Marathi News Today : लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. भाजपा आणि काँग्रेसने काही ठिकाणचे उमेदवार जाहीर केले आहेत. महाराष्ट्रातील उमेदवारांचीही यादी समोर आली आहे. तर, काही मतदारसंघात अद्यापही रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत वादामुळे अधिकृतरित्या जागा वाटप होऊ शकलेले नाही. दरम्यान, आज ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे वंचितने महाविकास आघाडीला दिलेल्या अल्टिमेटमचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे येत्या काळात वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत राहते की त्यातून बाहेर पडते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra News Updates 26 March 2024 : महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर
नागपूर : राज्यात सूर्य आग ओकू लागला असून कमाल तापमानसह किमान तापमानाचा पारा देखील झपाट्याने वर चढत आहे. त्याचवेळी भारतीय हवामान खात्याकडून देशाच्या काही भागात पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नव्हता. मात्र, आता राज्यातील काही जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पुणे : घोरपडी परिसरात शाळकरी मुलगा कालव्यात बुडाल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी कालव्यात बुडालेल्या मुलाचा मृतदेह बाहेर काढला.
नवी मुंबई : रस्त्यावरून पायी जात असताना पार्क केलेल्या गाडीतून कोणीतरी थुंकले असा समज झाल्याने एका युवकाने गाडीतील व्यक्तीच्या गळ्यावर फुटलेल्या काचेच्या बाटलीने वार केला. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ठाणे : भिवंडी येथील खोणीगाव भागात धुळवड साजरी करण्यासाठी मोठ्या आवाजात गाणी वाजविल्याने एका तरूणावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) कर्मचारी तरुणाची ५७ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.
नागपूर : ज्या राज्याने हे शहर वसवले, या नगरीची स्थापना केली, त्या नागपूर नगराच्या राजालाच वारंवार उपेक्षेला सामोरे जावे लागत आहे. कधी या राज्याच्या पुतळ्याचा रंग उडालेला असतो, तर कधी त्याचे सिंहासन तुटलेले असते. शहराच्या प्रशासनाला मात्र त्याची जाण नाही आणि मग त्याच्या वंशजांनी ही बाब लक्षात आणून दिली तेव्हाच प्रशासन जागे होते.
ठाणे : तलावपाली येथील एका सराफाच्या दुकानातून कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यांचा अपहार दुकानातील कर्मचाऱ्याने केल्याचा प्रकार समोर आला आहे. दुकानातून १ कोटी ५ लाख ५५ हजार ७६६ रुपयांचे ७० दागिने गायब आहेत. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्या कर्मचाऱ्याचा शोध घेत आहेत.
पुणे : महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोलीत झोपलेल्या तरुणाच्या अंगावर ॲसिडसदृश रसायन फेकण्यात आल्याची घटना रेंजहिल्स भागात घडली. या प्रकरणी खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बुलढाणा : बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुती व आघाडी च्या उमेवारांची घोषणा कधी याबद्धलची उत्सुकता आता ताणल्या गेली. मतदारसंघातील राजकीय वर्तुळासह १७ लाख मतदारांना ही उत्सुकता आहे.