Mumbai Breaking News Update : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसांनी घोषित होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडमोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली असून कालपासून त्यांच्या सभांचा झंझावात सुरू झाला आहे. राहुल गांधींच्या यात्रेमुळे काँग्रेस आणि मविआमधील पक्षांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे. १७ मार्च रोजी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर मविआची सभा होणार आहे. त्याआधी मनसेकडून राहुल गांधींना इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात येऊन यावेळी स्वा. सावरकर यांच्याबद्दल बोलाल, तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
भाजपाची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातून २० उमेदवारांची घोषणा
भाजपाने आज लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश असून नागपूरमधून अखेर नितीन गडकरी यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. तर बीडमधून पंकजा मुंडे यांचे नाव जाहीर केले आहे.
दुसऱ्या यादीत भाजपाने चार खासदारांचा पत्ता केला कट
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांच्याजागी पियूष गोयल यांना तर मुंबई उत्तर पूर्वमधून मनोज कोटक यांच्या जागी मिहिर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बीड लोकसभेतून प्रीतम मुंडे यांच्याजागी पंकजा मुंडे, तर जळगावमधून उन्मेष पाटील यांच्याजागी स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली गेली आहे.
Maharashtra News Today 13 March 2024
भाजपाने दुसऱ्या यादीत २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यापैकी चार महिला उमेदवार आहेत. नंदुरबारमधून डॉ. हिना गावित, जळगावसाठी स्मिता वाघ, रावेर लोकसभेसाठी रक्षा निखिल खडसे, दिंडोरी लोकसभेसाठी डॉ. भारती पवार आणि बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांच्याजागी पियूष गोयल यांना तर मुंबई उत्तर पूर्वमधून मनोज कोटक यांच्या जागी मिहिर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बीड लोकसभेतून प्रीतम मुंडे यांच्याजागी पंकजा मुंडे, तर जळगावमधून उन्मेष पाटील यांच्याजागी स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली गेली आहे.
भाजपाने आज लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश असून नागपूरमधून अखेर नितीन गडकरी यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. तर बीडमधून पंकजा मुंडे यांचे नाव जाहीर केले आहे.
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-२०२२ या परीक्षेअंतर्गत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.
कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीने निवडणूक लढण्याचे निश्चित केले आहे. ठाकरे सेनेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आजच्या बैठकीत दिसून आली असून तिरंगी लढतीची चिन्हे दिसू लागली आहेत.
सांंगली : विटा येथे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय सुरू करण्यास शासन सकारात्मक आहे. मात्र कार्यालय सुरू होईपर्यंत या ठिकाणी वाहन नोंदणीसह विविध कामासाठी दुप्पट शिबीरांचे आयोजन करण्यात यावे अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
खानापूर मतदार संघातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली. या बैठकीस उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुहास बाबर, अमोल बाबर, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदींसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
खानापूर मतदार संघाच्या विकास कामासाठी दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी खूप संघर्ष केला आहे. त्यांच्या पश्चात या मतदार संघातील विकास कामांना प्राधान्याने गती दिली पाहिजे. सर्वच विभागानी समन्वयाने कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.
वाशिम : हे थापाडे सरकार असून ही ‘भाजप’ नसून ‘भाडोत्री जनता पार्टी’ आहे. त्यांच्या इंजिनला भ्रष्टाचाराची चाके आहेत.असा आरोप उध्दव ठाकरे यांनी केला.
बुलढाणा : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांसाठी ९५ लाख रुपये कमाल खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाशिक येथील सभेत खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता भाजपाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटले की, श्रीकांत शिंदे हे काही अधिकृत व्यक्ती नाहीत की, त्यांनी उमेदवारी जाहीर करावी. महायुतीचे जागावाटप हे तीनही पक्षातील वरिष्ठ नेते जाहीर करतील.
नाशिक : सिन्नर तालुक्यातील मुसळगाव एमआयडीसीत असलेल्या सारस्वत बँकेचे एटीएम चोरट्यांकडून फोडण्याचा प्रयत्न झाला. चोरट्यांना रक्कम असलेला भाग उघडण्यात अपयश आल्याने रक्कम सुरक्षित राहिली.
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभा १५ ते १७ मार्च दरम्यान नागपुरातील संघाच्या स्मृती मंदिर परिसरात होणार आहे.राम मंदिर निर्माणानंतर त्यासंदर्भातील पुढील योजना, संघाचे शताब्दी वर्ष, शाखांचा विस्तार अशा महत्त्वाच्या विविध प्रस्तावांवर चर्चा होणार आहे.
पुरंदरचे माजी आमदार आणि शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर अजित पवार गटाच्या वतीने त्याला प्रत्त्युतर देण्यात आले आहे. गेल्या २ दिवसांपासून शिवराळ शिवतारे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप करत आहेत. ठाण्यातील शिंदेशाही संपवायची आहे का? असा सवाल माजी खासदार आनंद परांजपे यांनी उपस्थित केला आहे.
नागपूर: भारतीय जनता पक्षाने (भाजप) खतांच्या पिशव्यांवर, जेनेरिक औषधांवर पक्षाची जाहिरात केली. या बाबतीत प्रकाशित बातमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी त्यांच्या फेसबूक पेजवर भाष्य केले.
अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा, त्यांचे विचार, कार्य, स्मृती पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. यानिर्णयाने अहमदनगर शहरवासियांची, जिल्हावासियांची, महाराष्ट्रातील तेरा कोटी नागरिकांची महत्वाची इच्छा पूर्ण झाली आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. वाचा सविस्तर माहिती
नागपूर: शहरात चारही भागात मेट्रो सेवा सुरु असून मोठ्या प्रमाणात नागरिक मेट्रोने प्रवास करत आहे महामेट्रोच्या वतीने 'सेलिब्रेशन ऑन व्हील्स' उपक्रम राबवला जात आहे. महामेट्रोने नागरिकांकरिता आणखी एक निर्णय घेत सेलिब्रेशन ऑन व्हील्स उपक्रमांतर्गत रविवार दिवशी फक्त ३५००/- रुपये मध्ये एका तासाकरिता संपूर्ण मेट्रो ट्रेन बुक करू शकता.
नागपूर : नागपूर वनखात्याच्या अखत्यारितील अंबाझरी जैवविविधता उद्यान गेल्या दोन दिवसांपासून आगीत धूमसत आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास या उद्यानाला आग लागली. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या सहकार्याने ती विझवली, पण पुन्हा बुधवारी त्याचठिकाणी आगीचा भडका उडाल्याने या उद्यानाविषयी अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
महाराष्ट्र सरकारने मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकाची ब्रिटिशकालीन नावे बदलली आहेत. यावर मनसेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील म्हणाले की, रेल्वे स्थानकाची नावं बदलण्याऐवजी त्या रेल्वे स्थानकाची रुपरेषा बदलली पाहिजे. लोकल प्रवाशांना काय समस्या आहेत, हे खासदारांनी पाहून घेतले पाहिजे.
मुंबई : अंधेरी पश्चिम येथील कोकिळाबेन अंबानी रुग्णालयाच्या शेजारील भूखंड मिळूनही प्रत्यक्ष ताब्यासाठी एका ८५ वर्षे वयाच्या डॉक्टरने २५ वर्षे दिलेल्या लढ्याला यश आले आहे. परवडणाऱ्या दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारल्या जाणाऱ्या कर्करोग व बहुद्देशीय रुग्णालयाचा पायाभरणी समारंभ अलीकडे झाला. या रुग्णालयाचे व्यवस्थापन टाटा ट्रस्टच्या आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या कार्किनोज हेल्थकेअरमार्फत सांभाळले जाणार आहे.
नाशिक : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात अपयशी ठरलेल्या लोकप्रतिनिधींना धडा शिकवण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ५०० पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी सकल मराठा समाजाने केली आहे.
भाईंदर : मिरा रोड व भाईंदर शहरात रस्त्याच्या कडेला अथवा पदपथावर उभारण्यात आलेल्या शिवसेनेच्या ( शिंदे गट) कंटेनर शाखेला अखेर महापालिकेने नोटीसा बजावल्या आहेत. यात हे कंटेनर तात्काळ न हटावल्यास थेट कारवाई करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर यांचे ‘तिकीट फायनल’ झाल्याची चर्चाही पसरली आहे. उबाठा बरोबरच मित्र व शत्रू पक्षातही या भेटी बद्दल विविध तर्क लावण्यात येत आहे.
वसई : वसई विरार मधील विविध ठिकाणी अजूनही उघडी व तुटलेल्या अवस्थेतील गटारांची झाकणे आहेत. याचा फटका नागरिकांना बसत आहे. नुकताच नालासोपारा येथील रहेमत नगर येथे एका महिलेचा पाय अडकून जखमी झाली आहे.
अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात मोठ्या संख्येने असलेला कुणबी समाज सध्या केंद्रस्थानी आहे. या गठ्ठा मतपेढीवर प्रमुख नेत्यांचे लक्ष असून ते आपल्याकडे वळवण्यासाठी राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे.
महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप बाळासाहेब काळे हे स्वतः मैदानात उतरणार आहेत.
अकोला : अकोला भाजपकडून बेरजेचे राजकारण केले जात आहे. अकोट तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उबाठा शिवसेनेसह महायुतीचा घटक पक्ष असलेल्या प्रहारला भाजपने मोठा धक्का दिला आहे.
राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू झाल्यानंतर इकडे महाराष्ट्रात आधी मिलिंद देवरा आणि त्यानंतर अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. आता राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्रात आली आहे. त्यावेळी राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आणि काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी भाजपा नेते अशोक चव्हाण यांची भेट घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार का? अशी चर्चा होत आहे.
अधिसभेच्या बैठकीमध्ये सदस्य डॉ. योगेश भुते यांनी राममंदिर बांधकाम पूर्ण झाल्यानिमित्त रामजन्मभूमी न्यासच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवल्याचे विषयपत्रिकेवरून समोर आले आहे.
मुंबई : देशभरात रोजगार मेळाव्यातून हजारो उमेदवारांना नियुक्ती देण्याचे शासकीय कार्यक्रम गाजत असताना प्रत्यक्षात अनेक अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी पात्र उमेदवारांना रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नियुक्ती देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात हा प्रकार घडला आहे.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा बहुप्रतिक्षित असा मुंबई किनारी रस्ता प्रकल्प सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल १६ हजारांहून अधिक वाहनांनी या मार्गावरून प्रवास केला.