Maharashtra News Today, 26 August 2022: राज्यातील सत्तासंघर्ष आणि शिवसेनेतील फुटीबाबत गुरुवारी सुनावणी होऊ शकली नसून, घटनापीठाच्या स्थापनेची प्रतीक्षा कायम आहे. याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती मावळते सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्यापुढे शुक्रवारी किंवा नियोजित सरन्यायाधीश उमेश लळित यांच्यापुढे शिवसेना सोमवारी करणार आहे.

आगामी महानगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध प्रवर्गांना खूश करण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विविध घोषणा केल्या. सुमारे ७५ हजार सरकारी पदे भरण्याची घोषणा करून बेरोजगार किंवा तरुण वर्गाला मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले. तसेच उल्हासनगरातील बांधकामे अधिकृत करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.

Live Updates

Maharashtra Political Crisis Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट!

 

20:03 (IST) 26 Aug 2022
मोदींनी पुन्हा एकदा करुन दाखवलं! लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पटकावलं पहिलं स्थान

लोकप्रिय जागतिक नेत्यांच्या यादीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिलं स्थान पटकावलं आहे. सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पहिला क्रमांक मिळवला आहे. अमेरिकेतील डेटा इंटेलिजन्स कंपनी 'मॉर्निग कन्सल्ट'च्या सर्व्हेक्षणानुसार, ७५ टक्के रेटिंगसह नरेंद्र मोदी अग्रस्थानी राहिले आहेत. नरेंद्र मोदी यांच्यानंतर अनुक्रमे मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष मॅन्यूअल लोपेज ओब्राडोर आणि इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांचा क्रमांक आहे. ओब्राडोर यांना ६३ टक्के रेटिंग असून, मारियो यांची रेटिंग ५४ टक्के आहेत. या यादीत जगभरातील एकूण २२ नेते आहेत.

सविस्तर बातमी

19:04 (IST) 26 Aug 2022
तीन वर्षाच्या मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न उधळून लावण्यात सांगली पोलिसांना यश

सांगली : सवतीच्या तीन वर्षाच्या  मुलाचे अपहरण करून बिहारला पळविण्याचा प्रयत्न उधळून लावत सांगली शहर पोलीस ठाण्याच्या  पोलीसांनी मुलाची सातारा रेल्वे स्थानकावर सुखरूप सुटका केली. बातमी वाचा सविस्तर...

18:24 (IST) 26 Aug 2022
आनंद दिघे यांना टाडा लागला पण ते कोणाच्या पायाशी गेले नाहीत ; खासदार राजन विचारे

ठाणे : आनंद दिघे हे शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेसाठी झटत होते. त्यांना टाडा लागल्यानंतरही त्यांनी अडीच वर्ष तुरुंगात काढली. परंतु ते कोणाच्या पायाशी गेले नाही. त्यामुळे दिघे साहेब यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. असा टोला खासदार राजन विचारे यांनी शिंदे गटाला लगावला. बातमी वाचा सविस्तर...

18:17 (IST) 26 Aug 2022
अखेर ग्राहक आयोगाच्या अध्यक्षांना सेवा निवासस्थान मिळाले

मुंबई : उच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यांनंतर राज्य ग्राहक वाद निवारण आयोगाचे अध्यक्ष, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांना अखेर सेवा निवासस्थान उपलब्ध करून देण्यात आले आहे. नरिमन पॉईंट येथील एका इमारतीत त्यांना निवासस्थान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बातमी वाचा सविस्तर...

17:50 (IST) 26 Aug 2022
सांगली : मिरज तालुक्यातील शिपूरमध्ये उसाच्या फडात आढळली गांजा शेती

मिरजेपासून वीस किलोमीटर अंतरावरील शिपूर गावातील एका उसाच्या फडात गांजा पिकवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आज (शुक्रवार) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने उघडकीस आणला. या ३० गुंठे क्षेत्र असलेल्या उसाच्या पिकातून लाखो रूपयांचा गांजा जप्त करण्यात आला असून, संबंधित शेतकर्‍यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. वाचा सविस्तर बातमी...

17:31 (IST) 26 Aug 2022
आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीला शिंदे आणि ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन

ठाणे : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची शुक्रवारी पुण्यतिथी निमित्ताने ठिकठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्याचे कार्यक्रम शिवसेनेच्या वतीने ठाणे शहरात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटामध्ये शक्तीप्रदर्शनासाठी चढाओढ पाहायला मिळाली. बातमी वाचा सविस्तर...

16:58 (IST) 26 Aug 2022
मुंबई : प्रकाश सुर्वे यांची विभागप्रमुखपदी नियुक्ती – शिंदे गटाकडून घोषणा

शिवसेनेत बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले आमदार प्रकाश सुर्वे यांची विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे गटाच्यावतीने ही नियुक्ती करण्यात आली असून शिवसेनेच्या कार्यपद्धतीनुसार शिंदे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयातून तसे परिपत्रक काढण्यात आले आहे. वाचा सविस्तर बातमी...

16:43 (IST) 26 Aug 2022
पुणे : गोदामाची भिंत फोडून मद्याच्या बाटल्या लांबविणाऱ्या चोरट्यांची टोळी गजाआड

सासवड रस्त्यावरील गोदामाची भिंत फोडून मद्याच्या बाटल्यांची खोकी चोरुन पसार झालेल्या चोरट्यांच्या टोळीला उस्मानाबाद परिसरातून हडपसर पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून दहा लाखांच्या मद्याच्या बाटल्यांची खोकी तसेच ट्रक असा ४९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाचा सविस्तर बातमी...

16:41 (IST) 26 Aug 2022
कल्याण : शहापूर जवळील बिरवाडी गावात २७ लाखाचा बनावट मद्य साठा जप्त

शहापुर तालुक्यातील भातसा धरण रस्त्यावरील बिरवाडी गावातील एका गोदामावर राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाच्या भरारी पथकाने गुरुवारी रात्री छापा टाकून गोवा निर्मित, विदेशी आणि बनावट मद्याचा २६ लाख ८२ हजार रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला. बातमी वाचा सविस्तर...

16:33 (IST) 26 Aug 2022
“नितेश राणे स्वतःच्या बापाचं ऐकत नाहीत,” किशोरी पेडणेकर संतापल्या

आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात असल्याचा आरोप माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. आदित्य ठाकरे दिल्लीपर्यंत घोडदौड करणार आहेत. त्यामुळे आत्ताच त्यांना रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत असाही आरोप त्यांनी केला. मुंबई महानगरपालिका शिवसेनाच जिंकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान महापालिका आयुक्तांना पत्र लिहून भ्रष्टाचाराचा उल्लेख कऱणाऱ्या नितेश राणेंवर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना टीका केली आहे.

सविस्तर बातमी

16:33 (IST) 26 Aug 2022
अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये चक्कर येऊन पडले

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रकृती बिघडली आहे. एबीपी माझाच्या वृत्तानुसार, अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये चक्कर येऊन पडले. यानंतर त्यांची डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली. छातीमध्ये दुखत असल्याची तक्रार असल्याने त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सविस्तर बातमी

16:02 (IST) 26 Aug 2022
मुंबई : के ई एम रुग्णालयातील उदवाहक बंद अवस्थेतच

पालिकेच्या के ई एम रुग्णालयातील एक उदवाहक गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. उदवाहनाची देखभाल करणाऱ्या कंपनीचा आणि रुग्णालय प्रशासनाचा देयकावरून काही वाद असल्यामुळे हे उदवाहक दुरुस्त करत नसल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी केला आहे. तसेच या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. वाचा सविस्तर बातमी...

15:45 (IST) 26 Aug 2022
पुणे : एसटी बसच्या धडकेने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

एसटी बसच्या धडकेने पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना स्वारगेट परिसरात घडली. रोहिणी पांडुरंग भोसले (वय ६२, रा. मल्हार पेठ, सातारा) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. बातमी वाचा सविस्तर...

15:27 (IST) 26 Aug 2022
शेतकऱ्यांच्या न्यायालयीन लढ्यात ‘स्वीस सरकार‘ची मदत

नागपूर / यवतमाळ : कीटकनाशक फवारणी करताना शेतकरी मृत्यू प्रकरणी स्वित्झर्लंड येथील न्यायालयात कायदेशीर लढा लढण्यासाठी ‘स्वीस‘ सरकारने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विधि सहायता देण्याचा निर्णय घेतला आहे. बातमी वाचा सविस्तर...

13:52 (IST) 26 Aug 2022
पुणे : ऊसतोडणी कराराचे उल्लंघन ८१ कारखान्यांची ३९ कोटींची फसवणूक

ऊसतोडणी टोळ्या, मुकादम यांच्याकडून ऊसतोडणी यंत्रणेसाठी करण्यात येणारे करार न पाळल्याने राज्यातील ८१ साखर कारखान्यांची ३९ कोटी ४६ लाख ८४ हजार ३२२ रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. सन २००४ पासून २०२० पर्यंत ८१ साखर कारखान्यांची फसवणूक झाली आहे. ही फसवणूक टाळण्यासाठी अधिकाधिक कारखान्यांनी साखर आयुक्तालयाने तयार केलेल्या मोबाइल उपयोजनमध्ये (ॲप) वाहतूकदार, मुकादम, ऊसतोडणी कामगारांची माहिती भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाचा सविस्तर बातमी...

13:38 (IST) 26 Aug 2022
नितेश राणेंचं मुंबई पालिका आयुक्तांना पत्र; म्हणाले “आदित्यसेना टक्केवारी गँगमुळे…”

भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुंबईचे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र लिहिलं आहे. प्रशासक या नात्याने आपल्यावर पालिकेची भ्रष्टाचारी ओळख पुसण्याची जबाबदारी आहे याची आठवण नितेश राणे यांनी आयुक्तांना करुन दिली आहे. नेहमीप्रमाणे दुर्घटना आणि जिवीतहानी झाल्यानंतर मुंबई प्रशासनाला जाग येते हा समज दुर करणे हे प्रशासक म्हणून आपल्याकडून अपेक्षित आहे असंही ते म्हणाले आहेत.

सविस्तर बातमी

13:23 (IST) 26 Aug 2022
नालासोपारा रेल्वे स्थानकातून चिमुकल्याचे अपहरण; अपहरणाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

नालासोपारा रेल्वे स्थानकातून तीन वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा मुलगा भिक्षेकरी कुटुंबातील असून आपल्या कुटुंबीयांसह नालासोपारा परिसरामध्ये आला होता. गुरुवारी दुपारी तो नालासोपारा रेल्वे स्थानकाच्या फलाटावर फिरत होता. त्याचवेळी एका जोडप्याने या मुलाला आमिष दाखवून आपल्याजवळ बोलावले आणि त्याचे अपहरण करून फरार झाले. वाचा सविस्तर बातमी...

13:19 (IST) 26 Aug 2022
चंद्रपूर : आसोलामेंढा नहरात पाच मुले बुडाली; चौघांना वाचविण्यात यश, मुलगी बेपत्ता

सावली गावालगत आसोलामेंढा नहरात अंघोळीसाठी गेलेली पाच मुले पाण्यात बुडाली. यातील चौघांना वाचविण्यात यश आले तर काजल अंकुश मक्केवार नहरात वाहून गेल्याने तिचा शोध सुरू आहे. बातमी वाचा सविस्तर...

13:07 (IST) 26 Aug 2022
नागपूर : खाकीतील प्रेम आणि माणुसकीने अपंग दाम्पत्याच्या डोळ्यात अश्रू

दोन्ही पायांनी अपंग असलेले पती-पत्नी रडत-रडत पारडी पोलीस ठाण्यात आले. उदरनिर्वाहासाठी घेतलेला ई-रिक्षा चोरी गेल्यामुळे उपासमार होत असल्याची स्थिती त्यांनी पारडीचे ठाणेदार कोटनाके यांना सांगितली. त्यांनी ठाण्यातील जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांना कामाला लावून दोन चोरांना अटक केली. बातमी वाचा सविस्तर...

