Mumbai Pune Live Updates Today, 01 October 2024 : पुण्यातील कोंढवा परिसरात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दारू पिऊन मराठा आंदोलकांना शिवीगाळ करून, अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे. याबाबत लक्ष्मण हाके यांना मराठा आंदोलकांनी घेरावा घालून जाब विचारणारा व्हिडिओ काही मिनिटात सोशल मीडियावर व्हायरल झाला. यासंदर्भात लक्ष्मण हाके यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. दोन तरुणांनी माझ्याकडे येऊन चर्चा केली आणि तेच तरुण काही वेळाने काही लोकांचा जमाव घेऊन माझ्याकडे आले. माझे दोन्ही हात पकडून मला एकाच जागेवर थांबवून ठेवले. त्यावेळी मी पोलिसांना फोन केला आणि सर्व परिस्थिती सांगितली. त्यामुळे एकूणच प्रकरण पाहिल्यावर, मला जीवे मारण्याचा पूर्वनियोजित कट होता, असे ते म्हणाले. या घटनेनंतर आता राज्यातील ओबीसी-मराठा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच लाडकी बहीण योजनेवर विरोधकांकडून टीकाही केली जाते आहे. याशिवाय राज्यातील इतर घडामोडींवरही आपलं लक्ष असणार आहे.

Live Updates

Maharashtra News Live Today, 01 October 2024 : अमित शाह आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर

14:17 (IST) 1 Oct 2024
फुले दाम्पत्याच्या स्मारकातील शिलालेखात त्रुटी, ओळींमधून ‘शुद्र’ गायब

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शहरातील अनावरण झालेले महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे अर्धाकृती कांस्य पुतळे असलेले स्मारक वादात सापडले आहे.

सविस्तर वाचा…

14:11 (IST) 1 Oct 2024
नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दखल; चौकशीसाठी विशेष समिती नेमण्याचे निर्देश!

नायर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकाने लैंगिक छळ केल्याची तक्रार एका विद्यार्थिनीने दाखल केली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याप्रकरणाची दखल घेतली असून याप्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

सविस्तर वाचा

13:51 (IST) 1 Oct 2024
“महिला सुरक्षेच्याबाबतीत शिंदे सरकार असंवेदनशील”; पुण्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणावरून सुप्रिया सुळेंची टीका!

पुण्याच्या एका नामांकीत महाविद्यालयात शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना आहे. याशिवाय मुंबईतील एका वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण झाल्याचं उघडकीस आलं आहे. या घटनांवरून आता खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे. महिला सुरक्षेच्याबाबतीत शिंदे सरकार असंवेदनशील आहे. महिला सुरक्षेला त्यांचं प्राधान्य नाही, अशी टीका त्यांनी केली. तसेच पुण्यातील घटना प्रचंड वेदनादायी आणि संताप आणणारी आहे असेही त्या म्हणाल्या.

13:22 (IST) 1 Oct 2024
विधानसभेत दादा भुसे यांच्या प्रश्नांची पाटी कोरीच, नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक प्रश्न मांडणाऱ्यांत हिरामण खोसकर प्रथम

विधानसभेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा संपर्कमार्फत अभ्यास केला जातो. १४ वी विधानसभा नोव्हेंबर महिन्यात विसर्जित होणार आहे.

सविस्तर वाचा…

13:02 (IST) 1 Oct 2024
हृदयद्रावक! स्कूल व्हॅनने विद्यार्थ्याला चिरडले; घटनास्थळीच सोडला जीव

भंडारा : बाहेरून घरी परत जात असलेल्या एका ११ वर्षीय विद्यार्थ्याला एका स्कूल व्हॅनने चिरडल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास भोजापूर मार्गावर घडली. या अपघातात विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला.

वाचा सविस्तर…

12:26 (IST) 1 Oct 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनेते गोविंदा यांची प्रकृतीबाबत विचारपूस

अभिनेता गोविदा यांच्या पायाला गोळी लागली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्वतःच्याच परवाना असलेल्या बंदुकीतून गोळी लागल्याने त्याला पायाला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदा यांना फोन करत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. मी गोविंदा यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली. लवकर आणि पूर्ण बरे होण्यासाठी आणि स्वास्थ्यपूर्ण जीवनासाठी राज्य सरकार आणि जनतेच्या वतीने सदिच्छा व्यक्त केल्या, असे ते म्हणाले. गोविंदा हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयातून लाखो लोकांना आनंद दिला आहे. त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त करत आहोत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

12:19 (IST) 1 Oct 2024
पश्चिम महाराष्ट्रातील वर्चस्वावरून महायुती, महाविकास आघाडीत आकड्यांचा खेळ रंगात

कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्यानंतर पश्चिम महाराष्ट्रावर वर्चस्व कोणाचे यावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आकड्यांचा खेळ रंगात आला आहे. अमित शहा यांनी पश्चिम महाराष्ट्रात सद्यस्थितीपेक्षा दुप्पट झेप घेऊ असा दावा केला आहे.

वाचा सविस्तर…

12:03 (IST) 1 Oct 2024
मुंबईतील नऊ हजार ९११ घरांची सप्टेंबरमध्ये विक्री; विक्रीत काहीशी घट, पितृपक्षाचा फटका ?

२०२४ मधील आतापर्यंतची ही सर्वात कमी घर विक्री आहे. पितृपक्षामुळे सप्टेंबरमध्ये घर विक्री कमी झाल्याचे म्हटले जात आहे.

सविस्तर वाचा…

12:00 (IST) 1 Oct 2024
निवडणुकीचे पडघम आणि महिला नेत्यांची धूम, कुठे गौतमी थिरकणार तर कुठे राणा बरसणार

वर्धा : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पथ्यात येत असतांना संभाव्य उमेदवार हे मतदारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी नाना उपक्रम घेत आहे. मतदार अशा उपक्रमात हमखास हजेरी लावणार हे गृहीत धरल्या जाते. प्रसिद्धीच्या वलयात असणारे चेहरे या काळात मतदारसंघात येणार व जनतेचे लक्ष वेधून घेणार, असा हा प्रयत्न असतो.

वाचा सविस्तर…

11:59 (IST) 1 Oct 2024
नागपूर : तंत्रस्नेही महिला अधिकाऱ्याच्या उपक्रमाला राज्यभर पसंती अन्…

नागपूर: अधिकाऱ्यांना एका चाकोरीत, सरकारने ठरवून दिलेल्या चौकटीतच काम करावे लागते. या चौकटी ब्रिटीशकालीन आहेत, त्याच आपण स्वीकारल्या आणि वर्षानुवर्षे त्याच पद्धतीने कामही केले जात आहे. अनेकदा ते परिस्थितीशी सुसंगत नसते, वेळखाऊ आणि अपारदर्शीही असते. पण केवळ सरकारी पद्धत असल्याने त्यात बदल करण्याचे धाडस अधिकारी करीत नाही.

वाचा सविस्तर…

11:54 (IST) 1 Oct 2024
पंतप्रधानांची सभा झालीच नाही; पण मैदानाची झाली दुर्दशा!

सभेसाठी भव्य मंडप उभारण्याच्या कामामुळे स. प. महाविद्यालयाच्या मैदानाची दुर्दशा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सविस्तर वाचा…

11:49 (IST) 1 Oct 2024

“गरज संपली की अजित पवार बॅनरवरून गायब होतात”, अंबादास दानवेंची खोचक टीका; म्हणाले, “ताटातील चटणी सारखा…”

सहकारी पक्षांची गरज संपत आली की असे बॅनरवरून उपमुख्यमंत्री अजित पवार गायब होतात. लाडकी बहीण योजनेच्या नावातील ‘मुख्यमंत्री’ हा शब्द गायब केला आहे. ताटातील चटणी सारखा मुख्यमंत्री शिंदेचा फोटो तेवढा शिल्लक आहे! निवडणूक संपली की त्यांनाही ‘तुम कौन.. हम कौन’ असंच दिसतंय, अशी टीका ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

11:46 (IST) 1 Oct 2024
संभाजीराजे छत्रपतींच्या स्वराज संघटनेला ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ म्हणून मान्यता; पक्षचिन्हही मिळालं!

संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेने विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पाश्वभूमीवर त्यांनी तयारीदेखील सुरु केली आहे. अशातच आता त्यांच्या संघटनेला निवडणूक आयोगाने ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ म्हणून मान्यता दिली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली.

सविस्तर वाचा –

11:28 (IST) 1 Oct 2024
‘कोरेगाव भीमा’प्रकरणी गोष्टी वदविण्याचा प्रयत्न, कोणत्या राजकीय नेत्याने केला हा आरोप !

राहुल मखरे यांच्यासह त्यांच्या काहींनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते.

सविस्तर वाचा…

11:26 (IST) 1 Oct 2024
रामटेकची आठवण करून देत उद्धव ठाकरे यांचा काँग्रेसवर अप्रत्यक्ष दबाव

नागपूर : रामटेक हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे, मात्र आम्ही लोकसभेत ही जागा काँग्रेसला सोडताना कुठलाही कद्रूपणा केला नाही, अशी आठवण करून देत विधानसभेत ही जागा शिवसेना ठाकरे गटच लढणार, असे खुद्द उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केल्याने नागपूर जिल्ह्यात सर्व जागा लढणार असे जाहीर करणाऱ्या काँग्रेसला तो इशारा मानला जात आहे.

वाचा सविस्तर…

11:25 (IST) 1 Oct 2024
पुण्यात बंडखोरी थोपविण्याचे भाजपसमोर आव्हान

पुणे : पुणे शहरातील आठ विधानसभा मतदार संघापैकी अपवादात्मक एखादा मतदार संघ वगळता इतर सर्वच मतदार संघात विधानसभेसाठी एकापेक्षा जास्त अधिक इच्छुकांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर पक्षात होणारी ही बंडखोरी थोपविण्याचे मोठे आव्हान भाजपच्या नेत्यांसमोर असणार आहे.

वाचा सविस्तर…

11:22 (IST) 1 Oct 2024
“अमित शाह अदाणींना दिलेल्या जमिनीचे मोपमाप करायला येत आहेत का?”; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊतांचे टीकास्र

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांच्या या दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. मोदी, शाह राज्यात आले की उद्योग राज्याबाहेर जाणार अशी भीती वाटते, असं ते म्हणाले. पुढे बोलताना आज अमित शाह मुंबईत येत आहेत, मात्र, काल मिठाग्रहांची २१० जमीन अदाणींना देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे अमित शाह या जमीनीचे मोजमाप करण्यासाठी येत आहेत का? अशी टीकाही त्यांनी केली.

11:03 (IST) 1 Oct 2024
मावळमध्ये भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध छुपा प्रचार? आमदार सुनील शेळके यांच्यासाठी गोळीबाराचा मुद्दा अडचणीचा

पवना बंदिस्त जलवाहिनीच्या विरोधात झालेल्या आंदोलनावरील गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.

सविस्तर वाचा…

11:02 (IST) 1 Oct 2024
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील महामार्ग खड्डेमय, दोन दिवस झालेल्या पावसात बुजवलेले खड्डे उख़डले, खड्ड्यांमुळे होणाऱ्या कोंडीने रस्ते प्रवास नकोसा

अवघ्या चार तासांच्या प्रवासासाठी आठ ते नऊ तास लागत असल्याने प्रवासी हतबल झाले असून रस्ते प्रवास नको रे बाबा अशीच काहीशी प्रतिक्रिया वाहन चालकांकडून व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वाचा…

10:30 (IST) 1 Oct 2024
भोसरी एमआयडीसीत कचऱ्याचे साम्राज्य

नागरी समस्या अलीकडच्या काळात उग्र रूप धारण करत आहेत. अनेकदा तक्रारी होतात, पण समस्या ‘जैसे थे’ राहते. नागरिकांच्या या समस्यांना प्रातिनिधिक व्यासपीठ देऊन त्यांचे गाऱ्हाणे या व्यासपीठावर मांडणारा ‘लोकसत्ता’चा हा पुढाकार

सविस्तर वाचा…

10:23 (IST) 1 Oct 2024
देवेंद्र फडणवीसांनी व्होट जिहाद शब्द वापरणे म्हणजे संविधानाचा अपमान- सचिन सावंत

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संविधानिक पदावर बसले आहेत. फडणवीसांनी व्होट जिहाद हा शब्द वापरणे म्हणजे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने जो मतांचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला दिला आहे, त्याचा संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने केलेला अवमान आहे. संविधानाचा अनादर आहे. संविधाना आधारे घेतलेल्या शपथेचा भंग आहे, अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे.

10:22 (IST) 1 Oct 2024
घटस्थापनेसाठी दुपारी पावणेदोनपर्यंत मुहूर्त, तृतीयेची वृद्धी झाल्याने नवरात्र दहा दिवसांचे

पुणे : पितृपक्षाच्या समाप्तीनंतर अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गुरुवारी (३ ऑक्टोबर) घटस्थापना करून शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात होणार आहे. गुरुवारी ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे सुमारे पहाटे पाचपासून दुपारी पावणेदोनपर्यंत कोणत्याही वेळी घटस्थापना करून नवरात्रातील पूजन करता येईल.

वाचा सविस्तर…

10:22 (IST) 1 Oct 2024
वनराज आंदेकर खून प्रकरणात आणखी काहीजण सामील, खुनापूर्वी आरोपींकडून गोळीबाराचा सराव

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून करण्यापूर्वी आरोपींनी गोळीबाराचा सराव केला होता. त्या ठिकाणांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. खून प्रकरणात आणखी आरोपींची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात सोमवारी दिली.

वाचा सविस्तर…

10:21 (IST) 1 Oct 2024
पिंपरी-चिंचवड ‘राष्ट्रवादी’ फुटीच्या उंबरठ्यावर?

पिंपरी : भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्यासह बंडखोरीचा इशारा दिलेल्या मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, विनोद नढे या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सोमवारी पुण्यात भेट घेतली.

वाचा सविस्तर…

10:19 (IST) 1 Oct 2024
पुणे मेट्रोचा अजब कारभार! मेट्रोच्या तिकिटापेक्षा वाहनतळ शुल्कच जास्त

पुणे : पुणे मेट्रोच्या काही मोजक्या स्थानकांवर सध्या वाहनतळाची सुविधा उपलब्ध आहेत. यातील पुणे जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकावर सशुल्क वाहनतळ सुविधा सोमवारपासून (ता.३०) सुरू झाली. या ठेकेदाराने वाहनचालकांकडून दुप्पट वसुली सुरू केल्याने मेट्रोच्या तिकिटापेक्षा वाहनतळ महाग असल्याची तक्रार प्रवाशांनी सुरू केली.

वाचा सविस्तर…

10:18 (IST) 1 Oct 2024
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केल्याचा मराठा आंदोलकांचा आरोप

पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दारू पिऊन मराठा आंदोलकांना शिवीगाळ करून, अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे.

वाचा सविस्तर…

10:15 (IST) 1 Oct 2024
पालघर जिल्ह्यात दुसरे मोठे बंदर

वाढवण बंदर प्रकल्पानंतर पालघर जिल्ह्यात मुरबेच्या रूपाने दुसरा मोठा बंदर प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा…

10:15 (IST) 1 Oct 2024
स्वराज्य संघटनेची “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” म्हणून अधिकृत नोंदणी; संभाजीराजे छत्रपतींनी फेसबूक पोस्टद्वारे दिली माहिती

तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी, कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली “स्वराज्य संघटना” आता भारतीय निवडणूक आयोगाकडे “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेला आहे. अर्थातच, स्वराज्य संघटना आजपासून “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” म्हणून ओळखला जाईल, अशी माहिती संभाजीराजे छत्रपतींनी दिली.

10:15 (IST) 1 Oct 2024
पुण्यात सात नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी, आठवडाभरात कामकाजास सुरुवात; ६० कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता

शहराचा वाढता विस्तार, गुन्हेगारी, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन गृह विभागाने पुणे शहरात सात नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी दिली.

सविस्तर वाचा…

10:14 (IST) 1 Oct 2024
हडपसर भागात टोळक्याकडून वाहनाची तोडफोड, शहरात दहशत माजविण्याचे सत्र कायम

वादातून टोळक्याने नऊ वाहनांची तोडफोड केल्याची घटना हडपसर भागातील काळेपडळ परिसरात घडली.

सविस्तर वाचा…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते मुंबई, ठाणे आणि कोकण मतदारसंघाचा घेणार आढावा घेणार असल्याची माहिती आहे.