Mumbai Pune Updates Today, 01 October 2024 : पुण्यातील कोंढवा परिसरात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दारू पिऊन मराठा आंदोलकांना शिवीगाळ करून, अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे. याबाबत लक्ष्मण हाके यांना मराठा आंदोलकांनी घेरावा घालून जाब विचारणारा व्हिडिओ काही मिनिटात सोशल मीडियावर व्हायरल झाला. यासंदर्भात लक्ष्मण हाके यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. दोन तरुणांनी माझ्याकडे येऊन चर्चा केली आणि तेच तरुण काही वेळाने काही लोकांचा जमाव घेऊन माझ्याकडे आले. माझे दोन्ही हात पकडून मला एकाच जागेवर थांबवून ठेवले. त्यावेळी मी पोलिसांना फोन केला आणि सर्व परिस्थिती सांगितली. त्यामुळे एकूणच प्रकरण पाहिल्यावर, मला जीवे मारण्याचा पूर्वनियोजित कट होता, असे ते म्हणाले. या घटनेनंतर आता राज्यातील ओबीसी-मराठा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच लाडकी बहीण योजनेवर विरोधकांकडून टीकाही केली जाते आहे. याशिवाय राज्यातील इतर घडामोडींवरही आपलं लक्ष असणार आहे.
Maharashtra News Live Today, 01 October 2024 : अमित शाह आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
वसई: विरार शिरसाड अंबाडी महामार्गावरील शिवणसई येथे एका हायवा ट्रकने एका रिक्षाला जोरदार धडक दिल्याने अपघात घडला आहे. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सातीवली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भाईंदर :- दिव्यांग नागरिकांच्या विविध मागण्यांना घेऊन प्रहार जनसंघटनेच्या मिरा भाईंदरमधील पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी महापालिका मुख्यालयाबाहेरील रस्ता अडवला. यामुळे परिसरात बराच वेळ वाहतूक कोंडीची समस्या उभी राहिली.
विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे राज्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महायुती तर दुसरीकडे महाविकास आघाडीने राज्यभरात सभांचा धडाका लावला आहे. विविध मतदारसंघात जाऊन मेळावे घेत निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. जागावाटपासंदर्भात सध्या चर्चा सुरु आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत आज महत्वाची बैठक पार पडली. यावेळी महाविकास आघाडीच्या जागावाटप कधी जाहीर होईल? याविषयी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जिंतेद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले की, आता विजयादशमीच्या मुहूर्तावर पहिली यादी जाहीर केली जाईल, असं जिंतेद्र आव्हाड म्हणाले आहेत.
"उद्याचा मुख्यमंत्री कोण ते ठरलेलं आहे. महाराष्ट्रातील जनतेने निर्णय घेतलेला आहे. फक्त मतांच्या पेटीपर्यंत जायचं आहे. धनुष्यबाण दिसला की धनुष्यबाणासमोरील बटण दाबायचं आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं. यात काहीही शंका नाही. ते जनतेच्या मनातील नेतृत्व आहेत. आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणींना महिन्याला १५०० रुपये भेटले असते का? शेतकऱ्यांची वीज बिल माफ झाले असते का?", असं शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले आहेत.
नागपूर : एका मित्राच्या घरी दारू पार्टी सुरु असताना एकाने “तुझ्या बहिणीशी माझे प्रेमप्रकरण सुरु असून आम्ही अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापीत केले आहेत” असे म्हटले. त्यामुळे चिडलेल्या तीन तिघांनी मित्राचा दगडाने ठेचून खून केला.
नागपूर : शासनाच्या जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियांत्रिकी सेवेतील अभियंत्यांचे पदोन्नतीसह इतरही अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. शासनाला निवेदन दिल्यावर आश्वासनाशिवाय काहीच मिळत नाही.
नागपूर : माटे चौक ते प्रतापनगर चौक सिमेंट रोड साठ फुटाचा असताना दोन्ही बाजूचे फुटपाथ अतिक्रमणाने गिळकृत केले आहे. महापालिका व पोलिस प्रशासनाच्या आशीर्वादाने अतिक्रमण धारकांची दादागिरी वाढली आहे.
बंदी घातलेल्या गुटख्याचा साठा करून छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली.
गांधींनी केलेली विधाने प्रथमदर्शनी मानहानीकारक असून हा खटला चालवण्यासाठी पुरेशी असल्याचे न्यायालयाने म्हटल्याचे ॲड. पिंगळे यांनी माध्यमांना सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शहरातील अनावरण झालेले महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे अर्धाकृती कांस्य पुतळे असलेले स्मारक वादात सापडले आहे.
नायर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकाने लैंगिक छळ केल्याची तक्रार एका विद्यार्थिनीने दाखल केली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याप्रकरणाची दखल घेतली असून याप्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.
पुण्याच्या एका नामांकीत महाविद्यालयात शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना आहे. याशिवाय मुंबईतील एका वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण झाल्याचं उघडकीस आलं आहे. या घटनांवरून आता खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे. महिला सुरक्षेच्याबाबतीत शिंदे सरकार असंवेदनशील आहे. महिला सुरक्षेला त्यांचं प्राधान्य नाही, अशी टीका त्यांनी केली. तसेच पुण्यातील घटना प्रचंड वेदनादायी आणि संताप आणणारी आहे असेही त्या म्हणाल्या.
विधानसभेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा संपर्कमार्फत अभ्यास केला जातो. १४ वी विधानसभा नोव्हेंबर महिन्यात विसर्जित होणार आहे.
भंडारा : बाहेरून घरी परत जात असलेल्या एका ११ वर्षीय विद्यार्थ्याला एका स्कूल व्हॅनने चिरडल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास भोजापूर मार्गावर घडली. या अपघातात विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला.
अभिनेता गोविदा यांच्या पायाला गोळी लागली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्वतःच्याच परवाना असलेल्या बंदुकीतून गोळी लागल्याने त्याला पायाला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदा यांना फोन करत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. मी गोविंदा यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली. लवकर आणि पूर्ण बरे होण्यासाठी आणि स्वास्थ्यपूर्ण जीवनासाठी राज्य सरकार आणि जनतेच्या वतीने सदिच्छा व्यक्त केल्या, असे ते म्हणाले. गोविंदा हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयातून लाखो लोकांना आनंद दिला आहे. त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त करत आहोत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्यानंतर पश्चिम महाराष्ट्रावर वर्चस्व कोणाचे यावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आकड्यांचा खेळ रंगात आला आहे. अमित शहा यांनी पश्चिम महाराष्ट्रात सद्यस्थितीपेक्षा दुप्पट झेप घेऊ असा दावा केला आहे.
२०२४ मधील आतापर्यंतची ही सर्वात कमी घर विक्री आहे. पितृपक्षामुळे सप्टेंबरमध्ये घर विक्री कमी झाल्याचे म्हटले जात आहे.
वर्धा : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पथ्यात येत असतांना संभाव्य उमेदवार हे मतदारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी नाना उपक्रम घेत आहे. मतदार अशा उपक्रमात हमखास हजेरी लावणार हे गृहीत धरल्या जाते. प्रसिद्धीच्या वलयात असणारे चेहरे या काळात मतदारसंघात येणार व जनतेचे लक्ष वेधून घेणार, असा हा प्रयत्न असतो.
नागपूर: अधिकाऱ्यांना एका चाकोरीत, सरकारने ठरवून दिलेल्या चौकटीतच काम करावे लागते. या चौकटी ब्रिटीशकालीन आहेत, त्याच आपण स्वीकारल्या आणि वर्षानुवर्षे त्याच पद्धतीने कामही केले जात आहे. अनेकदा ते परिस्थितीशी सुसंगत नसते, वेळखाऊ आणि अपारदर्शीही असते. पण केवळ सरकारी पद्धत असल्याने त्यात बदल करण्याचे धाडस अधिकारी करीत नाही.
सभेसाठी भव्य मंडप उभारण्याच्या कामामुळे स. प. महाविद्यालयाच्या मैदानाची दुर्दशा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
“गरज संपली की अजित पवार बॅनरवरून गायब होतात”, अंबादास दानवेंची खोचक टीका; म्हणाले, “ताटातील चटणी सारखा...”
सहकारी पक्षांची गरज संपत आली की असे बॅनरवरून उपमुख्यमंत्री अजित पवार गायब होतात. लाडकी बहीण योजनेच्या नावातील 'मुख्यमंत्री' हा शब्द गायब केला आहे. ताटातील चटणी सारखा मुख्यमंत्री शिंदेचा फोटो तेवढा शिल्लक आहे! निवडणूक संपली की त्यांनाही 'तुम कौन.. हम कौन' असंच दिसतंय, अशी टीका ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
https://twitter.com/iambadasdanve/status/1840970432259707388
संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेने विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पाश्वभूमीवर त्यांनी तयारीदेखील सुरु केली आहे. अशातच आता त्यांच्या संघटनेला निवडणूक आयोगाने 'महाराष्ट्र स्वराज्य पक्ष' म्हणून मान्यता दिली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली.
राहुल मखरे यांच्यासह त्यांच्या काहींनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते.
नागपूर : रामटेक हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे, मात्र आम्ही लोकसभेत ही जागा काँग्रेसला सोडताना कुठलाही कद्रूपणा केला नाही, अशी आठवण करून देत विधानसभेत ही जागा शिवसेना ठाकरे गटच लढणार, असे खुद्द उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केल्याने नागपूर जिल्ह्यात सर्व जागा लढणार असे जाहीर करणाऱ्या काँग्रेसला तो इशारा मानला जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांच्या या दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. मोदी, शाह राज्यात आले की उद्योग राज्याबाहेर जाणार अशी भीती वाटते, असं ते म्हणाले. पुढे बोलताना आज अमित शाह मुंबईत येत आहेत, मात्र, काल मिठाग्रहांची २१० जमीन अदाणींना देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे अमित शाह या जमीनीचे मोजमाप करण्यासाठी येत आहेत का? अशी टीकाही त्यांनी केली.
पवना बंदिस्त जलवाहिनीच्या विरोधात झालेल्या आंदोलनावरील गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.
अवघ्या चार तासांच्या प्रवासासाठी आठ ते नऊ तास लागत असल्याने प्रवासी हतबल झाले असून रस्ते प्रवास नको रे बाबा अशीच काहीशी प्रतिक्रिया वाहन चालकांकडून व्यक्त केली जात आहे.
नागरी समस्या अलीकडच्या काळात उग्र रूप धारण करत आहेत. अनेकदा तक्रारी होतात, पण समस्या 'जैसे थे' राहते. नागरिकांच्या या समस्यांना प्रातिनिधिक व्यासपीठ देऊन त्यांचे गाऱ्हाणे या व्यासपीठावर मांडणारा 'लोकसत्ता'चा हा पुढाकार
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संविधानिक पदावर बसले आहेत. फडणवीसांनी व्होट जिहाद हा शब्द वापरणे म्हणजे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने जो मतांचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला दिला आहे, त्याचा संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने केलेला अवमान आहे. संविधानाचा अनादर आहे. संविधाना आधारे घेतलेल्या शपथेचा भंग आहे, अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते मुंबई, ठाणे आणि कोकण मतदारसंघाचा घेणार आढावा घेणार असल्याची माहिती आहे.