Mumbai-Maharashtra News Updates, 07 November 2022 : महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका कधीही घोषित होण्याची शक्यता असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होते. राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील संपर्क प्रमुखांच्या बैठकीत ठाकरे बोलताना उद्धव ठाकरेंनी मध्यावधी निवडणुकीची शक्यता व्यक्त करताना कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचनाही दिल्या. उद्धव ठाकरेंच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून प्रतिक्रिया उमटत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याचबरोबर आर्थिक दुर्बलांना (ईडब्ल्यूएस) नोकरी आणि प्रवेशांसाठी देण्यात आलेल्या १० टक्के आरक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालय आज (७ नोव्हेंबर) निकाल देणार आहे. १०३ व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून ही आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती. आरक्षणासह घटनादुरुस्तीच्या वैधतेला वेगवेगळ्या याचिकांच्या माध्यमातून आव्हान देण्यात आलेले होते. याच याचिकांवर सरन्यायाधीश उदय लळित यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठातर्फे हा निकाल देण्यात येईल, यावरही अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असून हा विषयही दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

Live Updates

Maharashtra News Updates : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

11:13 (IST) 7 Nov 2022
ठाणे : चुलीचा धूर घरात आल्याने दोन जणांवर कोयता, चॉपरने जीवघेणा हल्ला

चुलीचा धूर घरात आल्याने महिला आणि तिच्या पतीने दोन जणांवर कोयता आणि चाकूने हल्ला केल्याचा प्रकार भिवंडी येथील अंजूरफाटा भागात शनिवारी उघडकीस आला आहे. लालचंद्र पाटील आणि त्यांचा पुतण्या विघ्नेश अशी जखमींची नावे आहे. सविस्तर वाचा…

11:12 (IST) 7 Nov 2022
नागपूर : खळबळजनक, अज्ञात आरोपींनी चक्क पोलिसांची वाहने जाळली

नागपूर : काही असामाजिक तत्त्वांनी वसंतराव नाईक झोपडपट्टी परिसरातील पोलीस चौकीसमोर उभ्या पोलिसांच्या ३ वाहनांना आग लावली. यात तिन्ही वाहन पूर्णत: जळाली. आरोपींनी चक्क पोलिसांची वाहने जाळल्यामुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सविस्तर वाचा…

11:11 (IST) 7 Nov 2022
नागपूर : पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या

नागपूर : पत्नीच्या जाचाला कंटाळून नागपुरातील एका व्यक्तीने मोहगाव (झिल्पी) तलावाजवळील भिवकुंड नाल्याजवळ पेट्रोल अंगावर ओतून पेटवून घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचा…

11:09 (IST) 7 Nov 2022
नागपूर : शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत रिंगणात उतरलेल्या संघटनांसमोर पेच

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिक्षक संघटना सक्रिय झाल्या आहेत. स्वत:चा उमेदवार लढवायचा की कुणाला पाठिंबा द्यायचा, हे काँग्रेसने अद्यापही जाहीर केलेले नाही. तर भाजपा शिक्षक आघाडी आणि शिक्षक परिषद भाजपकडून उमेदवारीसाठी मागणी करत असले तरी भाजपनेही अद्याप कुणालाही पाठिंबा दिलेला नाही.

सविस्तर वाचा…

11:04 (IST) 7 Nov 2022
पुणे: तळेगावात १९ वर्षीय तरुणाचा खून; २० ते २५ जणांनी केले वार!

पुण्याच्या तळेगावमध्ये एका महाविद्यालयीन तरुणाचा हकनाक बळी गेला आहे. २० ते २५ जणांच्या टोळक्याने कोयता आणि लोखंडी रॉडने वार करून तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे तळेगावात एकच खळबळ उडाली आहे. बातमी वाचा सविस्तर…

11:00 (IST) 7 Nov 2022
‘भारत जोडो’ यात्रा आज राज्यात; नांदेड शहरात १० नोव्हेंबरला सभा

नांदेड : काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीहून सुरू झालेल्या ‘भारत जोडो’ यात्रेला दोन महिने पूर्ण होत असून ‘मुझे चलते जाना हैं; बस चलते जाना..!’ म्हणत निघालेले सव्वाशे भारतयात्री आज, सोमवारी नांदेड जिल्ह्यात दाखल होत आहेत. सविस्तर वाचा

10:57 (IST) 7 Nov 2022

नागपूर : पत्नीच्या जाचाला कंटाळून नागपुरातील एका व्यक्तीने मोहगाव (झिल्पी) तलावाजवळील भिवकुंड नाल्याजवळ पेट्रोल अंगावर ओतून पेटवून घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. राहुल श्यामलाल बोरीकर (४५) रा. अयोध्यानगर परिसर साई मंदिरजवळ, नागपूर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सविस्तर वाचा

शरद पवार (File Photo)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरू होते.