Mumbai Pune Updates Today, 01 October 2024 : पुण्यातील कोंढवा परिसरात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दारू पिऊन मराठा आंदोलकांना शिवीगाळ करून, अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे. याबाबत लक्ष्मण हाके यांना मराठा आंदोलकांनी घेरावा घालून जाब विचारणारा व्हिडिओ काही मिनिटात सोशल मीडियावर व्हायरल झाला. यासंदर्भात लक्ष्मण हाके यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. दोन तरुणांनी माझ्याकडे येऊन चर्चा केली आणि तेच तरुण काही वेळाने काही लोकांचा जमाव घेऊन माझ्याकडे आले. माझे दोन्ही हात पकडून मला एकाच जागेवर थांबवून ठेवले. त्यावेळी मी पोलिसांना फोन केला आणि सर्व परिस्थिती सांगितली. त्यामुळे एकूणच प्रकरण पाहिल्यावर, मला जीवे मारण्याचा पूर्वनियोजित कट होता, असे ते म्हणाले. या घटनेनंतर आता राज्यातील ओबीसी-मराठा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच लाडकी बहीण योजनेवर विरोधकांकडून टीकाही केली जाते आहे. याशिवाय राज्यातील इतर घडामोडींवरही आपलं लक्ष असणार आहे.

Live Updates

Maharashtra News Live Today, 01 October 2024 : अमित शाह आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर

10:22 (IST) 1 Oct 2024
घटस्थापनेसाठी दुपारी पावणेदोनपर्यंत मुहूर्त, तृतीयेची वृद्धी झाल्याने नवरात्र दहा दिवसांचे

पुणे : पितृपक्षाच्या समाप्तीनंतर अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गुरुवारी (३ ऑक्टोबर) घटस्थापना करून शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात होणार आहे. गुरुवारी ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे सुमारे पहाटे पाचपासून दुपारी पावणेदोनपर्यंत कोणत्याही वेळी घटस्थापना करून नवरात्रातील पूजन करता येईल.

वाचा सविस्तर…

10:22 (IST) 1 Oct 2024
वनराज आंदेकर खून प्रकरणात आणखी काहीजण सामील, खुनापूर्वी आरोपींकडून गोळीबाराचा सराव

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून करण्यापूर्वी आरोपींनी गोळीबाराचा सराव केला होता. त्या ठिकाणांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. खून प्रकरणात आणखी आरोपींची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात सोमवारी दिली.

वाचा सविस्तर…

10:21 (IST) 1 Oct 2024
पिंपरी-चिंचवड ‘राष्ट्रवादी’ फुटीच्या उंबरठ्यावर?

पिंपरी : भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्यासह बंडखोरीचा इशारा दिलेल्या मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, विनोद नढे या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सोमवारी पुण्यात भेट घेतली.

वाचा सविस्तर…

10:19 (IST) 1 Oct 2024
पुणे मेट्रोचा अजब कारभार! मेट्रोच्या तिकिटापेक्षा वाहनतळ शुल्कच जास्त

पुणे : पुणे मेट्रोच्या काही मोजक्या स्थानकांवर सध्या वाहनतळाची सुविधा उपलब्ध आहेत. यातील पुणे जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकावर सशुल्क वाहनतळ सुविधा सोमवारपासून (ता.३०) सुरू झाली. या ठेकेदाराने वाहनचालकांकडून दुप्पट वसुली सुरू केल्याने मेट्रोच्या तिकिटापेक्षा वाहनतळ महाग असल्याची तक्रार प्रवाशांनी सुरू केली.

वाचा सविस्तर…

10:18 (IST) 1 Oct 2024
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केल्याचा मराठा आंदोलकांचा आरोप

पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दारू पिऊन मराठा आंदोलकांना शिवीगाळ करून, अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे.

वाचा सविस्तर…

10:15 (IST) 1 Oct 2024
पालघर जिल्ह्यात दुसरे मोठे बंदर

वाढवण बंदर प्रकल्पानंतर पालघर जिल्ह्यात मुरबेच्या रूपाने दुसरा मोठा बंदर प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा…

10:15 (IST) 1 Oct 2024
स्वराज्य संघटनेची “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” म्हणून अधिकृत नोंदणी; संभाजीराजे छत्रपतींनी फेसबूक पोस्टद्वारे दिली माहिती

तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी, कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली “स्वराज्य संघटना” आता भारतीय निवडणूक आयोगाकडे “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेला आहे. अर्थातच, स्वराज्य संघटना आजपासून “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” म्हणून ओळखला जाईल, अशी माहिती संभाजीराजे छत्रपतींनी दिली.

10:15 (IST) 1 Oct 2024
पुण्यात सात नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी, आठवडाभरात कामकाजास सुरुवात; ६० कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता

शहराचा वाढता विस्तार, गुन्हेगारी, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन गृह विभागाने पुणे शहरात सात नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी दिली.

सविस्तर वाचा…

10:14 (IST) 1 Oct 2024
हडपसर भागात टोळक्याकडून वाहनाची तोडफोड, शहरात दहशत माजविण्याचे सत्र कायम

वादातून टोळक्याने नऊ वाहनांची तोडफोड केल्याची घटना हडपसर भागातील काळेपडळ परिसरात घडली.

सविस्तर वाचा…

10:14 (IST) 1 Oct 2024
भारतीय विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी आयर्लंडला पसंती… किती झाली विद्यार्थिसंख्या?

आयर्लंडमधील भारतीय विद्यार्थ्यांची संख्या आता दहा हजारांच्या घरात गेली असून, त्यातील बहुतांश विद्यार्थी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे आहेत.

सविस्तर वाचा…

10:12 (IST) 1 Oct 2024

काँग्रेसकडून राज्यभरात सरकारचा निषेध

काँग्रेसकडून राज्यभरात ‘लापता लेडीज’ पोस्टर्स राज्यभरात लावण्यात आले आहेत. पोस्टर्समधून महिला सुरक्षेच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारण्यात आला आहे. एका वर्षात ६४ हजार महिला बेपत्ता झाल्याच्या आशयाचे बॅनर आहेत. राज्याला भ्रष्टयुतीची नजर लागली असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येतो आहे.

10:10 (IST) 1 Oct 2024

“…तर आम्ही लाडकी बहीण योजना सुरुच केली नसती”; नितीन गडकरींच्या ‘त्या’ विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया

महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्यामुळे इतर क्षेत्रांमध्ये वेळेवर अनुदान दिले जाईल, याची खात्री नाही असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय उमटू लागल्या आहेत. दरम्यान, यासंदर्भात आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भाष्य केलं आहे.

सविस्तर वाचा –

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते मुंबई, ठाणे आणि कोकण मतदारसंघाचा घेणार आढावा घेणार असल्याची माहिती आहे.