Mumbai Maharashtra News Updates, 02 September 2024 : विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर आल्यामुळे राज्यात घडामोडींना वेग आला आहे. सध्या जवळपास सर्वच पक्षाचे नेत्यांचे महाराष्ट्रात दौरे सुरु आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीचा आढावा घेतला जात आहे. तसेच सभा, मेळावे आणि बैठका घेत आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. यातच महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण तापलं आहे. यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते, मंत्री तानाजी सावंत यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेल्या एका विधानामुळे महायुतीमध्ये धुसफूस सुरु असल्याची चर्चा आहे. यासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकीय अपडेट्स, पाऊस-पाण्याच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी हे पेज सतत रिफ्रेश राहा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra News Today, 02 September 2024

17:46 (IST) 2 Sep 2024
डोंबिवलीत गोग्रासवाडीत गणपती आगमन मिरवणुकीतील तरूणावर बाटलीने हल्ला

डोंबिवली येथील पूर्वेतील गोग्रासवाडीचा राजा या गणपतीची आगमन मिरवणुकीतून गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत जात असताना एका तरूणाने मिरवणुकीतील एका तरूणावर काचेच्या बाटलीने जोरदार हल्ला चढविला. या हल्ल्यात काचेची बाटली फुटून दोन जणांना लागली.

वाचा सविस्तर…

17:07 (IST) 2 Sep 2024
धाराशिव जिल्ह्याला पावसाने झोडपले; रस्ते पाण्याखाली, तेरणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

धाराशिव जिल्ह्यातील तेरणा नदीकाठच्या परिसरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. १६ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून कळंब तालुक्यातील इटकूर मंडळात सर्वाधिक १५० मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे.

वाचा सविस्तर…

16:39 (IST) 2 Sep 2024
ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू

शेतकऱ्यांनी खरीप हंगामात शेतात कापूस, सोयाबीन, भाजीपाला व अन्य कडधान्य पिकांची लागवड केली.मात्र,अचानक वर्धा नदी शेतकऱ्यांवर कोपली.नदीला आलेल्या पुराने शेतशिवार जलमय झाले. यामुळे ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले.

सविस्तर वाचा…

16:38 (IST) 2 Sep 2024
धक्कादायक : किरकोळ वादातून बँक कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करून खून, हडपसर भागातील घटना; तीन अल्पवयीनांसह चौघे ताब्यात

जेवण करून शतपावली करण्यासाठी निघालेल्या बँक कर्मचारी तरुणावर किरकोळ वादातून कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तीन अल्पवीयनासंह एका तरुणाला ताब्यात घेतले.

सविस्तर वाचा…

16:37 (IST) 2 Sep 2024
धनकवडीतील अकरा गणेश मंडळांची शनिवारी प्रतिष्ठापनेची संयुक्त मिरवणूक

प्रत्येक मंडळाच्या स्वतंत्र मिरवणुकीमुळे होणारी वाहनांची आणि कार्यकर्त्यांची गर्दी, ढोल-ताशा पथकांच्या वादनामुळे होणारे ध्वनिप्रदूषण या गोष्टींना दूर ककत धनकवडीतील अकरा गणेश मंडळांनी शनिवारी (७ सप्टेंबर) गणेश चतुर्थीला संयुक्त मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर वाचा…

16:36 (IST) 2 Sep 2024
Mumbai Local Train Update : पश्चिम रेल्वे, हार्बर मार्ग विस्कळीत

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वे २० ते ३० मिनिटे उशिराने धावत असल्याने आणि हार्बर मार्गावरील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. सविस्तर वाचा…

16:27 (IST) 2 Sep 2024
“आता सगळेच पवार घरोघरी फिरायला लागलेत”, अजित पवारांची बारामतीतून खोचक टीका

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची राज्यभर जनसन्मान यात्रा सुरु आहे. आज ही जनसन्मान यात्रा बारामतीत होती. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक टीका. “आता काही लोकं सांगत आहेत की दादा आता बारामतीत वेगळंच नाटतंय. आधी एवढे पवार घरी येत नव्हते. आता लई पवार घरी यायला लागले आहेत. आता सर्व पवार विचारपूस करत आहेत. गेल्या २५ ते ३० वर्षात कोणी आलं नाही. मात्र, आता काय रे बाबा तुझं कसं आहे? असं सर्वजण विचारत आहेत. मी म्हटलं चांगलं झालं ना, तुम्हालाही बरं वाटतं. आधी जे पवार फक्त मत मागत होते. आता ते पवार घरोघरी आणि दारोदारी फिरायला लागले आहेत. मग त्यामध्ये दोन्ही बाजूचे पवार फिरत आहेत”, अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

15:24 (IST) 2 Sep 2024
गणेशोत्सव कालावधीत एसटीच्या ४,९५३ बस आरक्षित

गणेशोत्सवानिमित्त मुंबईस्थित कोकणवासीयांची कोकणात जाण्याची लगबग सुरू झाली आहे. यंदा एसटीतर्फे सर्व विक्रम तोडून सुमारे ५००० जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे.

वाचा सविस्तर…

14:54 (IST) 2 Sep 2024
वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; चार जणांना अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री पुण्यात घडली. या घटनेत वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला. माजी नगरसेवकावर गोळीबार झाल्याच्या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. यानंतर पोलिसांनी आरोपींना चार आरोपींना अटक केलं असून हा खून कौटुंबिक वादातून झाला असून बहि‍णींनी आणि मेहुण्यांनी त्यांचा खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

14:48 (IST) 2 Sep 2024
डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट-रूळाच्यामध्ये अडकलेली महिला प्रवाशांच्या सतर्कतेमुळे बचावली

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर १५ ते २० मिनीटे या घटनेने गलका उडाला होता. एका लोकलमध्ये गर्दीतून चढताना एक महिलेचा लोकल दरवाजाच्या मधील आधारदांडा हातामधून सटकला आणि त्या पाय घसरल्याने फलाटावरून मधल्या पोकळीतून थेट रुळाच्या दिशेने पडल्या.

वाचा सविस्तर….

14:28 (IST) 2 Sep 2024
अबब… आठ फुटांचा लाकडी बैल… नागपुरातील तान्हा पोळ्याचा असा आहे इतिहास…

नागपूर : नागपूरसह विदर्भातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये तान्हा पोळ्यानिमित्त सगळ्याच वयोगटातील लोक लाकडी बैल घेऊन त्याची पुजा करून हा सन आनंदाने साजरा करतात. नागपुरातील या सणाला तब्बल २३५ वर्षांचा इतिहास आहे. त्यातच नागपुरातील सनियर भोसला पॅलेसमधील तब्बल आठ फुट उंचीचा लाकडी बैल सर्वांचे लक्ष वेधून घेतो. ३ सप्टेंबरला तान्हा पोळा आहे. त्यानिमित्त या सनाचा इतिहासाबद्दल आपण माहिती जाणून घेऊ या…

वाचा सविस्तर…

14:27 (IST) 2 Sep 2024
अंबरनाथ गोळीबारातील दोन जण डोंबिवलीतील घारिवलीत अटक

कल्याण : अंबरनाथ येथील एमआयडीसीत दोन वर्षापूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणातील दोन फरार आरोपींना कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने डोंबिवली जवळील घारिवली गावातून अटक केली आहे. मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या या दोन्ही आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी विविध भागात शोधकार्य सुरू ठेवले होते. अखेर हे दोन्ही गुन्हेगार कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांना सापडले.

वाचा सविस्तर…

13:38 (IST) 2 Sep 2024
मराठवाड्यात पावसाचा कहर; तीन ठार, ८० जनावरे वाहून गेली तर १३५ घरांची पडझड

मराठवाड्यातील ४२० महसूल मंडळपैकी २८४ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने शेतामध्ये पाणी साठले आहे. नदी नाल्यांना पूर आले असून लातूर जिल्ह्यात ढोरसावंगी येथे नरेश अशोक पाटील या तरुणाचा वाहून गेल्याने मृत्यू झाला. सविस्तर वाचा

13:37 (IST) 2 Sep 2024
मोहोळमध्ये डॉक्टर महिलेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

मोहोळ शहरात एका डॉक्टर महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दुपारी उशिरा घडली. या घटनेचे निश्चित कारण लगेचच समजू शकले नाही. मोहोळ पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. सविस्तर वाचा…

13:06 (IST) 2 Sep 2024
“खबरदार… कुणाचेही तिकीट कन्फर्म नाही, ते आम्हीच बघू,” भाजपा प्रदेशाध्यक्षांची तंबी

वर्धा : विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असल्याने सर्वच पक्ष वाजतगाजत कामाला लागल्याचे दिसून येत आहे. बैठकांना उधाण आले असून काही इच्छुक उमेदवार तिकीट पक्के झाल्याचा दावा करीत आहेत. पण हेच हेरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशा उत्साही संभाव्य उमेदवारांचे कान टोचले. आर्वी व धामणगाव या दोन विधानसभा क्षेत्राचा आढावा घेण्यास ते आले होते. आर्वीत बोलताना त्यांनी इच्छुकांना खडेबोल सुनावले.

वाचा सविस्तर…

13:06 (IST) 2 Sep 2024
शिंदे, फडणवीसांचा गैरसमज, ती याचिका ‘लाडकी बहीण’ योजनेविरूद्ध नाही, वडपल्लीवार म्हणाले…

नागपूर : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला विरोध करण्यासाठी काँग्रेस न्यायालयात गेली, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात सरकारने आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात केला होता. अनिल वडपल्लीवार यांनी ही याचिका केली ते काँग्रेस कार्यकर्ते आहेत, असा दावाही या नेत्यांनी केला होता. थेट शिंदे, फडणवीस यांनी नाव घेऊन आरोप केल्यामुळे वडपल्लीवार एकदम प्रकाशझोतात आले होते. या प्रकरणातील नेमके सत्य काय आहे हे वडपल्लीवार यांनी सोमवारी माध्यमांना सांगितले.

वाचा सविस्तर…

13:05 (IST) 2 Sep 2024
डोंबिवलीत आजदेमधील पत्नीचे अनैतिक संबंध समाजमाध्यमात उघड करणाऱ्या पतीविरुध्द गुन्हा

डोंबिवली : डोंबिवलीतील आजदेगाव येथील एका सोसायटीत राहत असलेल्या पतीने आपल्या पत्नीचे घरातील काही अनैतिक संबंधाच्या दृश्यध्वनी चित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित केल्या. अशाप्रकारे बेकायदा कृती केल्याबद्दल, आपली समाजात बदनामी केल्याबद्दल संबंधित महिलेने आपल्या पती विरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार केली आहे.

वाचा सविस्तर…

12:56 (IST) 2 Sep 2024
हिंगोलीत पावसाचा हाहाकार; अनेक भागात पिकांचं नुकसान, अनेकांच्या घरात पाणी शिरलं

राज्यातील विविध जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला असून पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. अनेक भागात पिकांचं नुकसान झालं असून पिकेही पाण्याखाली गेले आहेत. नांदेड,परभणी, हिंगोलीत मुसळधार पाऊस झाला आहे. या तीनही जिल्ह्यातील २०० पेक्षा जास्त लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

12:19 (IST) 2 Sep 2024
“…तर ११३ आमदार निवडणुकीत पाडणार”, मनोज जरांगेंचा महायुतीला इशारा

“मला राजकारणात जाण्याची इच्छा नाही. गोरगरिबांना देणारं बनवायचं आहे. सरकारने आता निवडणुका थेट डिसेंबरमध्ये ढकलल्या आहेत. सध्या महायुतीच्या विरोधातील वातावरण राज्यातील तीन विभाग आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातही विरोधी वातावरण तयार झालं आहे. आता जर सरकारने आरक्षण दिलं नाही तर संपूर्ण ११३ आमदार निवडणुकीत पाडणार”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

12:05 (IST) 2 Sep 2024
लोकलमध्ये विसरलेले तीन लाखाचे दागिने डोंबिवली लोहमार्ग पोलिसांकडून दिव्याच्या महिलेला परत

लोकल प्रवासात विसरलेले दिवा-आगासन येथील एका महिलेचे दागिने डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी कौशल्याने तपास करून त्या महिलेला परत केले. दागिने असलेल्या पिशवीवर एका सराफाच्या दुकानाचे नाव होते. सविस्तर वाचा

11:49 (IST) 2 Sep 2024
मराठवाड्यात भाजपकडून छत्तीसगडमधील कायर्कर्त्यांची कुमक

मराठवाड्यातील ४६ मतदारसंघापैकी १६ मतदारसंघात यश मिळविणाऱ्या भाजपने आपल्या बाजूने जनमत वळविण्यासाठी आता छत्तीसगडमधील २६ कार्यकर्त्यांना प्रत्येकी एक मतदारसंघ बांधणीसाठी वाटून दिला आहे. सविस्तर वाचा

11:46 (IST) 2 Sep 2024
परभणी : पुराच्या पाण्यात एसटी बस गेली वाहून, मानवत तालुक्यातील घटना

पुराच्या पाण्यात परिवहन महामंडळाची बस वाहून गेल्याची घटना परभणी जिल्ह्यात मानवत तालुक्यातील वझुर (बु.) या गावी पहाटे चारच्या सुमारास घडली.

वाचा सविस्तर…

11:18 (IST) 2 Sep 2024
Vanraj Andekar Shot Dead : वनराज आंदेकरांवर बहिणीच्या पतीकडून गोळीबार; मालमत्तेच्या वादातून आंदेकरांचा खून

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री नाना पेठेत घडली. रात्री उशिरा खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सविस्तर वाचा…

10:45 (IST) 2 Sep 2024
“औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन देवेंद्र फडणवीस”, खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल

“औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन कोण आहेत? ते काल आम्ही पाहिलं. औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन देवेंद्र फडणवीस आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे लोकही त्या क्लबे सदस्य आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी महाविकास आघाडीने आंदोलन केलं. मात्र, आमचं आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने केला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही”, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

10:42 (IST) 2 Sep 2024
“असना” वादळामुळे सप्टेंबर महिना अतिवृष्टीचा..!

ऑगस्टच्या तुलनेत देशात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीसदृश्य पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. देशाच्या काही भागात सप्टेंबर महिन्यात सामान्य पातळीपेक्षा कमी तर बहुतांश भागात सामान्य पातळीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा

10:40 (IST) 2 Sep 2024
Bail Pola Festival 2024 : बैलांचा साज महागला, संकटग्रस्त शेतकऱ्यांमुळे पोळ्यावर निराशेचे सावट

मुसळधार पावसाने खचलेला शेतकरी आता पोळ्यासाठी लागणारा बैलांचा साज महागल्याने घायकुतीस आल्याची स्थिती आहे. गत १० जुलैपासून जिल्ह्यात सतत पाऊस सुरू आहे. मोठ्या प्रमाणात शेतात पाणी साचून असल्याने पीक हातून जाण्याची चिन्हे आहे. त्यातच आता पोळा सण आला. सविस्तर वाचा

10:28 (IST) 2 Sep 2024
Vijay Wadettiwar : “विधानसभेला काँग्रेसने जास्त जागा लढवाव्यात…”, विजय वडेट्टीवार यांचं सूचक विधान

“विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या तीन बैठका झाल्या आहेत. या महिन्यांत जागावाटपाचा प्रश्न सुटेल या अनुषंगाने आमच्या बैठका सुरु आहेत. विधानसभेला काँग्रेसने अधिक जागा लढवाव्यात अशी राज्यातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, यामध्ये शेवटी आघाडी धर्म आहे. त्यामुळे आघाडीमध्ये आम्ही सर्वजण एकत्र बसून निर्णय घेऊ”, असं काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री पुण्यात घडली. या घटनेत वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला आहे. माजी नगरसेवकावर गोळीबार झाल्याच्या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध घेण्यात येत आहे.

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह