Mumbai-Maharashtra News Updates, 08 November 2022 :आगामी विधानसभा, लोकसभा तसेच महापालिका निवडणुकीसाठी राज्यातील पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. भाजपाकडून मुंबईमध्ये ‘जागर मुंबईचा’ या मोहिमेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे गटावर टीका केली जात आहे. सध्या काँग्रसेची ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रात दाखल झाली आहे. याच कारणामुळे काँग्रेसचे सर्व नेते या यात्रेला यशस्वी करण्यात व्यस्त आहेत. तर दुसरीकडे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी शिवराळ टिप्पणी केली. या घडामोडींमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.

तर दुसरीकडे गुजरात, हिमचाल प्रदेशच्या निवडणुकीमुळे देशपातळीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यासह राज्य, देश तसेच जगभरातील सर्व घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

Live Updates

Maharashtra News Updates : महाराष्ट्रासह देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

21:25 (IST) 8 Nov 2022
… तर पहाटेच्या शपथविधीसाठी अजित पवारांना किती खोके मिळाले होते? – विजय शिवतारेंचा सुप्रिया सुळेंना सवाल!

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल(सोमवार) राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने, राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत सत्तारांनी २४ तासांच्या आत माफी मागावी असा अल्टिमेटम दिला आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, सत्तारांच्या या वक्तव्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना(शिंदे गट) प्रवक्ते विजय शिवतारे यांनी प्रसारमाध्यमांसमोर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर ५० खोके घेतल्याचा आरोप करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना, सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला. वाचा सविस्तर बातमी...

20:26 (IST) 8 Nov 2022
५० खोके घेतल्याचा आरोप अजित पवार, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरेंना भोवणार?; शिंदे गटाचा मोठा निर्णय!

शिवसेना(शिंदे गट) प्रवक्ते विजय शिवतारे यांनी प्रसारमाध्यमांसमोर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर ५० खोके घेतल्याचा आरोप करणाऱ्यांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला जाणार असल्याचेही सांगितले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंनाही इशारा दिला. वाचा सविस्तर बातमी...

18:08 (IST) 8 Nov 2022
‘एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना टार्गेट करणे चुकीचेच’; चंद्रकांत पाटील

पुणे : राज्यातील राजकीय संस्कृती हा एक चिंताजनक विषय झाला असून, सर्व पक्षाच्या लोकांनी यावर बसून काय बोलले पाहिजे काय नाही हे ठरविणे आवश्यक आहे. दिलगिरी व्यक्त केली की हा विषय संपला पाहिजे असं वाटते. बातमी वाचा सविस्तर...

17:10 (IST) 8 Nov 2022
“माझ्या शापानेच महाविकासआघाडी सरकार कोसळलं”, करुणा मुंडेंचं विधान, म्हणाल्या, “माझ्या जीवाचं बरं-वाईट झाल्यास…”

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर करुणा मुंडे यांनी पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. “आपल्या किंवा मुलांच्या जीवाचं काही बरं-वाईट झाल्यास धनंजय मुंडे जबाबदार असतील”, असे करुणा मुंडे यांनी म्हटले आहे.

सविस्तर बातमी वाचा...

16:20 (IST) 8 Nov 2022
“अब्दुल सत्तारांवर कारवाईसाठी दाखवलेली तत्परता गुलाबराव पाटलांच्या वेळी का नाही?”; सुषमा अंधारे यांचा महिला आयोगाला सवाल!

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल(सोमवारी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने राजकीय वातावरण चांगलच तापलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली व अब्दुल सत्तारांना सुप्रिया सुळे यांची माफी मागण्यासाठी अल्टिमेटम देण्यात आला. शिवाय, सत्तारांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशीही मागणी करण्यात आली. याचबरोबर राज्याच्या महिला आयोगानेही सत्तार यांच्यावर कारवाईसाठी कालच पोलीस महासंचालकांना पत्र पाठवलं आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना(ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाला एक सवाल केला आहे. ज्यावरून विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. वाचा सविस्तर बातमी...

16:19 (IST) 8 Nov 2022
… तेव्हा शिंदे गट आणि भाजपाच्या पायाखालची जमीन सरकली – सुषमा अंधारेंचं विधान!

शिवसेनेची(ठाकरे गट) सध्या राज्यभर महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. यानिमित्त सुषमा अंधारे या विविध जिल्ह्यांमध्ये सभा घेत आहेत. काही दिवसांअगोदर त्या जळगावमध्ये होत्या, त्या दरम्यान मंत्री गुलाबराव पाटील आणि त्यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगल्याचं दिसून आलं. सुषमा अंधारेंच्या सभेला परवानगीही नाकारली गेली. तर काही ठिकाणी त्यांची जोरदार सभा झाली. यावरून राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चा सुरू झाल्या. दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी शिंदे गट आणि भाजपावर टीका केली आहे. वाचा सविस्तर बातमी...

15:54 (IST) 8 Nov 2022
डोंबिवलीतील सारथी फायनान्स संस्थेच्या अधिकाऱ्याकडून ४० कर्जदारांची फसवणूक

डोंबिवलीतील रामनगरमध्ये कार्यालय असलेल्या सारथी फायनान्स कन्सलटन्सी सर्व्हिसेस या खासगी वित्तीय संस्थेच्या साहाय्यक शाखा व्यवस्थापकाने सारथीकडून कर्ज घेतलेल्या कर्जदारांना स्वताच्या बँक खात्यावर कर्ज हप्त्याची रक्कम भरणा करण्यास सांगितली.

सविस्तर वाचा…

15:52 (IST) 8 Nov 2022
मुंबई : ४५ वर्षे जुन्या घाटकोपर-विक्रोळी रेल्वे स्थानकादरम्यानच्या उड्डाणपुलावर हातोडा; नवीन केबल स्टेड उड्डाणपूल उभारणार

मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवरील काही ब्रिटीशकालिन उड्डाणपूल पाडून त्याऐवजी वांद्रे सागरी सेतुप्रमाणे केबल स्टेड पूल महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून (महारेल) उभारले जाणार आहेत. घाटकोपर आणि विक्रोळी रेल्वे स्थानकादरम्यानही ४५ वर्षे जुना उड्डाणपूल पाडून त्याऐवजी केबल स्टेड उड्डाणपूल उभारण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सविस्तर वाचा…

15:46 (IST) 8 Nov 2022
पुण्यात अब्दुल सत्तारांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन, राजीनामा न दिल्यास पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग अडवण्याचा इशारा

बेताल वक्तव्य करणारे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी पुण्याच्या मावळमध्ये चप्पल – जोडे मारत आंदोलन केले. शिंदे- फडणवीस सरकारचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. बातमी वाचा सविस्तर...

15:07 (IST) 8 Nov 2022
पुणे: मतदान यंत्रे ठेवण्यासाठी रावेतमध्ये स्वतंत्र गोदामं; ७५ हजार यंत्रे ठेवण्याची क्षमता

केंद्रीय निवडणूक आयोगाची मतदान यंत्रे (इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन - ईव्हीएम) आणि व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) ठेवण्यासाठी जिल्ह्यात अत्याधुनिक असे गोदाम उभारण्यात येणार आहे. बातमी वाचा सविस्तर...

15:01 (IST) 8 Nov 2022
ठाणे : कशेळी खाडी पुलावर माती आणि रेतीच्या ढिगाऱ्यांमुळे अपघातांची भिती

ठाणे आणि भिवंडी शहरातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या कशेळी-काल्हेर रस्त्याची दुरावस्था झाली असतानाच, या मार्गावरील कशेळी खाडी पुलावर माती आणि रेतीचे ढिगारे साचल्याची दिसून येत आहे. या ढिगाऱ्यांमधील माती व रेती रस्त्यावर इतरत्र पसरून त्यावरून दुचाकी घसरून अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे. सविस्तर वाचा…

14:28 (IST) 8 Nov 2022
नागपूर : हिवाळी अधिवेशनाकरिता तात्पुरत्या स्वरुपातील भरतीसाठी तरुणांना आवाहन; २४ नोव्हेंबर अर्जाची अखेरची तारीख

नागपूर येथे होणा-या हिवाळी अधिवेशनासाठी लिपिक टंकलेखक आणि शिपाई व संदेशवाहकांची तात्पुरत्या पूर्णतः हंगामी स्वरूपात पदे भरण्यात येणार आहेत. लिपीक-टंकलेखकांची एकूण १० पदे आणि शिपाई व संदेश वाहकांची एकूण २४ पदे भरण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सविस्तर वाचा…

14:22 (IST) 8 Nov 2022
मनसेचा सायंकाळी हर हर महादेव चित्रपटाचा मोफत शो; राष्ट्रवादी-मनसे समोरासमोर येण्याची शक्यता

ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात सोमवारी रात्री राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडल्यानंतर मनसेनेचे नेते अविनाश जाधव यांनी चित्रपटगृहात धाव घेत पुन्हा हा शो सुरू केला होता. दरम्यान, या वादाचे पडसाद आजही उमटण्याची शक्यता आहे. मनसेने याच मॉलमध्ये सायंकाळी ६:१५ वाजता मोफत शो ठेवला आहे. सविस्तर वाचा…

14:19 (IST) 8 Nov 2022
सीएसएमटी पुनर्विकासासाठी पाच महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण होणार; पुनर्विकासाला मिळणार गती

ऐतिहासिक अशा सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाला गती दिली जात असून त्या कामासाठी एखाद्या कंपनीची निवड करून पाच महिन्यात काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. देशभरातील १४ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून  त्यात सीएसएमटी स्थानकाचा समावेश आहे. सविस्तर वाचा…

14:10 (IST) 8 Nov 2022
पुणे: खाद्यान्नावरील जीएसटीचे दर कमी करण्याची मागणी

अवकाळी पावसाने सर्व प्रकारच्या पिकांना फटका बसला असून सध्या बाजारांमध्ये खाद्यान्न वस्तूंचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले आहेत. बातमी वाचा सविस्तर...

13:48 (IST) 8 Nov 2022
अडीच वर्षात कधी मातोश्री बाहेर न पडलेल्या मुख्यमंत्र्यांनी टीका करणं बंद करावं; नारायण राणेंचा टोला

पुणे : फिकी महिला आघाडी मार्फत राष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेचे उदघाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले.केंद्रीय मंत्री नारायण राणे माध्यमांशी संवाद साधला आणि दुष्काळ तसेच उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा आणि राज्यातून बाहेर गेलेले प्रकल्प, अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. बातमी वाचा सविस्तर...

13:18 (IST) 8 Nov 2022
मुंबई : सेंच्युरी मिल संक्रमण शिबिर परिसरातील खड्डयात पडून बीडीडीवासीयाचा मृत्यू

सेंच्युरी मिल प्रकल्पातील म्हाडाच्या संक्रमण शिबिर परिसरातील खड्डयात पडून वरळी बीडीडीतील स्थलांतरी रहिवाशाचा रविवारी मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर बीडीडीवासीय आक्रमक झाले असून म्हाडाकडून संक्रमण शिबिरात सोयीसुविधांची वानवा असल्याचा आरोप होत आहे. सविस्तर वाचा…

13:17 (IST) 8 Nov 2022
दिवाळीच्या दिव्यामुळे आग लागल्याने भाजलेल्या मुलीचा अखेर मृत्यू

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिव्यामुळे कपड्यांना आग लागून भाजलेल्या १८ वर्षीय महाविद्यालयीन तरूणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात मुलगी ६५ टक्के भाजली होती. निधी मकवाना(१८) असे मृत मुलीचे नाव असून ती खार पश्चिम येथील इमारतीत कुटुंबियासोबत राहात होती. सविस्तर वाचा…

12:57 (IST) 8 Nov 2022
क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे करणार कृषी तंत्रज्ञान नवउद्यमींमध्ये गुंतवणूक

पुणे: भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आतापर्यंत शेतकऱ्यांना मदत केली आहे. मात्र, आता अजिंक्य रहाणे कृषी तंत्रज्ञान नवउद्यमींमध्ये गुंतवणूक करणार आहे. बातमी वाचा सविस्तर...

12:39 (IST) 8 Nov 2022
शिरुर: घोडगंगा साखर कारखान्यामध्ये अशोक पवार यांचे पॅनेल विजयी

विरोधकांनी प्रतिष्ठेची केलेल्या रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आमदार व कारखान्याचे अध्यक्ष ॲड अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला. बातमी वाचा सविस्तर...

12:34 (IST) 8 Nov 2022
मुंबई : रेल्वेच्या हद्दीतील पूलाचा भाग पाडून टाका; अंधेरी गोखले पुलाबाबत पालिकेचे पश्चिम रेल्वेला पत्र

अंधेरीचा गोखले पूल धोकादायक झाल्याच्या कारणास्तव सोमवारपासून बंद करण्यात आला.  या पुलाचा रेल्वे रुळांवरील भाग तातडीने पाडून टाकावा अशी विनंती महापालिकेने पश्चिम रेल्वेला केली आहे. पूल न पाडल्यामुळे कोणतीही दुर्घटना झाल्यास पालिका जबाबदार राहणार नाही असाही इशारा या पत्रात देण्यात आला आहे. सविस्तर वाचा…

12:31 (IST) 8 Nov 2022
नवी मुंबई: अंमली पदार्थ बाळगणाऱ्या नायझेरियन नागरिकाला अटक

अंमली पदार्थ विक्री वितरण आणि सेवन यामध्ये अनेकदा नायझेरियन नागरिकांचा सहभाग समोर आला आहे. नवी मुंबईतही नुकत्याच झालेल्या एका मोठ्या कारवाईत १० लाख ३० हजार रुपयांचे एम डी (मेथाक्युलॉन हस) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. बातमी वाचा सविस्तर...

12:16 (IST) 8 Nov 2022
पिंपरीत 'हर हर महादेव' चित्रपटाचा शो बंद पाडल्याबद्दल संभाजी ब्रिगेडच्या शहराध्यक्षांसह १३ जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी : विनापरवाना आंदोलन करून विशाल टॉकीज येथे सुरू असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडल्याने संभाजी ब्रिगेडच्या शहराध्यक्षांसह १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बातमी वाचा सविस्तर...

12:03 (IST) 8 Nov 2022
नवी मुंबईतील बांधकाम व्यवसायाला आणि विकासाला चालना देण्यासाठी समिती

नवी मुंबईतील बांधकाम व्यवसायाला आणि विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने सिडको आणि क्रेडाय-एमसीएचआयच्या चार सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे. ही समिती नवी मुंबईतील विकासाच्यादृष्टीने सूचना करणार असून विकासादरम्यान निर्माण होणाऱ्या समस्या सोडवणार आहे.सविस्तर वाचा…

12:02 (IST) 8 Nov 2022
पीएफआयचे देशात ५० हजारांहून अधिक सदस्य!; २०१७ मध्येच १९ पानी दस्तावेज तयार

‘इस्लामिक स्टेट’ (आयएस) या अतिरेकी संघटनेशी ‘पॅाप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या सदस्यांचा थेट संबंध असल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने २०१७मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाला सादर केलेल्या १९ पानी डॅासिअरमध्ये (दस्तावेज) दिली होती, असे कळते. त्यावेळी या संघटनेचे अस्तित्व दक्षिणेतील केरळ व तामिळनाडू या दोन राज्यांपुरतेच होते.

सविस्तर वाचा…

11:45 (IST) 8 Nov 2022
नागपूर : हेमंत जांभेकर यांचे पोलिसांनी नोंदवले जबाब, महाठग अजित पारसे प्रकरण

स्वतःला मीडिया विश्लेषक असल्याचे सांगणाऱ्या महाठग अजित पारसेने क्रूड अँड बायोफ्यूल फाऊंडेशनचे अध्यक्ष हेमंत जांभेकर यांच्या फाऊंडेशनमध्ये सचिव पद मिळवले होते. जांभेकर यांनाही जाळ्यात अडकवले होते. जांभेकर यांचा गुन्हे शाखेने जबाब घेतला आहे. सविस्तर वाचा…

11:37 (IST) 8 Nov 2022
पुणे महापालिका प्रशासनाकडून १९३ कोटींची निविदा; शहरातील ५० रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार

पुणे : शहरातील दुरवस्था झालेल्या रस्त्यांचे डांबरीकरण आणि सिमेंट काँक्रिटीकरणासाठी १९३ कोटी रुपयांची निविदा महापालिका प्रशासनाकडून काढण्यात आली आहे. त्या अंतर्गत प्रमुख ५० रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे. बातमी वाचा सविस्तर...

11:22 (IST) 8 Nov 2022
मनसेचा सायंकाळी हर हर महादेव चित्रपटाचा मोफत शो; राष्ट्रवादी-मनसे समोरासमोर येण्याची शक्यता

ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात सोमवारी रात्री राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडल्यानंतर  मनसेनेचे नेते अविनाश जाधव यांनी चित्रपटगृहात धाव घेत पुन्हा हा शो सुरू केला होता. दरम्यान, या वादाचे पडसाद आजही उमटण्याची शक्यता आहे. मनसेने याच मॉलमध्ये सायंकाळी ६:१५ वाजता मोफत शो ठेवला आहे. सविस्तर वाचा…

11:15 (IST) 8 Nov 2022
पुणे: सदाशिव पेठेत गुंगीचे ओैषध देऊन तरुणीचे अपहरण; दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल

सनदी लेखापाल (सीए) परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीला गुंगीचे ओैषध देऊन अपहरण करण्यात आल्याची घटना सदाशिव पेठेत नुकतीच घडली. तरुणीला कल्याण येथे डांबून ठेवण्यात आले होते. बातमी वाचा सविस्तर...

10:58 (IST) 8 Nov 2022
चंद्रपूर : भररस्त्यात हत्येचा थरार; धारदार शस्त्राने तरुणाचा शिरच्छेद

शहरातील दुर्गापूर परिसरात भररस्त्यावर हत्येचा थरार अनुभवायला मिळाला. ७ ते ८ आरोपींनी धारदार शस्त्राने एका ३५ वर्षीय तरुणाचा शिरच्छेद केला. ही थरारक घटना सोमवारी रात्री १०.३० च्या सुमारास घडली. महेश मेश्राम, असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सविस्तर वाचा…

maharashtra-live

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

Story img Loader