गेल्या आठ दिवसांपासून राज्यातील वातावरण असेच काहीसे झाले आहे. पण आता मात्र उन्हाच्या झळा आणखी तीव्र होणार आहेत. सविस्तर वाचा…

12:32 (IST) 10 Feb 2025

अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, ७४ टक्के प्रकरणे अल्पवयीन मुलींशी निगडीत

जिल्ह्यात गेल्या वर्षभरात १३२ बलात्काराच्या घटना समोर आल्या. चिंताजनक बाब म्हणजे यातील ९८ प्रकरणे ही अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची होती. म्हणजेच जिल्ह्यात दाखल होणाऱ्या ७४ टक्के गुन्हे हे अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराशी निगडीत आहेत. ही एक चिंताजनक बाब आहे. सविस्तर वाचा…

12:29 (IST) 10 Feb 2025

आदिवासींचा "कोयापुनेम" महोत्सव काय आहे? आजपासून सुरुवात

गोंदिया : आदिवासींचे श्रध्दास्थान कचारगड येथे माघ पौर्णिमेला सोमवार १० फेब्रुवारी पासून कोयापुनेम महोत्सवाला सुरुवात झाली. तो पाच दिवस चालणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने आदिवासी आपल्या कुलदैवतेचे स्मरण करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून कचरागड येथे दाखल होतात. दरवर्षी माघ पौर्णिमेला गोंडी धर्मपरंपरा, बोलीभाषा, पूजन - विधी, नृत्यकला, संस्कृतीचे दर्शन येथे घडते.

सविस्तर वाचा...

12:19 (IST) 10 Feb 2025

चाळकेवाडीच्या पठारावर आढळतात "हे" नवनवे जीव

नागपूर : पाल म्हंटलं की तिला हाकलण्याच्याच मागे सारे लागतात, पण बाह्य जगात एवढ्या वेगवेगळ्या आणि सुंदर पाली आहेत, की कुणीही त्यांच्या प्रेमात पडावे. संशोधक अशा नवनवीन पालींच्या प्रजाती शोधून काढतात. सातारच्या चाळकेवाडी पठारावर अशाच एका नवीन पालीच्या प्रजातीचा शोध लागला आहे.

सविस्तर वाचा...

Marathi News Live Update Today | महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Maharashtra News Live Updates in Marathi

महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स

Story img Loader