Mumbai Maharashtra Updates : अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केल्यानंतर राज्याचं राजकारण राष्ट्रवादीवर लक्षकेंद्रीत झालं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पदही धोक्यात आल्याच्या चर्चा आहेत. त्यातच, अजित पवारांनी दिल्लीत शरद पवारांशी भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. येत्या काळात अनेक राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील राजकारण कोणत्या दिशेने जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यातील राजकारण, पावसाचे अपड्टेस आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा.
Mumbai Maharashtra Live Today : राज्यातील राजकारण, पावसाचे अलर्ट आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा!
ठाणे : शिळ डायघर पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस शिपाई ज्योती मुंढे यांना शबनम खान आणि हसीना खान यांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
सविस्तर वाचा...
वसई – नणंदेचा गर्भपात व्हावा यासाठी मांत्रिकाच्या सहाय्याने जादुटोणा केल्याचा प्रकार विरारच्या ग्रामीण भागात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मांडवी पोलिसांनी महिलेसह मांत्रिकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सांगली : राग आला की एक तर मारायला हात शिवशिवतात, नाही तर तोंडातून सात पिढ्यांचा उद्धार हमखास. पण यामागे मनातील रागाला वाट करून देण्याचा मार्ग मानला जात असला तरी यात प्रामुख्याने महिलांवरूनच उद्धाक केला जातो. या पिढीजात परंपरेचा त्याग करण्याचा निर्धार सांगलीच्या नमराह फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केला असून याची आठवण करून देण्यासाठी सह्याद्रीनगरात शिवीमुक्त कट्टाही उभारला आहे.
डोंबिवली येथील पूर्व भागात गजानन चौकातील एका संकुलात राहत असलेल्या एका शिक्षिकेच्या घरातून चोरट्यांनी दोन लाख ७० हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज लांबविला. रेश्मा अभिजीत कुंभार असे शिक्षिकेचे नाव आहे. त्या गजानन चौकातील एका संकुलात राहतात. सोमवारी सकाळी त्या कामानिमित्त बाहेर होत्या. घराला कुलुप होते.
गणेशोत्सवाला मोजके दिवस शिल्लक असून यंदा गणेशमूर्तीच्या उंचीवर कोणतेही बंधन नाही. त्यामुळे अनेक मंडळांनी उंच गणेशमूर्ती घडविण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी महिनाभर आधी गणेशमूर्ती मंडळाच्या मंडपात आणण्यात येतात व त्यानंतर सजावट केली जाते. यंदाही अनेक मंडळांनी आगमन मिरवणुका काढून गणेशमूर्ती मंडपस्थळी आणण्यास सुरुवात केली आहे.
नागपूर : भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील खंदाड या गावातील शेतात बुधवारी वाघ मृतावस्थेत आढळला. घटनेची माहिती कळताच पोलीस आणि वनखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले.
तेरा वर्षापूर्वी कल्याण डोंबिवली पालिकेच्या सर्वसाधारण सभेने डोंबिवलीतील रेल्वे स्थानका जवळील विष्णुनगर मासळी बाजार इमारतीचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. या प्रकल्पासाठी तीन कोटी ३३ लाख रुपयांचा खर्च पालिकेने प्रस्तावित केला होता.
नागपूर : भाजप नेत्या सना खान यांच्या मोबाईलमध्ये काही व्हिडीओ आणि फोटो होते ते अमित शाहूने बघितले. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यातून अमितने सना यांच्या डोक्यात रॉड घालून खून केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
धाराशिव : दैवी चमत्काराचे दावे करणाऱ्या स्वंयघोषित राष्ट्रसंत लोमटे महाराजाला महिलेवर केलेल्या अत्याचार प्रकरणी येरमाळा पोलिसांनी अटक केली आहे. पंढरपूर येथे सापळा लावून मोठ्या शिताफीने पोलिसांनी लोमटे महाराजाला गजाआड केले आहे. न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देशभर दोन सभा घेणार आहेत. बिहार आणि कर्नाटकात ते जाहीर सभा घेणार असल्याचे आज त्यांनी सांगितले.
नागपूर : भाजपा नेत्या सना खान यांचा मृतदेह तब्बल १४ दिवसांनंतर बुधवारी पोलिसांच्या हाती लागला. तो घेण्यासाठी नागपूर आणि जबलपूर पोलीस पथकासह सना यांचे नातेवाईक सिहोर गावाकडे रवाना झाले आहेत.
