Maharashtra Politics Updates : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. याप्रकरणावरुन अजूनही राज्यातील राजकारण तापलेलं आहे. तसेच ठाकरे गटाचे काही खासदार शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. याबरोबरच अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यात उमटताना दिसत आहेत. या प्रकरणात प्रशासन काही कारवाई करणार का हे पाहावे लागणार आहे. यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले आहेत. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यासह राजकीय व इतरही महत्त्वाच्या घडामोडीची अपडेट आपण लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमांतून जाणून घेऊयात…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Marathi News Live Update Today | महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…
१४ गंभीर गुन्हे दाखल असलेला कुख्यात भिवंडीचा ‘तात्या’ अटकेत; खासदार सुरेश म्हात्रे यांनी उपस्थित केला होता लोकसभेत विषय
बीड, परभणीसारख्या गंभीर परिस्थितीची पुनरावृत्ती भिवंडी शहर, ग्रामीण भागात निर्माण होऊ नये. भिवंडी शहर परिसरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी लोकसभेत १४ गंभीर गुन्हे दाखल एका कुख्यात इसमाचा उल्लेख संसदेत करून कारवाईची मागणी केली होती.
गडकरींनी सांगितल्या रोजगाराच्या लाखो संधी: साडेसात लाख कोटींची विदर्भात गुंतवणूक
नागपूर : खासदार औद्योगिक महोत्सवाच्या दुसऱ्या आवृत्तीमधून विविध प्रकल्पांमधून साडेसात लाख कोटींची गुंतवणूक विदर्भात होत आहे. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यात जगात सर्वात उत्तम दर्जाचे लोहखनिज असून यामुळे नजीकच्या जिल्ह्यात मोठमोठे उद्योग सुरू होतील आणि रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
खासदार फुटीच्या चर्चेवर एकनाथ शिंदे यांची टोलेबाजी
ठाणे : आनंद दिघे साहेबांचा चित्रपट सुपरहीट झाला आणि आपला विधानसभेचा पिक्चर देखील सुपरहीट झाला.. आता तिसरा सिनेमा आपल्याला काढायचा आहे. आता कोणता? त्याचे नाव काय? याची मला माहिती नाही. पण तो देखील सुपरहीट होणार आहे असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
डॉक्टर नसतानाही मी मोठे ऑपरेशन केलेत, मला हलक्यात घेऊ नका…, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे डॉक्टर आहेत. ते ऑपरेशन करतात. पण मी डॉक्टर नसताना मोठे-मोठे ऑपरेशन केले आहेत. ते पण भूल न देता केले आहेत. त्यामुळे मला कोणीही हलक्या घेऊ नका अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली. शेवटच्या क्षणापर्यंत महाराष्ट्राची सेवा करणे हेच माझे कर्तव्य आहे असे शिंदे म्हणाले.
‘एसटी’त सर्व अधिकार संचालक मंडळालाच, परिवहन मंत्र्यांकडून दबावाचा…
नागपूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) हे जनतेशी संबधित असल्याने अध्यक्षपदी राजकीय व्यक्तीच असावी. यात दुमत नाही. पण परिवहन खात्याचा मंत्री मीच आहे, त्यामुळे माझा निर्णय हाच अंतिम असेल, हे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे वक्तव्य हे अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी आहे. या वक्तव्याबाबत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने बरेच गुपित उघड केले.
नवी मुंबईत कंत्राटी सफाई कामगारांचे आंदोलन सुरु ! पालिकेने नाका कामगारांकडून कचरा संकलन सुरु केल्याचा दावा…
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात साफसफाई करणाऱ्या कंत्राटी कामगारांनी बेकायदेशीर काम बंद आंदोलन करू नये असे आवाहन नवी मुंबई महापालिका प्रशासनाने केल्यानंतरही केल्यानंतरही कामगार संघटनांनी सकाळपासूनच काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
मोदी साहेबांनी मला आठवणीने फोन केला आणि म्हणाले… एकनाथ शिंदे यांचे ठाण्यात वक्तव्य
ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रविवारी वाढदिवस होता. या वाढदिवसा निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केला आणि मराठीतूनच त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच ते पुढे म्हणाले की मी मुख्यमंत्री नसतानाही मोदी, शहा यासह अनेकांनी आठवणीने मला फोन केला.
नॅक मूल्यांकनाची नवी पद्धती एप्रिल-मेमध्ये लागू?
नॅक मूल्यांकनासाठी समितीच्या लाचखोरीच्या प्रकरणामुळे नॅक मूल्यांकनाच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना आता राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून (नॅक) नवी मूल्यांकन पद्धती एप्रिल-मेमध्ये अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.
दहावी, बारावीच्या ऐन परीक्षा काळात शिक्षकांना क्षमता वृद्धीचे प्रशिक्षण
राज्य मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षा काळात शिक्षकांसाठी १० फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत क्षमतावृद्धी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. मात्र, परीक्षेचे कामकाज करताना प्रशिक्षणाला उपस्थित कसे राहायचे, असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे, सविस्तर वाचा…
मुंबई विमानतळावर कारवाईत आठ कोटींचा गांजा जप्त; दोघांना अटक, सीमाशुल्क विभागाची कारवाई
मुंबई : सीमा शुल्क विभागाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर केलेल्या कारवाईत बँकॉकहून आलेल्या दोन प्रवाशांकडून सव्वा आठ किलो गांजा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सव्वा आठ कोटी रुपये आहे. दोेन्ही आरोपींविरोधात सीमाशुल्क कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बँकॉकहून येणारे संशयीत प्रवासी तेथून गांजा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
उद्योगपतींना पायघड्या घालताना ‘रेवडी’चा विषय नाही
‘स्वातंत्र्यानंतरही देशातील अनेकांना आवश्यक प्राथमिक सुविधा मिळत नाहीत. त्यांच्यासाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांना रेवडी म्हणता येणार नाही’, अशी परखड भूमिका झारखंड विधानसभेचे अध्यक्ष रवींद्रनाथ महातो यांनी मांडली. सविस्तर वाचा…
इंस्टाग्रामवरील पोस्ट ! एकाचा खून आणि दोन बंधू पोलीस कोठडीत,
वर्धा : सोशल मीडियावरील पोस्ट पाहून गुन्हा करणारे व गुन्हा करीत तो सोशल मीडियावार टाकणारे, असे दोन वर्ग झपाट्याने वाढत असल्याचे पाहायला मिळते. ही घटना यापैकीच. हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव माथणकर या गावात पोस्टमुळे रक्ताचा सडा पडल्याचे दिसून आले आहे.
या आठवड्यात मटार उसळीचा बेत; आवक वाढल्याने किरकोळ बाजारात ४० ते ५० रुपये किलो दर
परराज्यातून होणारी मटारची आवक वाढली आहे. त्यामुळे मटार स्वस्त झाला असून, किरकोळ बाजारात एक किलो मटारचे दर ४० ते ५० रुपयांपर्यंत इतके आहेत. ‘मध्य प्रदेशात मटारची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. सविस्तर वाचा…
मोटरचालकाची मुजोरी; दुचाकीस्वार तरुणाला फरफटत नेले; खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोटारचालक अटकेत
पुणे-सोलापूर रस्त्यावरील भैरोबानाला चैाकात मोटारीने दुचाकीस्वार तरुणाला धडक दिली. दुचाकीस्वार तरुणाने मोटारीचे छायाचित्र मोबाइलवर काढल्यानंतर मुजोर मोटारचालकाने त्याच्या अंगावर मोटार घातली. तरुणाला एक किलोमीटर फरफटत नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. सविस्तर वाचा…
Pune GBS Updates : पुण्यातील ५५ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य! राज्य आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणीतील निष्कर्ष
पुण्यात नांदेडगाव परिसरात गुइलेन बॅरे सिंड्रोमचा उद्रेक झाला आहे. या परिसरातील पाण्याचे नमुने रासायनिक आणि जैविक तपासणीसाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यातील ५५ ठिकाणचे पाणी नमुने दूषित आढळले असून, ते पिण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. सविस्तर वाचा…
पिझ्झा मागवल्याने विद्यार्थिनींना नोटीस; कुठे घडला हा प्रकार?
शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींनी खाण्यासाठी बाहेरून पिझ्झा मागविल्याने संबंधित विद्यार्थिनींना वसतिगृहामधील प्रवेश एक महिन्यासाठी रद्द करण्यात येईल, अशी नोटीस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून बजावण्यात आली आहे.
देहू: एकनाथ शिंदेंनी शिरीष महाराजांच्या कुटुंबाला केली आर्थिक मदत; ३२ लाखांचं कर्ज…
देहूत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी नुकतीच आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली होती. त्यांच्यावर ३२ लाखांच कर्ज होतं. कर्जाचा उल्लेख आत्महत्येपूर्वी लिहिलेला चिठ्ठीत केला होता. सविस्तर वाचा…
मुंबई, नवी मुंबई व ठाण्यातून १६ बांगलादेशी नागरिकांना अटक
नवी मुंबई, मानखुर्द, मुंब्रा, दारूखाना येथे मुंबई पोलिसांनी शनिवारी केलेल्या कारवाईत १६ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींमध्ये ९ महिला व सात पुरूषांचा समावेश आहे. सविस्तर वाचा…
सहा जणांच्या माघारीनंतर मतदान यंत्र पडताळणीच्या रिंगणात उरले एकमेव पराभूत शंकरराव गडाख
लोकसभा निवडणुकीतील एक व विधानसभा निवडणुकीतील १० अशा एकूण ११ पराभूत उमेदवारांनी निवडणुकीतील मतदान यंत्र पडताळणीसाठी अर्ज केले असले तरी प्रत्यक्षात मात्र आता केवळ एकच उमेदवार पडताळणीच्या रिंगणात राहिला आहे. सविस्तर वाचा…
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचा पक्ष सदस्यत्वचा राजीनामा; ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता
अहिल्यानगरःकाँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पदासह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आपले राजीनामा पत्र त्यांनी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेसचे कार्य समितीचे सदस्य तथा ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना पाठवले आहे. सविस्तर वाचा…
“हा व्हिडिओ बघा! भाजपाचे आमदार सुरेश धस यांचा दुटप्पीपणा. एकीकडे सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी काढण्यात आलेल्या मोर्च्यात सुरेश धस सहभागी होतात. आणि दुसरीकडे म्हणतात की पोलिसांवर गुन्हे दाखल करू नका..भाजप आमदार पोलिसांना क्लिनचीट का देत आहे? सोमनाथ सुर्यवंशी यांच्या जीवाची किंमत नाही का? एका आईने आपला मुलगा आणि कुटुंबाने आधार गमावला आणि पोलिसांना फक्त सुनावलं म्हणून सोडून द्यायचे? हा न्याय असू शकतो का? सुरेश धस यांना परभणी प्रकरणात सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय का मिळू द्यायचा नाही?”, अशी पोस्ट काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर केली आहे.
हा व्हिडिओ बघा!
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 10, 2025
भाजपचे आमदार सुरेश धस यांचा दुटप्पीपणा.
एकीकडे सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी काढण्यात आलेल्या मोर्च्यात सुरेश धस सहभागी होतात. आणि दुसरीकडे म्हणतात की पोलिसांवर गुन्हे दाखल करू नका..भाजप आमदार पोलिसांना क्लिनचीट का देत आहे?
सोमनाथ सुर्यवंशी यांच्या… pic.twitter.com/RLJDScEx5k
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट पाचवरील जिना प्रवाशांसाठी बंद, दिव्यांग प्रवाशांचे हाल, प्रवाशांना वळसा
डोंबिवली : डोंंबिवली पूर्व रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर कोपर दिशेने (पश्चिम) उतरण्यासाठी एक उतार जिना होता. या जिन्यावरून इतर प्रवाशांबरोबर दिव्यांग प्रवाशांना आपली तीन चाकी सायकल घेऊन चढ, उतार करणे शक्य होत होते. डोंबिवली रेल्वे स्थानकातील पूर्व, पश्चिम पादचारी पुलाच्या कामासाठी फलाट क्रमांक पाचवरील जिना प्रवाशांसाठी रेल्वेने बंद केला आहे.
CM Shinde Meet Raj Thackeray : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक राज ठाकरेंच्या भेटीला, राजकीय चर्चेला उधाण
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले आहेत. अचानक फडणवीस शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवस्थानी पोहचले आहेत. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. “कधी कधी काही व्यक्तिगत कामे असू शकतात. काही मैत्रीचे धागे असू शकतात, त्यामुळे भेट होऊ शकते. या भेटीमागचा उद्देश हा काही राज ठाकरे यांच्याबरोबर युतीची चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस गेले असे म्हणणे योग्य ठरणार नाही. अशा चर्चा कधीही चॅनलला माहिती होत नसतता. इतक्या खुलेपणे देवेंद्र फडणवीस गेले याचा अर्थ इथं कोणताही राजकीय हेतू नाही हे समजून घ्या”, अशी प्रतिक्रिया भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
Marathi News Live Update Today | महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…
महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स