Mumbai Breaking News Update: येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. युती व आघाडीमधील मित्रपक्षांचे काही नेते वेगवेगळ्या जागांवर दावा सांगत आहेत. तर वरीष्ठ नेत्यांकडून अद्याप कोणतीही निश्चित माहिती देण्यात आलेली नाही. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी काही जागावरील उमेदवारांची नावं जाहीर केल्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळातून त्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील जागावाटप व उमेदवारीचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Maharashtra News Live Today 12 March 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग!
तलाठी भरतीसाठी टीसीएस कंपनीकडून परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेतील प्रश्नांबाबत आक्षेप घेण्यात आले होते.
पथकाच्या सूचनेवरून संक्रमित कोंबड्यांच्या संपर्कातील ८७ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे नमुने एम्सच्या प्रयोगशाळेत तपासणीला पाठवण्यात आले.
पवित्र पोर्टलद्वारे नविन भरती प्रक्रिया राबविण्यापूर्वी सध्या कार्यरत शिक्षकांना बदलीची संधी मिळावी अशी राज्यातील शिक्षकांची मागणी होती.
परीक्षेची वेळ जवळ असताना हे रुग्ण वाढल्याने पालकांचीही चिंता वाढली आहे. कांजण्या हा आजार व्हारीसोला झोस्टर विषाणूमुळे होतो.
उष्ण कटीबंधातील शेतीत हे थंड हवामान लागणारे पीक न घेण्याचा सल्ला पाटील कुटुंबास अनेकांनी दिला होता. पण तो अव्हेरून योग्य ती काळजी घेत हे पीक फुलविले.
पदव्युत्तर भत्त्याबाबत वैद्यकीय शिक्षण खात्याच्या निकषांवर राज्यातील वैद्यकीय, आयुर्वेदिक, दंत शाखेच्या शिक्षकांनी आक्षेप घेतला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या चौकातील सिग्नल यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जात होती. परंतु त्याबाबत निर्णय होत नसल्याने काही दिवसांत ही यंत्रणा बंद करावी लागत होती.
ग्रामीण भागातील अनेक शाळा शिक्षकांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात शिक्षकांची १ हजार ६०० पदे रिक्त होती.
जागावाटपाची प्राथमिक चर्चा झाली आहे. तिन्ही पक्षांनी एकत्र बसून बोलणी केली. प्रत्येकाचा मान-सन्मान राखला जाईल, कार्यकर्त्यांना समाधान वाटेल असा तोडगा काढण्याचा प्रयत्न आमचा असेल. बहुतेक विद्यमान जागा त्या त्या पक्षाला सोडण्याची प्राथमिक चर्चा झालेली आहे. त्यासंदर्भात अंतिम चित्र आम्हालाही लवकरात लवकर स्पष्ट करावं लागणार आहे. १४-१५ तारखेला आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे – अजित पवार</p>
महाराष्ट्र न्यूज टुडे लाइव्ह
Maharashtra News Live Today 12 March 2024: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर!