Maharashtra News Today, 26 August 2022: राज्यातील सत्तासंघर्ष आणि शिवसेनेतील फुटीबाबत गुरुवारी सुनावणी होऊ शकली नसून, घटनापीठाच्या स्थापनेची प्रतीक्षा कायम आहे. याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती मावळते सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्यापुढे शुक्रवारी किंवा नियोजित सरन्यायाधीश उमेश लळित यांच्यापुढे शिवसेना सोमवारी करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आगामी महानगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध प्रवर्गांना खूश करण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विविध घोषणा केल्या. सुमारे ७५ हजार सरकारी पदे भरण्याची घोषणा करून बेरोजगार किंवा तरुण वर्गाला मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले. तसेच उल्हासनगरातील बांधकामे अधिकृत करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.

Live Updates

Maharashtra Political Crisis Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट!

12:05 (IST) 26 Aug 2022
विश्लेषण : टोमॅटो फ्लूचे संकट किती गंभीर? लॅन्सेटचा अहवाल काय सांगतो?

करोना महासाथीमधून आपण काहीसे सावरतोय असे वाटत असतानाच आता टोमॅटो फ्लू नामक नवीन आजार भारतातील काही राज्यांमध्ये आढळून येत आहे. केरळ, तमिळनाडू, हरियाणा आणि ओडिशा या चार राज्यांमध्ये काही लहान मुलांना टोमॅटो फ्लूचा संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे हा आजार नेमका काय आहे याबाबत माहिती देणारे हे विश्लेषण.

सविस्तर विश्लेषण…

12:04 (IST) 26 Aug 2022
उत्तर प्रदेशमध्ये लग्नस्थळी आग, होरपळून पाचजणांचा मृत्यू, सातजण जखमी

उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद जिल्ह्यात लग्नाची तयारी सुरू असलेल्या तीन मजली इमारतीत आग लागल्याची घटना घडली. या आगीत आतापर्यंत पाचजणांचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली. स्थानिकांनीही मदत कार्याला हातभार लावत सात नागरिकांना सुरक्षित बाहेर काढलं.

सविस्तर बातमी…

12:04 (IST) 26 Aug 2022
पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना रद्दची शिफारस

करोनाकाळात योजनेला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना रद्द करण्याची शिफारस महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाच्या संचालकांनी कृषी आयुक्तालयाला केली आहे. वाचा सविस्तर बातमी…

12:03 (IST) 26 Aug 2022
मुंबई : दोन हजार रुपये घेऊन बोगस आधारकार्ड देणाऱ्यास अटक

दोन हजार रुपयांमध्ये बनावट आधारकार्ड तयार करून देणारा आरोपी महेंद्र किशोर मानमोंडे याला कांदिवली पोलिसांनी अटक केली. महेंद्रने अनेकांना बनावट आधारकार्ड दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. वाचा सविस्तर बातमी…

12:02 (IST) 26 Aug 2022
अहमदाबादमधून तडीपार, मुंबईत येऊन घरफोड्या; सराईत आरोपीला अटक

अहमदाबाद येथून तडीपार करण्यात आल्यानंतर मुंबईत येऊन चोऱ्या करणाऱ्या सराईत आरोपीला बोरीवली पोलिसांनी अटक केली. अजीत पिल्ले असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध मुंबईसह अहमदाबादच्या विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. वाचा सविस्तर बातमी…

12:01 (IST) 26 Aug 2022
पुणे, पिंपरीतील वाहन प्रशिक्षणाच्या निम्म्या संस्थांचे परवाने रद्द होणार

पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ६९ वाहन प्रशिक्षण संस्था अनधिकृतपणे सुरू आहेत, असे सांगत परवान्याची मुदत संपुष्टात आल्यानंतरही त्याचे नूतनीकरण न करणाऱ्या वाहन प्रशिक्षण संस्थांचे परवाने रद्द करण्यात येत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. बातमी वाचा सविस्तर…

12:01 (IST) 26 Aug 2022
पुण्यातील पाषाण तलाव परिसरात अविवाहित जोडप्यांना बंदी

पक्षी निरीक्षण करणाऱ्या पक्षीप्रेमींना अडथळा होत असल्याचे आणि सुरक्षेचे कारण पुढे करून महापालिकेच्या उद्यान विभागाने अविवाहित जोडप्यांना पाषाण तलाव परिसरात बंदी घालण्याचा फतवा काढला आहे. वाचा सविस्तर बातमी…

11:58 (IST) 26 Aug 2022
राज्यातील पहिले अपंगांसाठीचे विशेष उद्यान नागपुरात

अपंगांसाठी राज्यातील पहिले विशेष उद्यान नागपुरात सुरू करणार, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केली.

सविस्तर वाचा…

10:35 (IST) 26 Aug 2022
दोन वर्षांच्या खंडानंतर उद्या नागपुरात निघणार प्रसिद्ध काळी व पिवळी मारबत

गेल्या दोन वर्षापासून करोनामुळे निघू न शकलेली विदर्भाची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेली काळी पिवळी मारबत शनिवारी सकाळी निघणार आहे. १४१ वर्षांची परंपरा असलेली काळी व १३७ वर्षांची परंपरा असलेली पिवळी मारबत मिरवणुकीचे मुख्य आकर्षण हे विविध समस्यावर भाष्य करणारे बडगे ( पुतळे) असतात.

सविस्तर वाचा…

10:25 (IST) 26 Aug 2022
आनंद दिघेंच्या स्मृतिदिनानिमित्त CM शिंदेंनी पोस्ट केलेली चारोळी चर्चेत

राज्यामध्ये सत्तापालट घडवणारे शिवसेनेचे बंडखोर नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरु आनंद दिघे यांचा आज स्मृतीदिन. याचनिमित्त शिंदे यांनी सोशल मीडियावरुन दिघे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये कवितांच्या माध्यमातून विरोधकांना चिमटे काढणाऱ्या शिंदे यांनी आपल्या राजकीय गुरुला आंदरांजली वाहण्यासाठीही चारोळ्यांचा आधार घेतला आहे.

सविस्तर बातमी

अशा अनेक महत्त्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.