Mumbai Breaking News Update: येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. युती व आघाडीमधील मित्रपक्षांचे काही नेते वेगवेगळ्या जागांवर दावा सांगत आहेत. तर वरीष्ठ नेत्यांकडून अद्याप कोणतीही निश्चित माहिती देण्यात आलेली नाही. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी काही जागावरील उमेदवारांची नावं जाहीर केल्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळातून त्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील जागावाटप व उमेदवारीचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Maharashtra News Live Today 12 March 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग!
नागपूर : कौटुंबिक वादातून मेहुण्याने जावयाचा खून केला. ही घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजता बेलतरोडीत घडली. रवी गलीचंद कहार (३०, तिनसई, छिंदवाडा-मध्यप्रदेश) असे खून झालेल्या युवकाचे तर अरुण अन्नू बनवारी (२४, गोरेघाट, ता. लिंगा, जि. छिंदवाडा-मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून शहरात हत्याकांडाची मालिका सुरु असून मार्च महिना लागल्यानंतरही हत्याकांडाच्या घटनांवर नियंत्रण नसल्याचे चित्र आहे.
मालेगाव: काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची न्याय यात्रा बुधवारी नाशिक जिल्ह्यात दाखल होत आहे. या यात्रेच्या निमित्ताने मालेगाव शहरात 'रोड शो' तसेच चौक सभेचे आयोजन करण्यात येणार असून राहुल गांधी हे लोकांशी संवाद साधणार आहेत.
चंद्रपूर : शहरात गुरुवार १४ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता, न्यू इंग्लिश हायस्कूलच्या पटांगणावर ‘निर्भय बनो’ च्या सभेचे आयोजन केले आहे.
इमारतीला भूमाफियांनी बनावट बांधकाम परवानगींच्या आधारे महारेराचा नोंदणी क्रमांक मिळवून ही बेकायदा इमारत अधिकृत आहे, असे दाखवून घर खरेदीदारांना या इमारती मधील सदनिका विकण्याची तयारी केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वे संबंधित विविध उपक्रमांचा पायाभरणी तसेच लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मुंबईः गोरेगावमधील एका शाळेमध्ये १३ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला मेघवाडी पोलिसांनी सोमवारी अटक केली. याप्रकरणी आरोपीविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गतच्या उन्हाळी सत्र परीक्षांना शुक्रवार, २२ मार्चपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर उन्हाळी सत्रातील सर्व परीक्षांचे निकाल वेळेवर जाहीर करण्यासाठी आणि तृतीय म्हणजेच शेवटच्या वर्षाला असलेल्या एकाही विद्यार्थ्याचा निकाल राखीव न राहण्यासाठी सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे प्रथम व द्वितीय वर्षाचे गुण संबंधित संकेतस्थळावर परीक्षेपूर्वी भरणे आवश्यक आहे.
नंदुरबार - आम्ही रामाचे पुजारी आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामचे व्यापारी आहेत. राजकारणात धर्माचा वापर करणे हा त्यांचा धंदा असल्याचे टिकास्त्र अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोडले. खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी नंदुरबारमध्ये दाखल होत आहे.
पालघर : माहीम ग्रामपंचायतकरिता नळ पाणी योजना कार्यान्वित करण्यासाठी ठेकेदारांनी साठा केलेल्या एचडीपीई पाईपला दुपारी तीन वाजेच्या सुमारास आग लागली. माहीम आणि केळवे गावातील हद्दी जवळ किमान दीड हजार पेक्षा अधिक पाईप रचून ठेवले होते. लगत असणाऱ्या गवताने पेट घेतल्याने सगळ्या पाईपांनी पेट घेतला. पालघर अग्निशामक दल तसेच पोलीस स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवण्याचे काम करत आहेत
नवी मुंबईतील शाहबाज गावात बेकायदेशीर राहणाऱ्या आठ बांगलादेशी नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात पाच महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.
पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी गेल्या कित्येक दिवसांपासून चाललेल्या नाराजीच्या चर्चांनंतर अखेर पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून काम करू दिलं जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती, असं सांगितलं जात आहे. त्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, “येत्या दोन-तीन दिवसांत पुणेकरांचा अंदाज घेऊन त्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करेन. शनिवारवाड्यावर पुणेकरांशी संवाद साधून यासंदर्भात विचारेन!”
मनसेचे खंदे नेते असलेल्या वसंत मोरे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आता ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या पक्षात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नागपूर : तुम्ही जर दुचाकी किंवा चारचाकी वाहन चुकीच्या दिशेने चालवत असाल तर आजच सावध व्हा. कारण आता वाहतूक पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांना थेट पोलीस ठाण्यात नेऊन गुन्हे दाखल करीत आहेत. आतापर्यंत १२१ वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले असून वाढते अपघात बघता यामध्ये कुणालाही सुट देण्यात येणार नाही.
