Maharashtra News Today, 29 August 2022 : राज्यातील सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणीची तारीख अद्याप निश्चित झालेली नसल्याने सत्तापेच कायम आहे. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल असं भाकीत अमोल मिटकरी यांनी केलं आहे. बोदवड येथे रोहिणी खडसे यांनी संवाद यात्रेचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना अमोल मिटकरी यांनी भाजपावर जोरदार टीका केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबईतील एसी लोकल विरोधात प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. एसी लोकलमुळे इतर रेल्वे गाड्या रद्द होत असल्याने मुंबईतील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचा खोळंबा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्र्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाला गंभीर इशारा दिला आहे. गरीब माणसाला जर एसी परवडत नसेल, तर एसी फेकू आंदोलन करू, असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे. हा प्रश्न केवळ कळवा-मुंब्रा पुरता मर्यादीत नाही. हे आंदोलन गरीब विरुद्ध एअर कंडिशन असे असल्याचे आव्हाड म्हणाले आहेत. हा विषयही दिवसभर चर्चेत असणार आहे.
याशिवाय महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि कलाविषयक घडामोडींचा आढावा एकाच ठिकाणी…
Maharashtra Live News Today : शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार? अमोल मिटकरींचं मोठं विधान, म्हणाले…
तरुणाईसह वयोवृद्धांनाही वेड लावणाऱ्या ‘व्हॉट्सॲप स्टेटस’वर तलवारीसह स्वत:चे छायाचित्र ठेवणे जिल्ह्यातील संग्रामपूर नगर पंचायतीच्या नगरसेवकाला भलतेच महागात पडले. पोलिसांनी नगरसेवकाविरुद्ध शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. भारत ऊर्फ बिट्या प्रकाश बावस्कर, असे या आरोपी नगरसेवकाचे नाव. तो बजरंग दलाचा पदाधिकारी असून गोरक्षा विभाग प्रमुखदेखील आहे. सविस्तर वाचा…
गणेशोत्सव कालावधीत गणेश मंडळांनी प्रसाद तयार करताना आणि वाटताना स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत. गणेशोत्सवात गणपतीच्या आरतीनंतर प्रसाद वाटप होते. विषबाधेच्या संभाव्य घटना टाळण्यासाठी प्रसाद तयार करताना आणि वाटताना स्वच्छतेबाबत काळजी घेण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
पुणे : विसर्जन मिरवणुकीच्या वेळी लक्ष्मी रस्त्यावरून प्रथम मानाची पाच गणपती मंडळे गेल्यानंतरच अन्य मंडळांनी मार्गस्थ जावे हा रूढी-परंपरा व प्रथेचा भाग म्हणजे कायदा नाही. त्यामुळे अन्य गणपती मंडळांना विसर्जनासाठी लक्ष्मी रस्ता वापरण्यावर असणारी बंधने बेकायदेशीर आणि संविधानातील कलम १९ नुसार असलेल्या संचार स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे असा आक्षेप घेणारी याचिका बढाई समाज ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. बातमी वाचा सविस्तर…
ठाणे जिल्ह्यात खड्डे बळींचे सत्र सुरूच आहे. रविवारी रात्री दिवा येथील आगासन गावात खड्डा चुकविताना टँकर खाली चिरडून दुचाकीस्वार गणेश पाले (२२) याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्याने सुसंस्कृत नेतृत्व दिलेले आहेत. त्यात खंडू रांगणेकर, प्रभाकर हेगडे, पाटील यांच्या नावाचा उल्लेख होतो. ही सर्व मंडळी समाजातील एक विशिष्ट विचारधारा घेऊन एक विशिष्ट दर्जांनी समाजकारण, राजकारण करीत होती. हीच ठाण्याची ओळख होती. हळूहळू तशीच स्थिती इथे होईल, यासाठी ठाणेकर काळजी घेतली आणि महाराष्ट्र मुक्त होईल.
प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त बुधवारी (३१ ऑगस्ट) मध्यभागात वाहतूक बदल करण्यात येणार आहे. शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.गणेशोत्सवाचा प्रारंभ बुधवार होणार असून प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मंडळांकडून मिरवणुका काढण्यात येतात. शिवाजी रस्त्यावरील शनिवारवाडा परिसरात ‘श्रीं’ची मूर्ती खरेदीसाठी भाविकांची गर्दी होते.
चोरटे नेहमीच वेगवेगळी शक्कल लढवत असतात. चोरी करताना किंवा केल्यानंतर मागे कोणताही पुरावा शिल्लक राहू नये, याची खबरदारीही घेत असतात. मात्र यवतमाळ तालुक्यातील साकूर या गावी, चोरट्यांनी मुद्देमाल, ऐवज, दुचाकी, मोबाईल आदी साहित्य चोरून पसार झाल्यानंतर ज्याचा मोबाईल चोरी केला.
वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवाचा प्रारंभ बुधवारी (३१ ऑगस्ट) होणार असून उत्सवाच्या काळात अनुचित घटना टाळण्यासाठी शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. उत्सवाच्या काळात साडेसात हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सविस्तर वाचा…
कल्याण- गणपती विसर्जनाच्या दिवशी कल्याण शहरात कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक विभागाने विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील ३१ पोहच रस्त्यांवर वाहने उभी करण्यास प्रतिबंध केला आहे. या भागात कोणत्याही प्रकारची वाहने उभी करू नयेत.
कोयना प्रकल्पबाधितांसाठी राखीव असलेल्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याचा काम जिल्हा प्रशासनाने मागील आठवड्यात हाती घेतले होते. ठाणे तालुक्यात येणाऱ्या मौजे पिंपरी गोठेघर, डायघर, भंडार्ली आणि वालिवली येथील राखीव जमिनीवर मागील तीस वर्षांपासून भूमाफियांनी कब्जा केलेल्या जागेवरील अनधिकृत बांधकाम जिल्हा प्रशासनानाने दोन दिवसांची धडक मोहीम राबवित हटविले आहे.
बनावट चलनी नोटांची विक्री करण्यासाठी आलेल्या एका आरोपीला घाटकोपर पोलिसांनी अटक केली. या आरोपीकडून पोलिसांनी पाचशे रुपयांच्या एकूण ४० नोटा हस्तगत केल्या असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
करोना प्रादूर्भाव ओसरल्यामुळे दोन वर्षानंतर गणेशोत्सवानिमित्त फुल बाजार बहरल्याचे चित्र आहे. ठाण्यातील फुल बाजारात नागरिक सकाळपासनू गर्दी करत आहे. यंदा फुले खरेदी करताना नागरिकांना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा प्रत्येक फुलांच्या दरात प्रति किलो मागे २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे.
‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’च्या चाचणीस अखेर मंगळवार, ३० ऑगस्ट २०२२ पासून सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी सकाळी ११ वाजता एका सोहळ्यात चाचणीला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमधील (एमएमआरसी) अधिकाऱ्यांनी दिली.
मागील सतरा वर्षापासून भिवंडी जवळील कोन गावातील हिंदू-मुस्लिम बांधव गुण्यागोविंदाने गणेशोत्सव साजरा करत होते. दोन वर्षापुर्वीची करोनाची महासाथ, त्यानंतर वाढलेली महागाई यामुळे उद्योजक, व्यापारी, रहिवाशांकडून वर्गणी मिळणे अवघड झाल्याने कोन मधील ड्रीम काॅम्पलेक्स सामाजिक सलोखा मंडळाने यावर्षापासून गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटात ‘बाबूजी आ गये ‘ म्हणताच मुन्नाभाईचे शिष्य एका दिवसात एक खोटे रुग्णालय उभारतात. असाच काहीसा धक्कादायक प्रकार भंडाऱ्यात एका आमदार पत्नीच्या रुग्णालयात घडला.
भाद्रपद गणेश चतुर्थीला घरोघरी गणपती पूजन होत असल्याने पुजेसाठी पुरोहित उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेक गणेश भक्तांनी पुरोहितांकडे ऑनलाईन पुजेची आग्रही मागणी केली आहे. या मागणीला अनेक पुरोहितांनी प्रतिसाद देऊन ऑनलाईन पध्दतीने पूजा सांगण्याची तयारी दर्शविली आहे. सविस्तर वाचा…
“देशात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेले काम सोडले, तर कुठलेही काम पैलतिरापर्यंत पोहचू शकलेले नाही, गडकरींनी रस्ते चांगले केले, भाजप आता त्यांच्याही मागे लागला आहे”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमरावतीत केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संवाद बैठकीत बोलताना जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर तोंडसुख घेतले.
लग्नास नकार दिल्याने एका २२ वर्षीय तरुणीने शनिवारी दोन वेळा भायखळा रेल्वे स्थानकात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. आत्महत्येचा पहिला प्रयत्न फसल्यानंतर थेट भायखळा रेल्वे स्थानकात भरधाव वेगात येणाऱ्या लोकलसमोरच ती उभी राहिली. या प्रकारामुळे स्थानकात उपस्थित प्रवाशांचे धाबेच दणाणले.
कल्याण : कल्याण जवळील शहाड येथे पोलीस पाटील असलेल्या पतीने पत्नीला रात्रीच्या वेळेत मोबाईल हाताळण्यास दिला नाही. त्याचा राग येऊन रागावलेल्या पत्नीने देव्हाऱ्यातील लाकडी पाट पोलीस पाटील असलेल्या पतीच्या डोक्यात मारुन गंभीर दुखापत केली आहे. बातमी वाचा सविस्तर…
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या निकालांत प्रचंड गोंधळ करणाऱ्या महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अर्थात ‘एमकेसीएल’ची अखेर विद्यापीठातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ‘एमकेसीएल’ला झुकते माप देणाऱ्या कुलगुरूसह सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिली. वाचा सविस्तर बातमी…
यंदाही पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवासाठी ठाणे महापालिका सज्ज असून गणेश मुर्तीं विसर्जनासाठी विसर्जन घाट, कृत्रिम तलावांची निर्मिती तसेच गणेश मुर्ती स्वीकृती केंद्रे तयार करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली.
रेल्वे पोलीस फोर्सचे एएसआय रवींद्र सानप आणि मोटरमन यांनी जीव देण्यासाठी निघालेल्या एका महिलेला अक्षरशा मृत्यूच्या तोंडातून परत आणल्याची घटना घडली आहे. मुंबईतील भायखळा रेल्वे स्टेशनवर हा थरारक प्रसंग घडला. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या रेल्वे प्रवाशांना मात्र हा प्रसंग पाहून धस्स झाले. वाचा सविस्तर बातमी…
कोल्हापूरमध्ये गोकुळच्या ६० व्या सर्वसाधारण वार्षिक सभेमध्ये जोरदार गोंधळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष सुरु झाला आहे. बसण्यासाठी जागा नसल्याने आणि समाधानकारक उत्तरं दिली जात नसल्याने शौमिका महाडिक सभेतून बाहेर पडल्या आणि समांतर सभा सुरु केली. यावेळी त्यांनी साध्या दूध उत्पादकांची फसवणूक करु नका असं आवाहन करत सत्ताधाऱ्यांनी दिलेली वचनं पाळली नाहीत असा आरोप केला. दरम्यान, सभा संपल्यानंतर सतेज पाटील, हसन मुश्रीफ, ऋतुराज पाटील या तिन्ही आमदारांना सभासदांनी खांद्यावरून व्यासपीठावर नेलं.
आधी विमानतळ बांधले जाते आणि त्यानंतर त्या परिसरात इमारती किंवा अन्य बांधकामे उभी राहतात. नवी मुंबई विमानतळाच्या बाबतीत नेमके विरुद्ध चित्र आहे. हे विमानतळ प्रस्तावित आहे आणि त्याआधीच या परिसरात इमारती उभ्या राहात आहेत, असा टोला उच्च न्यायालयाने सोमवारी हाणला. सविस्तर वाचा…
आंबटशौकीन असलेल्या एका वृद्ध डॉक्टरने एका तरुणीला अश्लील 'व्हिडिओ कॉल' केला. त्यानंतर त्या तरुणीने डॉक्टरचे अश्लील छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन १६ लाख २५ हजार रुपयांनी लुटले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) सणासुदीच्या काळात होणाऱ्या भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या विरोधात विशेष मोहीम हाती घेतली असून अन्नपदार्थ खरेदी करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन ग्राहकांना करण्यात आले आहे. तसेच अन्नपदार्थ विक्रेते आणि उत्पादकांना सूचनांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महापालिका क्षेत्रातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला असून याबाबत मनसेच्या शहर पदाधिकाऱ्यांनी पालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांची भेट घेऊन संताप व्यक्त केला. झोपलेल्या व्यक्तीला उठवता येते पण, झोपेचे सोंग घेणाऱ्या व्यक्तीला उठवता येत नाही, असे सांगत मनसे पदाधिकाऱ्यांनी नगर अभियंता सोनाग्रा यांना कुंभकर्णची प्रतिमा भेट दिली.
गणेश विसर्जन निमित्ताने ठाणे जिल्ह्यातील ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहर म्हणजेच ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे पोलिसांनी वाहतूक बदल लागू केले आहेत. एक, चार, पाच सहा आणि नऊ सप्टेंबर या दिवशी दुपारी ते रात्री गणेश विसर्जन संपेपर्यंत हे बदल लागू असणार आहे.
क्रिकेटमधील भारताचा पारंपारिक स्पर्धक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तान संघासोबत रविवारी आशिया चषकातील भारताचा पहिला सामना रंगला. या सामन्यावर उल्हासनगर शहरात सट्टा खेळणाऱ्या एका सट्टेबाजाला उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे.
सकाळच्या सुमारास गस्तीवर असलेल्या सी ६० पोलीस पथकाच्या एका जवानाने सहकाऱ्यावर गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना एटापल्लीपासून जवळच असलेल्या आलदंडी मार्गावर घडली आहे. वाचा सविस्तर बातमी…
मराठा आरक्षण रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातील फेरविचार याचिकेवर निकाल आल्यानंतरच मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपविण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयात गेले काही महिने प्रलंबित असून त्यावर लवकर सुनावणीसाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून नवीन सांख्यिकी व कायदेशीर तपशीलही सादर करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.