Marathi News Today: लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती व महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटपाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. उमेदवारी नाकारण्यात आलेल्या नेत्यांची नाराजी तर उमेदवारी मिळालेल्या नेत्यांचा विजयाचा निर्धार अशा गोष्टी घडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीत मनसे तर महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीच्या समावेशावरूनही तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

Live Updates

Maharashtra News Live Updates 22 March 2024: महायुती आणि महाविकास आघाडीशी संबंधित महत्त्वाच्या राजकीय घडामोडी एका क्लिकवर!

19:06 (IST) 22 Mar 2024
मनोज जरांगेंच्या करमाळ्यातील सभेविषयी उत्सुकता

सोलापूर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे उद्या शनिवारी करमाळा तालुक्यात येत असून दिवे गव्हाण येथे त्यांची विराट सभा होणार आहे. या सभेसाठी ७० एकर मैदान वापरले जाणार आहे. या सभेत लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सभा होत असल्याने त्या अनुषंगाने जरांगे काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

18:51 (IST) 22 Mar 2024
चंद्रपूर : लोकसभेत काँग्रेस पक्षाला तिकीट वाटपाच्या वादाची पार्श्वभूमी, यंदाही अनपेक्षित धक्का!

१९८० ते १९९५ पर्यंत केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांनी या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र, तेव्हाही माजी खासदार नरेश पुगलिया यांचे नाव उमेदवारांच्या स्पर्धेत शेवटपर्यंत राहायचे.

सविस्तर वाचा...

18:31 (IST) 22 Mar 2024
सागर बंगल्यावर धाराशिवच्या उमेदवारीसाठी रांग, देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तोडगा काढण्याचे आव्हान

मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवाराला मिळालेल्या मताधिक्यामुळे अनेकांचा आत्मविश्वास वाढला आहे. मोदींच्या लाटेत देशाच्या संसदेत जाण्याचा मार्ग सहज शक्य असल्याची धारणा बळावली आहे. त्यामुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणार्‍या भाजपा आणि महायुतीतील उमेदवारांची संख्या मोठी आहे. देवेंद्र फडणवीस यांनीच यावर तोडगा काढावा, यासाठी शुक्रवारी दिवसभर सागर बंगल्यावर इच्छुक उमेदवारांची रांग लागली होती.

सविस्तर वाचा..

18:25 (IST) 22 Mar 2024
निवडणूक आयोगाच्या ॲपला नागरिकांचा प्रतिसाद

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आचारसंहितेचा भंग वा तत्सम गैरप्रकारांविषयी तक्रार करण्यासाठी उपलब्ध केलेल्या सि – व्हिजिल ॲपवर तक्रारी येण्यास सुरूवात झाली आहे. खासदार, आमदार, राजकीय पक्ष यांच्याविषयी तक्रारी करण्यात येत आहेत. आचारसंहितेविषयी नागरिकांमध्ये असलेली सजगता त्याद्वारे दिसून येत आहे.

सविस्तर वाचा...

18:15 (IST) 22 Mar 2024
एकनाथ शिंदे गटाच्या माजी आमदाराचा दावा, म्हणाले, “नवनीत राणांची उमेदवारी…”

आमदार रवी राणा यांचा सूर धमकीचा असतो, यावरून आजही त्‍यांच्‍यात पैशांची गुर्मी आणि आम्‍ही कुणालाही खरेदी करू शकतो, असा अविर्भाव आहे, असे अडसूळ यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा...

18:03 (IST) 22 Mar 2024
VIDEO: नाशिक रोड स्थानकाजवळ गोदान एक्स्प्रेसच्या मालडब्याला आग

नाशिक : नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास ११०५५ डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर गोदान एक्स्प्रेसच्या माल (पार्सल) डब्याला आग लागली. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी काही गाड्यांचा खोळंबा झाला.

सविस्तर वाचा...

18:00 (IST) 22 Mar 2024
तळोजात बीअर शॉपीमध्ये मद्य विकणाऱ्यावर कारवाई

पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीलगतच्या पेणधर गावातील बीअर शॉपीमध्ये मद्याच्या बाटल्या विकणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. पेणधर गावातील आरुषी बीअर शॉपीमध्ये गुरुवारी दुपारी साडेचार वाजता सुमारे ९ हजार रुपयांची विस्कीच्या बाटल्या विक्री करताना तळोजा पोलिसांनी ही कारवाई केली.

सविस्तर वाचा...

17:59 (IST) 22 Mar 2024
शक्तीपीठ महामार्गाविरोधात आजऱ्यातील शेतकऱ्यांचे प्रांत अधिकारी यांना हरकती व निवेदन सादर

कोल्हापूर : गोवा ते नागपूर शक्तीपीठ मार्ग हा आजरा तालुक्यातील सहा गावांमधून जाणे प्रस्तावित आहे. शेळप, पारपोली, सुळेरान, खेडगे, दाभिळ वाडी, आंबाडे ही गावे होत. या सर्व गावातील बाधित शेतकऱ्यांनी शुक्रवारी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने निवेदन व सामुदायिक हरकती प्रांताधिकारी कारवे यांना देऊन आपला विरोध दर्शवला.

17:48 (IST) 22 Mar 2024
छत्रपती संभाजीनगर : लघु उद्योजकाचा खून; निलंबित पोलिसासह दोघांना अटक

छत्रपती संभाजीनगर – वाळूजमधील साजापूर येथील लघु उद्योजक सचिन साहेबराव नरोडे (वय ३७) यांचा बंदुकीची गोळी झाडून केलेल्या खून प्रकरणात लाच प्रकरणात निलंबित असलेला पोलीस अंमलदार रामेश्वर सीताराम काळे व त्याचा साथीदार लक्ष्मण नामदेव जगताप यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी शुक्रवारी दुपारी येथे आयोजित पत्रकार बैठकीत दिली.

सविस्तर वाचा...

17:11 (IST) 22 Mar 2024
नाशिक रोड स्थानकाजवळ गोदान एक्स्प्रेसच्या मालडब्याला आग

नाशिक : नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास ११०५५ डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर गोदान एक्स्प्रेसच्या माल (पार्सल) डब्याला आग लागली. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी काही गाड्यांचा खोळंबा झाला.

सविस्तर वाचा...

16:46 (IST) 22 Mar 2024
समाज, राजकारणाची दिशा सुधारण्यासाठी प्रयत्न करत नसल्याने सगळे पक्ष पंतप्रधान मोदींचा विरोधात – शाहू महाराज

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम नाकारून चालणार नाही. मात्र, समाजकारण आणि राजकारणाला योग्य दिशा मिळाली नाही. समाज आणि राजकारणाची दिशा सुधारण्यासाठी ते विशेष प्रयत्न करत नसल्यामुळेच सगळे पक्ष त्यांच्या विरोधात आले आहेत, अशी टीका शाहू महाराज छत्रपती यांनी शुक्रवारी येथे केली.

सविस्तर वाचा -

16:33 (IST) 22 Mar 2024
बीड लोकसभा लढण्यास इच्छुक; पंकजा मुंडे असो की प्रीतम मुंडे, मी लढणार – बजरंग सोनवणे

सध्या शरद पवार गटाने महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर केले नाहीत. विविध मतदारसंघातून अनेक जण इच्छुक आहेत. बीड लोकसभा मतदारसंघातून ज्योती मेटे आणि बजरंग सोनवणे यांच्या नावाची चर्चा आहे. पक्षाने जबाबदारी दिल्यास मी निवडणूक लढण्यास इच्छुक असून निवडणूक जिंकेलही, असा विश्वास बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला. ते आळंदीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सविस्तर वाचा...

16:30 (IST) 22 Mar 2024
पृथ्वीराज चव्हाण का म्हणाले, “हात-पाय बांधून निवडणूक लढविण्याची कबड्डी खेळा…”

येनकेनप्रकारेण निवडणूक जिंकण्यासाठी मोदी सरकार रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केला.

सविस्तर वाचा...

16:06 (IST) 22 Mar 2024
दोन महिन्यांतच अटल सेतूची सुरक्षा ऐरणीवर

उरण : अटलसेतूवर टॅक्सीतून आलेल्या मुंबईतील महिलेने आत्महत्या केली. दोन महिन्यांपूर्वी १२ जानेवारीला सुरू झालेल्या या देशातील सर्वात मोठ्या सागरी पुलाची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी सागरी पुलावर पोलीस गस्त वाढविण्याची आवश्यकता आहे. मात्र त्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध केल्या जात नाहीत.

सविस्तर वाचा...

16:04 (IST) 22 Mar 2024
Maharashtra News Live Updates: नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ गोदाम एक्स्प्रेसच्या डब्याला आग

मुंबईहून गोरखपूरकडे जाणाऱ्या गोदाम एक्स्प्रेस गाडीच्या डब्याला आग लागली. या घटनेमुळे गाडीत असलेल्या प्रवाशांची धावपळ. नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथे रेल्वेच्या डब्याला आग; अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल. आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू...

15:53 (IST) 22 Mar 2024
दुचाकी चोरट्यांची भन्नाट शक्कल, चोरी जळगावात अन विक्री…

जळगाव : जळगावात दुचाकींची चोरी करुन त्यांची विक्री करण्यासाठी मात्र थेट मध्य प्रदेश गाठायचे, अशी शक्कल लढविणाऱ्या दोन चोरट्यांना पकडण्यात जळगाव येथील एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. त्यासाठी त्यांना थेट मध्य प्रदेशातील खंडवा गाठावे लागले.

सविस्तर वाचा...

15:51 (IST) 22 Mar 2024
बजाजची सीएनजी दुचाकी रस्त्यावर कधी येणार? राजीव बजाज यांनीच दिलं उत्तर

बजाज ऑटो कंपनीकडून सीएनजीवरील दुचाकी विकसित करण्यात येत आहे.

सविस्तर वाचा...

15:38 (IST) 22 Mar 2024
धुळ्यातील भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या विरोधात फलकबाजी

धुळे : इच्छुकांच्या भाऊगर्दीत भाजपने पुन्हा विश्वास ठेवलेले धुळे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या विरोधात मालेगावमध्ये फलकबाजी करण्यात आली आहे. या फलकांव्दारे खासदारकीला न्याय देणारा उमेदवार धुळे- मालेगाव लोकसभेला हवा, असा खासदार मान्य आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

15:23 (IST) 22 Mar 2024
aharashtra News Live Updates: रोहित पवारांवर अमोल मिटकरींची खोचक टीका!

पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या घोटाळ्याबाबत बोलत स्वतः ला मुत्सद्दी राजकारणी दाखवण्यासाठी धडपड करणाऱ्या बाल नेत्याने आपण कमी वयात ६००० कोटीचे मालक कसे झालो व कारखाना जप्ती का आली तेही एकदा पत्रकार परिषद घेऊन सांगावे.. - अमोल मिटकरी</p>

https://twitter.com/amolmitkari22/status/1771052725171630140

15:03 (IST) 22 Mar 2024
सांगलीच्या आखाड्यात पैलवान उतरल्याने भाजप आणि काँग्रेसची समीकरणे बदलली

सांंगली : महाविकास आघाडीतील जागा वाटप अजून रेंगाळले असताना आणि सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा प्रबळ दावा असताना जनसंवाद मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. या ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारीमुळे भाजपबरोबरच काँग्रेसलाही धक्का बसला आहे.

सविस्तर वाचा..

15:00 (IST) 22 Mar 2024
भाजप व आपचे कार्यकर्ते नगरमध्ये परस्परांना भिडले; घोषणायुद्ध

कोणताही अनुचित प्रकार होण्याआधीच शहर पोलिसांनी हस्तक्षेप करत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात नेले.

सविस्तर वाचा...

14:46 (IST) 22 Mar 2024
डोंबिवली : कंपनी मालकाने साथीदारांसह केली कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

डोंबिवली जवळील टाटा पाॅवर पिसवली गावात राहत असलेल्या एका कर्मचाऱ्याला तळोजा येथील अपेक्स फ्रेस कंपनीचे मालक आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांनी मंगळवारी रात्री बेदम मारहाण केली.

सविस्तर वाचा...

14:37 (IST) 22 Mar 2024
कल्याणमधील वालधुनी भागातील वाहन कोंडीने प्रवासी हैराण

कल्याण : कल्याण मधील वालधुनी उड्डाण पूल भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रस्ते कामामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवासी हैराण आहेत. सकाळच्या वेळेत कल्याण रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या आणि संध्याकाळी कामावरून परतणाऱ्या प्रवाशांचे यामध्ये सर्वाधिक हाल होत आहेत.

सविस्तर वाचा...

14:24 (IST) 22 Mar 2024
गडचिरोली : ‘वडेट्टीवार’ समर्थक नेत्यांचा भाजप प्रवेशाने काँग्रेमध्ये खळबळ

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार डॉ. नितीन कोडवते आणि डॉ. चंदा कोडवते या दाम्पत्याने ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेसच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. हे दाम्पत्य मागील काही वर्षापासून गडचिरोली काँग्रेसमध्ये सक्रिय होते. विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती.

वाचा सविस्तर...

13:49 (IST) 22 Mar 2024
बच्‍चू कडू यांच्या खेळीने महायुतीसाठी डोकेदुखी वाढणार ?

अमरावती : प्रहार जनशक्‍ती पक्षाच्‍या कार्यकर्त्‍यांची बैठक घेत आमदार बच्‍चू कडू यांनी वेगळी चूल मांडण्‍याचे संकेत दिल्‍याने महायुतीसमोरील अडचणी वाढल्‍या आहेत. जागावाटपाच्‍या चर्चेच्‍या वेळी आम्‍हाला विश्‍वासात घेतले गेले नाही, असे बच्‍चू कडू यांचे म्‍हणणे आहे. बच्‍चू कडू यांच्‍या खेळीने फटका कुणाला बसणार, याचे औत्‍सुक्‍य आहे.

सविस्तर वाचा...

13:40 (IST) 22 Mar 2024
नवीन पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागांसाठी ८७२ महाविद्यालयांचे अर्ज

मुंबई : सर्वसामान्यांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी, लोकसंख्येच्या तुलनेत तज्ज्ञ डॉक्टरांचे प्रमाण योग्य असावे यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा...

13:38 (IST) 22 Mar 2024
aharashtra News Live Updates: केजरीवाल यांच्या अटकेवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया...

केजरीवाल यांचा जी काही मद्य व्यवस्था आहे, ती मंत्रिमंडळ धोरणाची बाब आहे. मंत्रिमंडळ निर्णय चौकशीचा विषय होऊ शकतो का? हा प्रश्न आहे. सरकारला तोटा झाला असेल तर त्यात चौकशी होऊ शकते. तसं नसेल, तर न्यायालयाकडून मंत्रिमंडळाच्या निर्णयावर निकाल देता येतो का? हा प्रश्न आहे. धोरणात्मक निर्णयाला आव्हान देता येत नाही. हा अधिकार न्यायालयालाही नाही आणि तपास अधिकाऱ्यालाही नाही. सत्तेत बसणाऱ्यांमध्ये त्यावर आवाज उठवण्याची हिंमत नाही. हे फक्त बाहेर बोंबाबोंब करतात. ही दडपशाही आहे. काँग्रेसकडे जी राज्यं आहेत, काँग्रेसनं प्रश्न करायला हवा की आमच्या इतर राज्यांमधल्या मंत्रिमंडळांनी घेतलेल्या निर्णयांनाही तुम्ही आव्हान देणार आहात का? - प्रकाश आंबेडकर</p>

13:38 (IST) 22 Mar 2024
aharashtra News Live Updates: प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक आयोगाकडे केली तीन चिन्हांची मागणी

निवडणूक आयोगाकडून कॉमन निवडणूक चिन्हांचं प्रादेशिक पक्षांना वाटप केलं जाणार आहे. आम्ही गॅस सिलेंडर मागितला आहे. हेच गेल्यावेळी आमचं चिन्ह होतं. दुसरं शिट्टी मगितलं आहे. तिसरं चिन्ह रोडरोलर मागितलं आहे. ही वेगळी निवडणूक चिन्हं त्यांच्या यादीत आहेत. त्यामुळे आम्ही ती मागितली आहेत - प्रकाश आंबेडकर</p>

13:20 (IST) 22 Mar 2024
बॉडी मसाजासाठीची उपकरणे सेक्स टॉय नाहीत – उच्च न्यायालय

मुंबई : बॉडी मसाजसाठी वापरली जाणारी उपकरणे ही सेक्स टॉय म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकत नाही. तसेच, आयात करण्यास मनाई असलेल्या वस्तूंच्या यादीतही त्याचा समावेश केला जाऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

सविस्तर वाचा...

13:18 (IST) 22 Mar 2024
नागपुरात गडकरींच्या प्रचार कार्यालयात शिरण्याचा आप कार्यकर्त्यांचा प्रयत्न

नागपूर: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर देशभरात आपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. नागपूरमध्येही आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. नागपुरातील गणेश पेठ परिसरातील नितीन गडकरी यांच्या मुख्य निवडणूक प्रचार कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

वाचा सविस्तर...

Maharashtra News Live Updates 22 March 2024: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा!

Story img Loader