मुंबईः उभयतांमध्ये झालेल्या वादानंतर आईने मुलीची गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार वांद्रे पूर्व येथे घडला. मुलीच्या प्रेमसंबंधावरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्यातून मुलगी हाताला चावल्यामुळे संतापलेल्या आईने मुलीची हत्या केली. त्यानंतर तिला मिरगी आल्याचा बनाव केला. पण वैद्यकीय तपासणीत मुलीचा गळा दाबून मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला ताब्यात घेतले.
या काळात देवाच्या सर्व नित्योपचारांमध्ये कोणताही खंड पडणार नाही. मात्र पाद्य, तुळशी पूजा बंद राहणार असे औसेकर महाराज यांनी सांगितले.
अकोला : शहरातील रेल्वेस्थानक मार्गावरील भागवतवाडीमध्ये एका झाडाच्या प्रत्येक फांदीवर पांढऱ्या फुलांचा बहर आला आहे. लांबून पाहिल्यावर ही फुले नसून झाडाची कोवळी पाने असल्याचा भास होतो. मात्र, झाडाखाली पडलेल्या पाकळ्यांचा सडा आणि परिसरात पसरलेला मंद सुगंध या फुलाची ओळख पटवून देतो. मन प्रसन्न करणारा हा वृक्ष म्हणजे अत्यंत दुर्मीळ प्रजातीमधील ‘वायवर्ण’ अर्थात ‘वरुण’ आहे. हे वृक्ष पर्यावरण प्रेमींसह अकोलेकरांचे लक्ष वेधून घेत आहे.
घोडबंदर येथील आनंदनगर सिग्नल परिसरात एका ट्रकची दुचाकीला धडक बसल्याने नाशिकमधील एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी गेल्या कित्येक दिवसांपासून चाललेल्या नाराजीच्या चर्चांनंतर अखेर पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून काम करू दिलं जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती, असं सांगितलं जात आहे. त्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, "येत्या दोन-तीन दिवसांत पुणेकरांचा अंदाज घेऊन त्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करेन!"
अजित पवार म्हणाले की, सर्वप्रथम मी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्यावतीने दिवंगत ज्येष्ठनेते यशवंतराव चव्हाण व वेणूताई चव्हाण यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो.
कराड: राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेच्या केवळ तीन – चार जागाच मिळतील ही माध्यमातीलच चर्चा असून, त्यात तथ्य नसल्याचे ठामपणे सांगताना, आमच्या बैठकीत प्रत्येकाचा मानसन्मान राखला जाईल अशी भूमिका घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कराडमध्ये बोलताना सांगितले.
ही दृश्ये केवळ ऑडीशनचा भाग असून तिचा कुठे वापर केला जात नाही. सिनेसृष्टीत असं करावं लागतं असं तिला सांगितलं. मात्र तिची दृश्ये ‘कोठा’ नावाच्या अश्लील ॲपवर प्रसारीत करण्यात आली होती.
दर महिन्याला उत्कृष्ट तपास करणार्या पोलिसांना उत्कृष्ट तपास (बेस्ट डिटेक्शन) चा पुरस्कार देऊन पोलीस आयुक्तांतर्फे सन्मानित करण्यात येते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दरबारी केलेल्या मोर्चेबांधणी नंतर ठाण्याचा मतदार संघ सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याणासाठी अर्थसंकल्पात कमी तरतूद असल्याबाबत नाराजी व्यक्त केली.
मद्य सेवन करून बेधुंद झालेल्या कल्याण मधील वडवली गावातील तीन जणांनी गावातील एका मासळी विक्रेत्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली असून मावळ लोकसभा मतदारसंघात महत्वाचा असलेल्या शेकापने महाविकास आघाडीला पाठींबा दिल्याने बळ मिळणार आहे.
खड्डे दुरुस्तीवर वर्षाला २७३ कोटी रुपये खर्च करूनही रस्त्यांची दुरावस्था कायम असल्यावर उच्च न्यायालयाने सोमवारी बोट ठेवून आश्चर्य व्यक्त केले.
राज्यातील खासगी मान्यताप्राप्त शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याबाबत सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
जमीन खरेदीसाठी निघालेल्या दाम्पत्याकडील आठ लाखांची रोकड असलेली पिशवी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना खराडी परिसरात घडली. याप्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
Maharashtra News Live Today 12 March 2024: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर!