Mumbai Maharashtra Updates : अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केल्यानंतर राज्याचं राजकारण राष्ट्रवादीवर लक्षकेंद्रीत झालं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पदही धोक्यात आल्याच्या चर्चा आहेत. त्यातच, अजित पवारांनी दिल्लीत शरद पवारांशी भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. येत्या काळात अनेक राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील राजकारण कोणत्या दिशेने जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यातील राजकारण, पावसाचे अपड्टेस आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Mumbai Maharashtra Live Today : राज्यातील राजकारण, पावसाचे अलर्ट आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा!

11:17 (IST) 16 Aug 2023
शेतकऱ्यांच्या जमिनी फुकटात लाटणारा नैना नको; शासन लादत असलेल्या सिडकोच्या प्रकल्पाला विरोध

सरकार आणि सिडकोच्या माध्यमातून नैना प्राधिकरण शेतकऱ्यांना मोबदला न देता त्यांच्या जमिनी फुकटात लाटण्याचा प्रयत्न करीत आहे. या जमीन लुटीला शेतकऱ्यांनी  एकजूटी ने विरोध करण्याचा निर्धार मंगळवारी पेण येथील सभेत देशाच्या स्वातंत्र्यदिनीच केला आहे.

सविस्तर वाचा

11:07 (IST) 16 Aug 2023
भंगार विक्रीतून मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग मालामाल; ९.३७ कोटींची कमाई

भंगार विक्रीतून मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग मालामाल झाला आहे. भंगाराची विल्हेवाट लावण्याकरिता मध्य रेल्वेमार्फत शून्य भंगार मोहिम राबवण्यात येते. या मोहिमेंतर्गत जुलै २०२३ मध्ये ३४७.६७ मेट्रिक टन भंगाराची विक्री करण्यात आली असून, १.६३ कोटींचा महसूल जमा झाला.

सविस्तर वाचा

11:06 (IST) 16 Aug 2023
Buldhana Accident: ट्रॅव्हल्स मालकावर गुन्हा दाखल का नाही? संतप्त कुटुंबीयांचा आक्रोश

१ जुलैला बुलढाणा येथे झालेल्या अपघातात २५ व्यक्तींचा बळी गेला. मात्र दीड महिना लोटूनही कोणावरही कारवाई झाली नसल्याने सर्वांचे कुटुंब आता संतप्त झाले आहे. इथे मृतकांचे आप्त एकत्र आले. त्यांनी श्रद्धांजली देताना आपल्या भावनाही व्यक्त केल्या.

सविस्तर वाचा

11:06 (IST) 16 Aug 2023
वर्षभरापासून मला चेकमेट करण्याचा प्रयत्न सुरू, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य

आम्हाला एकाचवेळी कितीतरी वेळा विरोधकांशी मुकाबला करावा लागतो. यात काही तिरक्या चालीचे उंट असतात. काही अडीच घरे चालणारे घोडे असतात, काही हत्ती असतात.सगळेच एकमेकांना चेकमेट करण्यासाठी तयारी करत असतात. गेले एक वर्षांपासून मलाही चेकमेट करण्याचा प्रयत्न अनेकजण करत आहेत. विरोधकांनी आपली बुद्धी कितीही पणाला लावली तरीही जनतेच्या विश्वासाचं आणि पाठिंब्याचं बळ माझ्याकडे आहे. त्यामुळे विरोधक चितपट होत आहेत – एकनाथ शिंदे</p>

11:01 (IST) 16 Aug 2023
पुणे : कौटुंबिक वादातून काकाकडून पुतण्यावर गोळीबार

कौटुंबिक वादातून काकाने पुतण्यावर गोळीबार केल्याची घटना लोणी काळभोर भागात घडली. सुदैवाने या घटनेत पुतण्याला दुखापत झाली नाही. याप्रकरणी काकास पोलिसांनी अटक केली. प्रदीप तुकाराम जाधव (वय ४४, रा. लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) असे अटक करण्यात आलेल्या काकाचे नाव आहे.

सविस्तर वाचा

10:57 (IST) 16 Aug 2023
“राज्याचे आरोग्य बिघडावे म्हणून दिल्लीपासून…” कळव्यातील मृत्यूकांडप्रकरणी ठाकरे गटाचा हल्लाबोल

ठाणे महानगरपालिकेच्या अख्यारित असलेले कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात २४ तासांत १८ मृत्यू दगावले आहेत. तर, दोन ते तीन दिवसांतील हाच आकडा जवळपास २७ आहे. अपुरे कर्मचारी आणि वाढलेली रुग्णसंख्या यामुळे रुग्णांना वेळेत आणि योग्य उपचार करणे वैद्यकीय कर्मचाऱ्यांपुढे मोठे आव्हान आहे. त्यामुळेच हा प्रकार घडला असल्याचे प्राथमिक सांगण्यात येतेय. यावरून ठाकरे गटाने सरकारवर टीका केली आहे.

सविस्तर वाचा

09:53 (IST) 16 Aug 2023
…तर अजितदादा मुख्यमंत्री होतील, सुषमा अंधारे यांचं सूचक वक्तव्य

देवेंद्र फडणवीस कधी अमरावतीत आले तर त्यांना विचारा की तुम्ही बोलत होतात की आजन्म ब्रह्मचारी राहीन पण राष्ट्रवादीत जाणार नाही. आणि जर देवेंद्र एकही शब्द पाळत नसतील तर कशावरून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर कायम राहतील? त्यांच्यातील एकाने सांगितलं की ३ तारखेला आणखी एक गौप्यस्फोट होणार आहे. कदाचित गौप्यस्फोट सांगून त्यांच्याच नेता खाली खेचून अजित दादांना मुख्यमंत्री करतील – सुषमा अंधारे

महाराष्ट् न्यूज लाइव्ह