डोंबिवली – येथील पूर्व भागातील सर्वाधिक वर्दळीच्या बाजीप्रभू चौकात एमआयडीसी बस निवाऱ्याच्या बाजूला पालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळ रिक्षांमध्ये बसून काहीजण दररोज मद्यपान करतात. या मद्याचा घमघमाट परिसरात पसरतो. स्वच्छता गृहात जाणारे महिला, पुरुष नागरिक हा सगळा प्रकार पाहून हैराण आहेत.
स्वातंत्र्यदिनी नगर शहराजवळील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात देशविरोधी वादग्रस्त घोषणाबाजी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यासंदर्भात किल्ल्यात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या लष्कराचे जवान व भिंगार कॅम्प पोलीसांनी एकूण ५ जणांना ताब्यात घेतले.
काँग्रेस नेते राहुल गांधी हे खरे गांधी नसून खान असून महात्मा गांधी यांच्या आडनावाचा गैरफायदा घेण्यात आला, असा आरोप अभिनेते शरद पोंक्षे यांनी येथे आयोजित व्याख्यानात केला. सविस्तर वाचा…
वर्धा : विविध प्रसंगात सजावट, भेट, पूजेसाठी फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. या फुलात अग्रभागी गुलाब असला तरी त्याची महागडी किंमत अनेकांना परवडत नाही. आता त्यास तोड म्हणून कार्नेशन हे फुल बाजारात चर्चेत आहे. विविध रंगात ते उपलब्ध होत असून प्रामुख्याने बिहार प्रांत या फुल उत्पादनात आघाडीवर आहे.
गेल्या १२-१३ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. हा महामार्ग पूर्ण होऊन कोकणवासियांना सुलभ प्रवास करता यावा याकरता आज पनवेलमध्ये निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. त्यावेळी राज ठाकरेंनी उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना आंदोलन कसं झालं पाहिजे, यावर मार्गदर्शन केलं. पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला.
अमरावती : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शब्द पाळत नाहीत. आता एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाचे काही खरे नाही. ते केव्हा जाईल याचा नेम नाही. अजित पवार केव्हाही मुख्यमंत्री होतील अशी स्थिती आहे. भाजपा नेते केवळ उपयोग करून घेतात. त्यानंतर फेकून देतात, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
मुंबई गोवा महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. या काळात समृद्धी महामार्ग बनून वाहतुकीसाठी खुलाही झाला, परंतु, मुंबई-गोवा महामार्गाचं काम अर्धेही झालेले नाही. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सातत्याने आवाज उठवला आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मार्गाच्या पुर्णत्वासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसंच, चंद्रयानावरून त्यांनी मिश्किल टिप्पणीही केली आहे. पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके सभागृहात आयोजित केलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.
लोकांच्या कानपट्टीवर बंदुका ठेवायचा आणि आतमध्ये आणायचं. मग ते लोक आतमध्ये गाडीमध्ये झोपून जाणार, मी तुला दिसलो का? निर्लज्जपणाचा कळस सुरू आहे महाराष्ट्रात. आपण या सरकारमध्ये का आलो आहे? महाराष्ट्राचा विकास करायचा आहे मला, अरे कशाला खोटं बोलतोय. मोदींनी ७० हजार कोटींचा घोटाळा काढला तेव्हा टुणकन आले सगळे. भुजबळांनी सांगितलं असणार की आत काय काय असतं. जाऊ नका, तिथे जाऊ, तिथे झोपू - राज ठाकरे
धुळे – तालुक्यातील धुळे-साक्री महामार्गावरील जवाहर सूतगिरणीजवळ तीनजणांनी छायाचित्रकाराच्या चेहऱ्यावर मिरचीपूड फेकून बंदुकीचा धाक दाखवित पाच हजारांची रोकड, भ्रमणध्वनी, १५ हजार रुपयांचे मंगळसूत्र असा सुमारे २८ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला.
गडचिरोली : पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मानवतावाद अध्यासन केंद्राच्या माध्यमातून आदिवासींसह इतर लोकांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा बळजबरीने थोपविण्याचा घाट विद्यापीठाच्या वतीने रचण्यात आला आहे. सदर अध्यासन केंद्राला आमचा प्रखर विरोध असून १९ ऑगस्ट रोजी होणारा अध्यासन केंद्राचा उद्घाटन सोहळा आम्ही उधळून लावणार, असा इशारा आदिवासी युवा विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी पत्रपरिषदेतून दिला.
कोकणातील माणसा जागा हो, सज्ज हो, बाळा नांदगावकर याचा पनवेलहून एल्गार
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी काँग्रेसच्या गटाची सत्ता उलथवलीच नव्हे, तर स्वत: अध्यक्षपदी विराजमान झाले. काँग्रेससाठी हा मोठा धक्का होता. काँग्रेसच्या गटातील तीन संचालक फोडून बच्चू कडू यांनी ही किमया साधली खरी, पण आता बाजी पुन्हा उलटण्याचे संकेत मिळाले आहेत. काँग्रेसच्या गटातील १३ संचालकांनी मासिक सभेला अनुपस्थित राहून त्याची चुणूक दाखवून दिली.
कोल्हापुरात सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी ३.४ रिश्टर स्केलवर भूकंपाचे धक्के जाणवले, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली. ५ किमी खोलीवर हा भूकंप होता.
https://twitter.com/ani_digital/status/1691643267656392852?s=20
गडचिरोली : खाण क्षेत्राशी संबंधित नवे तंत्रज्ञान शिकण्यासाठी येत्या काही दिवसांत ४० आदिवासी विद्यार्थी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. तीन वर्षांच्या पदवीनंतर या विद्यार्थ्यांना लॉयड मेटल्समध्येच काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती ‘लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक बी प्रभाकरन यांनी दिली.
बुलढाणा: सवणा चिखली मार्गावर एसटी बस १० फूट खोल दरीत कोसळली. यामुळे विद्यार्थ्यांसह सुमारे २५ प्रवासी जखमी झाले. यातील ६ जणांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
लातूर : निलंगा येथे काँग्रेसने घातलेल्या धोंडे जेवणाला तीन हजारांची गर्दी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संभाजी पाटील निलंगेकर यांनी ६०० जणांची नऊ विषयांवर विकास परिषद घेतली. निलंग्यातील या दोन राजकीय कार्यक्रमांमुळे लातूर जिल्ह्यातील निलंगेकर – देशमुख हा पूर्वापार वाद नव्याने उफाळला असल्याचे दिसून येत आहे.
ज्या पद्धतीने केंद्र सरकारने नवाब मलिकांवर अन्याय केला आहे तो अतिशय वाईट उदाहरण आहे. ते काही आता बोलायची ही वेळ नाही. आता त्यांच्या कुटुंबाला ते घरी आले आहेत याचा आनंद आहे. ज्या दुःखातून जे काही त्या कुटुंबाने सहन केलंय त्याला हॅट्स ऑफ. ज्या पद्धतीने अनिल देशमुखांच्या पोरी लढल्या, ज्या पद्धतीने नवाब मलिकांच्या पोरी लढल्या, ज्या पद्धतीने या लेकी लढल्या आहेत, याचा सार्थ अभिमान मला आहे - सुप्रिया सुळे
जिल्ह्यात घडणार्या खून, प्राणघातक हल्ले, मारहाण, अत्याचारासह चोरीच्या घटनांमध्ये विधीसंघर्षग्रस्त बालकांचा सहभाग लक्षणीय वाढला आहे. जिल्ह्यातील कुख्यात चोरट्यांकडून विविध गुन्ह्यांत विधीसंघर्षग्रस्तांचा वापर पोलिसांनाही कारवाई करताना अडचणीचा ठरत आहे.
या बारीक खडीवरुन वळण घेताना किंवा वेगाने जाताना दुचाकी घसरुन चालक रस्त्यावर पडत आहेत. दररोज १० ते १५ जण या वळण रस्त्यावर पडत आहेत, असे या भागातील व्यापाऱ्यांनी सांगितले. डोंबिवली शहराच्या प्रवेशव्दारावरील सर्वाधिक वर्दळीच्या घरडा सर्कल चौकात दोन महिन्यांपासून खड्डे पडले आहेत.
Mumbai Maharashtra Live Today : राज्यातील राजकारण, पावसाचे अलर्ट आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा!