Mumbai Pune Live Updates Today, 01 October 2024 : पुण्यातील कोंढवा परिसरात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दारू पिऊन मराठा आंदोलकांना शिवीगाळ करून, अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे. याबाबत लक्ष्मण हाके यांना मराठा आंदोलकांनी घेरावा घालून जाब विचारणारा व्हिडिओ काही मिनिटात सोशल मीडियावर व्हायरल झाला. यासंदर्भात लक्ष्मण हाके यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. दोन तरुणांनी माझ्याकडे येऊन चर्चा केली आणि तेच तरुण काही वेळाने काही लोकांचा जमाव घेऊन माझ्याकडे आले. माझे दोन्ही हात पकडून मला एकाच जागेवर थांबवून ठेवले. त्यावेळी मी पोलिसांना फोन केला आणि सर्व परिस्थिती सांगितली. त्यामुळे एकूणच प्रकरण पाहिल्यावर, मला जीवे मारण्याचा पूर्वनियोजित कट होता, असे ते म्हणाले. या घटनेनंतर आता राज्यातील ओबीसी-मराठा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच लाडकी बहीण योजनेवर विरोधकांकडून टीकाही केली जाते आहे. याशिवाय राज्यातील इतर घडामोडींवरही आपलं लक्ष असणार आहे.

Live Updates

Maharashtra News Live Today, 01 October 2024 : अमित शाह आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर

10:14 (IST) 1 Oct 2024
भारतीय विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी आयर्लंडला पसंती… किती झाली विद्यार्थिसंख्या?

आयर्लंडमधील भारतीय विद्यार्थ्यांची संख्या आता दहा हजारांच्या घरात गेली असून, त्यातील बहुतांश विद्यार्थी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे आहेत.

सविस्तर वाचा…

10:12 (IST) 1 Oct 2024

काँग्रेसकडून राज्यभरात सरकारचा निषेध

काँग्रेसकडून राज्यभरात ‘लापता लेडीज’ पोस्टर्स राज्यभरात लावण्यात आले आहेत. पोस्टर्समधून महिला सुरक्षेच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारण्यात आला आहे. एका वर्षात ६४ हजार महिला बेपत्ता झाल्याच्या आशयाचे बॅनर आहेत. राज्याला भ्रष्टयुतीची नजर लागली असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येतो आहे.

10:10 (IST) 1 Oct 2024

“…तर आम्ही लाडकी बहीण योजना सुरुच केली नसती”; नितीन गडकरींच्या ‘त्या’ विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया

महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्यामुळे इतर क्षेत्रांमध्ये वेळेवर अनुदान दिले जाईल, याची खात्री नाही असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय उमटू लागल्या आहेत. दरम्यान, यासंदर्भात आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भाष्य केलं आहे.

सविस्तर वाचा –

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते मुंबई, ठाणे आणि कोकण मतदारसंघाचा घेणार आढावा घेणार असल्याची माहिती आहे.