12:49 (IST) 26 Aug 2022
नागपूर : केवळ धक्का लागला म्हणून युवकाला धावत्या रेल्वेतून दिले फेकून

शुल्लक कारणावरून वाद घालून एका युवकाला धावत्या रेल्वेगाडीतून फेकून दिल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुटीबोरीजवळ गुरूवारी घडली. बातमी वाचा सविस्तर...

12:27 (IST) 26 Aug 2022
पुणे : तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक

दोन गटांत झालेल्या वादातून तरुणाच्या डोक्यात लोखंडी सळी मारून आणि गळा आवळून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी किरण दिलीप मोरे (वय २६, रा. कोरेगाव पार्क) याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला २९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. वाचा सविस्तर बातमी...

12:26 (IST) 26 Aug 2022
नागपूर : फेसबुकवरील मित्रासोबतचा व्हीडिओ कॉल डॉक्टरला भोवला

फेसबुकवरून मैत्री करणाऱ्या तरूणीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालययातील एका डॉक्टरला व्हिडिओ कॉलींग करून तो व्हीडिओ समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देत पावणे दोन लाख रुपये उकळले. बातमी वाचा सविस्तर...

12:23 (IST) 26 Aug 2022
तीन दिशांना तोंडे असल्याने महाविकास आघाडी निष्प्रभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवस-सायासाने सत्तेवर आलेल्या दैवदुर्लभ सरकारचे पहिलेच विधिमंडळ अधिवेशन पार पडले. शिंदे गटातील मंत्र्यांचे आत्मविश्वासाअभावी चाचपडणे आणि भाजपच्या मंत्र्यांचा जम बसण्याआधीच्या संधीचा फायदा उठविण्यात महाविकास आघाडी विधानपरिषदेत बहुमत असतानाही निष्प्रभ ठरली.

सविस्तर वाचा...

12:08 (IST) 26 Aug 2022
काँग्रेसला मोठा झटका! गुलाम नबी आझाद यांचा राजीनामा

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. गुलाम नबी आझाद यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. पक्षाचं प्राथमिक सदस्यत्वही त्यांनी सोडलं आहे. १६ ऑगस्टला त्यांनी जम्मू काश्मीर काँग्रेस प्रचार समितीच्या प्रमुखपदाचा राजीनामा देत आपल्या नाराजीचे संकेत दिले होते. त्यानंतर अखेर आता त्यांनी राजीनामा देत पक्षाला मोठा धक्का दिला आहे. गुलान नबी आझाद यांनी अध्यक्षा सोनिया गांधी यांना चार पानांचं पत्र पाठवत राजीनामा देत असल्याचं सांगितलं आहे.

सविस्तर बातमी

12:08 (IST) 26 Aug 2022
शिर्डी साई मंदिरात हार, फुलं नेण्यास बंदी असल्याने संताप; ग्रामस्थ आणि विक्रेत्यांची सुरक्षारक्षकांसोबत झटापट

करोनाचं संकट ओसरलं असतानाही शिर्डीमधील साई मंदिरात हार, फुलं आणि प्रसाद नेण्यास बंदी असल्याने स्थानिक विक्रेते आणि ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. राज्यातील इतर मंदिरांनी नियम शिथील केलेले असतानाही साई मंदिरात मात्र बंदी असल्याने संताप व्यक्त होत असून, शुक्रवारी त्याचे पडसाद उमटले. साई संस्थानच्या भूमिकेला स्थानिक विक्रेते आणि ग्रामस्थांनी आव्हान दिलं असून, मंदिरात हार, फुलं नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षारक्षकांसोबत त्यांची झटापट झाल्याने वातावरण चिघळलं.

सविस्तर बातमी

12:08 (IST) 26 Aug 2022
ठाणे : आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसैनिक शक्तीस्थळावर जाणार

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने ठाणे शहरात शिवसेनेकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असतानाच त्यांचे पुतणे आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी शिवसैनिकांना १२ वाजता कोर्टनाका येथील रेस्ट हाऊस जवळ जमण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर शिवसैनिक खारटन रोड येथील आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळी म्हणजेच शक्तीस्थळावर जाणार आहेत. वाचा सविस्तर बातमी...

12:06 (IST) 26 Aug 2022
वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका कधी?; रखडलेले उड्डाणपूल, नागरिक हैराण

पुण्यातील विद्यापीठ चौक आणि चांदणी चौकातील रेंगाळलेले उड्डाणपुलांचे काम, त्यामुळे होणारी वाहतूककोंडी आणि पुणेकरांना होणारा त्रास याबाबत गुरुवारी थेट विधिमंडळातच प्रश्न उपस्थित करण्यात आला. मात्र, याबाबत संबंधित यंत्रणांची बैठक बोलविण्यात येईल, असे मोघम उत्तर राज्य सरकारकडून देण्यात आल्याने शहरातील वाहतूककोंडीच्या समस्येवर सध्यातरी कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याचे समोर आले आहे. वाचा सविस्तर बातमी...

12:06 (IST) 26 Aug 2022
"माझ्याविरोधातील पत्रकं जरूर वाट, पण त्याचं मला पाठव, मी भरतो", देवेंद्र फडणवीसांनी सांगितला फुंडकरांचा 'तो' किस्सा

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे दिवंगत नेते भाऊसाहेब फुंडकर यांच्या राजकीय जीवनावर बोलताना त्यांच्या स्वभावाची ओळख करून देणारा एक किस्सा सांगितला. "भाऊसाहेबांच्या एका नाराज कार्यकर्त्याने त्यांच्याविरोधात पत्रकं झापली. तेव्हा त्यांनी कार्यकर्त्याच्या घरी जाऊन तू पत्रकं जरूर वाट, पण त्याचं बिल तू देऊ नको. ते बिल मला पाठव, मी भरतो," असं सांगितल्याची आठवण फडणवीसांनी सांगितली. ते गुरुवारी (२५ ऑगस्ट) भाऊसाहेब फुंडकर यांच्या 'भूमिपुत्र' या स्मृतीग्रंथ प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.

सविस्तर बातमी...

12:06 (IST) 26 Aug 2022
"अकोला मतदारसंघ निवडून येईल न येईल म्हणून तो शिवसेनेला गेला आणि...", फडणवीसांनी सांगितला फुंडकरांचा 'तो' किस्सा

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे दिवंगत नेते भाऊसाहेब फुंडकर यांच्या 'भूमिपुत्र' या स्मृतीग्रंथ प्रकाशन कार्यक्रमात त्यांचा बाळासाहेब ठाकरेंसोबतचा एक किस्सा सांगितला. "एका लोकसभेत अकोला मतदारसंघ निवडून येईल न येईल म्हणून शिवसेनेला गेला आणि दोन्हीही पक्षांना निवडून येण्याची आशा नव्हती. मात्र भाऊसाहेब फुंडकरांनी बाळासाहेब ठाकरेंशी बोलून तो मतदारसंघ घेतला आणि निवडून आले," अशी आठवण फडणवीसांनी सांगितली.

सविस्तर बातमी...

12:06 (IST) 26 Aug 2022
पुणे : स्वप्नमहालातील हलत्या झोपाळ्यावर मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची होणार प्रतिष्ठापना

रंगीबेरंगी आरसे आणि झुंबरांनी सजलेल्या भव्य स्वप्नमहालातील हलत्या झोपाळ्यावर अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची प्रतिष्ठापना होणार आहे. अखिल मंडई मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवामध्ये स्वप्नमहाल साकारण्यात येणार आहे. वाचा सविस्तर बातमी...

 

 

 

Maharashtra Breaking News Live Today

अशा अनेक महत्त्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.