मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटात ‘बाबूजी आ गये ‘ म्हणताच मुन्नाभाईचे शिष्य एका दिवसात एक खोटे रुग्णालय उभारतात. असाच काहीसा धक्कादायक प्रकार भंडाऱ्यात एका आमदार पत्नीच्या रुग्णालयात घडला.
हेही वाचा >>> अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी आज मुलाखती
आमदार भोंडेकर यांच्या पत्नीचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय आहे. रुग्णालयाच्या तपासणीसाठी टीआरसी समिती येणार होती. आधी या रुग्णालयाचे नाव ‘पीईसी मल्टीस्पेालिटी हॉस्पिटल’ असे होते मात्र समिती येण्याअधी एका रात्रीत रुग्णालयाचे नाव बदलून ‘पीईसी आयुर्वेदिक रुग्णालय’ असे करण्यात आले. आता गरज होती रुग्णांची. ते कुठून आणायचे?मग, आमदार साहेबांची ‘सेना’ कामाला लागली. मजुरीवर जाणाऱ्या महिलांना २०० रुपये देऊन रुग्ण बनविण्यात आले. दोन दिवसाचे ४०० रुपये मिळणार म्हणून महिलांनी एकच गर्दी केली. अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाली. अनेक महिलांना परत पाठवण्यात आले. चार दिवसानंतर घरोघरी जाऊन भाड्याने आणलेल्या रुग्णांना फक्त १०० रुपये देण्यात आले. २०० रुपये सांगून १०० रुपये दिले म्हणून काही महिला आमदार साहेबांच्या नावाने बोटे मोडत होत्या.
हेही वाचा >>> नागपूर : आंबटशौकीन वृद्ध डॉक्टरला अश्लील ‘व्हिडिओ कॉल’ पडला १६ लाखांचा ; तरुणीने दिली छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी
मला काहीच कल्पना नाही – आमदार भोंडेकर
नियमित तपासणीसाठी समिती आली होती. परंतु, त्यासाठी महिलांना पैसे देवून रुग्ण बनवले की कसे याबाबत कल्पना नाही. महिलांची नावे द्या मी माहिती काढतो.